Welcome to misalpav.com
लेखक: गवि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हर्कत इल्ले. तसेही मुंबैक्र मिपाक्र जन्तेला भेतयच आहेच यकदा. णोव्हेंब्र च्या उत्तरार्धात कंदीपन चालंन. यक ट्रिप मारियाचा इच्यार हाये!

=)) ते सगळं आठवलं होतं रे. पण काये ना, माझ्या ओळखीतले काही महाभाग बाहेर दाबून नॉनवेज चापतात, पण घरच्यांना चालत नसल्याने घरी १००% व्हेजी असतात. आता तुम्ही घरी कधी आमंत्रण दिलं नाहीत त्यामुळे हॅ हॅ हॅ. असो. तेहे दिल्से माँफी मांगता हू.

मला वाटतं चिकनचा तुकडा दोर्‍याला टांगून ठेवावा म्हणजे घुबडाने नाही खाल्ला तर परत ओढून मागे घेता येईल. उगीच फुकट जायला नको.

वेगळाच विषय! त्या बाबा घुबडाला कोणी अपशकुनी म्हणून मारलं असलं तर अवघड आहे! :( बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या फेसबुक पेजवर या लेखाची लिंक देऊन पोस्ट टाकली आहे. पाहू कोणी उत्तर देतात का ते.

गवि! आता आहेच तुमच्या शेजारी तर जरा तो आय मेक-अप अन आयब्रोज कोठुन केल्या विचाराना बाईंना. काय बाई तरी एव्ह्ढी पिल्ला झाली तरी इकडच पीस तिकडे नाही, नाही तर आमचा अवतार पहावा.

२२ ऑक्टो . सकाळ. आत्ता पहिल्यांदाच भक्ष्य / अन्न पाहिलं . हा पहा उंदीर . म्हणजे अन्नाची सोय होतेय. आता कोण आणतेय ते शोधणे आले. की पिल्लाची आईच डबल ड्यूटी करतेय ? a हुश्श...!!

माझापण जीव भांड्यात पडला. चला निदान आता घुत्कारे ब्रदर्स गविंच नाव नाही लावणार पालक म्हणुन. ;)

खूपच सुंदर ! आपल्या सारखी सगळी माणसे असती तर लाखोने घुबडे वाचली असती. आत्ता शहरात जेवढी घुबडे शिल्लक आहेत त्यामुळे थोडा तरी उंदरांच्या संख्येवर ताबा राहिला आहे. मी सर्पोद्यान मध्ये काम करताना, जवळपास १०-१५ घुबडे तरी कॉल वर वाचवली आहेत. पण हे सापांसारखे कॉल नसायचे,म्हणजे घुबड लोकांच्या घरात घुसलेली नसून लोकच त्याच्या घरात घुसलेले असायचे. पुण्यात जिकडे जुने वाडे होते, त्याच्या आसपासच्या वडाच्या झाडावर घुबडांचे संसार असायचे. नंतर तेच वाडे बिल्डर ने घशात घातले आणि घुबडाला अपशकुनी म्हणून हुसकावून लावले. तेच सिंहगड रस्ता, सहकारनगर, पर्वतीला झाले , जुनी झाडे गेली आणि घुबड गेली. सिंहगड रस्त्यावर दातार क्लास समोरच्या (वृषाली बार) वडाच्या झाडावर घुबडाची घरटी होती. मी लोकांच्या घरून अशीच घुबडे पकडली आहेत, कोणच्या पोट माळ्यावर आहे, तर कोणाच्या खिडकीच्या समोर बसते.(त्यामुळे त्यांना अपशकून होतो. )खूप चीड यायची त्या अडाणी-सुखवस्तू घरात जायची पण मुंडी खाली घालून बिचाऱ्या घुबडाला पकडावे लागायचे. नंतर त्यांना सर्पोद्यान मधून दूर अभयारण्यमध्ये सोडले जायचे. मला स्वतःला हा पक्षी खूप आवडतो, लोकं मोराला क्युट-क्युट करत बसतात, माझ्या मते तर घुबड सगळ्यात गोंडस पक्षी आहे.(मी आई ला तो पाळू का असे गमतीत विचारले पण होते ;)) अशीच अनेक कार्यकर्त्यानी जमा केलीली (लोकांच्या घरी)घुबडे सर्पोद्यांच्या प्राणी-पक्षी अनाथालयात असतात, त्यातल्या किती तरी पिल्लांना आम्ही हाताने खिमा भरवून जगवले आहे. वरचे जे आहे ते बार्न आउल किंवा साधे घुबड आहे. ते सगळ्यात जास्त आढळून येते. त्यांना दिवसा दिसत नाही (किंवा कमी दिसते ) त्यामुळे कावळे त्यांची वाट लावतात. जर या घरट्या जवळ कावळा दिसला तर हुसकावून लावा. तसेच दिवसा त्या घरट्या जवळ बिलकुल प्रकाश टाकू नका किंवा कुठला मोठा आवाज करू नका. तुम्ही नशीबवान आहात म्हणून तुम्हाला घुबडाचे बाळंतपण करायची संधी मिळाली. :)

मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य आहे. एक मांजर साधारणपणे वर्षाला तीस उंदीर पकडते तर एक घुबड साधारण पणे दोनशे साठ ते तीनशे उंदीर पकडते. याचे कारण उंदीर हेच त्यांचे मुख्य खाद्य आहे. शिवाय घुबडाची दृष्टी माणसाच्या हजार पट चांगली असते. डोक्याच्या मानाने घुबडाचे डोळे इतके मोठे असतात कि माणसाला तेवढे मोठे डोळे बसवले तर त्यांचा(डोळ्यांचा) आकार सफरचन्दासारखा होईल. त्यामुळे घुबड आपले डोळे डावी उजवीकडे फिरवू शकत नाही. त्याचे डोळ्य़ा बाहेरचे स्नायू(EXTRAOCULAR MUSCLES) अविकसित असतात. तर आपली अक्खी मानच पूर्ण गोलाकार फिरवते. शिवाय घुबडाची ऐकण्याची शक्ती पण माणसाच्या हजार पट चांगली असते. उंदराने केलेली खुडबुड त्याला शंभर फुटावरून सुद्धा स्पष्ट ऐकू येते आणी त्या दिशेने ते आपले डोके वळवून उंदराच्या स्थिती चा अंदाज घेते. घुबडाचे पंख सुद्धा कात्रीने कापल्या सारखे असतात त्यामुळे त्याच्या पंखांची फडफड मुळीच होत नाही(याउलट कबुतराची फडफड).म्हणून पकडला जाईपर्यंत उंदराला घुबड आल्याचे कळतच नाही. दुर्दैवाने निशाचर असून अजिबात आवाज न करत उडण्याच्या त्याच्या शैलीचा आणी मोठे डोळे यांच्या भीतीमुळे घुबडाला भूतांशी आणी समाजाच्या अभद्र गोष्टींशी निगडीत केले गेले आणी अपशकुनी ठरवले गेले.

शिवाय घुबडाची ऐकण्याची शक्ती पण माणसाच्या हजार पट चांगली असते.
+१०० लेखातही उल्लेख केलाच आहे. पण हे प्रत्यक्षच दिसतंय. कितीही दूरवर आणि कितीही हलकासा आवाज झाला तरी घुबड लगेच टक्क डोळे उघडून आवाजाच्या दिशेने बघतं. मानही नेहमी वरच्या दिशेनेच असते. कारण या जागेचा एन्ट्रन्स (कोणी शत्रू जिथून घुसू शकेल असं मोकळं ओपनिंग) वरच्या दिशेला आहे. या सततच्या अतिजागरुकपणामुळे त्या पक्ष्याची झोप वगैरे अस्तित्वातच नाहीये असं म्हणता येईल. मधेच डोळे मिटून घेतं तेव्हा झोपलंय असं वाटतं पण क्षणाक्षणाला कसल्यातरी चाहुलीने / आवाजाने डोळे उघडून परत जागरुक. त्याचा एकूण अविर्भाव झोपेची अत्यंत गरज आहे पण अजिबात मिळत नाही असा वाटतो. पहाटे पहाटे तर गपागप डोळे मिटत असतात पण उघडतातही लगेच.

