Welcome to misalpav.com
लेखक: चतुरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कित्ती वर्षांनी उगवलात. हॅलेचा धुमकेतूच जणू. असो. लेख अतिशय सुंदर आहे. बुद्धीबळाच्या क्षेत्रातील अतिशय रोचक आणि रंजक माहिती मिळाली.

नजीकचे प्रतिस्पर्धी सतत बदलत राहिले आहेत ..पण विश्वनाथन आनंद अजूनही चिरतरूण आहे..

प्रचंड विश्लेषणाने खेळी ठरवण्यापेक्षा अंतस्फूर्तीने खेळी ठरवून त्यात अगदी ढळढळीत तोटे किंवा चुका नाहीत ना इतके तपासून चाल करायची हा त्याचा विशेष.
हे वास्तव असेल तर हा माणूस डॉमिनेटिंग आहे हे नक्कि. विश्वनाथना आव्हान तगडे आहे, आणी डेव्हिड वर्सेस गोलायथ सामना हा मला सगळ्यात जास्त आवडणारा प्रकार आहे. कार्लसनला माझ्या विषेश शुभेच्छा.

वाह चरुतंग !! लेखन आवडले आहे , मी फॉलॉ करत आहे टुर्नामेन्ट ह्या वेळेस . बाकी ह्या वेळी आनंदचे विजेतेपद जाणार असे मला इन्ट्युटीव्हली वाटत आहे. कार्ल्सन इझ कंम्प्लीटली डिफरंट क्लास !! ( पण जर पहिले १२ चे १२ डाव ड्रॉ झाले अन टुर्नामेन्ट ताय ब्रेकर मधे गेली तर आनंद नक्की जिंकेल ...रॅपीड मधे कोणी आनंदच्या जवळपास फिरकु शकत नाही ... परवाच एक मॅच पाहिली... ५ मिन ...रॅपीड ... त्यात आनंद ने एका बेसीक ओपनिंग खेळीवर तब्बल १.४३ मिनिट विचार केलाय :O आणि तरीही डाव जिंकलाय ! आनंद रॉक्स !! ) प्रचंड आतुरतेने स्पर्धा सुरु होण्याची वाट पहात आहे. ( बाकी धावते समालोचन कसे देतात ? मागील धाग्याची लिन्क देता का ? )

'चरुतंग' बनवल्याबद्दल प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा! ;) हा घ्या गेल्यावेळच्या सामन्याचा दुवा http://www.misalpav.com/node/21800 -रंगा

विश्वनाथन आनंदबद्दल थोडेतरी वाचून होतो. मॅग्नुस कार्लसनबद्दल माहिती नव्हतं. (आमचं बुद्धी डिपार्टमेंट रिकामं असल्याकारणाने त्याला बळ देण्याचा कधी विचारच केला नाही.) *DASH*

मातब्बर खेळाडुंविषयी लिहायला लेखकही त्याच तोलामोलाचा लागतो. सुंदर लेख. माहितीत भर टाकणारा.

त्या विश्वनाथन आनंदच्या आयुष्यातल्या इतक्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तुम्ही, त्यातल्या त्याला तरी किती लक्षात असतील म्हणते मी!

'आणि इथे मेलं एक साधं लिंबू आणायला सांगितलं तर ते कसं बरोब्बर विसरतात' हे पुढचे वाक्य ऐकू आलं. (पळा)

आपल्याला ह्या खेळातलं काही म्हणजे काही कळत नाही हो.... पण ज्या उत्साहानी तुम्ही सिसिलियन डिफेन्स, स्लाव, किंग्ज इंडियन, रे लोपेझ वगैरे नावं घेता ना..... आपल्याला तर स्क्वेअर कट, हुक, बॅकहॅन्ड क्रॉसकोर्ट, स्लॅम-डंक वगैरे ऐकल्यासारख्याच गुदगुल्या होतात. बुद्धिबळात एखादा खेळाडू दुसर्‍याचा कसा "धुव्वा उडवतो" ते अजून व्हिज्युअलाईझ करता नाही येत... पण तुमचं बुद्धिबळाविषयीचं लेखन आणि समालोचन वाचायला जाम आवडतं. त्या समालोचनासाठी ह्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहतोय! जे.पी.

