Welcome to misalpav.com
लेखक: घन निल | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त लेख आहे. त्याहीपेक्षा अतिशय जास्त तपशीलवार माहिती पाहिजे असेल तर मायबोलीवर "अन्नं वै प्राणा:" नामक १०-१२ भागांची लेखमाला वाचणे. नाद खुळा आहे. शेकड्याने रेफरन्सेस भरलेत.

अबे हपिसात माबो ब्यान आहे. "अन्नं वै प्राणा:" असे गुगललेस मायबोली.कॉम देऊन की येईल बघ. चिनूक्स नामक आयडीने लिहिलेली लेखमाला आहे.

लेख जबरदस्त आहे. वेळेअभावी मी नक्की कशाकशाला मुकत होतो /आहे हे सुद्धा कळणे कठीण आहे. तुला माहित असलेलं जालावर जे काही वाचनीय असेल ते शेयर कर म्हणून मागेही म्हणालो होतो. असे जित्के तुझे आवडिचे वेगवेगळ्या विषयातील धागे असतील, ललित्,माहितीपूर्ण्,विनोदी,गंभीर, भावनिक वगैरे वगैरे कसेही असू देत किंवा अगदि "मोकलाया दाहि दिशा" सारखं ऑल टैम ग्रेट रत्न असू देत; ते शेयर कर रे बाबा. प्लीझ.

भारी आहे लेख ! अजून असा एक किस्सा कोना आठवले नावाच्या लेखकाचे एक सरदार बापू गोखल्यान्वरचे एक पुस्तकात आहे त्यात वाचला होता,दुसर्या बाजीराव चा तो किस्सा द्राक्षांच्या सारा(ज्यूस म्हणा हवे तर ) बद्दल होता ,पण आठवत नाहीये आणि ते पुस्तक गावी आहे आता , दिवाळीत गेल्यावर शोधून टाकतो

सबब "सगळ्यात पहिला लाडू कोणी खाल्ला असेल?" ह्याचा एकदा शोध लागला कि आपोआप तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. बाकि प्रश्न गहन विचार करायला लावणारा आहे खरा. असो अहो कुठे ह्या फंदात पडताय....मस्त खायचा/प्यायचा आनंद लुटा आणि स्वस्थ रहा. दिवाळिच्या हार्दिक शुभेच्छा!

अहो संशोधनाच्या कामास मिपाकरांना लावले कि मी आपला फराळ करण्यास मोकळा ! काय समजलात ! ( कानातला अत्तराचा फाया तर्जनी अन अंगठ्यात धरून सुगंध घेतानाची स्मायली !!)

मला वाटलं यावर्षीच्या फराळाच्या पदार्थात लाडू पहिल्यांदा कोणी बनवले? असे विचारायचे आहे काय. असो. तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही.

खरंच विचार करणीय गोष्ट आहे. याचे नक्की उत्तर ठाऊक नसले, तरी कल्पना करू शकतोच की आपण. म्हणजे 'कोणी बनवला' बद्दल जरी नाही, तरी 'लाडू' हा पदार्थ कसकसा उत्क्रांत होत गेला असावा, वगैरे बद्दल कल्पनाविलास.... समर्थांनी दासबोधात त्याकाळी प्रचलित असलेल्या शेकडो खाद्यपदार्थांची नावे दिलीत. (त्यातली बरीच हल्ली माहितही नाहीत कुणाला) कुणीतरी हुडकून टाका कि जरा इथे.

समर्थांनी दासबोधात त्याकाळी प्रचलित असलेल्या शेकडो खाद्यपदार्थांची नावे दिलीत. (त्यातली बरीच हल्ली माहितही नाहीत कुणाला) कुणीतरी हुडकून टाका कि जरा इथे.
हे काय हो "एक तुतारी द्या मज आणुनि" टाईप..?!! ;)

संत एकनाथांच कृत रुक्मिणीस्वयंवरात रुखवताचे रसाळ वर्णन आहे. त्यात लाडू आहेत! अत्यंत लाडें वळिले लाडु| विवेकतिळवियाचे जोडु|| सुरस रसें रसाळ गोडु| चवीनिवाडु हरि जाणे|| रामनवमी, चैत्र, शके १४९३

येकदम विंट्रेष्टिंग!!! नाथांच्या वाङ्मयात कुठेतरी एके ठिकाणी इडलीचा उल्लेख असल्याबद्दलही वाचल्याचे अंधुकसे आठवतेय. त्यांचे कुटुंब गिरिजादेवी कन्नड असल्याचा परिणाम असावा.

रुक्मिणीस्वयंवरातील या रुखवतामधे फोडणीचे शाक, काचर्‍या, कोशिंबिरी, अनारसे, शेवया, लाडू, पापड, कुरवड्या, खारी भोकरे, पुर्‍या, गुळवर्‍या, क्षीरधारिया, इडुरिया (?), फेण्या, अमृतफळे, घार्‍या, खांडवी, मांडे, भात एवढ्या पदार्थांचे उल्लेख आहेत. ज्ञानेश्वरांचे मांडे तर प्रसिद्धच!

