नादखुळा छंद आहे गवि. आम्हाला इथे बसुन बघताना इतका आनंद होतोय तर तुम्ह्ला प्रत्यक्ष पहायला मिळतय म्हटल्यावर तुमच्या आनंदाला पारावार नसावा.
बाकी आनंदराव म्हणतायत तसं नाव बदलता आलं तर पहा. :)
आज एक नव्हे तर तीनतीन उंदीर शिकार करुन आणलेले दिसताहेत.
पुन्हा एकदा: रात्री व्हिडीओ अजूनतरी मिळत नसल्याने ही शिकार आईच करतेय की बापही जिवंत आहे याचा पुरावा नाही. नाईट व्हिजनची सोय केली पाहिजे. एरवी आपल्या उत्सुकताशमनार्थ त्यांच्यावर काळोखात टॉर्च मारणं मला पटत नाही.
इतक्या उंदरांचा स्टॉक का केला असावा? पुढच्या पिल्लांच्या अपेक्षेने का?
पहिल्या आणि दुसर्या पिल्लात ३ दिवसांचं अंतर होतं. रविवारी पहिलं, बुधवारी दुसरं, अशा क्रमाने साधारण शुक्रवार शनिवारी तिसरं यायला हवं. आज उरलेली पाच पिल्लं अजूनही अंड्यातच आहेत.
वाईट गोष्ट म्हणजे आज सकाळी एका पिल्लाची काहीच हालचाल दिसत नाहीये. खालील व्हिडीओ पहा.
पण ते जिवंत नाही असं इतक्यावरुन खात्रीने सांगता येणार नाही. ते हालचाल करेल अशी आशा. कार्यालयातून घरी गेलो की संध्याकाळी खात्री करुन सांगेन. हे आधी जन्मलेलं (दोघांतलं मोठं) पिल्लू आहे असा अंदाज.
विष घातलेले उंदीर खाल्ल्यामुळे मुख्यतः घुबडं मरतात. लहान पिल्लांना तर हा विषाचा अंश अजिबात सहन होत नाही. त्याच कारणाची भीती आहे. सगळीकडे कमीजास्त फरकाने घुबडांना हाच प्रॉब्लेम आहे कारण शहरांमधे उंदरांना अमिष ठेवून सापळ्यात पकडणे या सोबत दुसरा मार्ग म्हणजे विषारी अन्न ठिकठिकाणी ठेवणे किंवा रॅटकिल वगैरे हाही वापरला जातो. :(
झोपलं असावं अशीच इच्छा आहे. पोट हलताना मला तरी दिसलं नाही. दुसर्या पिल्लाचं पोट / छाती हलतेय ते स्पष्ट आहे. आता पुन्हा बघतो.
आज सकाळपासून त्या काल निपचित पडलेल्या पिल्लाचे काय झाले ते बघायला बराच वेळ नेटाने निरीक्षण केलं. पण घुबडाई पिल्लांवर बसलेल्या हलायलाच तयार नव्हत्या. काही सेकंद उठल्या तेव्हा लक्षात आलेल्या गोष्टी:
१. तिसरे अंडे उघडले आहे. म्हणजे अजून एक (तिसरे) पिल्लू जन्मले आहे.
२. तेवढ्या हालचालीमधे एकच पिल्लू दिसले (व्हिडीओ पहा) ते दमदार हालचाली करत होते. बाकीची पिल्ले पंखाखाली असल्याने दिसली नाहीत. त्यामुळे त्या कालच्या पिल्लाच्या नशिबाविषयी मनात सस्पेन्स घेऊनच घरातून निघावे लागले.
फोटोंमधे.. (काहीजणांना घाण / किळसादि वाटू शकेल पण जे काही असेल ते लॉग करणे या उद्देशाने लिहीले पाहिजे.)
१. आज आणखी एक नवा उंदीर आणलेला दिसला.
२. घुबडांच्या पद्धतीप्रमाणे न पचलेल्या अन्नभागाला तोंडावाटे गोळीच्या स्वरुपात बाहेर टाकणे. या गोळ्यांना पॅलेट्स म्हणतात. पहाटे जरा अंधारात काढल्याने हे गुप्तहेर फोटो जास्त क्लिअर नाहीत. रात्री काहीतरी मारामारी झाली असावी कावळे / अन्य कोणाशी. कारण पिसे पडलेली दिसत होती (घुबडाची स्वतःची).
