कितीला मिळतं हो ते मास्क? आणि भारतात मिळतं की भारताबाहेरून मागवावं लागतं?
पण किती विचित्रपणा आहे हा! म्हणजे फुकतात साले ते लोक आणि त्यांच्यामुळे आपण खर्च करून असले मास्क-बिस्क वापरायचे त्यापेक्षा सरकार सिगारेटवर कायमची बंदी का नाही आणत!! मला माहिती आहे हा खूप जुना मुद्दा आहे पण देशाची तरूण पिढी ह्या सिगारेटमुळे कॅन्सरच्या विळख्यात किंवा अजून दुर्धर रोगांना बळी पडत असेल तर काय उपयोग आहे तो फायदा कमावून?? सिनेमा सुरू होण्याआधी किळसवाण्या जाहीराती दाखवून सिगारेट सोडण्याइतपत दुधखुळी नाहीत ही लोकं!! काहितरी जालीम उपायच करायला हवा.
मीही दीड वर्ष तुम्ही म्हणताय त्याच पत्त्यावर असलेल्या हापिसात ये जा केली आहे. तेव्हाही फुंके होतेच पण आम्हाला कधी त्रास झाला नाही. सकाळी धूप घालावा तसा धूर तर नक्कीच होत नसेल आणि हापिसात चालत जाण्यापर्यंतची पाचेक मिनीटं नक्कीच म्यानेज होऊ शकतात. हां सिग्रेटीचा चटका लागणं हे जरा चूकीचं आहे पण बर्याचदा कसं असतं ना, मुली मैत्रिणीशी फोनवर चकाट्या पिटत चाललेल्या असतात. आपल्या आजूबाजूला कोणी चालतंय याचं भान नसतंच मग!! अशा प्रसंगी त्यांचा कोणाला धक्का लागला तरी तो धक्का समोरच्याने 'मारलाय' असं समजून खाऊ का गिळू या नजरेनं त्या व्यक्तीकडे पाहतात. कसंय ना, लोकांना समोरच्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
सिग्रेटीचा चटका लागणं हे जरा चूकीचं आहे
जरा?
धक्का लागणे आणि इजा होणे यातला फरक तो काय? फोनवर बोलत जाताना मुलींचं दुर्लक्ष होतं आणि धक्का लागल्यावर खाऊ की गिळू या नजरेनं बघितलं जातं. मान्य. होत असेल असं. पण माझ्यासारख्या काकवांनाही धक्के मारून जाताना भोळेपणाचा आव आणाणारे बघितले की काय करावं कळत नाही. समोरचा असतो विशितला माणूस म्हणजे यांचे धाकटी मावशी, काकू आमच्या वयाची असणार. मग सरसकटपणे नियम लावला जातो. धक्का मारल्यानंतर जे शब्द समोरच्या मनुष्यानं वापरलेत ते सांगितलं तर मला जे वाटलं ते वाटलच पण तुलाही त्याचा खून करावासा वाटेल.
हे असं असेल तर शब्द मागे घेतलेत. पेट्रोलपंपाकडच्या गेटमधून आत शिरताना WNS चं ऑफिस (अजूनही ते तिथं आहे की नाही ते माहित नाही) ओलांडलं की त्या येवढ्याश्या फूटपाथवरनं दाटीवाटीनं मागनं कोणी येतंय की नाही याची छटाकभर तमा न बाळगता मुलींना चालताना पाह्यलंय. मग आम्ही 'एक्स्क्युज मी' करत वाट काढून जायचो. भरीस भर त्या कैलासपतीच्या झाडावर बसलेले कावळे शर्टाचा, ब्यागचा वेध घेऊन कधी त्यावर चित्रकलेचा नमुना पेश करतायेत हे आणखी एक टेंशन असायचं.
