भारतीय माणूस जेव्हा गाडी घेतो तेव्हा तो मायलेज किती मिळतो याचा विचार करतो. तो जरी पैसा बचत आणि बजेटला महत्त्व देत असला तरी अप्रत्य़क्षपणे तेल बचत मोहिमेला मोठा पाठींबा देत असतो.
मला परवडते मग मी हार्ले डेवीडसन देखील घेईन पण वेगाने संपत जाणार्या तेलसाठ्यांचे काय ? म्हणून जास्तीत जास्त मायलेज देणार्या गाड्या वापराव्यात असे माझे मत. अर्थात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. (नाहितरी सल्ले हे फाट्यावर मारण्यासाठीच असतात.) मी तर असे म्ह्णेल की अशा प्रकारच्या गाड्यांच्या उत्पादकांना मायलेज वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे / नियम बनवावेत.
मी गेली ४ वर्षे रॉयल एन्फिल्ड वापरत आहे. दैनंदिन वापर तर आहेच, पण त्याच बरोबर वेळ मिळेल तशा कारगील - लडाख, ट्रान्स सह्याद्री अशा लांबच्या फेर्या देखील झाल्या आहेत. रॉयल एन्फिल्ड चालवण्यात जे सूख आहे ते शब्दात सांगता यायच नाही. ४ वर्षे - ६०००० की मी चालवुन ही अजिबात कंटाळा आलेला नाही.
प्रोस् :
१) नवीन twin-spark एंजीन. ६०००० की मी नंतरही ४५ की मी प्रती लिटर.
२) शहरात ही आरामात चालवता येयिल असे डिसाइन. रहदारीत ही अतिशय सहजतेने चालते (वजन जास्त अस्ल्यामुळे रहदारीत सतत पाय टेकवायची गरज भासत नाही)
३) तरुण पिढीला अकर्शित करेल असे डिसाइन्स (नाहितर पुर्वी रॉयल एन्फिल्ड एकतर पोलिसांकडे तरी असायच्या नाहितर चोरांकडे ).
कॉन्स :
१) थोडाफार खर्चिक मामला आहे.
२) प्रत्येक ३००० की मी नंतर servicing करावीच लागते (प्रत्येकवेळी oil बदलावे लागते. ३५० सी सी च्या गाडी मधे साधारण पणे ३ लिटर oil बसते. ६५० रु प्रती लिटर आहे oil)
३) इतर वहानांना येणार नाही अशा अडचणी रॉयल एन्फिल्ड सोबत येतात. क्लच केबल तुटणे, oil गळणे, अवघड जागीच bolt सतत ढिल्ला होणे इ. इ.
http://royalenfield.com/continentalgt/
हे युरोपात लॉन्च झालय , भारतात यायला अजुन किमान ५-६ महिने लागतील ...
परसनली मला हे फार म्हणजे खुप म्हणजे लैच आवडलय मॉडेल !! पण हे नक्कीच दीड लाखाच्या वर असणार ... परत एकदा बजेट मुळे लोच्या :(
अवांतर : "जोवर मिडल स्टॅन्डवर लावता येत नाही तोवर एन्फिल्ड घ्यायची नाही " अशी घरातुन सक्त ताकीद असल्याने नजिकच्या काळात रॉयल एन्फिड चालवायचा योग नाही आमच्या नशिबात :(
रॉयल एन्फिल्डला पर्याय म्हणून अवेंजर सारख्या बाईक चा पण विचार करून पहा.
बुलेट बुक केल्यानंतर पहावी लागणारी वाट अन तिच्यावर करावा लागणारा खर्च हे सर्व ध्यानात घेतल्यास अवेंजर हा त्या मानाने किफायतशीर पर्याय आहे.
रॉयल एन्फिल्डला पर्याय म्हणून अवेंजर सारख्या बाईक चा पण विचार करून पहा.
बुलेट बुक केल्यानंतर पहावी लागणारी वाट अन तिच्यावर करावा लागणारा खर्च हे सर्व ध्यानात घेतल्यास अवेंजर हा त्या मानाने किफायतशीर पर्याय आहे.
मी गेली चार वर्षे रॉयल एन्फिल्ड बुलेट वापरत आहे. ( १९९० मेड ). या चार वर्षात आलेले अनुभव खूप काही सांगून जातात.