३. मधेच खाली झुकून पिल्लांना साफ करणे किंवा चोचीने स्पर्श करणे, खाजवणे यांपैकी एक चालू असतं.
ग वि साहेब,
एक तर घुबडे मेलेले उंदीर सहजा सहजी खात नाहीत कारण ते रात्री आपल्या नजरेने आणि ऐकण्याच्या शक्तीने हालचाल करनार्या उंदराला अंधारात शोधतात. त्यामानाने त्यांना मेलेला उंदीर सहज दिसत नाही. आणि शिवाय दोन सर्वात जास्त वापरली जाणारी मूषक नाशके म्हणजे झिंक फोस्फाईड आणि ब्रोमोडायोलोन. हि आहेत. यापैकी झिंक फोस्फाईड हे उंदराच्या शरीरात पूर्ण विघटन पावते आणि त्यामुळे त्याचा उंदीर खाणार्या प्राण्यांवर परिणाम होत नाही पहा http://npic.orst.edu/factsheets/znptech.pdf
ब्रोमोडायोलोन मुले उंदीर ३ ते ७ दिवसांनी अंतर्गत रक्तस्त्रावाने मरतात पण बहुधा ते बिळात जाऊन मरतात त्यामुळे असे उंदीर घुबडांच्या तावडीत सापडतील हि शक्यता कमी आहे. त्याशिवाय ब्रोमोडायोलोनमुळे येणारा मृत्यू हा काही दिवसांनी होत असल्याने घुबडाची पिल्ले एवढ्यात त्याला बळी पडतील अशी शक्यता फार कमी आहे.
ईश्वरेच्छा बलीयसी
तसंच होऊ दे आणि कोणतीही विषबाधा न होऊदे अशी इच्छा....
मेलेले उंदीर घुबड खात नाही हे माहीत आहे, पण मरण्यापूर्वी / अर्धमेले उंदीर पकडू शकतं. त्यामुळे मुख्यतः त्यांचे मृत्यू होतात असं दोनतीन संदर्भांत वाचलं होतं म्हणून तसं वाटलं. तुम्ही दिलेली माहिती वाचून बरं वाटलं.
हे उंदीर मृतावस्थेत खिडकीखाली असू देण्यात माझ्या घरच्यांना मोठा आरोग्यविषयक धोका आहे का?
हाच प्रश्न न पचलेल्या अन्नाची बाहेर टाकलेली पॅलेट्स आणि अन्य उत्सर्जिते यांविषयीसुद्धा आहे.
खिडकी बारीक फट वगळता बंदच ठेवली आहे. तिथेच विंडो एसी आहे, तोही सध्या वापरत नाहीये. तो वापरल्यास तिथली दूषित / संसर्गित हवा आत येईल ना?
गवि साहेब,
ए सी जर रिसर्क्युलेशन मोड वर वापरला तर बाहेरची हवा आत येणार नाही त्यामुळे तसे वापरावयास हरकत नाही.
परंतु ए सी च्या आवाजाने घुबडाला अत्यंत त्रास होण्याची शक्यता आहे. मुळात त्यांचे कान अतिशय तीक्ष्ण असतात त्यात विंडो एसी चा पंखा पूर्ण वेळ आवाज आणि कंपन( vibrations) करीत असेल तर काय होईल ते सांगणे कठिण आहे.
मेलेल्या उंदरांचे तुम्हाला तसे काही प्रदूषण होण्याची शक्यता कमी आहे.
वेगळाच अनुभव, वेबकॅमची क्लॅरिटी खतरनाक आहे. शाळेतील पाठ्यपुस्तकात चिमण्या आणि मुलं धडा होता, त्याची आठवण आली.
आमच्या खिडकीत मागील हिवाळ्यात कबुतरीणबाई आल्या होत्या. दोनच अंडी होती. बहुतेक कबुतरांपर्यंत कुटुंबनियोजन पोचले आहे, घुबडांचा नंबर यायचाय अजून.
गव्हाणीचे घुबड मुंबईतही खूपशा ठिकाणी आढळते. याचे कारण तिथे उंदरांचा सुळसुळाट आहे. डॉ. गिरीश जठार हे घुबडांवरचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या वनपिंगळ्यावरील पुण्यातील इंद्रधनू येथील व्याख्यानात त्यांनी हे सांगितले होते.
