Welcome to misalpav.com
लेखक: जे.पी.मॉर्गन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सुंदर.. हा अनुभव मी घेतला आहे. एका कार्यक्रमाचे निवेदन करून रात्री अडीच वाजता घरी आलो. माझी कन्या त्या कार्यक्रमावर एकदम खुश होती.

मुलाकडून उत्स्फूर्त कौतुक आणि पार्टी म्हणजे लाख मोलाचं बक्षीस. तुमचं सर्वांचंच अभिनंदन! :) (आणि तुम्ही निवेद्क आहात हे पहिल्यांदाच समजतंय.)

आपला बाबा भारी आहे म्हणजे काय हे एक मुलगा म्हणून आणि बाबा म्हणून दोन्ही बाजूंनी अनुभवलय.. ह्याच साठी केला सारा हट्टाहास, असं भरुन पावल्याशिवाय राहात नाही, जिओ जेपी इथे शेअर केल्याबद्दल थँक्स!

प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार! मी नशीबवान खराच. पण मितान ह्यांचा तो धागा वाचून खरंच खूप वाईट वाटलं हो. आई बापांना मुलांशी संवाद साधण्याइतकाही वेळ मिळू नये? किती मोठ्या आनंदाला ही लोकं मुकतात. अनीशचाच अजून एक प्रसंग सांगतो - अनीशः बाबा मला बर्थडेला आयपॅड हवा मी: आयपॅड? एकदम आयपॅड का? अनीशः अरे वेदांग, ऋजुता, अथर्व, ईशान सगळ्यांकडे आहे. मला पण टेम्पल रन, एनएफएस, सबवे सर्फर्स खेळायचंय. मी: मी तुला एक विचारू? अनीशः हा विचार. मी: वेदांग, ईशान, अथर्व, ऋजुता, श्रावणी ह्यांच्यापैकी किती लोकांकडे तबला आहे? अनीशः कोणाकडेच नाही. मी: त्यांच्यापैकी किती जणं तबला वाजवतात? अनीशः कुणीच नाही. मी: बघ. विचार कर हं. तुझे सगळेच मित्र गेम्स खेळतात. पण तबला तूच एकटा वाजवतोस. मग जास्त भारी काय? आयपॅड की तबला? अनीशः (हसून) तबला! मी: मग? आपण आयपॅड आणायचा की तबला? अनीशः तबला!. मी: मग कुठे जायचं? खेळियामध्ये की शेखकडे? अनीशः शेखकडे!!! मला ढाल्या हवाय. मग मी तो आडवा ठेऊन पखवाजसारखा वाजवणार.... धिं ना धिं धि नक - धिंना तिन ति नक....!

लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, जसा आकार देऊ तशी घडतील हे तंतोतंत पटलं या प्रसंगाकडे पाहून. आयपॅडच्या ऐवजी तबल्याची आवड लावण्याची आयडीया लय भारी!! मित्राचा मुलगा आहे एक, ६ वर्षांचा. त्यांच्या घरी केव्हाही गेलो की, मोबाईल अथवा पीसीवर गेम खेळत बसलेला दिसतो. मित्राला त्याच्या सवयीविषयी एक दोनदा बोलूनही दाखवलं पण तो काहीतरी थातूरमातूर कारणं सांगून या गोष्टीकडे सरळपणे डोळेझाक करतो.

जसा आकार देऊ तशी घडतील हे अगदी खरं आहे, आणि जेपींनी त्यांच्या तबल्याच्या सुंदर उदाहरणातून अतिशय सहजपणे ते दाखवून दिलं आहे. What is more important is: या अतिशय impressionable वयात, भली-बुरी दोन्ही options सांगून, शेवटी निर्णय मुलालाच घ्यायला लावून decision-making चा महत्वाचा आधिकार देणं हे फारच सहज रीत्या मांडलंय, ते खास भावलं.

मुलांना गेम- टीव्ही लावून दिला की त्यांची कट कट नसते ...ते गपचुप्प खेळत बसतात .. असा पोरकट युक्तीवाद बरेच जण करतात .. आइ ला स्वैपाक करायचा असेल तर ती टीव्ही लावून देते ..ह्याचे प्रमाण वाढले की त्याचे व्यसन लागते आणि त्या मध्लया गोष्टींचा वाईट परीणाम होतो .. . . . पण विभक्त कुटुंबामधल्या गृहिणीसमोर दुसरा पर्याय सहज अ‍ॅव्हेलेबल नसतो ..

तिकडे मुलांचे जे अनुभव सांगितले आहेत, त्याची आणि या अनुभवाची तुलना केली, तर मुलांचा आई-बाप (आणि इतरः नातेवाईक, समाज इ.) यांच्याशी असलेला(आणि नसलेला) संवाद किती फरक घडवू शकतो, हे लक्षात येते. आई-बापाने मुलांना घडवण्या आधी "आई-बाप" घडले पाहिजेत. आणि जेपींसारख्या अनुभवी बापांकडून "पालक" म्हणून घडण्याविषयी बरंच काही शिकता येतं. हा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्स, जेपी.