खेळाडू धुव्वा कसा उडवतो हे बघायचं झालं तर लेवॉन एरोनिअन विरुद्ध आनंदने याच वर्षी ७५ व्या टाटा स्टील स्पर्धेत जिंकलेला डाव बघण्यासारखा आहे. http://www.youtube.com/watch?v=90kwP4SrIAI दोन उंट, घोडा आणि वजीर अशा अफलातून काँबिनेशनने आनंदने केवळ २३ चालीत एरोनिअनला खडे चारले. तो डाव बघून कार्लसनसुद्धा थक्क झाला होता!! या डावावर मी आधी लेखही लिहिला होता. http://www.misalpav.com/node/23895 वाचून बघा.

मी आधी चेस खेळतही नव्हतो आणि फॉलोही करत नव्हतो. तुमच्या इथल्या २०१२ वर्ल्ड चँपिअनशिपबद्दलच्या सामन्यांची माहीती आणि समालोचन वाचुन मी जरा चेस फॉलो करु लागलो आणि इंटरेस्ट आला. हा डाव मी इथे पाहीला होता. http://www.youtube.com/watch?v=kDF0OcvZxQ8 वर दिलेल्या लिंकचे चॅनल धमाल आणि अतिशय माहीतीपुर्ण आहे. बर्याच प्रसिद्ध डावांचे विश्लेषण आणि त्यातल्या महत्वाच्या चाली नेमक्या का खेळल्या गेल्या याचे वर्णन अगदी रंजक पद्धतीने आणि थोडक्यात केलेले आहे. इट्स अ फन लर्निंग. अगदी बिगीनरला ही त्यामूळे खेळात चटकन इंटरेस्ट निर्माण होउ शकेल. आनंद चे गेम्सही आहेत या चॅनलवर.

चेस काय बाप गेम आहे आणि आता खेळलो जरी नाही तरी एक प्रेक्षक म्हणून गेमचा आनंद घेता येइल नोव्हेंबर मधे. धन्यवाद तुम्हाला त्याबद्दल :). नुसतं समजण्यासाठीही आधी थोडं स्वतः शिकायला हवं. बाकीच्या गेम्स्/स्पोर्ट्स सारखं नाही हे काम :)

इतकी वर्ष खेळत असल्याने बर्‍याचदा अंदाज आलेलाच असतो , कित्येक ओपनिंग्स च्या तर १५-२० खेळ्या जवळपास ठरल्या सारख्या असतात . . फास्ट खेळणे भारी आहेच पण खरी मजा आहे ती नॉव्हेल्टी पाहण्यामधे ... जी रॅपीड चेस मधे क्वचितच पहायला मिळते ! तुम्ही पॉल मॉर्फी चे गेम्स पहा ... काय भन्नाट खेळायचा हा माणुस !! http://en.wikipedia.org/wiki/Paul_Morphy

चालींच्या खेळात एवढ्या पटपट चाली कराव्या लागत नाहीत. रॅपिड चेस मध्ये सगळा डावच २० मिनिटात संपवायचा असतो. आणि ब्लिट्झ किंवा लाइटनिंग चेस मध्ये फक्त ५ मिनिटात! वेगाने खेळणारा आनंद बघायचा असेल तर हा डाव बघा - http://www.youtube.com/watch?v=kUr_gdKQ8j4 शेवटल्या दीड मिंटात कळायचं बंद होतं!! डोक्यात मेंदूच असतात आणि वर्षानुवर्षांच्या सरावाने ते कंडिशन झालेले असतात फार क्वचित ब्लंडर होतो देखील. पण ते क्वचितच - हा पहा कास्पारोवने रॅपिड मध्ये आनंद बरोबर खेळताना केलेला ब्लंडर - http://www.youtube.com/watch?v=TY41yF1gX1w मेंदूचे कंडिशनिंग जितके उच्च दर्जाचे तितका तो खेळाडू सरस. अतिशय वेगाने टाकलेले चेंडू अचूक रीड करुन बाउंड्री तडकावणे हे सचिनला जमते ते याचमुळे. ताशी १२० किमि किंवा त्याहून जास्त वेगाने चेंडू गोलंदाजाच्या हातातून निघाल्यानंतर तो नीट वाचून त्यावर रिअ‍ॅक्ट होण्याइतका वेळ फिजिकलीच शक्य नाहीये. मग हे सचिनला किंवा कोणत्याही उच्च फलंदाजा शक्य कसं होतं? अनेक वर्षांच्या सरावाने ते गोलंदाजाची बॉडी लँग्वेज अचूक वाचू शकत असतात. गोलंदाजाचा हात, कंबर, डोके यांच्या स्थितीवरुन चेंडू कसा आणि कुठे येणार आहे याचा अंदाज त्यांना चेंडू हातातून सुटायच्या आधीच आलेला असतो. बॅट, पावलं आणि डोकं आधीच हलायला सुरुवात झालेली असते. चेंडू अचूक मारला जाणं हा फक्त अ‍ॅक्शन फॉलोथ्रू असतो! मनातल्या मनात त्यांनी तो काही दशांश सेकंद आधीच मारलेला असतो!!! हा बघा प्रसिद्ध सचिन ने ब्रेट ली ला धुतलेला!! चेंडूचा वेग आणि सचिनचे फटके कळायचं बंद होतं की हा माणूस हे करतो कसं?? http://www.youtube.com/watch?v=vUQPLAlU0Sw -रंगा

