Welcome to misalpav.com
लेखक: राजघराणं | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आ म्ब वा डे क र हे आपले नाव सोडून एका ब्राम्हणाचेच नाव आयुष्यभर वापरण्या मागची भूमिका काय? आज बर्याच कमी लोकांना हे माहित आहे कि त्यांच्या गुरुजीनीच त्यांचे आंबेडकर हे "नामकरण" केले. तसेच गांधीजींना उशिरा उपोषण करणे हि एक सवय होती का ? पाकिस्तान होऊच नये म्हणून ते उपोषणास का बसले नाहीत. आणि उपोषणाने आंबेडकर ह्यांना कोंडीत पकडणे कितपत बरोबर होते म्हणजे चर्चा न करता, एकमेकांची गोची काय होऊ शकते ते ना पडताळता मी उपोषण करीन हि धमकी देणे आणि उपोषणास बसणे कितपत योग्य आहे.....जर देशाबद्दल कळ कळ होती तर सरदार वल्लभ भाई पटेल ह्यांना पंतप्रधान करण्या ऐवजी नेहरूंना (ज्या माणसाला सी डब्लू सी मध्ये एकही मत पडले नाही पण वल्लभ भाई पटेलांना आणि गांधीजींनाच १३+२ अशी मते पडली तेव्हा देशाचा विचार ना करता नेहरू ह्यांनाच पंतप्रधान करा हे गांधीजीनी कुणाला विचारून ठरवले?)....

जर तुम्ही खरोखरच सिरीयस होऊन प्रश्र्न विचारत असाल तर... तुमच्या प्रश्र्नांची उत्तरे कदाचित खालील पुस्तकांत मिळतील १. गांधींनी आणि काँग्रसने अखंड भारत का नाकारला (शेषराव मोरे...हे पुस्तक मी गेले १ वर्ष वाचत आहे..मनन आणि चिंतन तर फार दूरची गोष्ट.... बाकी शेषराव मोरे अप्रतिम माणूस... कधी पण फोन करा,सगळे मुद्दे समजावुन द्यायला तयार) २. नथूराम गोडसे ३. माझे सत्याचे प्रयोग (खूद्द गांधी..२/३ महिने लागतात वाचायला.त्यांची सगळी मते पटतीलच असे नाही.पण एक माणूस म्हणून जगायला फार उत्तम पुस्तक) ४. प्रकाशाची / सुर्याची सावली... नक्की नाव आठवत नाही पण बाबांच्या मुलावरील पुस्तक आहे...

रकाशाची / सुर्याची सावली... नक्की नाव आठवत नाही पण बाबांच्या मुलावरील पुस्तक आहे. प्रकाशवाटा म्हणायचे आहे का मुवि तुम्हाला?

आपण म्हणता ते पुस्तक बहुधा 'प्रकाशनो पडछायो' या श्री दिनकर जोषि यांच्या गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद असावा. ह्या पुस्तकावर 'गांधी विरुद्ध गांधी' हे नाटक आणि चित्रपटही निर्माण झाला. हे पुस्तक एक कर्तृत्ववान बाप आणि त्याचा त्या मानाने नाकर्ता मुलगा असे गांधीजींच्या घरातील शोकांतिकेवर बेतलेले आहे. गांधीजी आणि त्यांचे पुत्र हरिलाल यांच्या संघर्षातून गांधीजींचा एक वेगळाच पैलू उलगडत जातो. देशाची समस्या सोडवू पहाणारे महापुरुष घरातल्या समस्या सोडवताना कसे हतबल होतात आणि व्यापक देश/समाजहितापोटी कुटुंबहित/सौख्याला कठोरपणे तिलांजली देतात ते अतिशय मनोज्ञ पद्धतीने यात मांडले आहे. प्रकाशवाटा हे बाबा आमटे यांच्या जीवनावरील पुस्तकही अर्थात तितकेच मनोज्ञ आणि प्रेरणादायक आहे.

