Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अहो, जीवनभाऊ आपल्या मनोरंजनासाठी आणि धमाल करु देण्यासाठी छान छान लेख लिहितात. त्यांना श्रेणी देणारे आपण कोण? उलट, ज्याला ज्याला पोपट म्हणता येईल अशा वस्तु, अवयव, संस्था, गाणी, वाकप्रचार अशा अनेक संदर्भात प्रतिसाद येऊ लागतील ते एन्जॉय करायचे.

उलट, ज्याला ज्याला पोपट म्हणता येईल अशा वस्तु, अवयव, संस्था, गाणी, वाकप्रचार अशा अनेक संदर्भात प्रतिसाद येऊ लागतील ते एन्जॉय करायचे.
हे वाक्य काळजाला भिडलं. माझं बालपणीचं आवडतं गाणं जवा नविन पोपट हा या गाण्याची आठवण करुन दिल्याबद्दल लेखकाचे आभार मानावे तेव्हढे थोडेच.

खंड्या हे प्रतीक आहे तुमच्या इच्छाशक्तीचे. तुमची इच्छा शक्ती ही लहान असते त्याला खतपाणी मिळाले की ती मोठ्ठी होते. कोणी कितीही पंख छाटले म्हणून इच्छाशक्ती मरत नाही. ती क्षीण होत नाही. वेळ आली की भरारी घेतेच. ...... बलोबल की नाई जीवन काका तुमाला अशेच मनायचे होते ना. माला धा माल्क देनाल ना आत्ता.

इतपर्यंत बरोबर.... "कोणी कितीही पंख छाटले म्हणून इच्छाशक्ती मरत नाही. ती क्षीण होत नाही. वेळ आली की भरारी घेतेच." त्यानंतर पण पुढे आहे... योग्य वेळी खूलासा करण्यात येईल....

"आणि अशा प्रकारे इच्छाशक्तीचे महत्त्व आपल्या जीवनात फार आहे." हे वाक्य नसल्याबद्दल २ माल्क काकाञ्च्या वतीने कमी करण्यात आले आहेत.