रंगाकाका आणि गिरिजा दोघांनाही. वर्षानुवर्षाच्या सरावाने हा वेग येणार हे खरंच. पण ह्या लेव्हलला चालींमधली क्लिष्टता काय च्या कायच वाढत असेल ना? इतक्या हजारो चाली आणि त्यांची कॉम्बिनेशन्स प्रोसेस करणं म्हणजे कर्मकठीण काम आहे. एक शंका अशी की ही लोकं अ‍ॅकॅडेमिकली पण हुशार असतात का हो? अजून एक - बुद्धिबळ फॉर डमीज असा काही छोटा खेळ का नाही? ज्यांना टेनिस झेपत नाही ते कसे पॅडल खेळायला देतात....तसा लहान मुलांना हा खेळ पिक अप करणं अजून सोपं होईल असा १६ ऐवजी ८ पीसेसचा वगैरे एखादा खेळ नसतो का? जनरल घरी बसल्या बसल्या पत्ते कुटायचे तर पोरं हे खेळतील. ह्या खेळातली क्लिष्टता थोडी कमी झाली तर खूप नवीन पोरं हा खेळ खेळायला लागतील असं वाटतं. जे.पी.

वाढते हे जरी खरं असलं तरी प्रत्येक खेळीला सगळ्या मोहोर्‍यांच्या खेळ्या तपासत बसायला लागत नाही. पटाचा विशिष्ठ भाग आणि त्यावरची मोहोरी ह्याचा एक पॅटर्न बनतो आणि त्यावरच लक्ष केंद्रित करुन त्याभोवती खेळ्यांची गुंफण सुरु असते. आपण जसं शब्द वाचताना सुरवातीला एकेक अक्षर वाचत शिकतो नंतर सरावाने एकेक अक्षर न वाचता शब्दच्याशब्द एकदम वाचतो आणि त्यापुढची पायरी म्हणजे शब्दांचे समूह वाचत वाक्यच वाचतो तोच प्रकार. मग कोणतंही पुस्तक दिलं तरी वाचनाच्या पद्धतीत फरक पडत नाही. हां, विषय क्लिष्ट असेल तर आपण जरा सावकश वाचू पण पद्धत तीच. असे खेळाडू अ‍ॅकॅडमिकली हुषार असतातच असे नाही. बर्‍याचदा नसतातच. किंबहुना त्यांची इतर बाबतीतली मेमरी सुद्धा सर्वसामान्य व्यक्तींइतकीच असते. बुद्धीबळाबाबतची मेमेरी ही डेलीबरेट प्रॅक्टीसमुळे काहीच्याकाही वाढलेली असते. साधारण खेळाडू एखाद्या खेळीचे अ‍ॅनालिसिस मेंदूच्या ज्या भागाने करतात त्याऐवजी त्याच खेळीला ग्रँडमास्टर्सची लाँग टर्म मेमरी आणि त्याच्याशी निगडित मेंदूचे भाग सक्रीय होतात. त्यामुळे ती खेळी एक स्वतंत्र खेळी न राहता एका विशिष्ठ पॅटर्नचा भाग बनते आणि ताबडतोब त्याच्याशी संबंधित डाटा मेंदूत प्रोसेस व्हायला सुरुवात होते. (हे सगळे एम आर आय स्कॅनिंग वापरुन अभ्यासले गेले आहे) सर्वसाधारणपणे १० वर्षांच्या सरावात असे १ लाख पॅटर्न्स ग्रँडमास्टर्सनी नजरेखालून घातलेले असतात! त्यामुळे त्यांच्या दृष्टीने पटावरची परिस्थिती ही पहिल्यांदाच न येता कितव्यातरी शे वेळा आलेली असते - फरक लक्षात येतोय ना? सहाजिकच