Welcome to misalpav.com
लेखक: भ ट क्या खे ड वा ला | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

चिपळूण म्हणजे माझे सासर. पण जास्त पाहिलेले नाही. मात्र मुंबईत, दहिसरात, १९५४ ते १९८१ आयुष्य घालविले. तिथे आंबा, फणस, चिकू, पेरू, बोरे, करवंदं, कमरकं, काजूची बोंडं, जांभळं, केळी, शहाळी, चिबुड भरपूर भरपूर खाल्ले. विकत नाही. थेट झाडावरून तोडून. फुलांमध्ये गुलाब, मोगरा, जाई-जुई, कृष्णकमळं, जास्वंद, चाफा, रातराणी, सुरंगी वगैरे वगैरे अनेक फुलांनी बालपण सुगंधी केलं. दुर्दैवाने कोणी जाणकार न भेटल्याने दुर्मिळ झाडाफुलांची, रान भाज्यांची ओळख झाली नाही. त्याची खंत जरूर आहे.

झकास लेख! आमच्यासारख्या शहरी वातावरणात वाढलेल्या पोरांना असले छान छान वास कुठून येणार? हातभट्टीसाठी टायर जाळल्याचा वास, ट्रकच्या चोंदवणार्‍या डिझेल धुराचा वास, पोहोण्याच्या तलावावर येणारा क्लोरीनचा गंध, असलेच गद्य वास जवळचे.

सुरेख लेख. काही आठवणी या फक्त आणी फक्त गंधाशीच निगडीत असतात. विशेषतः बालपणीच्या . जेंव्हा त्या गंधात, दरवळात आपण न्हाउन निघत असतो तेंव्हा त्याच अप्रुप नसत आपल्याला. मला कित्येक वर्ष दवाला पारिजातकाचा गंध असतो असच वाटायच. फार लवकर जाग यायची लहाण्पणी. मग उठुन पलिकडच्या घरात उडी मारायची. कोणाचीही चाहुल नसायची. अगदी पाखरांची सुद्धा. अन मग त्या टप टप अश्या टपटपणार्‍या पारिजातका खाली उभा रहायच. न अकळत डोळ्यातुन दवबिंदु ओघळायचे. आद्ल्या दिवसाच सारं मलिन्पण धुवुन निघायच. पुन्हा खळ्खळुन हसायला, जमेल तस जगायला बळ मिळायच. रातराणी तशी बक्कळ असायची पण संध्याकाळी कधी रम्य नसायच्या. हल्ली गावाकडच्या "माही" च्या वासाची आस लागलीय. सार्‍या गावात, लिंबु, कांदा अन कमी मसाल्याचा रस्सा...एक वेगळाच घमघमाट..सामुहिक. मातीचा वासही असाच...धाटांचा वास...मोहराचा वास..अन तरुणपणी कधीतरी वेडावणारा,पावसाने लगडलेला ऑस्ट्रेलीयन बाभळीचा वास.

सुंदर लेख. गंधांच्या निमित्ताने आठवणींच्या गल्ल्यांमधून फिरवून आणत, तिथल्या कुप्या उघडून स्मृतिगंध दरवळत ठेवणारा. -रंगा

प्रत्येक गंधाबरोबर एक एक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात त्यांना उजाळा मिळतो. लेख अजून विस्ताराने लिहा म्हणजे अधिक आनंद मिळेल. लिहिते रहा.

अशा अनेकविध स्मृतींचाच खजिना बनतो, आणि उधळूनही हा कधीच लुटला जात नाही. गंधाशी स्मृती निगडीत असावी याचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. कोकणात बालपण गेल्याने तुम्ही लिहिलेल्या बर्‍याच स्मृतींशी रिलेट करता आले. या निमित्ताने स्वर गंधाचे एक नवीन नाते हि उलगडले.>> हे वाक्य फार आवडले. अतिशय सुंदर लेख.

थोडी भर माझ्याकडुनही मे महिन्यात मित्रांबरोबर खाडीवर पोहायला गेल्यावर येणारा खारट पाण्याचा गंध..हिवाळी ट्रेक करताना येणारा कोरड्या गवताचा वास...आंब्याच्या मोहराचा मंद सुवास..देवळातला धुपाचा सुगंध