बहुपत्नीत्वाची चाल हिंदू धर्मातही होती. आणि ती हिंदुंनी स्वतः होऊन कयदा करुन बंद केली.
यासाठी भारतात मतदान झाले होते आणि सर्वमताने हिंदुंनी ही चाल कायद्याने स्वधर्मासाठी बंद करवली हे माहिती नव्हते मला. जरा पुरावे द्याल का याचे?
तुम्ही ही चाल बंद करा, असा 'त्यान्नी' फतवा नव्हता काढला.
कायदा करुन अशी एखादी चाल बंद करणे याला फतवाच म्हणायला हवे. खासकरुन असे कायदे फक्त एकाच धर्मासाठी करुन दुसर्या धर्मासाठी केले जातात तेव्हा त्याला फतव्याचेच स्वरुप असते.
आता तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घेतला,
याला तुम्ही पायावर धोंडा पाडुन घेता यातच सगळे आले.
तर त्याला बाकीच्यानी काय करायचे?
बाकीच त्यांना पाहिजेत ते करतच आहेत.
ते पोटगीच्या कायद्याचेही तसेच. अस्ले आत्मघातकी कायदे करायला कोण सांगितले होते? उगाच दुसर्यांना दोष का द्यायचा?
वरचीच सगळी उत्तरे परत वाचा. असो. शुभ दीपावली.
कायदा तुमच्याच संसदेने केलेला होता.
आणि समजा बहुसंख्य हिंदुना नसेल मान्य तो कायदा, तर आपला आवाज उठवून ते हा कायदा बदलू शकतात.
--------------
द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा कट्टर विरोधक उद्दामराव एकलिंगे.
कायदा तुमच्याच संसदेने केलेला होता.
तुमच्या म्हणजे? तुम्ही बाहेरचे की काय? मग कशाला उगाच तोंड उचकटताय,. तुम्हाला नाहिच कळायचे ते, आणि संसद काय हिंदु संसद होती काय? ती घटनाधिष्ठित निधर्मी राष्ट्राची संसद होती ना?
आणि समजा बहुसंख्य हिंदुना नसेल मान्य तो कायदा, तर आपला आवाज उठवून ते हा कायदा बदलू शकतात.
फक्त आवाज उठवुन कायदा बदलता येतो? आणि मुळात प्रश्न कायदा बदलण्याचा नाहिच. तो बदलावा असे म्हणणारे फारसे नरपुंगव दिसणारही नाहित. पण तो सर्वांना "समान" असावा एवढीच माफक अपेक्षा. एखाद्या विशिष्ट धर्मापुढे लाळघोटेपणा करु नये.
तुमची आणि आपली सर्वांची यामधला फरक यत्ता दुसरीत शिकवतात. आपल्या जवळच्या शाळेत कृपया लगेच प्रवेश घ्यावा.
उद्या कोणी जर एखाद्याला म्हटले की "तु मुर्ख आहेस" तर त्याचा अर्थ "आपण सग्ळे मुर्ख आहोत " असा होत नाही
१) तुम्ही ज्या घटनांची यादी दिली आहे त्या सर्व घटनांची मुसलमानांनी निंदा केली पाहिजे असे माझेही मत आहे.
२) संघाची स्थापना का झाली याचा स्वातंत्र्योत्तर काळात विचार करायचे काही कारण नाही. कारण स्वातंत्र्यानंतर राज्य करणारे मोगल वा इंग्रज नव्हते - सत्ता भारतीयांची होती. त्यामुळे फक्त हिंदूंचे संघटन करण्याची आवश्यकता उरली नव्हती. समाजाला आज संघाची गरज नाही हे समाजाने ठळकपणे अधोरेखित केलंय ! शाखांची संख्या बघा, त्यात जाणा-या तरुणांची संख्या बघा. संचलनात भाग घेणा-या स्वयंसेवकांची गेल्या दहा वर्षातली ( ढासळती ) टक्के वारी काढा म्हणजे समजेल. संघ आणि त्यांच्या अन्यान्य संघटनांच्या प्रचारकांची आणि पूर्णवेळ कार्यकर्त्यांची ( ढासळती )संख्या बघा. हिंदूंचे संघटन या विषयाचे भारतीय समाजाला ना आकर्षण वाटते ना त्याची आवश्यकता वाटते. विसर्जित करा असे मी म्हणालो नाही. विसर्जित करायची आवश्यकताच नाही. संघ एक दिवस आपोआप विरघळलेला असेल.
