प्रदूषण या गोष्टी शी श्रद्धा अंधश्रद्धा धर्म याचा काही संबंध नाही.
तसेच विवेकी विचारांवरही एका धर्माची मक्तेदारी नाही. सामाजिक पर्यावरणाच्या विरूद्ध जाणारी तत्त्वे नाकारणे हे काही एकट्या एखाद्या धर्माच्या अनुयायांचे काम नाही. तसेच विवेकवादाची कास धरणे हेही सर्वांनाच समानपणे लागू आहे. इथे सुधारणा म्हणजे अमुक एका धर्माच्या विरुद्ध जाणारी गोष्ट असे मानण्याचेही काही काम नाही. तसं पाहिले तर जगातल्या कुठल्याही धर्माच्या मूल तत्त्वांचा सारांश हा इतर धर्मीयांच्या किंवा वर उल्लेखलेल्या सामाजिक पर्यावरणाच्या विरुद्ध नाही हे थोडे खोलात जाऊन पाहिल्यास लक्षात येईल.
दुसर्याची चूक हे आपल्या चुकीचे समर्थन होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जग बदलण्याची सुरुवातही आपल्यापासून करावी लागते.
पुन्हा एकदा धाग्यावरील चर्चा धाग्याच्या सारांशाकडे वळवत - दिवाळी हे निमित्त आहे. वर उल्लेखलेल्या इतर दिवशीही फटाक्यांमुळे जे प्रदूषण होते ते टाळणे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे. मग ते दिवस किंवा ती कारणे कुठलीही असोत वा कशाशीही संबंधित असोत. फटाक्यांच्या आवाजाने किंवा रोषणाईने होणारा आनंद त्यांच्यामुळे इतरांना होणार्या त्रासापेक्षा मोठा आहे का हे एकदा अंतर्मुख होऊन तपासले पाहिजे.
माझा एक दृढ विश्वास असा आहे की आपल्या प्रत्येकाला एक सोपा आणि एक अवघड पर्याय नेहमीच उपलब्ध असतात. सोपा पर्याय अवलंबिणे तितकेच सोपे आणि सोईचेही असते. अवघड पर्याय स्वीकारायला तसाच आत्मविश्वास आणि दृढनिश्चय लागतो. हा अवघड निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर आयुष्यातल्या पदोपदी कसा घ्यायचा याबद्दल जर आपण आपल्या नंतरच्या पिढीला शिकवू शकलो नाही तर त्याच पिढ्या कदाचित आपल्याला आरोपीच्या पिंजर्यात एक दिवस उभे करतील.
लहानपणी खूप फटाके उडवले.
घरी एकदाच फटाके आणले जायचे ते तुळशीच्या लग्ना पर्यंत थोडे राखून ठेवले जायचे. हो आणि थोडे भारत जिंकला तर आणि गावस्कर ने शतक मारले तर सुद्धा
दुसर्या दिवशी कागदांच्या तुकड्यांनी भरलेले अंगण झाडायला पण मजा यायची.
मी २६/२७ वर्षाचा होई पर्यंत फटाके उडवत असे, लहानपणी तर पर्यावरण हा शब्द हि ऐकला नव्हता.
माझी मुलगी मात्र १४/१५ वर्षाची होताच फटाके फोडायची थांबली. कोणत्याही प्रकारचा उपदेश न करता
प्रदूषण वगैरे जाऊदे पण फटाका निर्मितीत बाल कामगारांचे जे शोषण होते त्यासाठी काही कठोर उपाय केले पाहिजेत अगदी किमती दुप्पट करून का होईना हे थांबवले पाहिजे.
कोकणात काही जण बागेत माकडे (केल्टी) आली कि त्यांना पळवायला फटाके वापरतात.
फटाके आवडत नाहीत.. डोकं उठतं आवाजानी.. धुरानी गुदमरल्या सारखं होतं
असा त्रास होणारे लोक जगात आहेत हे लक्षात न घेता कधीही फटाके उडवतात लोक.. राग येतो.. पण काय करणार..
आकाशकंदिल आणि फटाके यांचं मूळ बहुधा चिनी आहे असं वाचल्याचं आठवतं. या दोन्ही प्रथा आपल्याकडे केव्हा आणि कशा सुरू झाल्या माहित नाही.
