Welcome to misalpav.com
लेखक: जागु | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्तच ताई… एकदम लहानपणात घेऊन गेला तुमचा लेख… दिवाळीच्या हार्दिक आणि मन:पुर्वक शुभेच्छा…

माझे एका गावात बागडण्यात गेले.
शब्दशः 'सरले' बालपण. लेख मस्तं आहे. पण फक्त गावाकडेच नाही तर, मुंबईतही आम्ही हेच वातावरण उपभोगलं आहे. असो. रम्य ते बालपण आणि रम्य ती बालदिवाळी.

वर्णन्,जन्मच मुम्बै सारख्या शहरात झाल्याने आम्ही अशा गावातील गोष्टींचा आनंद अशा कथालेखातुनच अनुभवतो हे ही नसे थोडके.

मस्त , थोड्या फार फरकाने मी पण हेच अनुभवले आहे . आता लेख वाचला आणि पटकन गावच्या आठवणीनि डोळ्याच्या कडा पाणावल्या . खूप आभारी आहे जुन्या दिवाळीची आठवण करून दिल्याबद्दल .

लहानपणापासूनच्या आठवणींची दिवाळी परत एकदा अनुभवली. धन्यवाद! फक्त तो 'दिवाळीचा गृहपाठ' नामक प्रकार नव्हता का? आम्हाला दरवर्षी सुटी लागल्यावर लगेचच त्या शंभर-एक पानी गृहपाठाचा सुरूवातीलाच फडशा पाडायची खुमखुमी असायची, आणि न चुकता, फराळ, फटाके, नातेवाई़क आणि भावंडांच्या भाऊगर्दीत तो अभ्यास बाजूलाच राहून जायचा; मग सुटी संपत आली की अखेरच्या आठवडयात जीव तोडून, पाठ-मान एक करून एक-एक विषय संपवायचा!

जागुताई, किती छान लिहिता हो तुम्ही. हे वाचल्यावर डोळ्यात टचकन पाणी आल. सुरेख लेख.

खूपच छान लेख! गावची दिवाळी आठवली. सकाळी सकाळी अभ्यंग नि छान कढत पाण्याने घातली गेलेली आंघोळ, औक्षण, देवदर्शन नि थोडेसे फटाके, त्या नंतरचा फराळ मग इकडे तिकडे बागडणे, नवीन कपडे दुपारी थोडं फराळातलं नि बरोबर जेवण, क्रिकेट, मग संध्याकाळी बहिणींबरोबर शेणसड्याला मदत, सुपारी घेऊन तिच्यावर रांगोळी सोडून लिहीलेलं 'शुभ दीपावली', पुन्हा फटाके, फुलबाज्या, पाऊस, भुईनळ्या.... आहाहा! २२-२४ म्हणजे बरीच वर्षं झाली की.... आम्ही म्हातारे झालो बहुधा! :(

मस्त ताई बालपण आठवले. तसे आज ही सौ. चकलीची भाजणी (चक्क ३-४ किलोची केलेली आहे), चिवडा, लाडू, अनरसेचे पीठ ही भिजवलेले आहे, बहुतेक उद्या चिवडा, चकली आणि शेव घरात करेल असे वाटते. बाकी करंज्या, अनरसे इत्यादी बहतेक सोमवार किंवा मंगळवारी करेल. रविवारी सुट्टी असल्या मुळे नाईलाजाने का होईना मला मदत करावी लागेल. चीन बने बनलेली स्वस्तात मिळणारी सजावटी विजेच्या दिव्यांची लडी आत्ताच मुलगा विकत घेऊन आला आहे. भाऊ बीजेचा कार्यक्रम यंदा माझ्या घरी आहे जवळपास ३०-४० (आम्ही 5 भाऊ बहिण, त्यांची मुले-सुना मामा, लेक जावई). वर्षांतून एकदा या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र जमतो. जो पर्यंत आई आहे तो पर्यंत तरी हे सुरु राहणार. अजूनही सर्वाना आईची भीती वाटतेच (आम्ही सर्वांनी पन्नासी-साठी गाठली तरी ही), नवीन पिढीने ही प्रथा सुरु ठेवावी ही अपेक्षा करू शकतो. सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा

खुप छान लेख जागुतै. माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. ६ वी पर्यंत चाळीत होतो तेव्हा सगळी मजा अनुभवली. तेव्हा एक भेंडीचे झाड होते त्यावर अशाच पेटलेल्या फुलबाज्या फेकायचो ती कुठल्यातरी फांदीवर अडकुन बसायची, मग किल्ले, फटाके काय मजेचे दिवस होते ते. मग चाळ तोडुन तिथे बिल्डींग झाली. मग गच्चीत फटाके फोडायला लागलो किल्ला करायला जागाच उरली नाही. आताशा फटाक्यांचा आवाज नकोशे वाटतात. आणि भावुबिजेच्या दिवशी आमच्या घरात आईचे ४ भावु , मामी, त्यांची मुलं (प्रत्येकी ३ म्हणजे आम्ही ९ मामेभावु / बहीण) अशा सगळा गोताव़ळा जामायचा असे सगळे जण मिळुन किमान १८ जण तरी जमत असु. ओवळणीचा कार्यक्रमच १ तास चालायचा मग जेवायला पंगत बसायची. रम्य ते बालपण आताच्या मुलांना जागेअभावी किल्ले नाहीत, कोणी कोणाकडे येत जात नाही (म्हणजे सख्खे सोडुन) म्हणुन नातेवाईकांची तोंडओळख नाही राहीली. असो.

विवेकजी, प्रमोदजी धन्यवाद. काळानुसार कायापालट होणारच. निसर्गनियम आहे. पण ही कायापालटीत स्नेहभाव, सणांचे आपापल्यापरीने संस्कार टिकून रहावेत असेच वाटते.