१) तुम्ही ज्या घटनांची यादी दिली आहे त्या सर्व घटनांची मुसलमानांनी निंदा केली पाहिजे असे माझेही मत आहे.
पण ते करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
आणि त्यामुळेच संघ जिवंत राहणे, ही काळाची आणि पर्यायाने हिंदूंची गरज आहे.ज्या दिवशी संघ संपेल त्यादिवशी शरियत कायदा लागू केला जाईल, असे वाटते.
मुसलमान काय म्हणतात आणि त्यांनी काय म्हणावे हा माझ्या लेखनाचा विषय नाही. आपला विषय संघ हा आहे.
दुसरा मुद्दा : संघाची किंवा हिंदु म्हणून संघटीत राहण्याची गरज जर भारतातल्या हिंदुना वाटत असती तर सातत्याने त्यांनी हिंदुत्वाचा विचार करणा-या आणि तो तथाकथित करतो म्हणून भाजप ला नाई का सत्तेवर बसवले असते ? कायमचे ? गुजरात सोडता एकही राज्यात अन्य पक्षांच्या कुबड्यांशिवाय भाजप या तथाकथित हिंदू रक्षण करणा-या संघाच्या राजकीय आघाडीला कधीच आजवर बहुमत मिळाले नाही - संघाची डायरेक्ट मदत असून देखील. राम या विषयावर डायरेक्ट निवडणूक लढवून सुद्धा सत्तेत आलेल्या वाजपेयी सरकारला तब्बल चौदा पक्षांची मदत घ्यावी लागली कारण राम मंदिर बांधु असे आश्वासन देऊन देखील भाजपला बहुमत नव्हते. तुम्ही ज्या शहरात राहता तिथेआणि संपूर्ण भारतात रोज सायंकाळी शाखा ओसंडून वाहिल्या असत्या. रोज जाऊ द्या वर्षातून एकदा - शरियत लागू नये म्हणून विजया दशमीच्या संचलनाला तरी समस्त हिंदू सहभागी झाले असते …? होतात का ? संचलन झाल्याचे तरी कळते का ? काढा गेल्या दहा वर्षातल्या संचालनात सहभागी होणा-या हिंदूंची संख्या. आपण अभ्यासा अंती प्रामाणिक पणे उत्तर दिले तर संख्या घटलेलीच दिसेल. वैयक्तिक तुम्ही भयगंड ग्रस्त असाल त्यामुळे तुमचा हा भ्रम आहे की देशातल्या समस्त हिंदुना शरियतचे भय वाटते आहे आणि त्यामुळे समाजाला संघाची आवश्यकता आहे. गेल्या दहा वर्षातली सांख्यिकी सांगेल संघ आणि अन्यान्य परिवारातल्या संघटनेतील प्रचारक वा पूर्णवेळांची संख्याच नव्हे तर पात्रता ही रोडावली आहे. संघच फक्त हिंदूंचे रक्षण करतो या भ्रमात राहू नका. सातशे वर्षे हिंदुंवर वेगवेगळी आक्रमणे झाली - विशेषत: इस्लामी आक्रमणे म्हणून हिंदुस्तान इस्लामी राष्ट्र नाई झाले. संघाची गरज भासवून हिंदुना इतके किरकोळीत नका हो काढू !
असो,
भावना पोहोचल्या.....
पण मग आता,
रझा अॅकॅडमी,इंडियन मुजाहिदीन, लष्करे तोयबा इ. संघटनांबद्दल आपले काय मत आहे?
आणि
" संघच फक्त हिंदूंचे रक्षण करतो या भ्रमात राहू नका."
मी अजिबात भ्रमात नाही,
फक्त संघच हिंदूंचे रक्षण करतो, ही वस्तूस्थिती आहे.
तुम्ही ज्या संघटनांची नावे इथे दिली आहेत त्या संघटना भारत द्रोही आहेत, त्यांच्या समाज विघातक काळ्या कृत्यांनी भारताचे नुकसानच केले आहे आणि भारतीय मातीत या अशा किंवा कोणत्याच फ्यासीस्ट संघटनांना थारा मिळता कामा नये असे माझे मत आहे.