मी लहान असताना वडील मोजके फटाके आणून तिन्ही भावंडांना वाटून द्यायचे. त्यामुळे आपोआपच नियंत्रण रहायचं. माझ्या दोन्ही मुलांना लहान असल्यापासून आवाज आणि धूर करणार्या फटाक्यांचं आकर्षण नाही. आम्हीच काय आणून देत होतो ते लावायचे एवढंच. माझ्या एका आतेबहिणीला जळत्या फुलबाजीमुळे फ्रॉक पेटून ७०% भाजल्याच्या जखमा झाल्या आणि तिचं पुढचं आयुष्य कठीण झालं. ते उदाहरण डोळ्यासमोर होतंच. नंतर एकदा एका बाणाचं किटाळ मुलाच्या डोळ्यात गेलं. डोळा थोडक्यात बचावला.
जरा मोठी झाल्यावर फटाके म्हणजे पैशांचा निव्वळ धूर करणे हे समीकरण त्यांच्या डोक्यात बसलं. त्यातच शिवकाशीला फटाक्याच्या कारखान्यात बालमजूर कसे काम करतात आणि त्यातले कित्येक मृत्युमुखी पडतात वगैरे वाचल्यानंतर दोन्ही मुलांनी आपणहून फटाके आणणं बंद केलं.
मला सुतळी बॉब्म वाजवण्याचं फार वेड होत ! फटाके आणताना वडिलांना मी फक्त सुतळी बॉब्मच उडवणार असे सांगुन इतर फटाके घेत नसे... सुतळी बॉब्मचा दणदणीत आवाज मला विशेष आवडायचा ! पण जेव्हा लक्षात आले की या फटाक्यांनी प्रदुषण होत आहे शिवाय कष्टाच्या पैशाचा क्षणात धुर होत आहे तेव्हा पासुन फटाके वाजवणे बंद केले.
स्वतः बद्धल विचार करताना इतरां बद्धल सुद्धा विचार करायला हवा ! जी काही थोडी फार नावाला उरलेली शुद्ध हवा आहे ती देखील पुढच्या पिढ्यांना मिळणार का ? असा विचार खरं तर प्रत्येकाने करायला हवा.
ज्यांना विचार पटतात आणि स्वतःमधे बदल घडवतात त्यांची संख्या कमी असेल,पण त्या संख्येने देखील थोडाफार फरक नक्कीच पडेल.
ज्यांना "प्राणवायु" चे महत्व कळतं आणि पटतं त्यांनी देखील यावर विचार आणि बदल का करु नये ?
जाता जाता :-
सध्या बाजारात आवाज मुक्त फटाक्यांचा नविन ब्रॅड आला आहे ! ;)
>>प्रदूषण होणार नाही असे फटाके का तयार नाहीत?
-- मिपा त्याकरताच सुरु केलय ना मालकांनी?? आता तुमच्यासारखे सूज्ञ संपादक देखील मिपाच्या मूळ उद्देशांबाबत अनभिज्ञ असावेत ना... ;)
फटाकेमुक्त दिवाळी, पाण्याविना रंगपंचमी या संकल्पना जरा डोक्यावरून जाणार्या आहेत...
कुणालाही, कुठेही, कितिही नैसर्गिक रंग फासला तरी तो धुवायला थोडेतरी पाणी लागणारच ना!...कपडे कसे धुणार?......म्ह्णजे १००% पाण्याविना रंगपंचमी करणे मलातरी शक्य वाटत नाही.....
तद्वत, दिवाळीच्या ४-५ दिवसांत मी सुतळीचा तोडा सुद्धा वाजवला नाही, तरी मी बाकी वर्षभर प्रदुषण करतोय/स्विकारतोय त्याचं काय?
हार्ले डेविड्सनचा १०-१५ गाड्यांचा ताफा गोंगाट करत गेला तर मला अप्रुप/आनंद/कुतुहल वाटते कि मी प्रदुषणाचा विचार करतो हेही बघायला पाहीजे ना...
कितिका % जनता चालवू दे......प्रदुषणाचा विचार होतो का नाही?
किंवा किति % गाड्या चालवल्या तर त्याचा प्रदुषणावर परिणाम होत नाही?....