तसा आम्हाला कूट सोडवायचा फार नाद न्ह्वता पण काहीतरी "मिथक" घडले आणि आम्हाला तो नाद लागला.बर्‍याचदा आपण स्पष्ट पणे काही लिहू शकत नाही, मग आपण अशा कुटाचा आधार घेतो.संस्क्रुत मध्ये पण अशीच काही अप्रतिम कुट आहे असे ऐकून आहे. नमनाला इतके तेल खूप झाले.... तर आता मी सोडवलेले हे कूट..... ================================================================= "‘पोपट घेता का पोपट’ आसे म्हणत एक पोपट विकणारा तो पोपटवाला आमच्या दारात उभा राहुन ओरडत होता,उन्हाळ्याच्याचे दिवस होते, त्याने आमच्या दारात येऊन पिण्यास पाणि माग़ितले, त्याने पोपट आणणारी ती जाळी आमच्या कट्ट्यावर ठेवली. ते पाहुन मी आणि माझी बहीन ग़ीता त्या पिंजर्यातील पोपट पाहु लाग़लो,आम्ही आईवडीलांना ही पोपट दाखवायला बाहेर बोलवले. ते ही आनंदाने पोपट पाहु लाग़ले,पण त्यातील एका पोपटाच्या डोळ्याला इजा झाली होती, तो पोपट इतरापेक्षा ग़प्प होता. त्या पोपटाला पाहुन मला व आमच्या घरच्यांना खुप दया आली,मग़ मीच म्हणालो, ‘आपण हा पोपट घेऊया ,खुपच गरिब आहे,’ मग़ बाबांनी तो पोपट पन्नास रुपये देऊन विकत घेतला,त्याच दिवशी त्याला कोणते नाव ठेवायच म्हणुन आम्ही त्याला ‘खंड्या’ नाव ठेवल." तुम्ही हा पहिला परिच्छेद नीट वाचला असेलच. एका रुढी परंपरेत अडकत चाललेला माणूस ह्यांना दिसला.तो डोळस पण नाही आणि पुर्णतः आंधळा पण नाही.म्हणजे त्याला घडवायचा पुर्ण चानस आहे.बरे आणि तो घेतला कुणी तर "जीवन-गीता" ह्या भावंडांनी.म्हणजे आता ते त्याला "जीवन-गाणे" शिकवायला मोकळे झाले.(मोकलाया चा इथे काही संबंध नाही) पोपटाचे नांव खंड्या ठेवले आहे.खंड्या हे "किंग फिशरचे" मराठी नांव आहे. पोपट हा शाकाहारी पक्षी आहे तर खंड्या हा मांसाहारी पक्षी आहे. हा सुक्ष्म फरक पण इथे लक्षांत घेण्यासारखा आहे.आणि परत तो गरीब पण आहे... "थोडक्यात एक गरीब शाकाहारी आणि रुढी परंपरा जपायच्या बेतात असणार्‍या माणसाला मांसाहारी घराण्याने आश्रय दिला." इथे पहिला अंक संपला ------------------------------------------------------- "आमच्या बाग़ेतील पेरु काढुन त्याला आम्ही भरवत आसे, काही दिवसानी स्वारी चाग़लीच ग़ुबग़ुबीत झाली. आमच्या बाग़ेत तो आनंदी आसायचा. घरच्यांना तो आता खुप आवडे. कधी कधी खंड्या उडून जाईल आशी भिंती वाटायची, म्हणुन एक दिवस माझ्या बाबांनी त्याचे पखं थोडेसे छाटले ,तरी तो थोडाफार उडू शकत आसे.पण त्याला इतर पोपट प्रमाणे ग़ग़न भरारी घेता येत नसे. आमच्या घराच्या पलिकडे बाग़ होती तेथील पांढर्या भिंतीवर जाऊन बसणे हा त्याचा उद्योग होता. कधी कधी हा महाशय आमच्या बाथरुम च्या खिडकीत बसत, आमच्या आईने ठेवलेला हिरव्या रंग़ाचा साबण त्याला पेरु सारखे वाटे, आणि तो साबणा चे तुकडे चोचीत धरत ,कधी कधी तो ग़िळत ही आसे, नशिबी त्याला त्याचा त्रास झाला नाही, जेव्हा माझ्या आईने तेथे साबण ठेवायचे बंद केले तेव्हा त्याचा तो उद्योग थांबला." आता तुम्हाला दुसरा अंक थोडा फार समाजायला लागला असेल....नसेल समजला असे समजून लिहीत आहे.... "तर आता हा पक्षी त्यांच्या घरांत रुळायला लागला.हिरवे काही दिसले तरी खायला लागला."मी जनरली नोटांना हिरवा रंग देतो.म्हणून मला पण साबणाच्या जागी "हिरव्या नोटा" दिसायला लागल्या. म्हणजेच तो पाळीव पोपट आता मांसाहारी तर झालाच पण शिवाय पैसे पण खावु लागला. इतर पक्ष्यांच्या नादी लागून त्याने पळून जावू नये म्हणून हाय कमांडने पंख पण थोडेसेच कापले.थोडक्यात पदोवनीती केली. इति दुसरा अंक संपला....आता तुम्हाला तिसरा अंक समजेल....तर वळू या तिसर्‍या अंका कडे.... --------------------------------------------------------------- "आनेक दिवस झाले आता तो आमच्याबरोबर राहुन माणसाळलेला होता,आता हा आपणाला सोडुन जाणार नाही आसे वाटल्याने वडीलानी त्याचे पंख छाटायचे बदं केले, जवळ जवळ वर्ष होऊन ग़ेले आसेल , आणि एक दिवस त्या पांढर्या भिंतीवर बसलेला खंड्या, ज्याच्याकडे आम्ही सर्व पाहत होतो, किती ग़ोड दिसत होता तो, आकाशात एक पक्ष्याची माळ आम्ही पाहीली खंड्याने ही ते पाहीले, ते पक्षी सर्व पोपट होते, खंड्या ही ते निरखुन पाहत होता, एका एक त्यान ही पंख पसरुन भरारी घेतली, आणि आमचा खंड्या त्याच्या भाईबंधा बरोबर निघुन ग़ेला. माणसाळलेल्या या पक्षाला आशी ग़ग़ण भरारी घेण निश्चितपणे सोपे नसणार.मी त्यावेळी खुप रडलो, त्या दिवशी रात्री घरचे कोणी जेवले नाहीत,मी तर दोन दिवस उपाशी होतो. आमच्या घरच्या प्रेमावर मात करुन त्याने ती ग़ग़ण भरारी घेतली होती. आम्हाला त्याची खुप सवय झाली होती, त्याला भुक लाग़ली की कसा ओरडत होता यामुळे घर सुन्न झालं होते. आता आमचा खंड्या परत येणार नाही आशी मनाची समजुत घातली." पदोवनीती केल्याने नाराज झालेला पोपट सूड घेतल्या-शिवाय राहील का? पण त्याने वाट बघीतली आणि योग्य वेळ येतांच तो आपल्या इतर भाउबंदात सामील झाला. बाकी असे कुणी निघून गेले की हाय कमांड गेले उडत असे म्हणतात "आठवा काँग्रेस अरस आणि इतर सुरस बारागावच्या कहाण्या" पण हे घराणे सुशिक्षीत असल्याने त्यांनी अन्न सत्याग्रहाचा अवलंब केला. इथे आपला तिसरा अंक संपला.... आता चौथा आणि शेवटचा अंक..... वरील तिन्ही अंक वाचलेत तर चौथा अंक हा नेहमी घडणारा आहे.त्याचे नांव आहे "अगं अगं म्हशी..." ---------------------------------------------------------------------- "आसेच एक वर्ष ग़ेले, खंड्या ला काही प्रमाणात विसरलो होतो,एवढ्यात एक मजेशीर घटना घडली, एकदा माझे बाबा शेतामध्ये तपासणी करत होते, त्याच्या बरोबर दोन कामग़ार ही होते,एकदम एकाने बोट दाखवुन म्हटलं, ‘बघा बघा पाटील साहेब पक्षाचा थवा उडतोय आकाशात’, बाबा ते निरखुन पाहीले तर ते पोपट होते,त्यातील एक पोपट सग़ळ्याच्या माग़ुन आणि कमी वेगाने उडत होता. त्याना तो खंड्याच वाटला. त्याचे पखं इतर पोपटापेक्षा वेग़ळे वाटले,त्यामुळे बाबांना तो पक्की खात्री पटली की तो खंड्याच होता. त्या दिवशी माझे वडील घरी आले, तेव्हा ते आतिशय उत्तेजीत झाल्यासारखे दिसले, आल्या आल्या ते आम्हाला हाका मारून आम्हाला म्हणाले, ‘आज काय झाले आसेल सांग़ा पाहु?’, आम्ही त्याच्या चेहर्याकडे पाहत होतो, पुढे म्हणाले, ‘ आपल्या खंड्याला मी पाहीलं ‘ मग़ आम्ही एका सुरात ओरडलो,’आम्हाला ठाऊक आहे, माग़च्या बाग़ेत येऊन बघा,चला,’ आम्ही सर्व लग़बग़ीनं माग़च्या दिशेला नेले , तर त्या पांढर्या भिंतीवर नेहमी बसतो तसा आमचा खंड्या बसलेला होता. तो आमच्याकडे आशा नजरेने पाहत होता की,त्याला काही तरी आम्हाला साग़ावयाचे आहे की, ‘कायमचा थोडाच ग़ेलो होतो तुम्हाला सोडुन? चला माझे पेरु आणा बरं,खुप भुक लाग़ली आहे’." तुम्ही जर शेवटचे वाक्य नीट वाचले असेल तर तुम्हाला कथा नक्कीच समजली असेल...तरी पण मी अर्थ सांगूनच टाकतो...मुद्दाम गहन विचार करून काहीतरी अर्धवट ठेवायला मी "मठ्ठ विचारी" नाही... तर मिपाकरांनो अशाप्रकारे दुसर्‍या पक्षांत सामील झाल्यावर जे होते तेच ह्या "पोपटाचे" पण झाले.त्याला पण आयत्या अन्नाची सवय झाली होती.म्हणून त्याने पांढरे निशाण (म्हणजेच ती पांढरी भिंत) दाखवले आणि परत मूळ घरी येण्याची इच्छा प्रकट केली... पण कशी तर अन्न मागून हिरवा साबण मागीतला नाही.... अशा प्रकारे हे ......आश्रीत पोपट राव दल बदली करून आपल्या घरी परत आले.... अशा एका वाक्यांतला लेख मिपा मध्ये टाकता येत नाही हे लेखकाला माहीत असल्याने त्याने लेख फुलवला आहे का? अशी शंका मनांत आल्याशिवाय रहात नाही..... एक डिस्क्लेमर ......एका नेत्याचा आणि त्यांच्या प्रकाशित झालेल्या "चर्चा करायला बोलावले तर जाईन" ह्या वाक्याचा वरील लेखाशी काहीच संबंध नाही....... एक विनोद म्हणूनच ह्या प्रतिसादाकडे पाहिले जावे , ही विनंती.....