दुर्दैवाने निशाचर असून अजिबात आवाज न करत उडण्याच्या त्याच्या शैलीचा आणी मोठे डोळे यांच्या भीतीमुळे घुबडाला भूतांशी आणी समाजाच्या अभद्र गोष्टींशी निगडीत केले गेले आणी अपशकुनी ठरवले गेले.
वरचा निष्कर्श आणि एकूण प्रतिसाद अत्यंत आवडला. मनःपूर्वक धन्यवाद!

गवि, मस्तच उपक्रम चालू आहे. मी माझ्या मुलीला (वय वर्षे १०) पण या तुमच्या कार्याची माहिती दिली आहे. तीला फारच आवडली आहे. आम्ही सतत अपडेट्स बघत आहोत.

क्यामेरा लावून तुम्ही एकदम कल्पक काम केले आहेत. आता अधूनमधून अपडेट्स बघत राहण्याचा चाळा लागणार. मलाही घुबड अतिशय आवडते. एक वेगळाच डौल असतो याच्यात. आणि याच्या चेहेर्‍यावर खरोखरंच शहाणपणा दिसतो असे मला वाटते.

मलाही घुबड अतिशय आवडते. एक वेगळाच डौल असतो याच्यात. आणि याच्या चेहेर्‍यावर खरोखरंच शहाणपणा दिसतो असे मला वाटते.
अगदी, अगदी!!! शिवाय देखणेपणाही असतो. एकदा एका विहिरीजवळच्या बेचक्यात खबदाडीत एकदम जवळ अचानक घुबडाचे पिल्लू दिसल्यावर पहिल्यांदा दचकलो होतो पण नंतर ते लै आवडले होते त्या प्रसंगाची आठवण झाली.

पुढे काय होईल ह्याची खुप उत्सुकता लागुन राहिलीये. बाय द वे एवीतेवी घुबड आता केंद्रस्थानी आहेच तर त्याच्या अपशकुनीपणाचे पण किस्से येउद्यात. कुणाला असा काहि अनुभव आला आहे का कि ह्या फक्त ऐकिव गोष्टि आहेत?

घुबडाच्या काही खास गुणांमुळे त्याला ही गूढता चिकटली असावी असा तर्क आहे: - रात्रीचा वावर - दोन्ही डोळे समोरच्या बाजूला (मनुष्याच्या चेहर्‍याप्रमाणे) बहुधा नाईट व्हिजनसाठी अ‍ॅडाप्टेशन. इतर बहुतांश पक्ष्यांमधे डोळे डोक्याच्या दोन विरुद्ध बाजूंना असतात. - दोन्ही बाजूंना डोळे नसल्यामुळे होणारा व्हिज्युअल फिल्डचा र्‍हास भरुन काढण्यासाठी मान २७० अंशात म्हणजे जवळजवळ उलटी आणि वरच्याही दिशेने वळवण्याची शरीररचना. रात्रीच्या संचारामुळे मुळात हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा कमी वेळा उघडपणे नजरेला येतो. त्यामुळे जेव्हा येतो तेव्हा विचित्र / वेगळा भासतो. सर्व शिकारी पक्ष्यांच्या अंगावरचे रंग, पिसं आणि चोचीचा आकार हे घुबडातही असतात. त्यामुळे अर्थातच एक भीतीदायक चेहरा / रंगसंगती दिसते. घारही जवळून बघितली तर भेदकच दिसते. फक्त डोळे समोर नसतात इतकाच फरक. - घुबड न पचलेला अन्नाचा भाग गोळीच्या रुपात ओकून टाकतं. -मनुष्याच्या चेहर्‍याशी साम्य, घूत्कार करुन आवाज करणं अशा सर्व गोष्टींमुळे उगीच गूढ आणि भीतीयुक्त वलय तयार झालं आहे असं दिसतं. एरवी आता पाहतोय त्यामुळे लक्षात आलं आहे की हा अगदी इतर सर्व पक्ष्यांइतकाच साधासरळ आणि काहीही विचित्र नसलेला पक्षी आहे. काही आक्रमकता असेलच तर तितकी किंवा त्याहून जास्त कावळ्यांमधेही पाहिली आहे. तीही फक्त पिल्लांमुळे असावी. शिवाय पुन्हापुन्हा पाहायला मिळालं तर त्याचं दिसणंही विचित्र वाटत नाहीये. ह्युन्दाई सँट्रो गाडी १९९९ साली जेव्हा भारतात दिसायला लागली तेव्हा तो उंच उभट शेप अत्यंतच विचित्र दिसायचा. असली गाडी लोक कशी हौसेने विकत घेतात अन चालवतात असं मारुती ८०० ला सरावलेल्या डोळ्यांना वाटायचं. आता डिझाईन चेंज नक्कीच झालाय, पण तरीही मुळातला उभटपणा आता विचित्र वाटत नाही. पुन्हापुन्हा बघून सवय झालीय. तशातला प्रकार.