जर मी वाजवत असलेल्या फटाक्यांनी दुसर्या कुणालाही त्रास होत नसेल (वाजवल्यावर किंवा वाजवताना) तर अडचण काय आहे?
मी वाजवत असलेल्या फटाक्यांनी दुसर्या कुणालाही त्रास होत नसेल (वाजवल्यावर किंवा वाजवताना)
>> तुम्हाला प्रत्येक वेळी कोणी सांगायला थोडीच येणार आहे की तुमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे ते.
याच धाग्यावरील वडापाव किंवा पिराचा प्रतिसाद वाचाल तर तुमच्या ध्यानात येईल की ज्यांना त्रास होतो त्यांना सहन करण्या व्यतिरिक्त काही पर्याय नसतो.
आणि बाकी प्राण्यांना होणारा त्रास तर अलाहिदाच आहे.
अवांतर : हार्ले डेविडसनच्या आवाजाचे डेसिबल्स जास्तीत जास्त ९८.५ असतात आणि "सहन" करायला लागणारा वेळ ५ ते १० सेकंद
आणि फटाक्यांच्या आवा़जाचे डेसिबल्स कमीत कमी ११८ असतात आणि सहन करायची वेळ - जेवढा तुमच्या सारख्यांच्यात उत्साह असेल तेवढा
एक मशीन शोधायला हवं जे आसपासची हवा खेचून त्यातले हानिकारक प्रदूषण शोषून घेऊ शकेल. हे मशीन गाडीवर ठेऊन फिरते करता येइल आणि अशी अनेक मशीन जास्त प्रदूषित रस्त्यावर ठेवता येतील. हे मशीन चालवण्याचा खर्च फटाक्यांची किंमत थोडी वाढवून वसूल करता येईल आणि मग ज्यांना फटाके उडवायचे असतील त्यांना ते उडवता येतील आणि प्रदूषणाचे परिणाम कमी होतील. अर्थात बाकीची काही बंधने पाळावीच लागतील, जसे हॉस्पिटल जवळ फटाक्यांचा मोठा आवाज नको.
मला एक कळत नाही कि अंनिसने काहिही आवाहन केले कि लोक 'अंनिस कसे फक्त हिंदूंच्या प्रथांविरुद्ध बोलते आणि ईतर धर्मियांविरुद्ध काहीच करत नाही' असे गळे का काढतात. मुळात हे आर्ग्युमेंटच चुकीचे आहे. अंनिसचे समाजसुधारणेचे काम बरोबर आहे कि चुकीचे असा वाद असु शकतो पण काम हिंदू धर्मातच का असा वाद कसा काय होऊ शकतो. काम जर चांगले आहे तर ते सर्वांसाठीच चांगले आहे आणि वाईट आहे तर सर्वांसाठीच वाईट आहे. तरिही डॉ. दाभोळकरांनी एके ठिकाणी यावर फार छान उत्तर दिले होते. त्याचा थोडक्यात सार असा -
१. अंनिस फक्त हिंदूसाठीच काम करते हा गैरसमज आहे. अंनिसने वेळोवेळी ईतर धर्मातील प्रथांविरुद्धही काम केले आहे. (उ.दा. नुकतेच अंनिसने नळदुर्गमधील एका फकिर बाबाचा भंडाफोड केला)
२. परंतु तरीही अंनिसचे जास्त (मेजर) काम हिंदु धर्मात चालते कारण अंनिसमधले बरेचशे कार्यकर्ते हिंदू असतात आणि आपल्या आजुबाजूच्या अंधश्रद्धांमुळे व्यथित होऊन अंनिस मधे आलेले असतात. शिवाय भारतात हिंदू बहुसंख्य असल्यामुळे अंनिस कडे येणारी अंधश्रद्धेची प्रकरणेही जास्त हिंदूमधीलच असतात.
३.जर एखादा हिंदू कार्यकर्ता मुस्लिम समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध काही करायला गेला तर प्रबोधन होणे सोडून दोन धर्मात वितुष्ट येण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे मुस्लिम समाजातुनच पुरोगामी लोकांनी पुढे येऊन त्या धर्मात प्रबोधनाचे काम करावे अशी अपेक्षा आहे.
