कलयुग सुरु झाले की काय?
मी हंबरण्याचा आवाज "हम्म हम्मा" असा ऐकला होता....आज काल "कुई SS कुई SS कुई SS" असा झाला की काय? का म्हशी रोडावल्या आणि कोल्ह्याच्या आकारच्या झाल्या?
शापाच्या चर्चेत उ:शापाची चर्चा असावी का?
उ:शाप
मानवाच्या जीवनाला, काय दैवा, शाप आहे?
तो कुणाचा पुत्र आहे वा कुणाचा बाप आहे...
अन्नवस्त्राची शिदोरी पोसते आहे तनूला,
तेवढ्याने होत नाही, भावनांचा व्याप आहे...
कोणत्या नाजूक वेळी तोकड्या शक्तीस याच्या,
धीर देण्या माउलीचा हात देतो थाप आहे...
आपल्या पाठी उभा आहे पिता या भावनेने,
हिंमतीचा जोर येतो, शत्रुची का टाप आहे...
खुंटल्या यत्नास जेंव्हा मार्ग दावाया कुणाच्या
युक्तिचा आधार लाभे, आदराची छाप आहे...
साथ देण्या भावनांना, जाणुनी त्या पातळीने,
जीव लावी हेच मोठे सख्यभावा माप आहे...
या मनाला गुंतवाया मोहुनी सर्वस्वभाना,
भामिनीच्या डोळियांचा कामदेवी चाप आहे...
एक धागा हा सुखाचा लाभतो प्रेमात मोठा,
जीवनी संगीत वाटे, घेतसे आलाप आहे...
सर्व संबंधांस साधा, भावनेला साथ देती,
नाचतो त्यांच्याप्रमाणे, लागते रे धाप आहे...
ना कधी होते मनाचे मानल्या इच्छेप्रमाणे,
वेळ येता दे दगा ते आपुले, हा ताप आहे...
ज्या भरोशाने जगाला लाविलेले ऊरपोटी,
तो तुटे, हा भावनेला वेदनेचा राप आहे...
शास्त्र सांगे सोडुनी द्या, मोहमायेचा पसारा,
वागणे ना त्याप्रमाणे, कोण जाणे पाप आहे...
काव्य देई या मनाच्या भावनांना वाट सोपी,
लेखणी हाती धरावी, एवढा उ:शाप आहे...
एक सूचना
या सगळ्या पौराणिक कोथा डेटाबेस स्वरुपात साठवल्यास आपल्याला पाहिजे तशा क्वेरीज चालवता येतील
शाप - म्हटले की शापाच्या कथा,
उ:शाप - की त्या अहिल्येच्या कोथा
कुमारी माता- की तसल्या कोथा
कथा + भाष्ये
कुमारी माता & इरावती कर्वे यांचे भाष्य
झालच तर कुमार पिता हेही यात येऊ शकतील
असं बरच काय काय
अजूनही काय काय अॅट्रीब्युटस् टाकायला हरकत नाही, म्हणजे आपला आपणच अभ्यास वाढवता येइल
असं नीट ष्टोअर केलं तर 'तुमच्यासाठी काय पण' माहिती शोधून काढता येइल
मला वाटतं..
ज्या प्रमाणे आशिर्वाद अथवा वरदान खरी ठरतातच असं नाही तसच शापाचं
पण म्हणून शापाचं महत्वं कमी होत नाही.
ज्या प्रमाणे एखाद्या व्यक्तीबद्दल खूप चांगल्या भावना तुमच्या मनात असतील आणी त्या व्यक्तीचे भले व्हावे असे तुम्हाला मनोमन वाटत असेल तर तुम्ही आशिर्वाद देता. किंवा त्याचे मंगल होवो असे मनात आणता.
तसच एखाद्याबद्दल अत्यंतिक तिरस्कार वाटत असेल तर तुम्ही त्याला शिक्षा व्हावी अशी मनोकामना करता ना? तोच शाप. आता त्याचा उच्चार केल्याने कुणाला थोडेफार समाधान मिळत असेल तेव्हढेच त्या शापाचे महत्वं बाकी काही नाही.
आधुनिक काळातील शाप राहिला.