नासिकमधल्या बौद्ध लेणीतील (पांडवलेणी) गुहा क्र. २३ मधील हे घुबडाचे शिल्प (अथेनियन आउल) (३/४ थे शतक) a

तिथल्या लेण्यांमध्ये ग्रीक शिल्पकलेचा फार प्रभाव आहे. व्यापाराद्वारे होणारी आदानप्रदान कलेच्या प्रांतातही होत गेली. किंबहुना यातील काही लेणी ग्रीक (यवनी) कलाकारांनीच खोदलेली असावीत. तिथे अथेनियन घुबडाखेरीज ग्रीक दंतकंथामधले स्फिन्क्स, ग्रिफिन हे काल्पनिक प्राणी पण कोरलेले आहेत.

वल्ली.. या दगडी कोरीवकामाकडे पाहताना विचित्र जाणीव झाली. ते अंतर्वक्र आहे असं समजून पाहिलं तर दगडाच्या आत (पोकळीत) कोरलेलं वाटायला लागतं आणि बहिर्वक्र आहे असं समजून पाहिलं तर खडकातून बाहेर आल्याप्रमाणे (भरीव) वाटायला लागतं.

मिरजेच्या किल्लाभागातल्या एका फारसी शिलालेखाचा फटू घेतल्यावर त्या फटूकडे पाहतानाही असेच जाणवायचे त्याची आठवण झाली.

वल्ली म्हणाला म्हणून मीही शंका घेतली नाही. मला मांजर वाटलं. किंवा वाघ सिंहाचा छावा. शिवाय आसनाखाली पायाशी बसण्याची जागाही घुबडापेक्षा मांजर / पाळीव प्राण्याशी जास्त जुळते.

ग्रीक मिथकांमधला हे घुबड काही वेळा धड प्राण्याचे आणि शिर पक्ष्याचे (घुबडाचे) अशा स्वरूपातही दाखवले जाते. हे तिथे असणारे अजून काही ग्रीक मिथकांतले प्राणी स्फिन्क्स (धड सिंहाचे शिर मानवाचे) आणि ग्रिफिन (धड पशूचे आणि शिर गरूडाचे) a-a

आमच्या इथे (भांडुप मधे) मागच्य वर्षी चुकुन आलं होतं. पण ते वरच्या फोटोमधे आहे त्यापेक्षा वेगळं होतं दिसायला - छान गुबगुबीत आणि शुभ्र रंगावर काळे ठिपके अस होत. आम्हाला कुणीच ते पाळू दिलं नाही आणि कावळ्यांनी हुसकावून लावलं त्याला :(

मस्त उपक्रम आणि त्यावरचा लेखही ! अपडेटही उत्सुकतेने वाचतोय. सर्वसाधारण लोकांसारखे खुळ्या अंधश्रद्धेला बळी न पडता उलट या घटनेचा चांगल्लच उपयोग केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद !

घुबड फार क्वचित दिसतं. हल्लीच समोरच्या झाडावरच्या बगळ्यांचा अंडी-ते-पक्षी हा प्रवास पाहिला. अंड्यातून बाहेर आल्यावर दिवसागणीक इंचा-इंचाने मोठी होतात की काय असं वाटायचं. या पक्षांमध्ये पण एखादं पिलू दुबळं निघतं आणि ते बहुदा मरतं. अंडी घालण्याअगोअदर चोचीने घरटं बांधायची कलाही थक्क करणारी.

वेगळाच विषय हाताळायला मिळतोय गवि अभिनंदन आणि शुभेच्छा. वेळो वेळी डिटेल्स मिळत जातीलच याची खात्री आहे. वेबकॅमची कल्पना पण भारीच. सहमत.

दुसरे पिल्लू बाहेर. सातपैकी पाच अजूनही अंड्यात. उंदीर गायब. सर्वांनी मिळून पोटात घातलेला दिसतो. ब्रेकफास्ट लंच डिनर.. आता बघू पुढे.

त्या घुबडिणीचे कान जबरी तिखट असणार. कारण वेबकॅम चालू झाल्याझाल्या तिने लगेच तिकडे बघितले. तुमच्या वेबकॅमला ऑटोफोकस आहे का? कारण त्यातल्या सर्वो किंवा स्टेपरचा आवाज आला तर ती वर बघणार!

या क्लिपच्या वेळी वेबकॅम चालू केला आहे असं नव्हे. वेबकॅम सतत चालूच आहे. या सीनपूर्वीही अनेक व्हिडीओ कॅप्चर झाले आहेत. त्यामुळे या क्षणी कॅमेरा चालू झाल्याचा आवाज वेगळा आला नसणार. मोशन डिटेक्शन मोडमधे अधेमधे ठेवतो (समोर सतत बसणे शक्य नसल्याने). त्यामुळे कॅमेर्‍याच्या एन्डला काही घडत नसावं. फक्त रेकॉर्डिंग (सॉफ्टवेअरमधे) चालू बंद होतं. बाकी वेबकॅममधून काही याखेरीज वेगळा आवाज येत असेल तर माहीत नाही. मॅन्युअल (डिजिटल) झूम आणि काही प्रमाणात पॅनिंगची सोय आहे. ती सॉफ्टवेअर कंट्रोलमधूनच. हा कॅमेरा आहे: A अर्थात तो एका पॅकेजिंग मटेरियलच्या ठोकळ्यात घालून ठेवला आहे. समोरचा LED बंद ठेवण्याचे सेटिंग केले आहे. (प्रत्यक्ष बंद झाला का हे पहायचे तर पुन्हा सर्व उचकटावे लागेल.) तरीही नवीन वस्तू घुबडिणीने नोट केली आहे. ती घुबडिणीला कदाचित एका डोळ्यासारखी भासत असेल. पण या वस्तूपासून उपद्रव नाही हे दोनतीन दिवसात समजल्याने तिला साधारणपणे त्यापासून आता धोका वाटत नाही असं दिसतं आहे.

ह्या वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र जोडून,आणि इतर काही वेगळ्या क्लिप्स जोडून, सोबतीला संगीत आणि समालोचन देऊन एक शॉर्ट फिल्म बनवता येऊ शकेल. जी या पक्षाच्या जीवावर उठणार्‍यांना नवीन काही तरी दाखवेल. :)

गवि मस्त चालु आहे प्रयोग . हा कॅमेरा भन्नाट आहे ...पुर्णवेळ बीझी न रहाता नीरीक्षण करता येत आहे :) ( लेख फेसबुकावर शेयर करीत आहे )