हां सिग्रेटीचा चटका लागणं हे जरा चूकीचं आहे पण बर्याचदा कसं असतं ना, मुली मैत्रिणीशी फोनवर चकाट्या पिटत चाललेल्या असतात. आपल्या आजूबाजूला कोणी चालतंय याचं भान नसतंच मग!! अशा प्रसंगी त्यांचा कोणाला धक्का लागला तरी तो धक्का समोरच्याने 'मारलाय' असं समजून खाऊ का गिळू या नजरेनं त्या व्यक्तीकडे पाहतात. कसंय ना, लोकांना समोरच्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
खरंय. जणू समस्त पुरुषजात आपल्याला धक्का मारण्यासाठी टपलेली असते असा आविर्भाव असतो खरा.
गोदरेज च्या सिक्यूरिटी वा तुमच्या कंपनीच्या HR शी बोलून बघा. नक्की काहीतरी मार्ग निघेल. निदान स्मोकर्स चा अड्डा १०-१५ फूट जरी दूर सरकला तरी तुमचा त्रास खूप कमी होईल.
टीप १: बाकी मी ही कधी काळी ब-यापैकी स्मोक करायचो पण दुस-यांना सहकार्य करुनच (म्हणजे त्रास होवू न देता)
टीप २: मी मुंबईकर नाही.
दुसर्याच्या खाकरण्याचा किंवा पाणी पितानाचा आवाज हा दुसर्याच्या आरोग्यावर किती परिणाम करतो हा संशोधनाचा विषय आहे. पण दुसर्याच्या तंबाखूच्या धुराचा परिणाम मी वर लिहिलेला आहे.
आपलि तुलना अनाठायी आहे असे वाटते
लेखनाशी अगदी सहमत. त्या वासानेच पोटात ढ्वळून येते. एका महामुर्खाने जळती सिगारेट रस्त्यावर टाकली होती मी चपल्या घातलेल्या असूनही नेमका त्याठीकाणी चपलेतून पाय थोडा बाहेर आला आणि अनपेक्षितपणे पायाच्या अंगठ्याला चटका बसला. फुल्या फुल्या त्या मेल्याच्या नावाने.
Every year, almost 1,000 smokers and non-smokers are killed in home fires caused by cigarettes and other smoking materials. The U.S. Fire Administration is working to help prevent home fire deaths and injuries caused by smoking materials. Fires caused by cigarettes and other smoking materials are preventable.
सन्दर्भhttp://www.usfa.fema.gov/campaigns/smoking/
अनेक फुकाडे असेही असतात की त्यांना सिगारेट सोडायची इच्छा असते पण ती सुटत नाही. व्यसनाने मेंदुचा ताबा घेतलेला असतो त्यामुळे तारतम्य हरवले असते. छातीच खोक झाल तरी शिग्रेटी फुकत असतात. हिंदी पिक्चर ने या सिगारेटला ग्लॅमर दिल. सिगारेट हे पौरुषाचे प्रतिक म्हणुन बिंबवण्यास ते यशस्वी झाले. स्त्रिया ही आपण कुठे पुरुषांपेक्षा कमी नाही हे दाखवण्यासाठी सिग्रेटी फुकु लागल्या. कष्टकरी माणसाला बिडी चा आधार असतो. तो त्याचा विरंगुळा असतो.कामाचा नवा उत्साह त्याला बिडीचे झुरके घेतल्यावर येतो. सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्यसनाचे भान राखावे. पण ती प्रगल्भता अजुन पुरेशी आलेली नाही. चालायचच. समाज हळू हळू प्रगत होत जातो आहे.
हल्ली ई-बुकिंग, ई-मेल, ई-लर्निंग वगैरे असते, तसे तशी ई-सिगारेट उपलब्ध झालेली असून काही लोक्स वापरताना दिसतात. आदतसे मजबूर लोकांनी या पर्यायाचाही विचार करावा.
सार्वजनिक ठिकाणी नाईलाजास्त्व किंवा मुद्दामून(असते काहीजणांच्या अंगात खाज) ढुंगणातून पादणा-यांना (तिथूनच पादणं अपेक्षित असतं) आपण हसतो, त्यांची इज्जत काढतो. पण नाका तोंडातून त्याहूनही घाणेरडा वास (स्वतःहून) सोडणा-यांना (थोडक्यात खायच्या प्यायच्या आणि श्वास घ्यायच्या जागेतून पादणा-यां शेकचिल्ली लोकांना) आपण करायला हवा तेवढा विरोध करत नाही.