हिंदूचे रक्षण संघ करतो तर परमेश्वर काय करतो ? मग देवळे शिव पार्वती विष्णू हनुमान कृष्ण राम यांची का ? रामाचे मंदिरच कशाला ? बाबरी फोडून तिथे डॉ हेडगेवारांचे मंदिर का नाही बांधले ? …. आणि माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या ना ! कर्नाटकात भाजपने गटांगळी का खाल्ली ? केंद्रात भाजपचेच सरकार का नाही ? संचलनात घोष पथक गुणिले फार तर पाच एवढेच स्वयंसेवक का असतात ? तुमच्याच सारखा भयगंड सा-या देशाला पाच पंचवीस नाही - अठ्ठ्यांशी वर्षात का नाही झाला ?
>>> हिंदूचे रक्षण संघ करतो तर परमेश्वर काय करतो ?
>>> एक कथा आहे. एक साधू परमेश्वराचा नि:स्सीम भक्त असतो. तो राहत असलेल्या गावात एकदा पूर येतो. सर्वजण नावेने सुरक्षित ठिकाणी जायला निघतात. "स्वतः देव माझे रक्षण करायला आला तरच मी जाईन" असे साधू सांगून तिथून हलत नाही. काही वेळाने मंदीराच्या पायर्यापर्यंत पूर येतो. त्याअवस्थेत एक नावाडी नाव घेऊन तिथे येतो व साधूला आपल्याबरोबर येण्यास विनवितो. साधू पुन्हा एकदा यायला नकार देतो. काही वेळाने मंदीर पूर्ण बुडायची वेळ येते. त्यावेळी लष्कराचे सैनिक हेलिकॉप्टर घेऊन साधूला वाचवायला येतात. पण साधू त्यांच्याबरोबर जायला नकार देतो. शेवटी काही वेळाने साधू पाण्यात वाहून जातो. मेल्यानंतर तो स्वर्गात देवाला जाब विचारतो की मी तुझी एवढी भक्ती करूनसुद्धा तू मला का वाचविले नाहीस. यावर देव सांगतो की मी २ वेळा तुला वाचवायचा प्रयत्न केला होता. एकदा मी नावाड्याच्या रूपात आलो तर एकदा हेलिकॉप्टर घेऊन आलो होतो. तूच अज्ञानामुळे मला ओळखले नाहीस.
आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल अशी आशा आहे.
>>> मग देवळे शिव पार्वती विष्णू हनुमान कृष्ण राम यांची का ?
दत्त, गणपती, देवी इ. ची पण देवळे असतात.
>>>> रामाचे मंदिरच कशाला ? बाबरी फोडून तिथे डॉ हेडगेवारांचे मंदिर का नाही बांधले ?
जिथे रामाचा जन्म झाला होता तिथे रामाचे देऊळ बांधायचे ना?
>>> …. आणि माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या ना ! कर्नाटकात भाजपने गटांगळी का खाल्ली ?
येडीयुरप्पा बाहेर पडल्यामुळे मतात फाटाफूट पडून भाजपची सत्ता गेली.
>>> केंद्रात भाजपचेच सरकार का नाही ?
भाजपला २७३ खासदारांची जमवाजमव जमली नाही म्हणून.
>>> संचलनात घोष पथक गुणिले फार तर पाच एवढेच स्वयंसेवक का असतात ?
त्याने काय फरक पडतो? संघाविषयी विश्वास व आत्मीयता असणे पुरेसे आहे.
>>> तुमच्याच सारखा भयगंड सा-या देशाला पाच पंचवीस नाही - अठ्ठ्यांशी वर्षात का नाही झाला ?
दुर्दैवाने देशातल्या बहुसंख्य जनतेला राखीव जागा, पुतळे, स्मारके, नामांतर, नामविस्तार इ. अफूच्या गोळ्या सातत्याने चारत गेल्याने त्यांना अजून या वस्तुस्थितीची पुरेशी जाणीव न झाल्यामुळे.