खरंय पैलवान. जेव्हा पोराच्या मित्र मैत्रिणींचे पालक बघतो तेव्हा मला वाटतं की मुळात आई वडीलांचेच स्वतःबद्दल भयानक गैरसमज असतात. आपल्याला सहा आकडी पगार मिळतो ह्याची धुंदी चढलेली असते. आपलं अपत्य हे राजकन्या / राजकुमार असल्यागत ते तिला / त्याला "सर्व सुख-सोयी" देतात आणि आपला सहवास न देता येण्याचं पापक्षालन करतात. आमचे चिरंजीव पण अधून मधून बॉम्ब टाकत असतातच. आपली "गर्लफ्रेन्ड" असल्याचं सांगून झालंय... आमच्या लग्नाला त्याला बोलावलं नाही म्हणून भडकून झालंय.... XX मावशीला उलटी होऊन तिच्या पोटातून बाळ बाहेर आलं का विचारून झालंय. ह्यातून एकच गोष्ट शिकलोय की पोरांचा सगळ्यांत जास्त विश्वास आणि कॉन्फिडन्स आई-बापावर असतो आणि काही केल्या तो मोडता कामा नये. बाकी आमचंही पालकत्त्वाचं शिक्षण चालू आहेच! :) जे.पी.

पोरगं "बाsssssssssबा" अशी आरोळी जेव्हा मारतो तेव्हा मला वाटतं त्यातचं आपण सगळं भरुन पावतो. त्या एका हाकेतच आपल्याबद्दलचा जीव्हाळा, प्रेम, आपुलकि सर्व काहि सामावलेलं असतं.

पार्टी अगदी थेट हृदयात उतरली. मस्तच. आमचे चिरंजीव, वय वर्ष चार, कधी कधी फार सेण्टी होऊन "आय लब यु बाबा" म्हणत बिलगतं तेंव्हा मनात जे धन्यतेचे उमाळे फुटतात त्याला तोड नसते. अगदी भरुन पावल्यागत वाटतं.

मिपावर आल्याचे कधीकधी जे सार्थक वगैरे वाटतं ना ते अशाच लेखांमुळे :) बहुगुणी तुमचाही मुद्दा/निरीक्षण भावले. अंगी हे सगळं गोजिरं बाणवण्याचा नक्की प्रयत्न करेन !

माझ मोठ पिल्लु ६ वर्षाच आहे मागचे तिन वर्ष ते माझ्याबरोबर माझ्या प्रत्ये़क क्रिकेट मॅच मध्ये माझ्याबरोबर असते.आणी तिच्या प्रत्येक कराटे मॅच साठी मी तिच्याबरोबर असतो. मागच्या ३ वर्षात माझा प्रत्येक करंडक तिला सोबत घेउनच स्विकारलाय्,आणी तिच्या मिळणार्‍या प्रत्येक सर्टीफिकेटस साठी तिला आवडणारे चिकन लॉलिपॉप स्वतः करुन खायला घातलेत.या वर्षी एअर गण मागणी आलिय्,पोरीला कराटेबरोबर नेमबाजी शिकायचीय.बघुयायत तिच्या मापाची गण आणी चांगला ट्रेनर मिळाला तर नक्की देणार.हेच तर गरजेच असत.पोर दोन पुस्तक कमी शिकली तरी चालतील पण त्यांच्यात विजुगुषी वृत्ती भिनलीच पाहिजे.त्यासाठी स्वतः त्यांच्याबरोबरीने धावन गरजेच आहे,भले तुमच काम कितीही महत्वाच असो.

मार्कांच्या रॅट रेस पासून दूर राहील तेवढी जास्त खुलेल तुमची कन्या .. तुमचे अभिनंदन!

बाबा - तुमचं अभिनंदन, पोरांबरोबर आपणसुद्धा धावायला पाहिजे जे १००% खरं. आणि बहुतेक आईबाप नुसते उपदेश देतात, आचरत कधीच नाहीत. कारं त्यांच्या आई-बापांनी सुद्धा हेच केलेलं असतं. अफलातून गोष्ट करताय! जे.पी.

माझ्याही पिताश्रींनी कधी माझ्यावर कुठल्याच गोष्टीची सक्ती केली नाही.वयाच्या १८ व्या वर्षी सगळे व्यवहार त्यांनी स्वतःहुन माझ्या हातात दिले.मी कमवत नसताना देखिल्,त्यामुळे लेकीला तु अस कर आणी तस कर हे सांगायची माझी आयुष्यात कधी हिंमत होणार नाही,स्पोर्ट्स तिची आवड आहे,तो मार्ग तिने निवडलाय त्यासाठी सगळ्या प्राथमिक सुविधा पुरवन हे माझ काम आणी तेव्हडाच तर मला करायचय्,बाकी त्यात विशेष अस काही नाही.