हे वाचल्यानंतर लगेचच विक्रोळी पश्चिमेला एक रस्ता हिरानंदानीकडे जातो त्या सिग्नलच्या बाजूला असलेला गोदरेज कंपाऊंडचा गेट, त्याबाजूचे सीसीडी, कंपाऊंडच्या भिंतीला चिटकूनच असणार्या चहा, वडापाव, साऊथ इंडियन पदार्थ, पान-सिगरेटच्या एकाला एक खेटून फुटपाथवरच उभ्या असणार्या टपर्या आणि त्या टपर्यांभोवती गळ्यात वेगवेगळ्या कंपन्याची रंगीबेरंगी लॅनयार्ड घातलेली शेकड्याने उभी असलेली माणसे हेच चित्र चटकन डोळ्यासमोर आले.
कंपन्यांची नो स्मोकींग पाॅलिसी असल्यामुळे कंपाऊंडच्या आत सिगरेट फुकायला मनाई असते, मग लोकं त्या छोट्याश्या रस्त्यावर, फुटपाथवर दाटीवाटीने उभे राहत सिगरेट फुकताना दिसतात. आता तिथे पर्यायी जागाच नसल्यामुळे त्यांच्याकडेही पर्याय नसावा.
एकेकाळी ऑफिसेसमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढायला परवानगी होती. म्हणजे थिएटरमध्ये, एअरपोर्टवर धूम्रपान अव्याहतपणे चालू असायचं. गेल्या पंधरा एक वर्षांत यामध्ये प्रचंड बदल झालेला मला दिसून आलेला आहे. बंद खोल्यांमध्ये सिगरेटी ओढू नये ही रास्त तक्रार होऊन तिच्यावर अंमलबजावणी झालेली दिसते.
आता प्रश्न असा आहे की ज्यांना सिगरेट ओढावीशी वाटते त्यांच्यासाठी वेगळ्या काढलेल्या जागा आहेत का? याचं उत्तर सरळसरळ नाही असं आहे. म्हणजे एके काळी जे ऑफिसात करता यायचं ते करण्यासाठी एकतर बाहेर जावं लागतं, पण त्यासाठी आखीव भाग नाही. जाण्यायेण्याच्या रस्त्यातच वडापाववाल्यांना टपऱ्या टाकायला बंदी नाही. मग काही प्रमाणात हा त्रास होणारच. तसा प्रत्येकाच्याच अस्तित्वाचा काही ना काही प्रमाणात इतरांना त्रास होतो. मला फक्त म्हणायचं आहे की एकदोन वाईट अनुभवांमुळे'निर्बुद्ध' वगैरे लेबलं सरसकट जमातीला लावू नयेत.
http://movies.ndtv.com/bollywood/ajay-devgn-fined-rs-100-for-smoking-in-public-in-goa-48862
ही बातमी बघा. गोव्यात कोणाला सूट नाही. फक्त तुम्ही तक्रार केली पाहिजे. असे धुरांडे गोव्यात सार्वजनिक जागी फारसे दिसणार नाहीत. रस्ता ही सार्वजनिक जागा नाही का?
माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही.
सार्वजनिक जागा म्हणजे - थिएटर, होटेल, बस आणि रेल्वे स्टेशन ई.
"रस्ता" हा सार्वजनिक आहे पण "सार्वजनिक जागा" नाही. कायदेतज्ञ अधिक मार्गदर्शन करु शकतील.
दुसरा मुद्दा हा की : मी रस्त्यावरुन चालताना जर मला एखाद्या दुचाकीचा धक्का लागला तर लोकांनी दुचाकी चालविणेच गैर आहे असा प्रचार चालू करणं अयोग्य ठरेल. चुकून लागलेला सिगारेटचा चटका हा "एक अपघात" आहे.
अम्मा शिग्रीटा?
क्या शिग्रीटा शिग्रीटा कर्ते रे तुमे?