एकदम बरोब्बर... मी बापूंना कधी बाबा तर कधी गांधीजी असे म्हणतो.मी गांधींचा चूकून बाबा असा उल्लेख केला आणि वाट लागली...

अतिषय उत्तम लेख !! अवांतर प्रतिसाद काढुन टाकावेत ही विनंती . ह्या चर्चेत , इथे सावरकरांना आणण्याचे कामच नव्हते . बाकी पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली आणि आचार्य मंडणमिश्र बौध्द होते ही विधाने वाचल्यालावर सदर व्यक्तीला अज्ञानात सुख मानु द्यावे असा विचार केल्याने बाकी काही बोलण्यात अर्थ नाही

अज्ञानात खरेच सुख आहे. त्याहून पण अति विचारी माणसे जेंव्हा लिहीत नाहीत तंव्हा परम सूख आहे. ही अतिविचारी माणसे मिपा सोडतील तो सुदिन...

अनुमोदन ! केतकरांनी लोकसत्ताची वाट लावल्यामुळे त्यांची तिथून हकालपट्टी झाल्यावर त्यांचे मौलिक विचारधन दुर्मिळ झाले होते. पण आता ती उणीव राहिलेली नाही.

ग्रेट्या बाकी काही म्हण, सारखे हिंदू हिंदू करून करून तुझ्याच अंगाला आता हिंदुत्ववादाचा भपकारा येऊ लागलाय. हिंदुत्वाचा भाट शोभतोस खरा.

नक्की कळलं नाही. जसे केतकर गांधी घराण्याचे स्वयंघोषित भाट आहेत, अगदी तसेच ग्रेटस्टिंकर हिंदुत्ववादाचे भाट आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला?

ओ मु.वि. हा नानु सरंजामे कोण हो? आणि त्य ची अशी अर्धवट सही का बरे आहे. तुम्हाला मी पुढची सही पुर्ण करुन देवु का? बघा पटले तर.

"फुंके,शिंके आणि थुंके यांना आमच्या कडे मनाई आहे!" बघाना तुमच्या लिखाणांत पण ती सगळ्याच शेवटीच आली आहे. बाकी काहीही म्हणा पण तुम्ही पण भारीच विनोदी बघा... अहो, चिंच गाभूळलेली असु दे ही हिरवी ती आंबटच असणार ना? मग मुद्दाम हे आंबट चिंच कशाला? असो....एकूण सध्या तरी त्रिकूटच दिसत आहे......

घटना समितीवर डॉ आंबेडकर निवडून येऊ नयेत म्हणून काँग्रेसने प्रयत्न केले. मुंबईत त्यांचा पराभव केला. यावर बंगालच्या एका खासदाराने तुम्ही घटना समितीत नसाल तर देशाच्या सर्व घटकांना न्याय मिळणार नाही असे वाटल्याने मी राजीनामा दिला आहे. माझ्या जागेवर तुम्ही निवडून या असं आवाहन केलं. दिलेला शब्द खरा करत त्यांनी बाबासाहेबांना मसुदा समितीवर निवडून आणलं. ही घटना स्वातंत्र्यापूर्वीची. पण फाळणीमधे बाबासाहेबांना निवडून देणारा मतदारसंघ काँग्रेसने पूर्व पाकिस्तानास देऊन टाकला. त्यामुळे बाबासाहेब आपोआपच पाकिस्तानच्या घटनासमितीचे सदस्य झाले. कदाचित भारताची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती यात हा अडथळा ठरला असता. त्यातच बाबासाहेबांनी मी पाकिस्तानची घटना लिहीण्यास तयार आहे हे विधान केल्याने धास्तावलेल्या काँग्रेसने त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आणि पुन्हा मुंबईतून निवडून आणण्याचे आश्वासन दिले. गुगळून पाहीले तर संदर्भ मिळतील. या घटना ख-या आहेत हे जर आढळून आले तर इतर कुणाचेही विश्लेषण न पाहता प्रत्येकजण त्यांचे अर्थ लावण्यास सक्षम आहेच.