प्रतिसाद
१: बरं झालं फुकट असून नाही पाहिला. वाचले.
२: अय्या!! तुम्ही श्री आणि जान्हवीच्या लग्नाला नाही गेलात? ;)
३. चेन्नईला जाताना पूल आणि धबधबा कुठे लागतो?
४. गुंडी या शब्दाच वेगळाच अर्थ माहित होता.
५. त्या होउन गेलेल्या बाप हीरोचे वर्णन वाचून, Carson Clay आठवला Mr. Bean's Holiday मधला. :)
२: अय्या!! तुम्ही श्री आणि जान्हवीच्या लग्नाला नाही गेलात? Wink
आमच्या घरात तर मिनिटा मिनिटाला च्यानेल चेंज होत होता. "जान्हवीचे लग्न" मग "चेनै एक्ष्प्रेस" की मग पुन्हा "जान्हवीचे लग्न" की मग पुन्हा "चेनै एक्ष्प्रेस". वैताग आला राव.
वैताग आला राव
अगदी ! जान्हवी अन् तीची ती महालबाड,महावस्ताद आई उगाच माझ्या डोक्याची मंडई ! पण ते शाहरुखचे चाळे पाहण्यापेक्षा बायडीला गुंतवुन ठेवुन माझी सुटका करण्याचा अस्त्र ठरत ! ;)
"जान्हवीचे लग्न"
हा काय किस्सा आहे?
आयला मला सिनेमा माहीत नाही की काही नाही... संन्यास घ्यायची वेळ आली की मला वेळ मिळत नाही?
असो
कुणीतरी वेळेवर उत्तर दिलेत तर बरे होईल...
हे असले काहीतरी टी.व्ही. वर आहे का?
गेले ३ महिने मी टी.व्ही. बंद केला आहे.
गूगल गुरु आणि विकी महागूरू असल्याने वेळ बरा जात आहे.
यु ट्युब वर बर्याच उत्तम क्लिप्स आहेत आणि हॅरॉल्ड लॉईड आणि चॅप्लीन आमची करमणूक करायला समर्थ आहेत.
असो....
जो जे वांछील तो ते लाहो.
नशिब बलवत्तर म्हणुन वाचलो आणि हा काल पाहिला नाही ! बायडी म्हणत होती बघुया म्हणुन पण नेहमीच्या ठराविक युक्त्या वापरुन हा अत्याचार करुन घेण्या पासुन वाचलो ! :)
३. चेन्नईला जाताना पूल आणि धबधबा कुठे लागतो?
माउ हा चित्रपट पाहिला नाही म्हणुन पूल आणि धबधबा पण पाहिला नाही. ;) चेन्नईला जाताना लागतो की नाही ते माहित नाही,पण हा धबधबा आहे मात्र शॉलिट्ट !
हा दूधसागर धबधबा आहे. पण तिरुपतीला जातना लागतो. चेनैला जाताना लागतो का माहित नाही? बघायला हवं trains between two stations मध्ये 'कैसलरॉक' ते चेनै ट्रेन आहे का?
हा दुधसागर धबधबा आहे ना गोव्यातला? पिक्चर पाहीला काल टिव्हीवर.. कौतूक ह्याचे वाटले की एवढा धबाबा पैसे कमावलेला पिक्चर असूनही त्यामानाने "कमर्शियल ब्रेक्स" बरेच छोटे होते.. "बालक पालक" टिव्हीवर पाहिला असल्यास ह्याचा संदर्भ आणि कौतूक कळेल.. ;-)
"बालक पालक" टिव्हीवर पाहिला असल्यास ह्याचा संदर्भ आणि कौतूक कळेल..
हॅहॅहॅ... "बालक पालक" म्हंटल्यावर एकच संदर्भ कळतो ! तो म्हणजे "ढिंच्याक ढिच्याक,ढिंच्याक ढिच्याक" ;)
जाता जाता :- बाणा बाणा बस्स बस्स किती करशील चा-वटपणा ? ;)
परवा शनिवारी पार्टी करींग. माझ्याच बाजुला आज्जी बसिंग. मला म्हणींग, ५०$ किराणा घेइंग तो एक मुव्हि मिळींग. तिला मिळींग वॉन्टेड मला देइंग. मी म्हंटल परत कस करिंग? बोलते बघींग तो बघींग नाय तर भायर फेकिंग. परत नाय आणींग. पाहिंग तर ह्योच मुव्ही असिंग. आता डायरेक्ट फेकिंग. नो लुंगी, नो ताप!
म्हणुन चालत ना वो अपर्णाताय! मिडल ईस्ट मधे लुंगीकाच राज्य असींग. असो चित्रपट परीक्षण आणि जान्हवी दोन्हि आवडलं. म्हणुन मी हा चित्रपट आणि जान्हवीचं लग्न (हे वर्ष संपायच्या आत झालं तर) नक्कि पाहणार.
आयला तुम्ही महान पाहिला? महानच आहात.
मी महान चुकवला पण ८८चा गंगा जमुना सरस्वती पाह्यलाचे प्रायःश्चित अजुन करते आहे. आमच्या कोवळ्या मनावर टरारा ओरखाडे काढले त्या चित्रपटाने.
त्यावेळी आम्ही बच्चनचे जाम फॅन होतो.
अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो वाले.
"तशी बच्चनला उतरती कळा नसीब्,लावारीस पासून लागली होतीच पण महान ने ती पुर्णत्वास नेली."
असे माझे मत आहे.
मी माझच पाल्हाळ लावुन बसले तिमा. खरतर ती तुमच्या लिखाणाच्या शैलीचीच चुक म्हणायला हवी. मी ही एकदम जोशात आले तुमच लिहीलेल वाचुन.
हं तर काय म्हणायच होतं, लिखाणाचा लहेजा आवडला, म्हणजे हे परिक्षण लिहुन तुम्ही फारएण्ड्चा भविष्यातला घास काढुन घेतलात, कारण याच्या पलिकडे त्या चित्रपटाची आणखी चिरफाड अशक्य!
आता फारएण्ड हे आव्हान स्विकारतील अशी अंधुकशी आशा. जे तुमच्या आमच्या नजरेतुन सुटत ते फारएण्डना दिसतं.
प्रतिक्रिया
.
हे असच असतय बगा
भारतासारख्या गरीब देशात
प्रतिसाद
२: अय्या!! तुम्ही श्री आणि
वैताग आला राव
ही अजून एक काय भानगड?
होणार सुन मी या घरची
म्हणजे...
२०० कोटी ??
नशिब बलवत्तर म्हणुन वाचलो आणि
हा दूधसागर धबधबा आहे. पण
दुधसागर..
"बालक पालक" टिव्हीवर पाहिला
दूधसागर आहे हा.
ही कठल्या सिनेमाची कथा आहे?
परवा शनिवारी पार्टी करींग.
नो लुंगी, नो ताप!
आम्हाला ईकडे असं काय
@ दिपक...
अरे कित्ति सोप्प आहे...
नाव इंग्रजी दिसले म्हणून परत बघीतले...
आयला तुम्ही महान पाहिला?
हो,,,,
अहो !
मी माझच पाल्हाळ लावुन बसले
जागे व्हा ! हे आणि हे असंच
धमाल
गुरु
फारएन्ड ना गुरु मानतो.....
कसचं कसचं
धमाल ?
तिमा,
हे हे