गोहत्या प्रतिबंध्क कायद्यासाठी साधूंनी संसदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी इंदिराजींनी लाठीमार की गोळीबाराचे आदेश दिले होते. तो दिवस गोपूजेचा होता ( म्हणजे नेमका कोणता दिवस?)
त्यावेळी एका साधूने शाप दिला की तुमच्यावरही ( म्हणजे इंदिराबैंवर) असाच शस्त्रहल्ला होईल.
इंदिराजींची हत्या झाली. तो दिवसही तोच म्हणजे गोपूजेचा होता ( म्हणे)
( साभार - सनातन वांगमय , चुभुदेघे)
कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात?
चुकून कोणाकडून हि आपलं थोडाजरी नुकसान झालं तर लगेच आपल्या तोंडात शिव्या येतात . शाप हा त्याचाच सभ्य प्रकार .
खून, दरोडे , बलात्कार आणि अजून भयानक अपराध करणार्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील म्हणून कोर्ट , पोलिस ह्या गोष्टी बंद केल्या तर चालतील का? गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची जाणीव तिथल्या तिथे करून द्यावी आणि इतरांना जरब बसावी म्हणून शाप देण्याची प्रथा होति.
सामान्य माणसांमध्ये शाप द्यायची ताकद नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने
पोलिस, कोर्ट कचेरी ह्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं
ज्याच्यामध्ये ती ताकद आहे तो कशाला ह्यांची वाट बघत बसेल
शाप देणे फक्त हिंदू धर्मातील पौराणिक कथांमध्ये नाही .ग्रिक कथांतही "Cursed" आहे . हिंदू धर्मातली जन्मलेली व्यक्ति नि:संकोच धर्मावरच टिका करते ते खपवून घेतले जाते (तसे इतर धर्मांत नाही अथवा दगड मारून ठार करतात)ही सहिष्णूता . निसर्गातले चांगले चमत्कार( पाऊस वगैरे)अथवा वाईट ( भूकंप ,पूर ,रोगांच्या साथी ,मृत्यू इत्यादि )यांचे वैज्ञानिक कारण मानवाला देता येत नव्हते त्यावेळी त्याने पौराणिक कथा पुष्टीसाठी केल्या .यामागे असलेल्या काही गूढशक्तिंना संतुष्ट केल्यास (पुजा ,बळी वगैरेने) आपल्याला त्रास देणार नाहित या विचाराने ही रीत सुरू झाली .तरीही आपत्ती आली की त्याला कोप म्हणायचे .सर्वच धर्मांमध्ये वाईट प्रवृत्ती आहेतच फक्त त्यांना व्यक्त करता येत नाहित .
अतिशय त्रासाने दिलेली शापवाणी खरी होते हे काही खरे वाटत नाही....
जर हे खरे असते तर आपल्या देशात सर्वसामान्यांचे शाप खरे होऊन न्यायाचे आणि कायद्याचे राज्य आले असते....
प्रतिक्रिया
केकाट न्या पेक्षा हम्बरलेल
आँ....
तुमचं
शापाच्या चर्चेत उ:शापाची
प्रसाद काय हा प्रमाद
मग....
अजुन वर्गणी
मुक्त विहारि
चष्मा वगैरे
तिथे + १
श्रावण बाळाच्या आईबापांनी
बाँम्ब पडला!
माताय !
...
सहमत.
मला वाटतं..
शाप हा फार वाइट असतो!
कल्ला....
त्यासाठीच तर
.
.
बाकीचे गांधी..
कथा की किस्से....
.
आयडी आणि शाप
हिंदू धर्मात निधर्मान्ध
चूक.... हिंदूंना जातीत
पुराणातल्या कथांमधे लॉजिक
हिंदु धर्मात शाप देण्याची
भारत हा एकंदरीत शापित देश आहे
आरेसेस भाजप बजरंग दल मोदी
.. हो की नै रे गुर्जी!
व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी
शाप देणे फक्त हिंदू धर्मातील
खरं तर अजून कुणाच्या
नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी
खरच भारी .. पण काम झाले कि ..
हिंदू धर्मात निधर्मान्ध
हे सगळ् वाचून डोक 'शाप' गेलय.....
Pagination