धाग्याचं नाव बदलता आलं तर जरूर पहा. कारण उगाच काहीबाही विषय घेऊन चर्वितचर्वण करत बसली असतील मंडळी असा समज झाल्याने मी हा धागा सगळ्यात शेवटी उघडून पाहिला. :(
जाताजाता, जितकं शक्य असेल तितका निसर्गाच्या व्यवहारांमधील हस्तक्षेप टाळावा.
आधी वाटलेली काळजी खरी ठरली नाही. एक पिल्लू गेलं होतं असं वाटलं पण चार अंडी अक्षत दिसताहेत आणि तीन पिल्लंही तेव्हा सर्व जिवंत आहेत. माझा गैरसमज झाला..
शुक्रवारीच आणखी एक पिल्लू जन्मलं होतं. मला असं वाटलं की दोन नंबरचं पिल्लू जगण्याच्या झगड्यात बळी गेलं. पहिलं तिसरं आणि चौथं सध्या अस्तित्वात आहेत. पण तीनच जन्मली आहेत आणि तिन्ही जिवंत आहेत हे आता कळलं. नंबर १ आता मोठं झालं आहे. त्याचे डोळे उघडले आहेत. त्याने खाणंपिणं व्यवस्थित सुरु केलं आहे आणि त्याउपर आता अविर्भाव करुन शत्रूला (शत्रू = मी, कावळे इत्यादि) घाबरवणंही सुरु केलं आहे.
सोमवार सकाळचा व्हिडीओ:
आता एक विशेष गोष्ट. या व्हिडीओबाबत आणि त्यावेळच्या घटनेबाबत. मी आज पहिल्यांदाच फोटोच्या / व्हिडीओच्या मोहात पडून एक चूक केली. मी पहिल्यांदाच थेट कॅमेर्याने फोटो काढायला म्हणून खिडकी उघडली आणि हात बाहेर काढले. मला माहीत होतं की अशाने घुबडाई उडून जाते. पण तरीही मी ते केलं कारण तशीही शिकारीसाठी ती काहीकाळ पिल्लांना सोडून दूर जातेच असं मला वाटत होतं.
तशी ती खरंच उडून समोरच्या झाडावर जाऊन बसली. आणि त्यानंतर एक भयंकरच नाटक घडलं ज्यामुळे मला बर्यापैकी धक्का बसला.
जणूकाही घुबडाई तिथून बाहेर निघण्याची दिवसरात्र वाट पाहात असल्याप्रमाणे आजवर घराजवळ कधीही न दिसणारा कोतवाल (ब्लॅक ड्रोंगो) पक्षी तातडीने तिथे येऊन घुबडाच्या पिल्लांवर हल्ला करण्यासाठी घुसू लागला. मी त्याला हुसकावलं कारण चूक माझी होती.
तेवढ्यात सात आठ कावळ्यांचा एक झुंड आला. तोही टपून बसल्यासारखाच दिसत होता. त्यांनी टीमवर्क करुन पिल्लांना खायचंच असं टार्गेट ठेवल्याप्रमाणे काम विभागून घेतलं. दोन कावळे घुबडामागे लागून त्याला भेवडवून आणखी दूर घेऊन गेले. (आउट ऑफ साईट) बाकीचे तीनचार कावळे घरट्यामधे घुसायला लागले. मी बर्यापैकी सटपटलो कारण माझ्या एका कृतीने आता ती तिन्ही पिल्लं मरणार होती. मला एकदम टेन्शन आलं आणि मी त्या कावळ्यांना हुसकावत तिथेच उभा राहिलो.
आता आपत्ती अशी होती की मी तिथे हुसकत उभा असेपर्यंत घुबडही परत येणार नाही आणि मी हुसकणं थांबवून आत गेलो तर कावळे एक मिनिटही पिल्लांना जिवंत सोडणार नाहीत.
यातून मार्ग काढण्यासाठी मी खिडकीच्या लेव्हलखाली लपून कावळ्यांना आवाजाने हाकलत राहिलो. एकदोन मिनिटांनी ते घुबड कावळ्यांचा ससेमिरा चुकवून घरट्यात आलं. ते खूफिया कॅमेर्यात पाहून माय सोल फेल इन युटेन्सिल.