काही कटू( क्लच/ब्रेक केबल तुटणे , ऑईल लिक, गाडी तील पेट्रोल संपल्यावर उडणारी त्रेधा तिरपीट , महागडे स्पेअर पार्टस ,बुलेट चे काम करणारे कमी लोक त्यांचे भरमसाठ दर, आणि बरेच काही )
हे सर्व कटू अनुभव जुन्या मॉडेल्स च्या बाबतीत होते, नवीन मॉडेल्स साठी अधिक आकर्षक , वजनाने हलकी, वापरायला सोपी (डाव्या बाजूला गियर ), चांगली फ्युएल एफ़िशिएन्सी , कलर ऑप्शनस या सर्व जमेच्या बाजू आहेत.
आणि चांगले अनुभव म्हणाल तर . . मेलोडी खाओ खुद जान जाओ .
हे वाचा
आसिफ ,
There is only one thing bigger than Bullet.. The pride of owning one !!
काय दिवस आले आहेत.... माकड सुद्धा रॉयल एन्फिल्ड ची चौकशी करायला लागले आहे ! ;)
असो... पेट्रोलचे दर लक्षात ठेवुन आणि मायलेज काय मिळते याचा विचार करुन हवी ती निवड करावी.
जाता जाता :- हिंदुस्थानात अजुन श्वास घेण्यासाठी लागणार्या हवेवर टॅक्स कसा बसवला गेला नाही ? असा प्रश्न हल्ली मला भेडसावु लागला आहे.
क्लासिक ३५०, standard ३५० किंवा thunderbird ३५० आणि ईलेक्ट्रा ..
सर्वांच इंजिन सेम आहे ..फरक आहे तो वजन , आणि स्टायलिंग मधे ..
standard ३५० ला डिस्क नाही , बटण स्टार्ट नाही..
क्लासिक ची उंची बरीच कमी आहे .. स्प्लिट सीट आहे .
ईलेक्ट्राची उंची चांगली आहे ..तुम्ही ६ फूट असाल तर ही जास्त कंफर्टेबल वाटते..
थंडरबर्ड ही क्रूजर प्रकारामधली बाईक आहे ..सध्याचे नवीन मॉडेल मधे बरेच चांगले चेंज केले आहेत ..
maintenance, handling :
जिन्क्स यांनी बरेच पॉईंट कव्हर केले आहेत ..
सध्याच्या गाड्या बॅटरी ओरीएंटेड फार आहेत ..त्यामुळे वायरींग , बॅटरी चा खर्च जास्त आहे ..
चेन सॉकेट ..चेन ल्युब न वापरल्यास ते खराब होते ..
स्पेयर पार्ट महाग आहेत ..
बाकी
सायलेन्सर बदलता येतो ( ९०% बदलतातच) हॉर्न बदलतात.
त्याचाही खर्च आहे..
बाकी ..
चलाओ तो जानो !!
आमच्या मित्राची आहे हि गाडी
काही मुद्दे:- किक मारताना काळजी घ्यावी उलट दाब येउन गुढगा दुखावू शकतो. चालवताना मस्त वाटते पण गाडी बंद पडली कि ढकलणे अशक्य आणि किमती गाडी रस्त्यात सोडून कुणी दुरुस्तीसाठी शोधणे धोक्याचे . गाडीच्या चाकाबरोबर ढकलणारा पण पंचर होतो. पहिले फुकट सर्विसिंग सोडले तर नंतरचे सर्विसिंगचा खर्च जास्त वाटतो. बाकी इंधन तर पिते गाडी…
राव रोयाल घ्याची ठरवले आहेत तर आता मागे बघू नक. या सारखी गाडी नाही जगात. सुख मणजे की हे हि गाडी सांगून जाते.
आणि खर्चाचे मानल तर थोडा जास्त आहे पण रोयाल घेणारा याचा विचार करत नाही एवडे खरे
रॉयल गाडी घेण्यासाठी अशी चौकशी नसती करायची..........जी आवडते ति डायरेक्ट घेऊन टाकायची असते........
खर्चाची तयारी ठेवा म्हणजे झालं.............
हत्ती पाळला कि त्याच्या खाण्या पिण्या कडे बघावच लागतं
चौदा वर्ष बुलेट चालवली आहे.
कंपनीने नवीन बुलेट अगदी पांचट करून टाकली आहे. झणझणीत मिसळीत दही घातल्यासारखी!