त्यावरची प्रतिक्रियाही तेवढीच झटपट आणि अचूक असणार. खरं पाहता बुद्धीबळ शिकणं अजिबात अवघड नाहीये, विशेषतः लहान मुलांना तर नाहीच. सुरुवातीला नुसती मोहोरी मांडून बसणे आणि पटावरती चाळे करत राहणे इतकाच उद्योग करु देत. कुठले मोहोरे कुठे बसते आणि ते कसे हालते एवढेच काही दिवस. नंतर चाली शिकताना काय पाहिजे ते खेळू देत फक्त नियमबाह्य चाली नकोत इतके बघावे. जरा बर्‍या खेळणार्‍या मुला/मुलींबरोबर नवख्यांना बसवा आणि त्यांना हरू द्या. ते कशामुळे हरले हे समजावून सांगा. न हरण्यासाठी काय करावे लागेल हे सांगा. ७-८ वर्षाची मुले साधारण महिन्याभरात खेळ पिकअप करतात. सुरुवातीला मात्र संगणक कटाक्षाने टाळा प्रत्यक्ष मोहोरी, पट त्यावरचा त्रिमित खेळ याने मेंदूत कनेक्शन्स घट्ट व्हायला मदत होते. असो. अजून काही मदत लागली तर मी करीनच.

चायला असं असतं होय हे. मी एकदा १३-१४ वर्षाचा असताना आमच्या हुशार हुषार म्हणून नावाजल्या गेलेल्या एका ८ वर्षाच्या मामेभावाकडून चारीमुंड्या चीत झालो होतो बुद्धीबळात. आम्ही आपले उंट तिरका, हती सरळ, घोडा अडीच, मोहरे एक राजा एक आणि वजीर अडीच सोडून कसाही एतक्या जुबबी आणि न अनुभवलेल्या ज्ञानावर खेळत होतो. तेव्हापासून स्वतःच्या बुद्धीचा आणि त्याच्या बळाचा संपूर्ण न्यूनगंड येऊन कधीही त्या वाटेला गेलो नाही. कदाचित थोडा वेळ सरावाने हे जमलेही असते.

हे दोघेही इंट्युइशनवर अवलंबून खेळ करतात असं दिसतंय. तर विशीला त्याच्या अनुभवाचा आणि थंड डोक्याचा निश्चितच जास्त उपयोग होईल असं वाटतंय. "ब्रेक" चा उपयोग कार्लसन नक्कीच करून घेणार असंही वाटतंय. भारतात स्पर्धा आहे म्हणून हा आजारीपणाच्या ब्रेकचा स्पेशल क्लॉज कबूल करून घ्यायला नको होता. तुला यायचं तर ये नाहीतर गेलास खड्ड्यात असं म्हणायला हवं होतं खरं तर. भरताला अजून हे भिकारी लोक कमी समजतात आणि आपण त्यांना तसे करू देतो हे अजिबात आवडलं नाही.

तुला यायचं तर ये नाहीतर गेलास खड्ड्यात असं म्हणायला हवं होतं खरं तर. भरताला अजून हे भिकारी लोक कमी समजतात आणि आपण त्यांना तसे करू देतो हे अजिबात आवडलं नाही. १००% सहमत ! अर्थात त्यांचा हा समज दॄढ करण्यात आपल्या हरामखोर राजकारण्यांचा गेंड्याचा वाटा आहे.या हरामखोर भ्रष्ट राजकारण्यांनी आपल्या देशाची लाज पार वेशीला टांगली आहे, मग तुमचा आणि तुमच्या देशाचा सन्मान कोण ठेवील ?

