Welcome to misalpav.com
लेखक: मन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अभ्यासपूर्ण लेख. आपण म्हटल्याप्रमाणं इथं अल्जिरिया मध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोमन लोकांचं साम्राज्य होतं. आज देखील इथे त्यांच्या रोमन धाटणीतल्या इमारतींचे अवशेष 'तिपाझा' नि 'ग्वेल्मा' इथं पहायला मिळतात. आफ्रिका खंडातलं सगळ्यात जुनं चर्च अल्जिरिया मध्ये आहे असं ऐकिव माहितीतून समजलंय. (१००० वर्षांपूर्वीचं वगैरे ऐकलंय. ऑथेन्टिसिटी कितपत याबद्दल शंका आहे.) थोडं गुगललं तर http://ghardaiatourisme.com/site/en/nord/algerie-romaine/ हे मिळालं. बाकी तलवारीच्या नि भाकरीच्या जोरावर धर्माचा प्रसार सगळ्याच संप्रदायांमध्ये आढळतोय. व्यापार निव्वळ! :(

अभ्यासपूर्ण लेख. वाचते आहे. खालच्या आकृतीत ती ढोबळमानाने दाखवायचा प्रयत्न केलाय.- म्हणजे युरोपची भूमी, # म्हणजे समुद्र, * म्हणजे मध्यपूर्व तर . म्हणजे आफ्रिका असं मानलं तर साधारण रचना अशी काहिशी आहे:- ही आकृती मला कळली नाही. भूमध्य समुद्राच्या भूगोलाची थोडिशी माहिती खालील धाग्यावर मिळेलः- इथं मला धागे दिसत नाहीत.

थ्यांक्स प्यारे. मंडळी, ह्याच धाग्याचा पुढील अंक/भाग खालच्या दुव्यावर वाचता येइल :- http://www.misalpav.com/node/25990 अवश्य वाचा , प्रतिक्रिया कळवा. . नोटः- जवळपास निम्म्या जगात मुस्लिम धर्म असणारे सत्ताधारी मध्ययुगात कसे कसे पसरले ते माझ्या चश्म्यातून लिहितोय. (सध्याच्या भारतीय मुस्लिम नागरिकांबद्द्ल मला राग आहे असे कुणीही समजून घेउ नका प्लीझ. मी मध्य युगाबद्दल लिहितोय.)

वाचत आहे. सर्व नीट वाचल्यावर प्रतिसाद देण्याचा विचार आहे. विवेचनाबरोबरच शक्य तितकी जास्त चित्रे, नकाशे वगैरे अवश्य द्यावेत. हाच का तो बाबक खुर्रामुद्दिन ? Babak Khorramdin .

युरोप, रशिया, आफ्रिका इ. च्या संदर्भात पर्शियन साम्राज्य नेमके कुठे होते, याचा शोध घेता हे सापडले: (या साम्राज्याचा भारतीय इतिहासात वा पुराणात काय उल्लेख सापडतो? याचे संस्कृत नाव काय?) .

सर्व वाचकांचे,वाचनमात्रांचेही आभार. वल्ली, चित्रगुप्त ह्यांना नकशाबद्दल विशेष थेंक्स. वरील लेखात एक दुरुस्ती आहे. रशिया हा रोमन साम्राज्याचा भाग नव्हता. दुरुस्ती सुचवल्या बद्दल बॅटमॅनचे आभार. .