फायरिंगची वाट लावली आहे. बुलेट म्हटले म्हणजे ४०च्या स्पीडला फायरिंग गब्बरसिंगचे हसणे हवे. न पेक्षा हीरो होंडा काय वाईट!?
घेणार असाल तर स्टॅंडर्ड ३५० घ्या. ही सर्वकालीन उत्तम बुलेट आहे.
थोडी अभिरुचीसंपन्न चकाचक ठेवली आणि व्यवस्थित कॅरी केली (म्हणजे चालवण्याची स्टाईल, बुलेट चालवताना परिधान करायची वेश/केशभूषा इ.) तर हार्लीडेव्हिडसन हिच्यासमोर मोलकरीण वाटावी इतके दार्शनिक मूल्य बुलेटमध्ये आहे.
बुलेट ही केवळ सोय नसून एक ध्यास आहे.
रोल्सरॉईसच घ्यायची तर मग पेट्रोल/मेंटेनन्सचा खर्च वगैरे क्षुद्र गोष्टींचा विचार करू नये.
हॅप्पी बुलेटिंग! :-)
जुन्या बुलेट मधे ४०च्या स्पीडला गब्बरसिंगच्या हसण्याचा आवाज नक्किच यायचा. पण तोच स्पीड तुम्ही ६०-८० ल नेला की भुकंप होतोय की काय (vibrations) असा भास व्ह्याचा.तुम्ही रॉयल एन्फिल्ड कशासठी घेत अहात हे आधी ठरवा. बुलेट चा आवाज हा रॉयल एन्फिल्ड चा एकमेव strong point नाही. ३५०सीसी मधे २०बीएचपी एवढी ताकद देनारी दुचाकी भारतिय बाजारात रॉयल एन्फिल्ड ही एकमेव आहे. शहरात वापरनार असाल classic 350 ही चांगली आहे. खूप दूरच्या सफरींवर जानार असाल तर thunderbird सर्वोत्तम आहे. thunderbird चे एर्गोनोमिक्स हे माझ्या द्रुश्टिनी तिचा सर्वात चांगला गुण आहे. एका दिवसात १२-१४ तास चालवुनही तुम्हाला पाठ दुखी, मान दुखी असले त्रास होनार नाहित.
"हाय कंबख्त तूने पीही नही" हे लॉजिक बिनतोड आहे.. सांगली कोल्हापूर भागात शुभ्र पायजमा सदरा किंवा धोतर जाकिटातले ऊस शेतकरी, तसेच पीएसआय लोक एकदम ऐटीत बुलेट घेऊन भकभकत जाताना पाहिले आहेत.
रुबाबदार आहे ही बाईक.. शंकाच नाही..
पण.. पण .. मी काय म्हणतो.. म्हणजे शांतपणे विचार करा बरं का.. की साडेतीनशे किंवा पाचशे सीसी इतक्या आकाराचा सिलिंडर एका बाईकला कशापायी? शिवाय प्रचंड बोजड आणि कान फाडणारा आवाज करणारं धूड घेऊन गावात एकवेळ ठीक पण शहरभागात फिरणं म्हणजे नसता बोजा असं नाही वाटत का..?
त्यापेक्षा हलकी, पंक्चर झाली तरी स्वतःच्या वजनाखाली टायरच्या चिरफळ्या न उडवणारी, बंद पडली तर मालकाची पुरती ऐट उतरवून त्याला कुत्र्याप्रमाणे हातभर जीभ काढून धापा टाकायला न लावणारी, कमी स्पीडवर चालवायला लागली की बद्धकोष्ठतेचा फील न देणारी अशी दीडेकशे सीसीची फ्युएल एफिशियंट बाईक का कमी वाटावी?
बाकी काय ते शान वगैरे सर्व व्यक्तीवर असतं.. शानदार व्यक्ती रस्त्याने चालत गेली तरी शानदारच वाटते.. त्यासाठी पांढरा, सॉरी, काळा हत्ती कशाला बाळगायला हवा.. ??
शिवाय बुलेटवर दळणाची पिशवी ठेवायला फार्फार अडचण होते, पण ते एक असो.. ;)
-(संसारी) गवि
आवड आपली आपली दुसरा काय !!
