प्रत्येकांच व्यक्ती म्हणुन जे स्वातंत्र्य आहे ना एक सारासार विचार करुन-अनुभव घेउन-चुका करुन/सुधारुन आपल्या जीवनात आपला निर्णय घेण्याच ते अबाधित राहावं.आपल्या धडावर आपलं च डोक असाव. ते या cult मध्ये माणुस हरवुन बसतो. बाकी प्रत्येकाला जीवनात जगायला स्वतःसाठी एक तत्वज्ञान लागतच. फक्त ते आपल स्वतःच्या अनुभवातुन/चिंतनातुन आलेल असल म्हणजे झाल.
मी एकदा एका जपान लाइफ नावाच्या एका MLM कंपनीच्या कार्यक्रमाला गेलो होतो. (हे एका महान गादी रुपये एक लाख फक्त कींमत असलेल्या सेमिनार होते ) माझ्या मित्राच्या (?) भयानक आग्रहानंतर आणि कुछ दोस्त की खातिर जसे आपण कधी कधी नादानी करतो तसे. आणि काय सांगु तुम्हाला पुढील काही तासांत जी काही अफाट करमणुक झाली की ज्याचे नाव ते. आणि त्याच बरोबर मला दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीये याचा आणि मित्राला दोस्त दोस्त ना रहा असा प्रत्यय मी त्यात जॉइन व्हायला नकार दील्यावर एकाच वेळी आला.
अॅम वे हा एक मोठा कल्ट
विजुभाउजी
हा ही एक मह्त्वाचा मुद्द्दा आहे की फक्त धर्माशी संबधित किंवा धर्म आधारीत च संघटना कल्ट असतात असे अजिबात नाही. धर्माशी काहीही संबध नसलेली AMWAY ही एक कल्ट च आहे कारण ती अनेक निकषांवर कल्ट प्रमाणे च काम करते.
जालावरील खालील दुवे आपण अवश्य अभ्यासा यावर भरपुर खल अगोदर च झालेला आहे. यातील काही भाग तर प्रचंड मनोरंजक आणि धक्कादायक असा आहे.
http://marriedtoanambot.blogspot.in
http://amwayglobalcultintervention.blogspot.in
माझ्या हाताला एखादाजरी अॅमवे वाला लागला ना...संपलाच समजा. 'ह्ये धुते' मी त्यांना. सुरवातच करायची "हे बघ तू मला मित्र -मैत्रीण न समजता एक टारगेट समजते आहे, अन मला सुद्धा टार्गेटचीच गरज होती"..अशे पळतात म्हणुन सांगु..मागच्या बाजुला धूर निघालेला अगदी स्पष्ट दिसतो.
डावी विचारसरणी हाही एक मोठाच कल्ट आहे. सर्वांत मोठी मजा अशी की लोकांना वाटते की अन्य कल्ट ना कल्टी दिली की माणूस आपोआप डाव्या विचारसरणीकडे झुकतो. पण हाही एक कल्ट आहे हे लोकांना कळत नाही.
डावी विचारसरणी फॉलो करणारे बरेच कॉम्रेड वागणुकी च्या बाबतीत खरोखर एखाद्या धर्मा वर आधारीत कल्ट च्या मेंबरांना ही बहुतेक वेळा भारी पडतात. त्यांचे मार्क्सवादा ला एखाद्या धर्मा सारखे पवित्र मानणे किंवा मार्क्स वाक्यं प्रमाणं धरुन चालणे हे अगदी उघड कल्टीश असले ( यांना च वैतागुन मार्क्स म्हणाला होता thank god i am not communist) तरी ही कम्युनीझम खालील काही कारणासाठी त्याला कल्ट म्हणन्यात अडचण येते असे माझे मत आहे ती कारणे अशी-
१- कम्युनिझम चे एकच एक असे केंद्र आता तरी उरलेले नाही जसे चायनीज-इंडीयन-क्युबन आपापल्या interpretation प्रमाणे मार्क्सवाद राबवितात
२-ती विचारसरणी ही इतकी निरनिराळे फाटे फुटुन वेगळी झालेली आहे की एक दुसर्या पे़क्षा अगदी स्वतंत्र झालेल्या आहेत जसे माओवादी-भाकप-चायनीज जे मर्यादेत कॅपिटलला ही गैर मानत नाही तात्पर्य अगदी वेगळ्या विचारसरणी आहेत.
