या बाबतीत सर्वांनी पुढाकार घ्यावा हे मान्यच आहे. पण तो एक पुढचा टप्पा आहे. पहिला टप्पा हा या रेषा कृत्रिम आणि स्वार्थी आहेत आणि त्या पुसल्या पाहिजेत याची जाणीव सर्व समाजाला व्हावी लागेल, त्याही आधी दुभंग निर्माण करण्याचे प्रयत्न थांबले पाहिजेत. धन्यवाद.
४७ नन्तर तर या भेदांची गरज नव्हती. मुसलमानांचे लांगुलचालन करणं कॉंग्रेसने चालू ठेव्लं. मुसलमानांचे तुष्टीकरण ईंग्रजाकडून मिळालेल्या देणगी सारखं त्यांच्या स्वार्थासाठी,मतांच्या रा़जकारणासाठी चालु राहिलं, पण संघाने या काँग्रेसच्या खेळीला सामाजीक उत्तर द्यायचे सोडून राजकीय उत्तर द्यायची व्यवस्था केली - जनसंघाची स्थापना करुन ! संघ ही राजकीय संघटना नव्हती. इंग्रजांच्या, काँग्रेसच्या क्रुपेने निर्माण झालेला भेदाच्या आगीवर संघ एका बाजूला तेल ओतुन आपली ही पोळी भाजुन घेतोय. खरेतर तो भेद जिवंत ठेवायचाच सातत्याने प्रयत्न करतोय !गावागावात,तुमच्या आजुबाजुला असलेल्या मुसलमानांशी तुमचं वैयक्तिक भांड्ण असते का ? वैर असते का - ते मुसलमान आहेत म्हणून ?
" पण संघाने या काँग्रेसच्या खेळीला सामाजीक उत्तर द्यायचे सोडून राजकीय उत्तर द्यायची व्यवस्था केली - जनसंघाची स्थापना करुन ! संघ ही राजकीय संघटना नव्हती."
काय बोलतो भाऊ तू ? जरा दोन वाक्यात साम्य असुदेकी ! किती कोलांट्या माराव्या लागतात ना…. उगी असुदे :)
संघ कार्यकर्ते आणि वैचारीक गोष्टींचा संबन्ध असतोच असे नाही. तिथे विचारांची फक्त देवाण होते घेवाणीला फक्त काहीनाच परवानगी असते.
( एकेकाळी शाखेत जाणारा....विजुभाऊ)
वैचारिक बदलाचा प्रवास तपशील म्हणून फार महत्वाचा नाही आणि या लेखात विषयाचा रोख पहाता ते फार महत्वाचे नाही. राम मंदिर ज्या पद्धतीने प्रसवल गेलं त्या प्रक्रियेचा आघात प्रचंड होता ज्यामुळे बाहेर पडण्याचे धाडस केले, हे स्पष्ट केले आहेच. अर्थात हा ही निर्णय अचानक घेता येणे शक्य नव्हते. धन्यवाद.
मुद्दा जर फक्त राम मंदिराचाच असेल तर, गोष्ट निराळी आहे.
केवळ ह्या एका कारणाने जर तुम्ही सगळ्या संघाला आणि स्वयंसेवकांना आणि त्यांच्या कार्यपद्धतीला दोषी समजत असाल तर ते चूकीचे आहे.
तो निर्णय राष्ट्रीय पातळीवरुन घेतल्या गेला होता.कुठल्याही पक्षाच्या कार्यकारणीत एकदा निर्णय घेतला की , एक तर तो पाळावा किंवा गप्प बसावे.
बरे दुसरी गोष्ट अशी की, तुम्हाला राम मंदिराचा निर्णय पटला नाही, मग तुम्हाला नंतर झालेले बाँब-स्फोट ते कसाब व्हाया गोध्रा हा प्रवास पण पटला नसेलच.तुम्ही कधी त्यावर आपले विचार का नाही मांडले?
वरच्या विधानावरून मूवी तुमचा पक्का आबा झालाय ! २६/११ नंतर कुणीतरी एवढ्या मोठ्या शहरात असे छोटे मोठे कारनामे तर होतच असतात असे म्हणाले होते, आठवते ना ? अहो राम मंदिर हे फक्त मंदिरासाठी आंदोलन नव्हते - किमान - शहाण्या विचारी मनांनी तरी एवढे भाबडे असू नये. बाबरी पडल्यानंतर या देशाची संपूर्ण वैचारिक फाळणी झाली आहे - विनाकारण ! या देशाचे समाजकारण धर्माच्या पलीकडे जाण्याची गरज होती आणि आहे त्या प्रक्रिये मध्ये भारतीय समाज शंभर वर्षांनी मागे गेलाय !!!