परंतु एकदम सगळ्याच गोष्टी एकत्र करुन भागत नाही. आपलं ऐकलं जात नाही याला खेळाव्यतिरिक्तही बरीच कारणं असतात आणि ती कारणं खेळाच्या मधे येऊ नयेत असे वाटत असते. स्वतः आनंद अतिशय स्वाभिमानी आहे. तो उगाच फालतूपणा चालवून घेत नाही. रोखठोक बोलतो. कास्पारोवने फालतू कॉमेंट्स केल्यावर आनंदने त्याला पुढील शब्दात झापले होते - "I think, Kasparov regrets his decision to retire. Kasparov lost his match in 2000 (to Kramnik) and retired in 2005. Then since 2011, he has been trying to make me retire too. He is perhaps missing the attention he used to get as the World champion." सगळ्याच गोष्टी त्याच्याही हातात नसतात परंतु परिस्थितीत बदल होतोय. भारतात उत्तम खेळाडू आणि पर्यायाने पुढील विश्वविजेते तयार करणे हे यावरचे एक सणसणीत उत्तर असू शकते. आनंद चेन्नैला चेस अकादमी काढणार असल्याची कुण्कुणही मध्यंतरी कानावर होती. कदाचित या विश्वचषकानंतर त्याला मूर्त रुप येईलही. -(आशावादी)चतुरंग

या वेळी आम्हीही हापिसला असल्याने याचा आस्वाद घेणे आम्हालाही अवघड झाले आहे. अर्थात अधूनमधून डोकावणे शक्य आहे, फार वेळ देणे अवघडच दिसते. नव्या दमाचे आस्वादक उभे रहावेत अशी अपेक्षा. मागच्या वेळीही बरेच लोक होते आपल्याबरोबर. ते लोक यावेळी धमाल करतील अशी आशा करतो.

मस्त परिचय. बाकी रंगाशेठ, दिक्षित ह्यांनी बोलून दाखवलं; पण तसे बाकीचे इतरही बरेच जण आहेत; जे तुमच्या एल्खांमुळे चेसकडे प्रथम ओढले गेले. तस्मात, सवड काढून लिहित रहाच. असे गायब होउ नका प्लीज.

यू ट्यूबवरचा हा दुवा दिला आहे - http://www.youtube.com/watch?v=zDwr_zPDe10&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mVDWyKU2arBvR कार्लसन आणि आनंद यांच्यातल्या आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १४ डावांचे संकलन आहे. धन्यवाद ररा! :)

http://mateinchennai.com/ आनंद जर्मनीतल्या बॅड सोड्न या लहानश्या गावात दिसला होता असे ब्लॉगलेखक म्हणतो. तिथे गरम पाण्याचे झरे आहेत. भरपूर पोहोणे, धावणे आणि सायकलिंग याद्वारे आनंदने त्याचे वजन ६ किलोने घटवले आहे (हे चांगले झाले, कारण मध्यंतरी तो जरा जास्तच गुबगुबीत झालेला चित्रात दिसत होता! ;) ) 'चेस टायगर ट्रेनिंग सेंटर' मधे बुद्धीबळाचा सराव करतो आहे. -रंगा

हे खेळाडू एवढ्या भराभर चाली कशा करु शकतात. आणखीन एक उदाहरण मध्यंतरी सापडले होते ते देतोय. कास्पारोव्-कार्पोव विश्वविजेतेपदाचा सामना १९९०. यातल्या एका डावात कार्पोवच्या खेळीला प्रत्युत्तर म्हणून कास्पारोवने केलेल्या खेळीबद्दल त्यानेच विश्लेषण करुन दाखवले आहे की ती खेळी का खेळली. ज्या प्रकारे कास्पारोव त्याची कॅलक्यूलेशन्स दाखवतोय ते केवळ थक्क करुन टाकणारे आहे. कास्पारोवची सात मोहोरी आणि कारपोवची ५ मोहोरी अशा मिसळीतून होणारी सगळी काँबिनेशन्स तो करुन दाखवतो आणि प्रत्येक वेळी तो कसा जिंकतोय हे दाखवतो. http://www.youtube.com/watch?v=SMe-hvCwTRo डाव सुरु असताना एकाही मोहोर्‍याला हात न लावता डोक्यातल्या डोक्यात हे सगळे खेळून बघणे आणि मग योग्य खेळी ठरवणे, मान गये बॉस! तेथे पाहिजे जातीचे!! (एरवी तसा कास्पारोव माझा फारसा आवडता खेळाडू नाहीये परंतु त्याचे हे असले विश्लेषण बघून मी ख्याक झालो!)