मग सर्व पूर्ववत झालं. आता स्वतःच्या उतावीळपणापायी असले प्रयोग करायचं नाही असा स्टोन टू ईअर.
:)
आणखी एक व्हिडीओ. वरुन व्ह्यू असल्याने नीट दिसत नाही पण भक्ष्याचे लचके तोडणं (बहुधा पिल्लांना भरवण्यासाठी) चालू आहे. पिल्लांचे चर्प चर्प ऐकण्यासारखे आहे. व्हॉल्यूम वाढवा.
तुमच्यातल्या भूतदयेला सलाम! तुम्ही त्या घुबडाईला ऊठवून लावण्यात 'उतावीळपणा' केला म्हणत असलात तरी आमच्यापैकी बहुतेकांनी उत्सुकतेपोटी exactly तेच केलं असतं, what mattered is that your soft side showed through आणि thanks to you, मायलेकरं सुरक्षित आहेत!
बाकी ते "माय सोल फेल इन युटेन्सिल...स्टोन टू ईअर..." खासच!
वाहवा. अतिशय स्तुत्य उपक्रम आणि अगदी वेगळा धागा.
पुढे काय काय कसकसे होते, हे बघण्याची उत्सुकता आहेच.
जीएंनी 'पिंगळावेळ' असे ज्याला म्हटले आहे, त्यावेळी म्हणजे साधारणतः पहाटे चारच्या सुमारास घरासमोरच्या तारेवर एक पिंगळा (हे नेमके कोणत्या जातीचे घुबड असते, हे ठाऊक नाही, पण लहानसे असते) येऊन बसतो, आणि काहीतरी 'बोलून' उडून जातो, असे बरेचदा बघितले आहे. ही घुबडीण पहाटे अवाज काढते का?
इतर पक्षांपेक्षा दिसायला वेगळे असल्या कारणानेच घुबड खुप आवडते. वेब कॅम द्वारे घुबड कुटुंबाची दिनःश्चर्या टिपून आणि सोबतीच्या समालोचनाने ह्या पक्षीविषयक ज्ञानात भर पडते आहे.
सर्वांना थँक्स.. :)
पिल्लं कशी आधी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या साईझची दिसताहेत ना?
घुबडाच्या पिल्लांना काहीतरी शब्द काढला पाहिजे.. कॅट - किटन, डॉग - पपी, गाय - वासरु, घोडा - शिंगरु तसं.
बादवे, मला एक इमिनंट घटना काळजीत पाडते आहे. आवाजाबाबत अत्यंत सेन्सिटिव्ह असलेले हे पक्षी चारच दिवसात येणार्या दिवाळीच्या बाँब्स आणि कडकड वाजणार्या माळांना कसे सहन करणार? विशेषतः पिल्लं. एखादा अग्निबाण घरट्यात शिरु नये अशी इच्छा. अर्थात तशी शक्यता कमी आहे.
तुम्ही पालक आहात त्या पिलांचे :-) वेळेवर नांवे ठेवलीत तर पुढे पिलू नं.१, पिलू नं. २ ....करायला लागणार नाही!
(बाकी video blog (vlog) ची वाटचाल मस्त चालली आहे, जमलं तर एकसंध short film करता आली तर बघाच. इथेच तज्ञांची मदत मागून crowdsourcing करू शकाल. अशा प्रकारची collaborative film तयार झाली नसेल तर अभिनव प्रयत्न ठरेल.)
थरारक, उत्कंठावर्धक, नेत्रसुखद, वाचनीय, नाविन्यपुर्ण
ओळ न ओळ वाचतोय.
तुमचे अपडेट आले की आधीचे व्हीडीओ बघुन परत परत तुलना करतोय.
आणि पुढच्या अपडेट्सची वाट बघतोय.
बहुगुणी म्हणतायत तेच म्हणतो, तंतोतंत.. अजून एखादा कॅमेरा डकवता आला तर बघा..
आणि गविकाक, दिवसातून किमान एक अपडेट तरी टाकाच, काळजी/ उत्सुकता वाटतेय.. एस्.पी.सी.ए. ला कळवणार आहत का? पुढे जाऊन ही पिल्लं घरट्याबाहेर कधी आणि कशी झेप घेतील तेव्हा तुम्ही त्यांना कसं सावरणार, काही विचार केलाय का? कावळा हा महानालायक प्राणी आहे, टपून असतो! उडायला शिकणार्या कित्येक पोपटांना समूहाने कावळे टोचताना पाहिलय..