>>> गुजरात सोडता एकही राज्यात अन्य पक्षांच्या कुबड्यांशिवाय भाजप या तथाकथित हिंदू रक्षण करणा-या संघाच्या राजकीय आघाडीला कधीच आजवर बहुमत मिळाले नाही - संघाची डायरेक्ट मदत असून देखील.
घोर अज्ञान! संघाविषयी तर सोडाच, या देशातील राजकारणाविषयी देखील तुमचे घोर अज्ञान आहे.
>>> अहो, लिहीण्याच्या ओघात मप्र, छ्ग, राहुन गेले, हे मान्य ! दिलगीरी. पण मुळ मुद्द! लक्षात घ्याना.
दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, गोवा, हि.प्र., उ.प्र., उत्तराखंड हे देखील राहून गेले. लिहिण्याच्या ओघात तुमचे बरेच काही राहून गेलेलं दिसतंय.
बादवे, तुमचा मूळ मुद्दा नक्की काय?
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो
१. ह्या देशाला काँग्रेस ची ही गरज नाहीये.
२. नैसर्गिक संकट असो वा मानवनिर्मित संकट असो संघ प्रत्येक वेळी धर्म-जातीचा कुठलाही विचार न करता सामान्य माणसासाठी काम करत आलेला आहे तो संघ देशाच्या प्रगतीमधला अडथळा कसा असु शकतो ह्याबद्द्ल आपल्याकडुन जास्तीची माहीती वाचायला नक्कीच आवडेल. (राजकारणाच्या बाबतीत संघ अतिशय कडवा आहे ही गोष्ट एकदम मान्य).
३. आपल्या राजकीय व्यवस्थेमधे प्रचंड प्रमाणात दोष आहेत ही बाब खरी आहे. संघ हा शब्द न ऐकलेलं शेंबडं पोरं पण सांगेल ही गोष्ट. प्रचंड भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा दोष. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा दुसरा दोष. असे शेकड्यानी दोष दाखवता येतील. ह्यामधे संघानी हिप्नोटाईझ करायचा प्रश्ण कुठे येतो? कुठली समांतर व्यवस्था उभी करतोय संघ म्हणे? भाजपा हा एक ऑफिशियल पक्ष आहे, व्यवस्था नाही.
संघाची शक्ती ह संपुर्ण मुद्दा :
शितावरुन भाताची परीक्षा करु नका हो. असे लोकं जाल तिथे भेटतील.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. जर ह्या जखमा पुसल्या गेल्या तरं सगळ्यांचीच दुकानं बंद पडतील, त्यामुळे स्वार्थी राजकारणी असं होऊ देणार नाहीत.
लेख वाचून काही प्रामाणिक प्रश्न पडले:
१) 'दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे' हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण देश असा दुभंग ठेवणं ही सर्वच पक्षांची राजकीय गरज झालीये त्याविषयी काही मत?
२) आपल्या वैचारिक प्रवासात
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती.
५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
ते..
६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब.
इथपर्यंत आमुलाग्र बदल घडण्याइतकं काय घडलं?
३)
संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत.
या वरच्या वर्णनात मला वाटतं "संघ" या शब्दाच्या जागी "शिवसेना", "मनसे", "काँग्रेस", "रिपाइं", "सीपीएम" किंवा "तृणमूल काँग्रेस", यांपैकी कुठल्याही पक्षाचं नाव घातलं तर चालेल, हो ना?
४) अखेरीसः "रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी" यामध्ये आपल्याला संघाने स्वतःच्याच सदस्यांची केलेली वैचारिक नसबंदी अभिप्रेत असावी, तसं असेल तर so called बुद्धीजीवी असलेले इतक्या मोठ्या संख्येने सदस्य अशी नसबंदी कित्येक दशकं का होऊ देत असावीत, आणि तुमच्यासारखे त्याला उघड विरोध का करीत नसावेत?
असो, लिखाणाचं धाडस इथे केलंत याचं कौतुक वाटतं; असंच लिखाण "पांचजन्य" मध्ये प्रसिद्ध होईल का?