छोटा लेख. १९७२ च्या फिशर-स्पास्की लढतीनंतर एवढी प्रसिद्धी मिळालेली ही पहिलीच लढत आहे. http://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/chess/Anand-Carlsen-duel-to-be-the-Chess-worlds-most-important-event/articleshow/24740127.cms

मी बुद्धीबळ फार खेळत नसले तरी तरी माझी दोन्ही मुले-(१३ व ९ वर्ष ) खेळतात, शिकत आहेत, रेटींग आहे पण सुरुवात आहे. त्यांना लेख, दुवे फार च आवडले. यु ट्यूब वर जावून हल्ली या लिंक बघत असतात आणि चर्चा पण करतात. . छान धागा दिल्याबद्दल धन्यवाद. वाचन खुण साठवली आहे.

लिंका बघून खेळणे आणि चर्चा ही सुरुवात असते. त्यांना जमेल तितक्या सामन्यांमधून भाग घ्यायला लावा. सामन्यांमधून मिळणारा अनुभव लाख मोलाचा असतो. त्यांचे खेळलेले डाव ते लिहून काढतात की नाही? नसतील तर आवर्जून डाव लिहून काढायला सांगा. नंतर त्याचे विश्लेषण करुन बघणे फार महत्त्वाचे असते. http://www.houdinichess.com/ हुडिनी चेस इंजिन त्यांना डाऊनलोड करुन द्या. हे चेस अ‍ॅनालिसिस सॉफ्ट्वेअर आहे (मोफत आहे!) तुमच्या मुलांना शुभेच्छा! -रंगा

हो,भरपूर सामन्यात भाग घेतात. बक्षिस मिळालं ,नाही मिळालं तरी एन्जॉय करतात गेम. अर्थात, मिळालं बक्षिस खूप खुश असतात. सामने एक वेगळा अनुभव असतो हे खरच. त्यांना पण आणि मला पण.(त्या वर लिहीन म्हणते एकदा) मात्र गेम लिहायचा कंटाळा करतात. अगदी कम्पलसरी असेल तर च गेम लिहितात. सांगली, पुणे, नाशिक, महापौर चषक यात लिहावाच लागतो , मग लिहितात आणि मग सरांसोबत विष्लेषण करतात. हे सोफ़्ट्वेर घेते. तसे ते chesstacties.com वर खेळतात आणि कधीतरी ओनलाइन पण. पण सातत्य व मेहनत अजून खूप हवी यात.,नाही का?

बुद्धिबळातील महिलांबद्दल अजून कसं कोणीच नाही बोललं. एवढे दुवे आणि लिंका दिल्यात तसंच आम्हा पामरास ह्या खेळातील बुद्धिवंत महिलांबद्दल काही माहिती दिली तर जरूर जाणून घ्यायला आवडेल…

जुडीथ पोग्लर आणि कोनेरु हंपी वगळता जास्त महिला अंतरराष्ट्रीय बुध्दीबळात प्रसिध्द नाहीयेत . ( माझ्या माहीती प्रमाणे कोनेरु , जगात २ नंबरला आहे ) बाकी महाराष्ट्रातल्या मुलीही आता नाव काढु लागल्या आहेत , इशा करवडे आणि भक्ती कुलकर्णी तर बहुतेक भारतातल्या टॉप १०० मधे येतात !!

जोरात सुरु झाली आहे. विशेषतः पुण्यातून अनेक लहानलहान मुले-मुली झपाट्याने पुढे येत आहेत. वूमन इंटरनॅशनल मास्टर मृणालिनी कुंटे हिने पुण्यात चेस अकादमी सुरु केली आहे. तिथे अनेक जण प्रशिक्षण घेऊन उत्तम खेळ करत आहेत.