३-किंवा एकच एक असा एखादा स्टेलिन सारखा लिडर ही नाही जो सर्वांना कंट्रोल करतो किंवा एखादा एकच कंट्रोल ग्रुप नाही.( जे असते तर सह्ज कल्ट म्हणता आले असते)
४-सर्वात मोठी अडचण अशी असते की जर इतक्या व्हेग विखुरलेल्या विचारसरणि ला जर कोंबुन कल्ट मध्ये कोंबले तर मग कल्ट ची व्याख्या प्रमाणा बाहेर ताणली जाउन आपला अर्थ आणि रोख हरवुन बसते. त्यामुळे जे खरेखुरे कल्ट स्पेसीफिकली टारगेट होउ शकत नाहीत.
आणि मग ती संकल्पना ( ब्रम्ह किंवा ताओ सारखी ) अतीसर्वसमावेशक होउन जाते ज्यात काय वाटेल ते कोंबण्याची मुभा मि़ळते. या वर माझ्या अल्प माहीती प्रमाणे या क्षेत्रांतील तज्ञांनी ( मी नव्हे) एक क्याटेगरी वापरली आहे जी अगदी अचुक अशी टर्म आहे. ती म्हणजे not cult but cult-like
तर अगदी अचुक म्हणावयाचे तर माझ्या मते आपण असे म्हणु शकतो की
communism is not a cult but cult-like.
यांना अप्रत्यक्षपणे काही सुचवायचय का ?
भारतातील बाँबस्फोटवादी संघटना यात मोडू शकतात... यांच्यात आत्मघातकी सदस्यही असतात. त्यांना मोबदला म्हणून देण्यासारखे काही नसेल तर 'जन्नत आणि मग हूर' अशी काय काय प्रलोभने दाखवली जातात.
भारतातील निधर्मांध मंडळी हा पण एक कल्ट आहे. अरूंधती रॉय, महेश भट्ट, तिस्ता सेटलवाड, निखिल वागळे, प्रफुल्ल बिडवाई इ. या कल्टमध्ये अग्रस्थानी आहेत. या कल्टमध्ये नुकतेच अनंतमूर्ती, अमर्त्य सेन इ. मंडळी जॉईन झाली आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट इ. पक्षातील मंडळी या कल्टचे तहहयात सदस्य असतात.
हारएसएस हा ही एक कल्टच आहे की... गांधीजीना शिव्या देणे, जातीयवाद पसरवणे ,हिंदू मुस्लिमात लावुण देणे हे आपले काम आहे असे हारेएसी कल्ट समजतात ....एका विशिष्ट जातीचे लोक या कल्टचे तहहयात सदस्य असतात.
हारेसेस मुळेच बिहारात पूर येतो ,महाड चिपळूणला तर दरवर्षी येतो .कांदा महाग होतो दुधाचा भाव दर दोन महिन्याला वाढतो विक्रमी उत्पादन होते तरी गहू महागच होतो, कोळसा अधिक काळा होतो.जमीनीचे भाव अव्वाच्या सव्वा वाढतात.
एके काळी " तिथं " गेलेला पण खर्या अर्थाने धर्मनिरपेक्ष चौ रा.
मी स्वतःला शहाणे समजणार्यांच्या CULT च्या जाळ्यात अडकलो आहे.
आमच्या या कल्टमध्ये आपलीच टोपी लाल कशी आहे हे जगाला ओरडून सांगितलं जातं. समोरच्याची नेहमी अक्कल काढली जाते. जे काही कळतं ते मलाच कळतं, बाकी सारे अडाणभोट आहेत असं बेंबीच्या देठापासून कोकललं जातं. या कल्टमध्ये संभाषणामधील शेवटचं वाक्य आपलंच असायला हवं असा अटटाहास असतो.