बहुगुणी - १) ( आपला विषय राजकीय पक्ष असा नाही पण तरीही … ) हा दुभंग जिवंत ठेवण्याचे दु:कृत्य काँग्रेस, भाजप सकट सगळे राजकीय पक्ष करताहेत हेच या समाजाचे दुर्दैव आहे. धार्मिक आणि जातीय दृष्ट्या भारतीय समाज समरस आणि एकसंध असावा ही आपल्या सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पण - स्वातंत्र्यानंतर तसा प्रामाणिक प्रयत्न कोणत्याच राजकीय पक्षाने केला नाही. ( फार अधिकार वाणीने मला सांगता येणार नाही पण जात आणि धर्म या बाबतीत सर्व कम्युनिस्ट पक्ष मात्र बहुदा वेगळे आहेत, त्यांनी त्यांचे राजकारण याच्या पलीकडे जाऊन केले आहे असे मला वाटते, but I have not studied them in toto )
2) माझ्यातला वैचारिक बदल हा विषय माझा लेखनाचा नाही. मी संघाचे काम केले आहे हे इथे उघड केले नसते तर संघाचे प्रत्यक्ष काम करणारे आणि ते कट्ट्यावरचे यांनी मला हा विषय मांडण्याचा नैतिक अधिकार नाही असे म्हणून सगळे मुद्दे पुसून टाकले असते. त्यामुळे मी अनेक वर्षे काम केले आता नाही एवढेच महत्वाचे - या ठिकाणी. स्वतंत्रपणे आपण म्हणाला त्या प्रमाणे त्या प्रवासा विषयी नक्की लिहीन.
३) संघाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कार्यकर्त्यांचा स्तर आपल्या मुद्दा क्रमांक तीन मध्ये लिहिल्या प्रमाणे असेल. माझा त्यांच्या संघटनात्मक बाबींचा अभ्यास नाही. पण आपण संघाची तुलना अन्य राजकीय पक्षांशी करत आहात, हे ध्यानात घ्या. संघाची तुलना राजकीय पक्षांबरोबर नाही येणार करता. आपल्याकडे तरी कोणताच राजकीय पक्ष कोणत्याच मुल्यांवर ( value system ) काम करत नाही.
४) संघातले बुद्धिवंत हा एक प्रचंड अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे संघ इतका दोषी आहे तर मग अमुक अमुक तिथे कसे आणि ते तिथे आहेत तर आपण तिथे जायला किंवा त्यांच्या बरोबर असायला काय हरकत आहे असे वाटून काही ही विचार न करता स्वत:ला झोकून देणारे बरेच लोक संघात सापडतील. आपले म्हणणे मला मान्य आहे तिथे ( खूप नव्हे पण ) बरेच आदरणीय बुद्धिवंत आहेत. या विषयी खूप लिहिण्याऐवजी माझा रोख डायरेक्ट व्यक्त करतो : काही बुद्धिवंत तिथे आहेत म्हणून संघविचार - आज आवश्यक आहे हे तर अजिबात न पटणारे आहे. मला आपणास काही प्रश्न विचारू द्या :
अ) २६/११ सारखे भीषण कृत्य ओसामाकडे अनेक बुद्धिवंत असल्याशिवाय होऊ शकेल का ?
ब) तंत्रज्ञान, मनोविकास, साहित्य, संगीत वगैरे वगैरे समाजाच्या सर्व थरातले बुद्धिवंत हिटलरकडे नव्हते का ? त्याच्या बाजूने खंबीरपणे शेवट पर्यंत उभे राहणारे बुद्धिवंत सहस्त्रावधी असल्याशिवाय एकट्या हिटलर ला त्याने जे काही साध्य केले ते करता आले का ?
क) द्रौपदीचे वस्त्रहरण होताना धृतराष्ट्र, भीष्म काही पांडव, आणि अन्य या बुद्धिवंतांचा रोल कसा होता ?
ड ) प्रमोद महाजन यांची अनेक काळी कृत्ये अटलबिहारी बाजपेयी यांच्या सारख्या जगन्मान्य बुद्धिवंत असामीने थोपविण्याचा एकतरी - ए-क त-री - प्रयत्न केल्याचा दाखला इतिहासा मध्ये सापडतो का ? महाजनांची काळी कृत्ये या विषयी आपण अनभिज्ञ असाल तर अनेक कागदपत्रांबरोबर - त्यांच्या बंधूंचे माझा अल्बम चाळा.
