Welcome to misalpav.com
लेखक: गुल-फिशानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काही चित्रे दिसत नाहियेत.. बाकी आमची त्यातली प्रगती तितकीच. तुमचे वर्णन वाचून चित्रे बघायला गेलो, आणि अत्यंत गूढ असं काहीतरी बघितल्यामुळे संभ्रमित झालो :)

आताच पहिला लेख वाचुन काढला आणि म्हटले की और आने दो, तोवर हा लेख वर आलेला! आता लेखणिला गती यायला लागली आहे तोवर टंकुन टाका. 'फ्लो' तुटायला नको. काही चित्रं दिसत नाहियेत पण.

चित्रकारांविषयी लेख येणे हे दुर्मिळ, आणि उत्तम लक्षण. एक नोंद कराविशी वाटते, ती अशी (अर्थात ती दालीच्या बाबतीत लागू होते की नाही हे अधिक अभ्यासातून कळू शकते) की प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीत जी एक प्रतिमा उभी केली जाते, आणि तिचा गवगवा केला जात असतो, त्यापेक्षा वस्तुस्थिती खूपच वेगळी असू शकते, आणि ती सहसा जगासमोर येऊ दिली जात नाही. प्रसिद्ध नेते, अभिनेते, कलावंत, लेखक, धार्मिक स्वामी, बुवा, बाबा इ. इ. अनेकांच्या बाबतीत असे घडत असते. (दिसते वा दाखवले जाते, तसे नसते इ.) पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

चित्र्गुप्त जी आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे. सत्य तर आपल्याला कळणे अवघड च असते. आपण अधिकाअधिक माहीती मिळवुन, विश्लेषण करुन, तर्क वापरुन सत्याजवळ जाण्याचा प्रयत्न करु शकतो.बाकी प्रतिमे विषयी आपल म्हणण खर आहे.