ऑफ रोडींग करायला ..लाँग टूर वर जायला एवढी आरामदायी गाडी दुसरी नाही..
बाकी शहराबद्दल तुमच्याशी सहमत ..
जारे कोपर्यावरून दुध घेउन ये म्हणला की, स्कूटर, मोपेड बरी वाटते ..
कसं आहे बुलेट च्या बाबतीत प्रॅक्टीकॅलिटीपेक्क्षाही क्रेझीनेस हाच ड्रायव्हंग फोर्स ठरतो .
बुलेट ही 'राखायची' गाडी आहे , स्पेयर म्हणुन एक मोपेड 'ठेवावीच' अगदी अंगवस्त्र महावस्त्र इतका फरक आहे दोहोत ...अर्थात दोन्हीही हवेच ;)
आमच्या पुणे जिल्ह्याच्या पुर्व भागात उस बागाईतदारांच एक गाव आहे,निवडनुकीच्यापुवी गावातले सगळे परवानाधारक बंदुकावाले २०-२५ बुलेट घेउन तालुक्याच्या पोलिस स्टेशनला धोतर फेटा घालुन बंदुका जमा करायला येतात .साला खरच बघण्यासारखा नजारा असतो,तालुक्याची आख्खी पेठ येड्यासारखी ही मिरवनुक बघत असते.
ग वि शि सहमत
एक तर आमच्या सारखा किरकोळ माणूस बुलेटवर बसला तर मी बुलेट चालवतोय का बुलेट मला चालवते हा प्रश्न पडतो. वर ते एवढे धूड घेऊन लांबच्या प्रवासाला गेलात तर एकतर पाठ हादरते आणि हाताला झिणझिण्या येतात. (तरी बरं आता ब्रेक उजवीकडे आला आहे). दोन चार वेळा मित्रांची चालवून पाहिली. शिवाय दर रविवारी काहीतरी खाट खूट करत बसायची कटकट कोण करणार?
तुम्ही एक तर त्या पंथाचे/ संप्रदायाचे(CULT) चाकर असता किंवा नसता. म्हणजे बुलेट आवडते तरी किंवा नावडते तरी.
मी दुसर्या प्रकारात मोडतो. माचो दिसण्यासाठी बुलेटच्या आधाराची गरज कधीच पडली नाही.
माझ्याकडे होंडा युनिकोर्न साडे सहा वर्षापासून आहे.(त्याअगोदर हिरो होंडा होती १ ७ वर्षे आणि १.५ लाख कि मी चालवून फुकून टाकली) अजून तरी त्यावर कोणताही खर्च नाही. बैटरि सुद्धा साडे सहा वर्षात बदललेली नाही.मी कोणतीही सर्व्हीसिंग करून घेत नाही. इंजिनाचे तेल काळे झाले तर बदलतो. हवा, पेट्रोल वेळच्या वेळी भरतो आणि सुखेनैव चालवतो. वाटेल तितके अंतर चालवतो. इंजिनचा थरथराट नाही कि होर्न सोडून वाजणाऱ्या इतर सुट्या भागांचा आवाज नाही. कुठे तेल गळत नाही कि किक मारावी लागत नाही. मी इतक्या वर्षात फक्त दोन वेळा किक मारली आहे ती सुद्धा किक चालते कि नाही ते पाहण्यासाठी. ब्रेक मारला कि गाडी जागच्या जागी उभी राहते.
शक्ती(पॉवर) हवी असेल तर के ती एम ड्युक ३९० घ्या ४ ३ हॉर्स पॉवर विथ ए बी एस(anti Lock braking system) वीस नि बावीस हॉर्स पॉवरची गणिते करू नका. http://www.ktm.com/naked-bike/390-duke-eu/highlights.html#.Um_NWHDz_IY
तात्पर्य काय?
बुलेट विकत घ्यायची असेल तर घ्या. (निष्फळ) चर्चा करू नका. एक तर तुम्हाला ती आवडेल किंवा नाही आवडणार.
बहुदा गवी आणि खरे साहेब हे दोघेही "मीड लाइफ क्राइसिस" चे शिकार झाले आहेत.
पाठ हादरते आणि हाताला झिणझिण्या येतात
मी बुलेट चालवतोय का बुलेट मला चालवते हा प्रश्न
शहरभागात फिरणं म्हणजे नसता बोजा दळणाची पिशवी ठेवायला फार्फार अडचण होते
ही सगळी त्याचीच तर लक्शणे आहेत ...