इ ) आपण ज्या गावात राहता त्या गावात एकतरी भाजपचा नगरसेवक असेल आणि तो नक्की - म्हणजे अगदी ठामपणे नक्की भ्रष्ट असेल हे सहज दाखवता येईल. अशा नगरसेवकाला आपल्या शहराचे कार्यवाह, संघचालक, वा अन्य बुद्धिवंत यांनी कधीतरी जाब विचारलाय का ?
ई ) ज्ञान प्रबोधीनीचे संस्थापक अप्पा पेंडसे, विवेकानंद स्मारकाचे एकनाथजी रानडे, सुधीर फडके, सांगलीचे देवल, चित्रकुटचे नानाजी देशमुख, आज जिवंत असणारे आणि जनसंघाचे धूळ बसवून पुसट केलेले संस्थापक बलराज मुधोक असे अनेक बुद्धिवंत संघातून बाहेर पडलेच की ! त्यांना संघ पटला नाही म्हणून बाहेर पडले. या सगळ्या बुद्धिवंतांची क्षमता त्यांच्या कार्याच्या परिचयातून आपणाला झालेलीच असेल !
……पण काही ठिकाणी काही बुद्धिवंत गप्प का बसतात हा मनोवैज्ञानिक अभ्यासाचा विषय आहे !
५) पांचजन्यमध्ये असे लिखाण छापून येणार नाही कारण - they do not have tolerance required to publish comments on themselves ! कुमार केतकर सुधीद्र कुळकर्णींचे विचार दर रविवारी छापायचे पण केतकरांचे विचार छापायचे धाडस साप्ताहिक विवेक वा पांचजन्य वा Organizer कधीच दाखवणार नाही. संघ हे कडवे संघटन आहे - दुर्दैवाने !
तुम्ही स्वतःला भूतपूर्व संघी म्हणवता ना... तुम्हाला वैचारीकता शोधुन दाखवावी लागतेय म्हणजे अतीच झालं.
कावीळ झालेल्या दिग्वीजयी खेकड्याचे रंगबिरंगी मनोगत तुम्ही रंगवलत...आणि त्यातल्या अत्युच्च्य पतित मुल्यांना नाकारण्याची विनम्रता दाखवताय... त्याला सिंपल दाद दिली मी.
>>>सिंपल दाद
अवेसोमे! ;)
-दोनशे झाले काय रे?
बिपिनदाचा शब्द आपला माथा. बास्स.
३०० बोला तो ३०० करने काच्च्च!
रज्जु भैइया अर्रर्रर्र सॉरी राजु भारतीय आगे बढो...
पण एक गोष्ट नक्की : `एक कुटुंब एक मुल' हे धोरण पालक, मुल आणि देश सर्वांच्या हिताचं आहे. पालक फोकस्ड संगोपन करू शकतात आणि लवकर मोकळे होतात, मुलाचं संगोपन यथोचित होतं आणि देशापुढे लोकसंख्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे तो सुटण्याची शक्यता निर्माण होते.
"सुखी कुटुंबं बघितली की इतरेजन त्यातून शिकण्याची शक्यता निर्माण होते."
हे , तुमच्या आमच्या सारख्या काही माणसांनाच लागू होते.बर्याचे वेळा, त्या माणसाचे सूख कसे हिरावून घेता येईल ह्याचाच विचार केला जातो.
तुम्ही म्हणताय तसं पालक, मुल आणि देश यांचं `एक कुटुंब एक मुल' या धोरणाने भलं होईलच असं नाही. ही गोष्ट कुटुंबागणिक बदलू शकते.
एकुलता एक किंवा एकुलती एक असलेल्यांचे पालक सजग नसतील तर रोगापेक्षा औषध भयानक असं म्हणायची वेळ येते.
चीनने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी हा प्रयोग करुन पाहीला होता आणि त्याचे दुष्परीणामही भोगले आहेत.
What became clear, the scientists say in their study published in the journal Science, is that one-child offspring suffer from what they term “sibling deprivation”, meaning that a lack of brothers or sisters appeared to make them more self-centred, less co-operative and less likely to get along with their peer group.
पण संगोपनातानं योग्य दखल घेऊन तो सोडवता येण्यासारखा आहे. मुल समाजाभिमुख होतं असा व्यक्तिगत अनुभव आहे.
