Welcome to misalpav.com
लेखक: मनीषा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

शत शब्द कथा असा खरेच काही साहित्य प्रकार आहे का ? असल्यास नवीन माहिती मिळाली ... बाकी कविता १४ ओळींची ऐकली होती शाळेत कधीतरी ...............

कथा आवडली. अवांतरः अश्वत्थाम्याबद्दल अजिबातच दया वाटत नाही. अतिअवांतर ( कदाचित अनावश्यक माहिती) : पूजनीय अनंत दा. आठवले उर्फ वरदानंद भारतींच्या पुस्तकात अश्वत्थाम्याला ३००० वर्षे भटकावं लागेल असा शाप मिळाल्याचा उल्लेख आहे. ते म्हणतात महाभारत संपून ५००० वर्षे उलटून गेली. त्यामुळं नर्मदा परिक्रमा अथवा इतर कुठंही अशी व्यक्ती भेटली म्हणजे अश्वत्थामा भेटला असं समजणं अथवा तसा उल्लेख चुकीचा आहे.

३००० हजार वर्षे कुणाची? माणसाची की ब्रह्मदेवाची?

हा बघ आधार. इ.स. ६३४ चा ऐहोळे येथील दुसर्‍या पुलिकेशीचा शिलालेख. पीडीएफच्या पेज क्र. ४ वर गेलास तर ३३वे कडवे पहा. तिथे दिलेय की इ.स. ६३४ साली महाभारत युद्ध संपून ३७३५ वर्षे झाली म्हणून. म्हणजे तेव्हापासून जर पुढे १२६५ वर्षे मोजली तर इ.स. १८९९ साली महाभारत युद्ध संपून ५००० वर्षे झाली असे म्हणायला पाहिजे. http://www.sdstate.edu/projectsouthasia/upload/Aihole-Inscription-of-Pulikeshin-II.pdf पण इथे एक गोम आहे. नुसत्या या पुराव्यावर विश्वास ठेवला तर महाभारताचा काळ हडप्पापूर्व येतो, आणि हडप्पापूर्व काळात वैदिक काळ नेला तर.......यू नो द्याट ;) प्लस तितक्या जुन्या काळात महाभारताशी संबंधित ठिकाणी म्हणण्यासारखे विशेष पुरावेही सापडले नाहीत. जे सापडलेत ते मुख्यतः इ.स.पू. ११००-८०० या काळातले आहेत. अर्थात मूळ प्रश्न सुटला नाही हे वेगळे सांगायला नकोच.

अर्थातच! अहो अजिंठा-वेरूळची लेणीही एलियन्सनी बांधलेले हिष्ट्री च्यानेलवर पाहिले नैत काय? त्याप्रमाणेच तेव्हाही चालू होते ते सर्व ;)

धन्स रे. :) बाकी हेमाद्रीच्या यादवप्रशस्तीमध्ये देवगिरीच्या यादवांचे कुल नहुषापासून - )नहुष, ययाती, यदु...वसुदेव, कृष्ण....) सुरु होते असे दाखवले आहे. बहुधा त्यांची ४४ वी पिढी. =)) आधार बघून नक्की सांगतो.

अरे ते दाखवणारच :) समजा पर पिढी ५० वर्षे जरी धरली तरी इसपू फार तर १४०० पर्यंत जातो हा प्रकार. आधार पहा जरूर. एनीवे, जनमेजय आणि महापद्म नंद यांच्यात साधारणपणे हजारेक वर्षांचे अंतर आहे म्हणतात बॉ. पाहिले पाहिजे.

चेपु वर काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध साईनाथ नावाच्या कालाकाराचं पेज पाहण्यात आलं. हा देवदेवतांची चित्रं काढतोच... पण त्याचा रामायण - महाभारताचा अभ्यासदेखील बराच असावा. त्यावरच त्यानेअश्वत्थाम्याबद्दल लिहीलं आहे. मनोरंजक धागा आहे. @मनीषा - कथा आवडली. जे.पी.

मारुतीराया प्रमाणे चिरंजीव असणे व डोक्यावर जखम बाळगुन अमरत्वाला सामोरे जाणे यात जमींन आस्मांचा फरक आहे... सबब कथा पुरेसी पटली नाही !

पूजनीय अनंत दा. आठवले उर्फ वरदानंद भारतींच्या पुस्तकात
वरदानंद भारतीं तेवढे खरे आणि बाकीचे खोटे हे कशाच्या आधारावर म्हणता आहात? अग्निकोल्हा ह्यांच्या मताशी सहमत. भगवान विष्णूंनी मारुती रायांना चीरांजीवित्वाचा आशीर्वाद तर अश्वथाम्याला चीरांजीवित्वाचा शाप दिला

भगवान विष्णूंनी मारुती रायांना चीरांजीवित्वाचा आशीर्वाद तर अश्वथाम्याला चीरांजीवित्वाचा शाप दिला
ह्याचे संदर्भ देऊ शकाल काय?