हळुच आणि हलकेच घ्या ;)
म्हटलेच आहे एक तर बुलेट तुम्हाला आवडते किंवा नाही आवडत. ज्यांना आवडते ते तिची तरफदारी करणारच.
म्हैस दुध किती देते विचारले तर तर दुधाचे काय पाहताय? तिचे चारित्र्य पहा.
असे आहे.
ह. घ्या.
सहमत. २०-१५ वर्षापूर्वीची गोष्ट. आमच्या बाबांचा एक बुद्धीजिवी मित्र उंची ६ फूट व वजन ६०-६५ किलो मात्र असा, बुलेटवरून पुण्यातून युनिव्हर्सिटी रस्त्याने जात होता. तेव्हा पुण्यात बुलेट कमी असल्याने शक्यतो बुलेट मालक लोकांना माहीत असे. तिथल्या एका पेट्रोलपंपवाल्याने सदर बुलेटच्या मालकाला (म्हणजे मित्राच्या भावाला ) फोन करून सांगितले "अहो आत्ता तुमची बुलेट पंपावरून गेली आणि कोणीतरी बुलेटवरून फडकत चालला होता. "
माझी स्प्लेंडर गेली दहा वर्षे उत्तम सर्व्हीस देतेय.
दोन तीन महिने वापरात नसेल तरीही पहिल्या कीकला स्टार्ट होते. मेन्टेन्स वगैरे फारसा नाही. बॅटरी एकदा बदलली.
ती सुद्धा फार दिवस वापरात नसल्यामुळे. स्प्लेम्डर घेतल्यापासुन पाठीला त्रास होणे बम्द झाले.
बुलेटची तुलना स्प्लेंडरशी करत नाही.पण मला सांगा दुचाकी घेवून तुम्ही १०० पेक्षा जास्त वेगाने किती वेळा चालवता?
मला बुलेट आवडते. तो एक षौक आहे. पण प्रॅक्टकली बघायला गेलो तर त्यात धोके अधीक दिसतात. एखादा किरकोळ अॅक्सीडेन्ट झाला तर बुलेट चालवणाराचा पाय नक्की प्लास्टर मधे जातो
प्रतिक्रिया
बिंधास्त घ्या....
भारतीय माणूस
रॉयल एन्फिल्ड - एक सूख
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
४५??? नक्की???
calling मनराव महाराज लेह
रॉयल एन्फिल्ड घ्यायची ठरवलीय
सत्यवचन
कोणते?
रॉयल एन्फिल्ड जीटी कॉन्टीनेन्टल
२.२५ लाख
काही मजा नाही राव…जुन्या
उभे राहून पहा.
स्टँडच्या बाजूला लावलेल्या
ख्या ख्या ख्या
Fully agree
रॉयल एन्फिल्डला पर्याय म्हणून
रॉयल एन्फिल्डला पर्याय म्हणून
प्रत्यक्ष पुरावा !! ईट्स अ किक !
बरोबर.. बुलेट ही श्रद्धा,
मेलोडी खाओ खुद जान जाओ .
350 Thunderbird best..
काय दिवस आले आहेत.... माकड
रॉयल एन्फिल्ड
काही मुद्दे
हाताची घडी तोंडावर बोट
धन्यवाद!!!
हे बरे आहे...
हल्ली पेट्रोल चे दर लक्ष्यात
खर्चाचे मानल तर थोडा जास्त आहे पण रोयाल घेणारा याचा विचार करत ना
रॉयल गाडी घेण्यासाठी अशी
दही मिसळ
कशासाठी घेत अहात?
स्टॅंडर्ड ३५०
"हाय कंबख्त तूने पीही नही" हे
गवि .....एकदम सही
आवड आपली आपली
मीही हेच म्हणणार होतो
जारे कोपर्यावरून दुध घेउन ये
एकच नंबर …
पावरबाज प्रतिसाद गवी साहेब
बुलेटचा नजारा काही औरच...!
ग वि शि सहमत
बुलेटचं माहिती नाही पण
बहुदा...
तिचे चारित्र्य पहा.
बुलेटवरून फडकत
माझी स्प्लेंडर गेली दहा वर्षे
विजुभौ ते पुलावर गाडीशी अपघात
मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज
Pagination