४. तरिही जर कुणी, बहुसंख्य असलेल्या धर्मातील अंधश्रद्धेविरुद्ध काहि काम करत असेल तर त्यात वाईट काय आहे? जर मी उद्या माझ्या घरातील कचरा झाडू घेऊन साफ करु लागलो तर घरच्यांनी माझं कौतुक करावं की "तुला स्वतःच्याच घरातला कचरा बरा दिसतो रे, बाकी घरात काय उकिरडा आहे तो नाही दिसत" अशी माझी निर्भत्सना करावी?
राहिला प्रश्न दिवाळीत फटाके ऊडविण्याला विरोध करण्याचा तर अंनिस ही विवेकवादाची चळवळ आहे. दिवाळीत काही सेकंदाच्या करमणुकीसाठी पैशांचा धूर करणे त्यातुन ध्वनी आणि वायू प्रदुषण करणे, आजारी आणि व्रुद्धांना त्रास देणे हे अविवेकी वागणे आहे आणि म्ह्णून अंनिसचा याला विरोध आहे.
(बाकी दाभोळकरांची भर दिवसा हत्या झाल्यानंतरही 'सॉफ्ट टारगेट सारखे' शब्द पाहुन अंमळ करमणुक झाली)
माझी लेक फटाक्यांच्या एवजी बंदुकीचे बार करायला लावते.स्वताच्या कानात कापसाचे बोळे घालुन...
बाकी गंमत जाउ द्या पण हीच तर भारताची उर्जा आहे,समाजातल्या जिवंतपणाचे लक्षण आहे,म्हणुनच गरिबातला गरिब देखिल स्वतःच्या मानसिक आनंदासाठी निदान लक्ष्मीपुजनाला तरी एखादा फटाका उडवतोच्,जरा मोकळेपणाने रस्त्यावर फिरा पोर ज्या मस्तीत हे चार दिवस जगतात ना त्याला भेंडी कशाचीच सर येत नाय.बच्चे है यार अभी नही करेंगे तो क्या हम जैसे मिसलपाव पे टाइमपास करेंगे.(दिल तो बच्चा है वाला बाबा पाटील.)
विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा हा सनातन प्रभात मधील लेख वाचला. लेख आवडला. लेख पटला. जे विचार पटतात ते पटतात म्हणावे मग ते कोणीही व्यक्त करोत. समजा मला फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावीशी वाटते पण अमुक एका संघटनेने ते सांगितले आहे म्हणुन मी मुद्दाम फटाके वाजवणारच ही भुमिका विवेकी वाटत नाही. असो. प्रगल्भतेची वाटचाल ह्ळू हळूच होत असते.
वरिल सर्व प्रतिसाद पाहुन दोन्ही बाजु पाहुन टोकच्या भुमिका घेत आहेत असे दिसते. बाबा पाटील, गिरीजा यांचेही मत पट्ते तरी थोडे कमी फटाके उड्वुन प्रदूषण रोखणे शक्य आहे. पण फटाक्या शिवाय दिवाळी साजरी करा असे लहान मुलांना समजवुन सांगणे कठिण आहे. आणि आत्ताच बरे आपण विचर करतो कि लोकांना त्रास किंवा आजारी आणि व्रुद्धांना त्रास होतो. होळी,गणपति, दहिहंडी या वेळी राजकर्णी लोक डी. जे वाजवून आवाज ची पातळी ओलांडतात तेव्हा कुणीच काही बोलत नाही.
दिवाळीला जसे पणत्या, रांगोळी व फराळाशिवाय पर्याय नाही तसेच फटाक्यांशिवाय देखील नाही.…
मोठ्या आवाजाचे आणि प्रदूषण करणारे फटके न आणता साधी फुलबाजी, भुईचक्र व भुईनळे आणुन आपल्या मुलांसोबत मस्त धमाल करावी… असे मला तरी वाटते.
कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचा म्हातार्या , आजारी माणसांना , लहान मुलांना किती त्रास होतो हे आपल्याला माहित आहेच. परंतु प्राण्यांना त्यांचा किती त्रास होतो ह्यावरचा १ लेख सकाळ मध्ये वाचला होता. त्यानंतर मी फटके उडवणं सोडून दिलं. आपण मोठ आवाज झाल्यावर कानावर हाथ ठेवू शकतो. पण मांजरींना, कुत्याच्या पिल्लांना , पक्ष्यांना ते सुधा करता येत नाही. कित्येक पक्षी प्राणी ह्या आवाजाने ह्दय विकाराचा झटका येवून मरतात. बहिरे होतात. गोंधळ उडाल्यामुळे गोल गोल फिरत राहतात.