वो साथियाँ देखे क्या? उस्मे वो हिरो का बावा बोल्ता ना, फेफ्डे तेरे आऊर पैसे भी तेरेच्च.
आपुन थोडा बाजूमेंच जाने का जी.
ये लोगांकु मालूम होता की कर रे वो गलत कर रे फिर भी करे तो हमें क्या बोलना? आपुन हाथा में शिग्रीटा दिके तो उसका बाजूसे जाताच नै .
वो इन्ड्या में क्या कैते, वो लोगोंका राज है ना? तो हम कुछ बोल नै सकते ना!
अब्बी इधर बोल्कु तुमे हल्का लगता तो हो लियो मियाँ ... हल्का!
ए सलिम माचिस तो दे दियो रे, बिडी होना! ;)
कौन बताया तुमकु
नंतर
पुरा मुहल्ला जानता इस्माइल्भाय.
हे नसून तो प्रसङ्ग असा आहे. चूडीबाजारवाली रुक्साना इस्माइलभायला भेटते.
"आउर इस्मायलभाय सलामालेकुम".
"वालेकुमस्सलाम!"
"क्या रे परसो लोगां मारे थे ना तुमकु?"
"कौन बोले आपकु?"
"अपना सलीम बोलरा था परसो गोश्त के दुकानपे, परसो खुंदल खुंदल के दिये कते"
"सलीम फेकू(दातोठ खात)!"
रुक्साना परत "भौत मारे कते" =))
सिगरेट कोणाला सोडायची आहे का?
काही श्वसनाचे व्यायाम आनी एन एल पी यांच्या सहाय्याने सिगरेट सोडत येते.
मी काहीजणाना यात मदत केली आहे.
सहा ते दहा जणांचा गट मिळाल्यास असा एखादा चार दिवसांचा कार्यक्रम करू शकतो. ( शनी रवी + शनी रवी)
डिसेंबर चौथा आठवडा जानेवारी पहिला आठवडा भारतात असेन.
मी स्वतः खूप प्रयत्नाने सिग्रेटचे व्यसन सोडले आहे. हे व्यसन मला मुळात लागलंच कसं याविषयी आता गिल्टी वाटतं.
सिग्रेट ओढणारे कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात हे आत्मपरीक्षणावरून लक्षात येतंय.
सिग्रेटने रिफ्लेक्सेस कमी होतात असा अनुभव आहे, (हे फॉल्स स्टॅटॅस्टिक्स सुद्धा असू शकेल, खात्री केली नाही)
प्रतिक्रिया
कितीला मिळतं हो ते मास्क? आणि
मीही दीड वर्ष तुम्ही म्हणताय
सिग्रेटीचा चटका लागणं हे जरा
आज सकाळी मी तरी नक्कीच कोण
ओक्के!!
हां सिग्रेटीचा चटका लागणं हे
सिक्यूरिटी वा HR शी बोलून बघा
दुसर्याच्या खाकरण्याचा किंवा
लेखनाशी अगदी सहमत. त्या
Every year, almost 1,000
अनेक फुकाडे असेही असतात की
कॅन्सरच्या भितीपेक्षा ही भिती अधिक प्रभावी ठरु शकेल
फुकाड्यांना तुम्ही कसलीही
ई- सिगारेट
नाकाचा उपयोग जर धुराड्यासारखा
एक होता कार्व्हर मधलं वाक्य!
सार्वजनिक ठिकाणी नाईलाजास्त्व
हे वाचल्यानंतर लगेचच विक्रोळी
एकेकाळी ऑफिसेसमध्ये आणि
सार्वजनिक जागी बंदी आहे ना?
रस्ता ही सार्वजनिक जागा नाही
धागाकर्त्याचा फुकाड्यांना
लेखामागची चीड आणि कळकळ
अम्मा शिग्रीटा?
कैकू होना रे तुमकू बीडी
इस्माईल भाय
एक दुरुस्ती देइन सुचवुनी
लेख वाचून मनस्ताप झाला
सिगरेट कोणाला सोडायची आहे का?
सहा ते दहा जणांचा गट
!
Pagination