अशा एका पदार्थाचा उल्लेख वैदिक वाग्मयात येतो तो इडली सारखाच अस्तो असं दुर्गाबाई भागवतांनी एक लेखात लिहील्याचे आठवते. (ऐस्पैस गप्पा - प्रतिभा रानडे)

'शाक' चा अर्थ 'फोडणी देऊन केलेला पदार्थ' असा असावा. ('शाक'चे मूळ संस्कृत रूप काय आहे?) कारण एकदा खास नेपाळी रेस्तोरां मधे जेवण्याचा योग आला होता, तिथे मेनुकार्डावर 'Aloo ko Shaak' 'Dahi ko Shaak' 'Dal ko Shaak' अशी पदार्थांची नावे होती. आधीतर ही बटाट्याची भाजी, कढी, वरण इ. ची नावे आहेत, हे कळलेच नाही.

शाक म्हणजे भाजी. म्हणूनच शाकाहारी म्हणजे फक्त भाज्या/वनस्पती खाणारे असा खरा अर्थ आहे.

हॅहॅहॅ... लाडुच ठीक आहे हो पण चक्का टांगुन मग त्याचे श्रीखंड बनवणार्‍याला संशोधकाला मी फार मानतो बाँ ! ;) (कडकबुंदी प्रेमी) ;)

पहिले श्रीखंड भीमाने बनवले आणि ते श्रीकृष्णाला दिले, त्यावरुनच नाव श्रीखंड ठेवले.

भौ, हे कुठे वाचलंत हो? ;) माझी माहिती जरा वेगळी आहे. अगदी आर्यांच्या काळात श्रीखंड हा पदार्थ शिखरिणी नावाने प्रख्यात होता.

http://spokensanskrit.de/index.php?page=8 इथे लड्डु म्हणजे एक गोड पदार्थ असा अर्थ आहे. पण लाडू किती जुने हे माहित नाही. गणपतीचे एखादे जुने शिल्प लाडू हातात धरलेले सापडले असेल तर लाडू त्याहून जुने असतील एवढे नक्की म्हणता येईल.

लाडू साऱखा शब्दशः आणि अर्थानेही Allround पदार्थ मी आजवर दुसरा बघितलेला नाही. जाम आवडतात मला लाडू. राजगिरा सोडून कुठलाही आवडतो. वन डिश मील चं बेस्ट उदाहरण - लाडू. ज्या कुणी काढला असेल तो जिनियसच होता माझ्यासाठी ! क्या बात. चायला एखादा बेसनाचा किंवा मुगाचा लाडू हाणावासा वाटतोय....

पहिले श्रीखंड भीमाने बनवले आणि ते श्रीकृष्णाला दिले, त्यावरुनच नाव श्रीखंड ठेवले. लाडवाबद्दल माहिती नाही.

तुम्हाला पाककृती देणार सांगून ३ वर्षे झाली तरी अजून दिली नाही तेच हे लाडू ना?

हरभरा डाळीचा जाडसर रवा काढायचा (गिरणीत काढून मिळतो). दूध आणि साजूक तूप लावून ठेवून द्यायचा. मग साजूक तुपावर भाजायचा. नंतर ओला नारळ व खवा घालून भाजायचा. साखरेच्या पाकात घालायचा. मी एकदोनदा खाल्लाय. अफलातून चव असते पण डाळीचा रवा परतत बसणे हे पेशन्सचे काम आहे. मिपाकर सानिकेनं वाटल्या डाळीचे लाडू म्हणून त्याच्या जवळ जाणारा प्रकार दिला होता. तोही सुरेख होता.

मला लाडू आवडत नाही, मी लाडू करत नाही, सो पहिला लाडू कोणी केला हा विचार करणार नाही. कृपया वरील प्रतिसात हलके घ्या. (चकलीप्रेमी)त्रिवेणी

घन निल मी सुद्धा यावेळी फराळ बनवताना हाच विचार करत होते. किती निगुतीने, चवीचा, रंगाचा, आकाराचा असा सगळा विचार करुन बनवला आहे हा फराळ! आपण नुसते सांगितल तस बनवत रहातो. अन त्यातही चुका करतो. वरचे प्रतिसाद अन लिंका मस्तच! आता कस दिवाळीच वातावरण वाटायला लागल. इकडे फराळाची चर्चा, तिकडे घर सफाई......व्वाह! इतक दूर राहूनही सगळ्यांच्यात असल्या सारख वाटल. धन्यवाद.

मिपावर असे प्रश्न विचारण्याचा वेगळाच आनंद मिळतो तो येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रियांमुळे … अगदी सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला हेच दाखवत असतात कि या विषयाला किती पैलू आहेत… मस्त वाटले सगळे प्रतिसाद !