पण as usual आपल्याला काय त्यांचं म्हणून कोणी लक्षदी देत नाही. आणि पोरांना जास्त फटाके दिले म्हणजे जास्त प्रेम आहे हा आई वडिलांचा गैरसमज.
खूपच घाबरुन जातात बिचारे...
आणि माणसांनाही त्रास होतोच. आमच्याकडे फटाक्यांच्या आवाजाने एका आजींचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. आणि हळूहळू खचत त्या गेल्या :(
माझ्यापुरते बोलायचे तर कळते पण वळत नाही!..
बाकी फटाके आणायचे केव्हाच थांबवले आहे मात्र आकाशात जाऊन तयार होणारी फुले आणि अग्नीबाण यांचे आकर्षण काही केल्या जात नाही :)
फटाके वाजवणे कधीच बंद केले आहे.
प्रदूषण, कुठेही, कोणतेही वाईटच. मग ते दिवाळीचे असो वा ३१ डिसेंबरचे...
आनंदाची गोष्ट म्हणाल तर गोड आवडणार्या माणसाला डायबिटीस झाला की कंट्रोल करावंच लागतं. पर्यावरणाचे एवढे प्रश्न असताना तोकडी स्पष्टीकरणे देऊन कसले साजरे करायचे आनंद? रोगाची पथ्यं कुणीतरी पाळली पाहिजेत ना?
यावर्षी खरोखरच फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले आहे असं दिसतंय.
महागाई हेच मुख्य कारण असे वाटते.. मी स्वतः १० वी नंतर कधीच फटाके वाजवले नाहीत. यावेळी मुलीने हट्ट केला म्ह्णून फटाके आणायला गेलो होतो. किंमतीबघून माझ्याच डोक्यात भरपूर फटाके वाजले. झाड (रु. १००), चक्र (रु १५०) वगैरे काय वाटेल त्या किंमती होत्या. बोरीवलीसारख्या ठिकाणी स्टॉलवर अत्यल्प गर्दी आणि विक्रेत्यांनी माल खपला जावा म्हणून केलेली अजीजी पाहून "फटाक्यांचे भवितव्य" लक्षात आले.
महागाईच्या निम्मित्ताने का होईना, यावेळी प्रदुषण कमी झाले म्हणायचे.
अवांतर :
बाकी संपुर्ण चातुर्मासात लक्ष्मीपुजन कसे करावे हे वाचत होतो. त्यात "लक्ष्मीचे पुजन झाल्यावर बाहेर जाऊन फटाके फोडावेत" या वाक्यामुळे जाम हसू आले. कदाचित एकाद्या चीनी माणसाने चातुर्मास लिहीले असावे...!!!
महागाई या निमित्ताने फटाके उडवणार्यांचे प्रमाण कमी झाले ही असेल. पण काही वेळा पैसा आला कि त्यासोबत माज ही येतो. मग तो जिरवण्यासाठी महाग वस्तु घेउन त्याची चैन करणे ही संकल्पना येते. जेवढी म्हणुन वस्तु महाग तेवढे त्याचे माजमूल्य जास्त. शंभर रुपयाच्या नोटात तंबाखू भरुन त्याचा झुरका घेणार्या लोकांच्या कथा ऐकल्यात की नाहीत? कथेत पुढे याच लोकांचा दुर्दशेत शेवट होतो.
