Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हे बघा असे करुन तुम्ही स्वतःच तुमच्या डोस्क्याला उजवीकडुन भोक पाडत आणी समोरुन टेंगुळ व टक्कल पाडत आहात वर डोळे मिच्मिचे होतील सो अलग. आवरा.....सावरा स्वतःला.

माफ करा थोडे स्पष्ट बोलतो आहे. पण आपले लेख / कथा जे काही आहे ते खुप बाळबोध आहे आणि त्यावर बरीच मेहनत घेण्याची गरज आहे. मिपावर बहुतांशी हौशे लेखकच आहेत. पण तरीही लेखन बर्‍यापैकी कसदार असते. हे मात्र खुपच उथळ, बालीश आणि बाळबोध वाटते आहे. एक कथाबीज मनात आल्यावर त्याच्यावर लगेच लेख नाही पाडता येत हो. आणि प्रत्य्के कल्पनेवर किंवा अनुभवावर एक लेखही बनत नाही. नाहितर इथल्या प्रत्येकाने आजवर शेकडो लेख पाडले असते. त्यामुळे लेख पाडण्याची घाई न करता एक वाचनीय लेख होइपर्यंत जरा दम धरा अशी नम्र सूचना.

मला वाटते, मुद्दाम गहन विचार करून काहीतरी खरडण्यापेक्षा हे लेखक बरे आहेत... त्यांचा दुसरा एक उत्तम गूण म्हणजे... कुणी निंदा अथवा वंदा ते स्वतः कुणाचीच बाजू घेत नाहीत. उपद्रवी प्रतिसादांपेक्षा हे असे निरुपद्रवी लेख खूप परवडले... बरे ते कधी म्हणत पण नाहीत की माझे लेख वाचा आणि त्यांनी एक पण वेडा=वाकडा प्रतिसाद पण दिला नाही आहे. भले मला भाऊंचे लेख आवडत नसतील.पण जो पर्यंत ते अनावश्यक राळ उडवत नाहीत तो पर्यंत मी त्यांच्या लेखनाला विरोध करणार नाही. (तुम्ही वैयक्तिक घेत नाही, ह्याची मला खात्री आहे.)

तुम्ही वैयक्तिक घेत नाही, ह्याची मला खात्री आहे
ओय्ये की फर्क पैन्दा है....... सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची शी"==== (अर्र "उ" लिहायचा राहीला वाटते)

मृत्युन्जय यांच्याशी असहमत. जीवन भौ ना जसे लिहायचे आहे तसे लिहु दे. लोक त्यांच्या लेखांबाबत चांगले वाईट ते ठरवतील. बालीश/दखल न घेन्याजोगे असेल तर ते आपोआप मागे पडेल हळू हळू प्रतिसाद कमी होत जातील. अर्थात ज्या लेखनाला जास्त प्रतिसाद मिळतात ते सकस असतेच असेही नाही. जीवन भौ मात्र मृत्युन्जय भौंच्या सूचनेवर थोडा विचार करा असे मी सुचवेन

वाचक आपले आभारी आहे , कोणाला कथा आवडतात कोणाला नाही , पण लेखन मला आवडतं, जरा वेग़वेग़ळ्या आशा कथा लिहायला आवडतात, पण माझ्या चार पैकी एक तर कथा नक्कीच तुम्हाला आवडेल. पण मी लिहीलेल्या माझ्या कथा सग़ळ्यच सर्वाना आवडतील आशा नाही.

"वाचक आपले आभारी आहे , कोणाला कथा आवडतात कोणाला नाही , पण लेखन मला आवडतं, जरा वेग़वेग़ळ्या आशा कथा लिहायला आवडतात, पण माझ्या चार पैकी एक तर कथा नक्कीच तुम्हाला आवडेल. पण मी लिहीलेल्या माझ्या कथा सग़ळ्यच सर्वाना आवडतील आशा नाही." बिंधास्त लिहा...फक्त विजूभाउंच्या सुचनेचा आदर करा... लेखकाला लेखन स्वातंत्र्य हवेच. बाय द वे मी तुमच्या लेखांची टर उडवतो, ह्याला तुमची काही हरकत नाही ना?

कथा आवडली. व्याकरणाच्या काही चूका आहेत. बाकी काही शब्दं बोलीभाषेतले जसेच्या तसे लिहिले आहेत. उदा आम्ही असे करिय आसे, ते ही आवडले. कथनात अजून सफाई येऊ शकते. लिहित रहा.