Welcome to misalpav.com
लेखक: बहुगुणी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पं. भीमसेन जोशी गेले त्या दिवशी त्यांची एक मुलाखत डीडी वर प्रसिद्ध झाली होती. तेव्हा भीमसेन जोशी आणि मन्ना डे यांनी गायलेली ही जुगलबंदी कायमची स्मरणात राहीली. http://www.youtube.com/watch?v=vcqmOaQSPDA गाणं: "केतकी, गुलाब, जुई" चित्रपटः बसंत बहार (१९५६) सं. दि.: शंकर जयकिशन

खरोखरीच चांगली गाणी गाणारा एक गवई गेला आपल्यातुन. चांगली शास्त्रीय बैठक असलेला असा एखादाच. असो. विनम्र श्रद्धान्जली मन्ना डेंना !!! - (सांगितीक) वाट्या...

खूप काही दिलय मन्नादांनी, त्यांच्या आवाजामुळे आयुष्यातले कित्येक क्षण समृद्ध झालेत, त्यांच्या आवाजाने ते कायमच आपल्यात राहातिल. त्यांना चिरशांती लाभो!

आवर्जून मराठी गाण्यांच्या जोडण्या (लिंक्स) टाकल्याबद्दल धन्यवाद. मन्ना डे ह्यांनी एकूण ५५ मराठी गाणी गायली आहेत.

शास्त्रीय संगीताचा तगडा बाज असणारा, तरीही सगळ्या प्रकारची गीतं सहजरित्या गाणारा एक गुणी गायक हरपला.. संगीताच्या तिन्ही पट्ट्यांमधला त्यांचा सहज वावर कायम स्मरणात राहील. "ऐ मेरे प्यारे वतन" मधला मंद्र सप्तकातला स्वर असो, "आजा सनम मधूर चांदनी में हम" मधला मध्य सप्तकातला असो, किंवा "यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी" किंवा "याल्ला याल्ला दिल ले गयी" मधला तार सप्तकातला खडा स्वर असो, मन्ना दा कायमच स्मरणात राहतील..

दाखवणारं हे एक मराठी गाणं.. फक्त शास्त्रीय बाजाचीच नाही तर उडत्या चालीची गाणीसुद्धा किती सहज गाता येतात हे त्यांनी दाखवलं.