महागाई ही काय आज एकदम सुरु झालेली नाही. गेली कित्येक वर्षे पाहात आहे. महागाई भडकली, महागाई भडकली असा टाहो फोडतही लोकं सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी सणासुदीला, लग्नसराईत, खास खास मुहूर्तांना सराफाच्या दुकानांत गर्दी करीतच असतात. '१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलीड लोचा' ह्या धाग्यावर तर तिशीतच गाडी/फ्लॅट घेऊन झाला आहे आणि आता काय करावे असा गहन प्रश्न आहे. लोकांच्या हातात भरपूर पैसा आहे (असावा). १० वर्षांपूर्वीचे उपहारगृहांचे दर आणि होणारी गर्दी आणि आजचे दर आणि होणारी गर्दी दोन सारखेच वाढलेले आहे. कपडेलत्ते, मोबाईल्सची महागडी मॉडेल्स, महागड्या मॉल संस्कृतीला आणि मल्टिप्लेक्सना गिर्हाईकांकडून मिळणारा वाढता पाठींबा पाहता फटाक्यांच्या विक्रीत आलेली घट महागाईमुळे नसावी असे वाटते.
आमची पिढी आता फटाके उडविण्याच्या वयाबाहेर आहे. तरूण पिढीत आमच्या पिढीइतके फटाक्यांचे आकर्षण उरलेले नाही. आमच्या काळात मनोरंजनाचे मार्ग मोजकेच होते त्यामुळे फटाक्यांमध्ये आनंद शोधला जायचा. हल्ली संगणक आणि मोबाईल गेम्स द्वारे तरूण पिढीला मनोरंजनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे फटाक्यांचे आकर्षण आहे, पण फार कमी आहे. बाल गोपाळांना शाळेतुन वगैरे ध्वनी आणि वायू प्रदुषणाची कारणे देत फटाके न उडविण्याच्या शपथाबिपथा देवविल्या गेल्या आहेत. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून फटाक्यांचे प्रमाण घटलेले दिसत आहे.
या धाग्याला चार वर्षे झाली. या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शपथ दिली हे महत्वाचे आहे. अंनिस ने केलेल्या फटाके मुक्त दिवाली या आवाहनाला दर वर्षी प्रतिसाद वाढतो आहे.
व्यक्तिगत दहा तरीही ती विनाफटाका दिवाळी साजरी करण्याची तयारी दाखवली आहे
तुलनेने कमी प्रमाणात फटाका वापर होतो आहे
२५ वर्षांमागे फटाका व्यवसाय केलेला पण गेल्या दहापंधरा वर्षांत फटाक्यांशी फटकुन राहिलेला नाखु
ज्या ज्या कुटुंबांनी स्वयंस्फूर्तीने आपली दिवाळी ही प्रदूषणमुक्त व पर्यावरण पुरक साजरी करुन देशाच्या प्रगतीत, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात हातभार लावला त्या सर्वांच अभिनंदन! ज्यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा आदर राखून अंमलबजावणी केली त्यांचही अभिनंदन!
प्रतिक्रिया
हा हा हा
(No subject)
खूपच छान प्रतिसाद.
लहानपणी खूप फटाके उडवले.
फटाके आवडत नाहीत.. डोकं उठतं
मला फटाके उडवायला आवडतात...
मूळ चिनी
मला सुतळी बॉब्म वाजवण्याचं
(No subject)
=))
हा हा हा :)
भाववाढ : फटाक्याची आणि कांद्याची ...
प्रदूषण होणार नाही असे फटाके
वाईट वाटलं
कच्चे हरबरे खा...
आणि नाकाला होणारा अपाय?
वरच्या १-२ प्रतिसादात आलेच आहे पण माझेही २ पैसे.....
हार्ले डेविड्सनचा १०-१५
कितिका % जनता चालवू दे.....
अस्सं ???
बर...
+१११
एक मशीन शोधायला हवं जे
मला एक कळत नाही कि अंनिसने
माझी लेक फटाक्यांच्या एवजी बंदुकीचे बार करायला लावते.
विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा
+१११...
+२२२
दोन्ही बाजु पटल्यात
मला या निमित्ताने गिरिश कुबेर
फटाके??
सहमत.
कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचा
+१
प्रदुषण कमी झाले.
हे पण वाचा
दिवाळी प्रदुषण.
कळते पण वळत नाही
फटाके वाजवणे कधीच बंद केले
यावर्षी खरोखरच फटाके
त्याचे कारण महागाई +
महागाई
महागाई या निमित्ताने फटाके
इतर कारणे
सहमत.
सहमत आहे.
या धाग्याला चार वर्षे झाली.
लेकीचे
ज्या ज्या कुटुंबांनी
या धाग्याला ६ वर्शे झाली .या
Pagination