Welcome to misalpav.com
लेखक: धन्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

@ इस्पीकचा एक्का: सहमत आहे अन रोचकही. @अभ्या: ते चादरीचे उदाहरण अन मारलेल्या रेडकाचे उदाहरण यात लै फरक आहे बे. तुझा मुद्दा समजला पण सहमती नाही कारण प्रकार वेगळा आहे. प्रलोभनात क्रूरता आहे. शेवटी इतना सेंटी नै होनेका वैग्रे सगळे ठीके. नॉनव्हेज मीही दाबत असतो, कोंबडी कापताना पाहिलेय, बकरे कापताना एकदा पाहिलेय. ते एक असोच.... पण इथे काहीचा अज्ञानातील सुखाचा भाग आहे असेही म्हणता येईल. @सौंदाळा: माहिती बरोबर आहे. असे कैक खोजे मुसलमान राजवटीत होते अन त्यांचा वट जनानखानाच का, राजकारणातही लै जबरी होता. तीच गोष्ट चीनची.

संवेदनशील विषयावर तितक्याच संवेदनशीलतेने लिहिलेला लेख. प्रतिसादांमधूनही बरीच नवी माहिती मिळाली. माणसाला 'आपण' जगाच्या केंद्रस्थानी आहोत असं वाटतं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे हे अशा वेळी पुन्हा लक्षात येतं. अर्थात वासराचं पोट भरुन जितकं दूध उरेल तितकंच वापरणारे शेतकरीही एके काळी बघितले होते - आज त्यांना वेड्यात काढलं जात असण्याची शक्यता जास्त! भवतालच्या सगळ्या गोष्टींचं बाजारीकरण करायची गरज नसते. खरं तर संवेदना कायम ठेवूनही उपभोग घेता येतो - पण आपण हे विसरून गेलो आहोत की काय अशी शंका येते.

सहमत शोषण आणि दोहन भारतीय /आशियायी संस्कृती मध्ये नैसर्गिक साधनांचे दोहन करून उपजीविका करण्याला जास्त महत्व दिले जात असे पाश्चिमात्य संस्कृतीत नैसर्गिक साधनांचे शोषण करून उपजीविका केली जाते . या विषयावर अधिक माहिती साठी श्री दिलीप कुलकर्णी यांचे "निसर्गायण" हे पुस्तक वाचावे . याचा अनुवाद विवेकानंद केंद्र प्रकाशन ने "Ahead To Nature " केला आहे .

या लेखावरुन समजलेले सत्य माणुस हा खुळ्या .....चा प्राणी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो काहीही करु शकतो. माजावर आलेल्या रेड्याचे वृषण ठेचत वगैरे काही नाहीत ते फक्त ताकदीने खेचतात, जेणेकरुन त्यांचा रक्तपुरवठा बंद पडेल .याला आमच्या भागात गोट्या खचवणे असे म्हणतात. एक शंका -एखाद्याचे खच्चीकरण करणे हा शब्दप्रयोग रेड्याच्या बाबतीतून वापरात आला असावा काय?

मस्तच तुम्ही नथु गुग्गुळाचा विचार केलेला दिसतोय. काही तरी डोक्यात शिरायला लागतय तर... पण आता जरा घेतलेत तर बरे...

बाय द वे... माझे जरा इंग्रजी कच्चे आहे आणि वेळ पण नाही... हे ट्रोल म्हणजे काय हो? तुम्हाला कुणीतरी ट्रोल म्हणाले होते का? आणि ते ट्रोलिंग म्हणजे काय? बाकी आपले नेहमीप्रमाणे...तुम्हाला ते पाठ झाले असेलच......

लेख व प्रतिसाद वाचून बरीच माहिती मिळाली , शहरातील आमची ही तिसरी पिढी असल्याने ह्यातील काही सुद्धा माहिती नव्हते , महाराष्टातील प्रत्येक भागात ह्या प्रकाराला काय म्हणतात ह्याची सविस्तर माहिती मिळाली , अपवाद आमच्या खानदेशचा त्यावर सुद्धा कोणी लिहावे.

कदाचित ते खेडयात लहानाचे मोठे झाले असतील त्यामुळे या सार्‍या गोष्टी त्यांनी पाहील्या (त्यांच्या शब्दांत अनुभवल्या) असतील. अर्थात हा फक्त अंदाज आहे. नेमकं काय ते त्यांनाच माहिती. ;)

बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये प्रजननाचा(माजावर येण्याचा) एक ठराविक हंगाम असतो. वर्षातून एक-दोनदाच ते प्रजननासाठी पात्र असतात. पण मनुष्यात असे नसते. या मागे काही उत्क्रांतीविषयीचे कारण आहे काय?

कारण माणसाने " शिणुमा" चा शोध लावला आहे. रंगीत सिनेमातील एकच रंग ठेवून बाकी रंग वजा केले की उत्क्रान्त सिनेमा बघावयास मिळतो. माणूस या बाबतीत " वेगळा" आहे .

त्यापेक्षा थोडे दिवस 'माझे ग्रामीण जीवन' चा अभ्यास तुम्हीच करा की साहेब.... हा वल्ल्या ना, धूर्त आहे लेकाचा. ;) ह. घ्या. साहेब!

