Welcome to misalpav.com
लेखक: प्रास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लग्नात लग्नं जुळवणारे लोक नेहमीच बघायला मिळतात, अन भोचक विचारणा आणि सल्ले देणारे अशा लग्ना-बिग्नाच्या जागी हमखास भेटतात! संवाद मस्तच! अगदी १००% वास्तवातला. बोलताना तरीही मुलगा आणि मुलगी यांच्या वागण्यात फरक केलेला बघून मजा वाटली. हे असंच ८०-९०% वेळेला ऐकायला मिळतं!

भारी बाई लक्ष तुमचे लग्नातल्या बायकांकडे! सूक्ष्म निरीक्षण!

भारी बाई लक्ष तुमचे लग्नातल्या बायकांकडे
नुसते भारी लक्ष नायतर तिखट कान सुध्दा. कारण अशा वेळी बायका जो खाजगी स्वर लावतात तो त्याच ग्रुपमध्ये नको असलेल्या बाईला पण ऐकायला जात नाही. ;) वा वा. सुरेख लेखन. :)

हल्ली उत्तम नोकरी, भक्कम पगार असलेल्या मुलींचे पालकच मुलीचे लग्न व्हावे यासाठी अनुत्सुक असतात, असेही बघण्यात येते.... लग्न झाले, तरी लग्नानंतरही तिच्या मनात भरवून सासर सोडून माहेरी बोलावून घेतल्याचेही प्रत्यक्ष उदाहरण बघितले आहे.

लग्नानंतरही तिच्या मनात भरवून सासर सोडून माहेरी बोलावून घेतल्याचेही प्रत्यक्ष उदाहरण बघितले आहे.
>>> कोण आहे तो नशीबवान .... ;)

खरेच आहे. या मंडळींना वीस वर्षांपासून ओळखतो, त्यावरून त्या मुलाची सुटका झाली, असेच म्हणायला हवे, हे खरेच.

मी तर अनेक लग्न समारंभात केवळ अश्या गप्पा ऐकण्यासाठी हजेरी लावतो. येवू दे अजून अश्या संवादांची मालिका अशातूनच व्यक्ती मधील वल्लींचे दर्शन घडते.

भारतात इतक्यात येणे झाले नाही , त्यामुळे अनेक धार्मिक समारंभाला हजेरी लावता येत नाही , मुंज , बारसे , पहिला वाढदिवस ते लग्न व साखरपुडा. ह्यामुळे अनेक गमती जमतीला मी मुकतो , मुंज व लग्नात म्हटलेली मंगलाष्टक. सध्या ह्याच नावाने एक मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे , जो आपली मराठी ह्या वेब साईट वर आल्याशिवाय पाहणे होणार नाही. पण नुकतीच माझ्या चेहरा पुस्तकावरच्या एका मित्राच्या कृपेमुळे ही तू नळीवरील क्लिप पाहण्यात आली , एका मुंजीत कोणतीतरी हौशी मावशी ,आत्या , काकू ही कुसुमाग्रज , ग्रेस , मर्ढेकर ह्यांचा वारसा सांगणार्‍या एका अनामिक कवी रचित मंगलाष्टक सुरात गात आहे. ज्यात खुबीने बटूच्या बहुतेक सर्व नातेवाईकांच्या नावाचा उल्लेख केला आहे , ही आधुनिक काळातील मंगलाष्टक माझ्या मुंजीत का बरे गायल्या गेली नाही , असे मात्र मला राहून राहून वाटते.