हे सारे तुम्हाला जमणार असेल तर तरच आमच्या कल्टमध्ये सामिल व्हा.
सहमत. मी देखील असेच स्वतःला फार भारी समजणार्या रॉयल एन्फील्ड कल्टचा अनुभव घेतला आहे. ३५० वा ५०० सीसी इंजिनाच्या गाड्या (मग त्या कितीही वॉबल(मराठी शब्द लक्षात येत नाही?) असल्या तरीही) लई भारी म्हणून, १००-१५० सीसी वाल्यांकडे तुच्छतेने पहायचे. मग या गाड्यांपेक्षा भारी गाडी असेल जसे सीबीआर, पल्सर एनएस वगैरे तरीही त्याची आणि या गाड्यांची कॅटेगरी वेगळी आहे वगैरे म्हणून आपलीच लाल म्हणायचे, याचा अनुभव घेतला आहे.
ही देवाने दिलेली भेट आहे.....
आमचा वारू आहे तो.
परवाच माझ्या रॉयल एन्फील्डची आणि डायनॅसोरची टक्कर झाली.तो डायनॅसोर ढगात ऊडाला.बरे आणि गेला तो नमका ड्रॅगनच्या पाठीवरच.तो ड्रॅगन पण म्हणाला
रॉयल एन्फील्ड वाल्यांच्या नादी लागायचे नाही.
माझ्या कडे खूप किस्से आहेत रॉयल एन्फील्डचे...
प्रतिक्रिया
मस्तच. प्रत्येकाला कुठला ना
प्रकाशजी मला अस वाटतं की
अरे आम्ही काय कुणाचे खातो रे
ग्रेटथिंकरजी आपल्याला नेमक काय म्हणायच आहे मला कळ्ल नाही हो
निरर्थक
आर्ट ऑफ लिव्हिंग हे देखील
विजुभाउ जी अगदी खर आहे पण यावर उघड साधी चर्चा देखील होत नाही
MLM कंपन्या ह्या सुद्धा
आत्माजी माझा स्वतःचा अनुभव सांगतो
सारासार विचारशक्तीला
+ १
एकदम चपखल !
तेच म्हणतो. अॅम वे हा एक
विजुभाउजी मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे
अॅम वे हा एक मोठा कल्टविजुभाउजी हा ही एक मह्त्वाचा मुद्द्दा आहे की फक्त धर्माशी संबधित किंवा धर्म आधारीत च संघटना कल्ट असतात असे अजिबात नाही. धर्माशी काहीही संबध नसलेली AMWAY ही एक कल्ट च आहे कारण ती अनेक निकषांवर कल्ट प्रमाणे च काम करते. जालावरील खालील दुवे आपण अवश्य अभ्यासा यावर भरपुर खल अगोदर च झालेला आहे. यातील काही भाग तर प्रचंड मनोरंजक आणि धक्कादायक असा आहे. http://marriedtoanambot.blogspot.in http://amwayglobalcultintervention.blogspot.inमाझ्या हाताला एखादाजरी अॅमवे
जबरी आयडिया दिलीत अपर्णा ताई.
डावी विचारसरणी हाही एक मोठाच
बॅटमॅन जी धाग्या ला नविन परिमाण दील्याबद्द्ल धन्यवाद
असे असेल तर मग रा. स्व. सं.
विज्युईझ्म
या माणसाच्या बोलण्यातून तो
च्यायला !
...
आम्हाला
जय गुरुदेव गुरुबंधु तिमाजी !
मराठी संकेतस्थळे
भारतातील निधर्मांध मंडळी हा
हारएसएस हा ही एक कल्टच आहे की
एका विशिष्ट जातीचे लोक
हे काहीच नाही
निधर्मांध या शब्दावर एकदा
मी स्वतःला शहाणे समजणार्
रॉयल एन्फिल्ड
रॉयल एन्फील्ड
तेवढीच आमच्या ज्ञानात भर
आमचा वैयक्तीक कल्ट आहे.
मिपा कल्ट आहे का नाही यावरही जाणकारांनी उजेड टाकावा
हो आहे.
ऐन वेळी कल्टी मारणारे पण कल्ट
सहकार