चांगला करमणूकीचा उपक्रम आहे .पक्षी थोडावेळ दूर जात असेल तर ओळखण्यासाठी अंड्यांवर स्केच पेनने रंगीत रेघा (रेझिस्टनसवर असतात तशा)मारा आणि वहीत प्रत्येकाची नोंद करा .जमल्यास अंडयाचे वजन घ्या .अगोदर आलेल्या पिलांच्या पायात रंगीत दोरे बांधा .पुढे कधी मोठे घुबड पाहिल्यास ओळखता येईल गविंचे घुबड .
आज व्हिडीओ तर घेतले. पण घुबडाईने पिल्लाना पूर्णवेळ पोटाखाली लपवून ठेवलेलं ... जाम उघड करेना.
त्यामुळे काही इव्हेन्ट कॅप्चर झाला नाहीच. मला मोशन डिटेक्ट ऑप्शनमधे तांत्रिक अडचण येतेय. माझा लॅपटॉप त्या ऑप्शनमधे तातडीने हँग होतो आणि गरम होत जातो. मोशन डिटेक्ट व्हिडीओज बनायचे बंद झाले.
समोर बसून मॅन्युअली कॅप्चर करणं कार्यालयामुळे शक्य नाही. त्यामुळे पहाटे उठून वेळ काढतो. पण तेवढ्यात काही घडले नाही की काहीच कळत नाही अपडेट.
आज घुबडीण जागची हललीच नाही त्यामुळे आज अपेक्षित असलेलं आणखी एक पिल्लू बाहेर आलं की नाही हेही कळलं नाही.
:-(
लॅपटॉपच्या एक्झॉस्ट जवळ एक टेबल फॅन चालू ठेवा. माझा लॅपटॉप तापला की मी सरळ त्याला उचलुन एसीच्या ब्लोकडे ठेवतो २-३ मिनीटं. तुमचा एसी सध्यां बंद असल्याने जर टेबल फॅन असेल तर तो वापरुन पहा.
प्रतिक्रिया
मस्त चाललय ! फ्क्त ते
गवि, अभिनंदन आणि शुभेच्छा.
नादखुळा छंद आहे गवि. आम्हाला
छान आहे
गविभाउ......... हे उत्तम सुरु आहे
भन्नाट आहे गविशेठ.
२४ ऑक्टोबर गुरुवार सकाळ
नाही नाही गवि, पोट म्हणजे जठर
विष घातलेले उंदीर
ओय! नको हो! ती शिकारीची उंदर
वा! खाण्यापिण्याची चंगळ आहे
तुमचे नशीब थोर...........
२५ ऑक्टो. शुक्रवार सकाळ.
भारीच...
मस्त..
ग वि साहेब,
तसंच होऊ दे आणि कोणतीही
घाण वास येत असेल तर हे सगळ
गवि साहेब,
मस्त
जबर्या उपक्रम...
मस्तच
गवि, तुम्हांला प्रचंड धन्यवाद..
शनिवार २६ ऑक्टो ते सोमवार २८ ऑक्टो.
आल इज वेल हे वाचल्यावर माय
माईन ऑल्सो
लगे रहो, गविभाई!
बघा? मी म्हंटल होतं कनी?
ज्यांना व्हिडीओ दिसत नाही
सुपर्ब!
मस्तच !!
पिंगळावेळ
वाचतो आहे.
थँक्स..
हि पिल्लं मोठी होणारेत सगळी !!
कसं वाटतं??
हे ही चालेल.
आउलेट हा शब्द आहे आधीच.
घुब्बाळ
गवि, आता नामकरण करा
थरारक, उत्कंठावर्धक,
अगदी हेच..
चांगला करमणूकीचा उपक्रम आहे
छान लिहिलय. वेगळाच विषय.
गवी काका .
बाळ-बाळंतीण कसे आहेत?
आज व्हिडीओ तर घेतले. पण
चर्रर्रर्र.....
लॅपटॉपच्या एक्झॉस्ट जवळ एक
पाहिजे तर हपिसला दांडी मारा!
Pagination