त्या माणसाचे सूख कसे हिरावून घेता येईल ह्याचाच विचार केला जातो.
आय अॅग्री. पण आपला निर्णय योग्य आहे ही खात्री असली की तशी शक्यता नाही.
"कुठल्याही बाबीचं सरसकटीकरण करता येत नाही एव्हढंच माझं म्हणणं होतं."
चायनानं हे धोरण राबवलंय याची कल्पना नव्हती पण त्यांची प्रगती साक्ष आहे. शिवाय जे लिहीलंय तो अनुभव आहे. विवाहितांना आणि विवाहेच्छुकांना निश्चित उपयोगी होईल. आणि माझ्या मते देशाच्या लोकसंख्येचा प्रश्न सुटला की इतर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटायला मदत होईल.
हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
हिंदू व ईस्लाम हे भिन्न धर्म आहेत असे जग मानते.भारतात अनेक धर्म असले तरीही अनेक धर्मियांची जीवनशैली प्रत्येक प्रांतानुसार आहे.
१९४७ आधिच्या जमान्यात जनरली काँग्रेसवाले जातात असा अनुभव आहे.
प्रतिक्रिया
बहुपत्नीत्वाची चाल हिंदू
.
आक्षेपार्ह
कायदा तुमच्याच संसदेने केलेला
.
तुमची आणि आपली सर्वांची
अक्कल गहाण ठेवली असल्यास
कंची साळा तुमची???
@ ट़ का......
....आपोआप विरघळलेला असेल.
तुम्ही स्वतः उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद...
किरकोळीत नका हो काढू !
तुम्हाला देखील संघ आवडत नाही असे दिसते.....
.... मग रामाचे मंदिरच कशाला ?
>>> हिंदूचे रक्षण संघ करतो तर
>>> गुजरात सोडता एकही राज्यात
हमममम!
>>> अहो, लिहीण्याच्या ओघात
गुड जोक !
वरील विचार मंथन हे राजू
लै जुना विषय.. मी १८५७ ला
लै जुना विषय....
सद्य विषय
'दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे' हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण...
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती. ५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .ते..६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब.इथपर्यंत आमुलाग्र बदल घडण्याइतकं काय घडलं? ३)संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत.या वरच्या वर्णनात मला वाटतं "संघ" या शब्दाच्या जागी "शिवसेना", "मनसे", "काँग्रेस", "रिपाइं", "सीपीएम" किंवा "तृणमूल काँग्रेस", यांपैकी कुठल्याही पक्षाचं नाव घातलं तर चालेल, हो ना? ४) अखेरीसः "रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी" यामध्ये आपल्याला संघाने स्वतःच्याच सदस्यांची केलेली वैचारिक नसबंदी अभिप्रेत असावी, तसं असेल तर so called बुद्धीजीवी असलेले इतक्या मोठ्या संख्येने सदस्य अशी नसबंदी कित्येक दशकं का होऊ देत असावीत, आणि तुमच्यासारखे त्याला उघड विरोध का करीत नसावेत? असो, लिखाणाचं धाडस इथे केलंत याचं कौतुक वाटतं; असंच लिखाण "पांचजन्य" मध्ये प्रसिद्ध होईल का?लिखाणाचं धाडस इथे केलंत याचं कौतुक वाटतं;
विटेकर ....!
जरा सविस्तर !
क्लासीक.
अर्धवट्राव !
आश्चर्य आहे.
़कुट य
अरे...
>>>सिंपल दाद
एकच नंबर
लेखातल्या कोणत्याही मुद्यावर काहीही चर्चा करण्यात रस नाही
`एक कुटुंब एक मुल'
जातीनिहाय विचार करुन प्रश्न कसा सुटणार?
भाबडा आशावाद....
अगदी असंच काही नाही.
हा पेपर भारतीय असल्याने....
हा मुख्य मुद्दा आहे -
मुल समाजाभिमुख होतं असा व्यक्तिगत अनुभव आहे.
सहमत आहे. कुठल्याही बाबीचं
@ धन्या भावू....
@ मुवि
झोपू द्या हो!
काय नाय होत इकडे. बिन्धास्त
हो! आतापर्यंत तरी संयत
धर्म
वाचतोय... वाचतोय !!
Pagination