अशा एका वाक्यांतला लेख मिपा मध्ये टाकता येत नाही हे लेखकाला माहीत असल्याने त्याने लेख फुलवला आहे का? अशी शंका मनांत आल्याशिवाय रहात नाही.....
मग तो एकोळी धागा होतो ना? तसे जीवन्राव चलाक आहेत. आन मुवि तुम्ही दहा चलाक आहात. काय खुलवलाय ग्रंथ आय मिन अर्थ! अगदी पुराणिक बुवा डोळ्यासमोर उभे राहिले. एक बारिकशी शंका...पोपटाचे नाव खंड्या हे मनोहर वाटते का?

बाकी मिपा प्रथे प्रमाणे प्रतिक्रियांनी धाग्याचा गुंता केला तरी सुंदर अनुभव , लेख आवडला , खन्ड्या पक्षाबद्दल फारशी माहिती नाही !!! पण त्याच पंख कापण म्हणजे क्रूर पणा वाटला

पंख छाटणे हे प्रतीक आहे. उदा: सोनियाजीनी शरद पवारजींचे पंख छाटले. किंवा बाळासाहेबानी राणेंचे पंख छाटले. आता या वाक्यावरून वरील दोन्ही पोपट स्वगृही कधी येतील हे विचारणे चूक आहे.

नाव वाचुन आधी वाटले की कुत्र्याची गोष्ट असेल. पण "पोपट" झाला. खंड्या नावाचा कुत्र्याचे नाव असलेला किंगफिशर पोपट !

लेख आवडला .. ( पूर्वी काय लिहिले आहे त्याच्या फंदात मी पडत नाही .. प्रत्येक लेख नवा !)