माझ्याकडे हा गावाकडचा एकच हटके अनुभव होता. त्यामुळे या विषयावर अजून काही लिहू शकेन असं वाटत नाही. जमलंच तर "आयटीच्या गोष्टीं"चा पुढचा भाग लिहिन म्हणतो. ;)

त्यापेक्षा थोडे दिवस 'माझे ग्रामीण जीवन' चा अभ्यास तुम्हीच करा की साहेब....
ग्रामीण जीवनाचा अनुभव असलेला धनाजीरावांसारखा मित्र आयता असता आम्हांस अभ्यास करायची गरज काये?
हा वल्ल्या ना, धूर्त आहे लेकाचा. ;)
:D

ग्रामीण जीवनाचा अनुभव असलेला धनाजीरावांसारखा मित्र आयता असता आम्हांस अभ्यास करायची गरज काये?
दगडा-धोंडयात लहानाचा मोठा झाल्यामुळे आम्हाला प्रत्येक दगड सुंदर दिसतो. मात्र तुमच्या मैत्रीसाठी उगाचच आम्हाला अजिंठा-वेरुळ, भाजे सारखी लेणी, अडनिडया गावातील मुळची दगडाची परंतू आता उच्च अभिरुचीच्या गावकर्‍यांनी लाख दोन लाखाची वर्गणी गोळा करुन भडक तैलरंगात रंगवलेली मंदीरे तसेच भग्न गड किल्ले पाहत फीरावं लागतं.

मात्र तुमच्या मैत्रीसाठी उगाचच आम्हाला अजिंठा-वेरुळ, भाजे सारखी लेणी, अडनिडया गावातील मुळची दगडाची परंतू आता उच्च अभिरुचीच्या गावकर्‍यांनी लाख दोन लाखाची वर्गणी गोळा करुन भडक तैलरंगात रंगवलेली मंदीरे तसेच भग्न गड किल्ले पाहत फीरावं लागतं.
=)) =)) =))

बरं बरं. पण त्या निमित्ताने तुमचेही पाय ज़रा मोकळे होतात. ज़रा ठंडगार येशीतून बाहर पडून गावकुसाबाहेरची मोकळी हवा खाता येते. काही सज्जन मित्र अचानक कसे चिडतात ते बघता येते, त्यातच कदिमदी महिषी पण सामोरी येते. =))

भारी धागा ... माहितीपुर्ण लेख अन त्यावरची चर्चा एक नंबर :) (अवांतर : मिपा दिवाळी अंक २०२४ मधली संजोप राव यांंची " सुंद " ही कथा वाचताना " सुंद बडविणे" या शब्दाची रेंगाळलो ... अन भरकटत या धाग्याला येऊन पोहोचलो ! )

हुर्र हुर्र ... हुर्र हुर्र ... हुर्र हुर्र ... झक्कास लेख. प्रतिसाद अजून वाचायचेत, तोवर हुर्र हुर्र . .

वृषण ठेचून बैलांना प्राणांतिक वेदना देणे अत्यंत क्रूर मनोवृत्तीचे अवलक्षण आहे. बैलाला नाकातून वेसण घालून उन्हात नांगर ओढायला लावणे, बैलगाडीला जुंपून प्रचंड वजन ओढायला लावणे, चाबकाने झोडपणे, वृषण ठेचून आत्यंतिक प्राणांतिक वेदना देऊन नैसर्गिक उर्मी नष्ट करणे, शर्यतीत पळण्यासाठी शारिरीक अत्याचार करणे आणि म्हातारा झाला की खाटकाला विकणे ही अत्यंत क्रूर मानसिक विकृती आहे. असे करणाऱ्यांचे तळपट होवो व ते कायमचे नरकात पडो.

माणसांनी माणासांना कमी वेतनात जास्त बौध्दिक, शारिरिक कष्ट करुन घेणे अत्यंत क्रूर मनोवृत्तीचे अवलक्षण आहे. मजुरांना डोक्यावर पाट्या वहायला लावून उन्हात तान्हात कष्टवणे, ऐन उन्हाळ्यात वितळत्या डांबरांच्या वाफांंमध्ये भाजत वाहनधारकांसाठी डांबरी सडका तयार करणे, सिमेंट कॉंक्रिट मशिन वर काम करायला लावुन किमी च्या किमी रस्ते तयार करणे, जीव धोक्यात घालुन उंच टॉवर वर पोलादी सांगाडे वेल्ड करणे , २०-२० तास सतत संगणकावर काम करत माना मोडुन, डॉळ्यांच्या खाचा करून विविध व्याधींनी जर्जर होई पर्यंत ताणणे, झोपेच्या नैसर्गिक उर्मी नष्ट करणे, वेतन न वाढवणे, काबाड कष्ट करुन सुद्धा स तत अपमानित करणे अशा आत्यंतिक प्राणांतिक वेदना देऊननैसर्गिक आनंद / सुख हिरावणे, कुटुंबाच्या गावपासुन दुर बदली करणे ही अत्यंत क्रूर मानसिक विकृती आहे. असे करणाऱ्यांचे तळपट होवो व ते कायमचे नरकात पडो.
शतकानुशतके जग हे शोषणावर चाललेय.. जो जेवढं जास्त शोषण करु शकतो तो जास्त धनाढ्य होत जातो.. जो जास्त शोषण करुन घेतो तो वेठ्बिगार होऊन राहतो .. त्याच्या पिढ्यांपिढ्या दारिद्र्यात खितपत पडतात .. समाजातली दरी वाढत जाते .. विषमता वाढत जाते .. एका जगात प्रकाश झगमगत राहतो..रोषणाईने उजळत राहतो .. दुसरीकडं अंधार, दैन्य पिच्छा सोडत नाही .... ........ आणी आपली इच्छा असो वा नसो याच साखळीचा आपण एक भाग असतो.. आपलं दुसर्‍या जगाबद्द्ल वाईट वाटणं हे तात्पुरतं, प्रासंगिक वैराग्य असतं ... कालांतरांन आपण बोथट होत जातो ! ..... हेच अंतीम सत्य ! ......