खटपट्या साहेब हे ज्युरी लोक " फिर्यादी अन गुन्हेगारांना" अनरिचेबल असतात. म्हणजे त्यांच्यावर दबाव येउ शकत नाही. + त्यांच्या सुरक्षिततेची सुद्धा हमी असते. आपल्या येथे असे होउ शकते का?
त्यांच्यावर दबाव येउ शकत नाही हे बरोबर.
पण जॉन ग्रिशम ची पुस्तके वाचल्यास वकील मंडळी ज्युरींचा अभ्यास करुन त्यांना कशा प्रकारे वळविता येऊ शकेल यासाठी कशा नाना क्लुप्त्या लढवितात ते वाचण्यासारखे आहे.
खटपट्या साहेब हे ज्युरी लोक " फिर्यादी अन गुन्हेगारांना" अनरिचेबल असतात. म्हणजे त्यांच्यावर दबाव येउ शकत नाही. + त्यांच्या सुरक्षिततेची सुद्धा हमी असते. आपल्या येथे असे होउ शकते का?
रनवे ज्युरी चित्रपट आठवला...(Runaway Jury 2003) नक्कि बघा.
मिपाचे माननीय सदस्य पिडांकाका यानी लेख लिहिलेले आहेत. व माझ्या अर्धवट माहितीनुसार त्यांनी ते अपुरे ठेवलेले आहेत. या निमि त्तने त्यांनी ते पुर्ण कराअवेत याची मी विनंती करतो.
शक्य असल्यास इथे कोणी त्या लेखांची लिंक देईल काय ?
PJ मोड ऑन
भारतातील न्यायव्यवस्थेतदेखिल लोकांचा सहभाग असतो.
अनुभव घ्यायचा असल्यास खालील प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करून पहावा -
रस्त्यावर वाहन चालवीत न्यावे. तुमचे वाहन चारचाकी असेल तर दुचाकी वाहनाला अथवा तुमचे वाहन दुचाकी असेल तर पादचार्याला किंचित (अक्षरशः किंचित) धक्का द्यावा. आणि -
भारतातील न्यायव्यवस्थेतील लोकांच्या सहभागाचा आस्वाद घ्यावा ;)
PJ मोड ऑफ
असो - अमेरिकेत ज्युरी ड्युटीचे पत्र आल्यास जावेच लागते. नाकारता येत नाही. तसेच तो दिवस हा भरपगारी सुट्टीचा असतो. तुमच्या कंपनीला त्या दिवसाचा पगार तुम्हाला द्यावाच लागतो - काम न करता!
१. अमेरिकेत ज्युरी ड्यूटीसाठी अमेरिकन नागरिकांना जाणं हे ऐच्छिक नाही. कंपल्सरी जावंच लागतं नाहीतर तो गुन्हा ठरतो. हां, तुमची काही स्पेसिफिक अडचण असेल तर दिवस बदलून घेता येतो पण कधी ना कधी जावं हे लागतंच!
२. सगळ्या कंपन्या ज्युरी ड्यूटीचे दिवस पगार देत नाहीत. बर्याच मोठ्या कंपन्या देतात. छोटे एम्प्लॉयर्स ते देऊ शकत नाहीत. अशा वेळी मी जर कामावर गेलो नाही तर मला त्या दिवसाचा पगार मिळणार नाही (इकॉनॉमिक डिस्ट्रेस) हे कारण देऊन तत्कालीन ज्यूरी ड्यूटी करण्यापासून मुक्तता मिळावी म्हणुन अर्जी करता येते. बहुतेक न्यायाधीश ती मान्य करतात.
बाकी इरसाल भाऊंनी मेन्शन केलेल्या लेखनाची लिंक इथे आहे...
http://www.misalpav.com/node/9612
त्यांचं बरोबर आहे, ही मालिका पूर्ण झाली नाही कारण ती केस नंतर पुढे अपील झाली. आणि न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे त्यावर अधिक काही लिहिता आलं नाही. आता कदाचित त्या केसचा पूर्ण निकाल लागला असेल पण आता इतक्या दिवसानंतर शिळ्या कढीला ऊत आणण्यात काय मतलब? म्हणून ती मालिका तशीच सोडली, झालं.....
:)
प्रतिक्रिया
खटपट्या साहेब हे ज्युरी लोक "
बरोबर
त्यांच्यावर दबाव येउ शकत नाही.
आल्यावर घेतो तुमच्याकडून
जॉन ग्रिशॅम....
खटपट्या साहेब हे ज्युरी लोक "
यावर
ज्यूरी
लोकांचा सहभाग
बेस्ट प्रतिसाद !
स्कारपिओ / फोर्च्युनर
काही सुधारणा
मला शिळी कढी चालेल काका
सहमत