आता आधी हा खड्डा भरून काढावा लागेल मग रस्त्यातले खड्डे बुजतील, म्हणजे विकास सुरु करायला आपण विनाकारण मागे पडलोय ! ही फाळणी करण्याची स्वतंत्र भारतात गरज काय होती ? आणि त्या नंतरचे आपले प्रश्न हे आपण ही मूवी संसर्गित / बाधीत आहात याचा दाखला देते ! कसाब म्हणजे पाकिस्तानची कारवाई हा काय मुसलमानांचा हिंदुंवर हल्ला होता ? कमाल आहे !! गोधरा, १९९३
चे स्फोट हे बाबरी पाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या फाळणीची विषारी फळे आहेत त्याचा जाब संघाला विचारा !
प्रथमतः, माझे नांव मुक्त विहारी (किंवा मुवि) असेच आहे.मला कुठलीही उपाधी किंवा इतर राजकीय नेत्यांचे नांव देवू नका.दुसरे..."अहो राम मंदिर हे फक्त मंदिरासाठी आंदोलन नव्हते."
निदान मला तरी ते फक्त त्यासाठीच आहे असे वाटते.
तिसरे... "बाबरी पडल्यानंतर या देशाची संपूर्ण वैचारिक फाळणी झाली आहे."
म्हणजे त्याआधी न्ह्वती असे आहे का?
चौथे..."या देशाचे समाजकारण धर्माच्या पलीकडे जाण्याची गरज होती आणि आहे त्या प्रक्रिये मध्ये भारतीय समाज शंभर वर्षांनी मागे गेलाय !!!"
हे फक्त एका राम मंदिरामुळेच का?
पाचवे... "कसाब म्हणजे पाकिस्तानची कारवाई.हा काय मुसलमानांचा हिंदुंवर हल्ला होता?"
हा "दार-उल-हरब" वरचा हल्ला होता.आता तुम्हाला दार-उल-इस्लाम आणि दार उल हरब माहीत नसेल तर गोष्टच वेगळी..
सहावे..."गोधरा, १९९३चे स्फोट हे बाबरी पाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या फाळणीची विषारी फळे आहेत त्याचा जाब संघाला विचारा !"
अच्छा म्हणजे त्याआधी हिंदू-मुस्लीम दंगे होतच न्हवते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
>>> अहो राम मंदिर हे फक्त मंदिरासाठी आंदोलन नव्हते - किमान - शहाण्या विचारी मनांनी तरी एवढे भाबडे असू नये.
मग अजून कशासाठी होते?
>>> बाबरी पडल्यानंतर या देशाची संपूर्ण वैचारिक फाळणी झाली आहे - विनाकारण ! या देशाचे समाजकारण धर्माच्या पलीकडे जाण्याची गरज होती आणि आहे त्या प्रक्रिये मध्ये भारतीय समाज शंभर वर्षांनी मागे गेलाय !!!
शहाबानो खटल्यातील निकाल राजीव गांधींनी पाशवी बहुमताच्या जोरावर फिरवून कोट्यावधी मुस्लिम स्त्रियांना म्हणजेच पर्यायाने भारतीय समाजाला किमान ५०० वर्षे मागे नेले त्याचे काय?
अगदी १५ दिवसांपूर्वी कोणत्यातरी साधूच्या स्वप्नावर अंधविश्वास ठेवून उन्नानमध्ये उत्खनन करण्याचा मूर्खपणा करून आणि त्यासाठी प्रचंड खर्च करून भारताला अनेक शतके मागे नेले त्याचे काय?
धर्माच्या आधारावर वेगळे कायदे करून भारतीय समाजात कायमची फूट पाडून ठेवली त्याचे काय?
या देशाची वैचारिक फाळणी ८ व्या शतकातच झाली होती व ती नंतर ब्रिटिशांनी व त्यानंतर काँग्रेसने अजून रूंदावली. बाबरी मशीद पाडण्याचा व या फाळणीचा काहीही संबंध नाही.
>>> आता आधी हा खड्डा भरून काढावा लागेल मग रस्त्यातले खड्डे बुजतील, म्हणजे विकास सुरु करायला आपण विनाकारण मागे पडलोय !
सर्वात धार्मिक आधारावर केलेल्या वेगळ्या कायद्यांमुळे व एका विशिष्ट धर्मातील लोकांचे धर्माच्या आधारावर सुरू असलेले फाजील लाडांमुळे तयार झालेल्या दर्या बुजविण्याची गरज आहे.
>>> ही फाळणी करण्याची स्वतंत्र भारतात गरज काय होती ?
धार्मिक आधारावर वेगळे कायदे करून दोन्ही समाजात कायमस्वरूपी दरी निर्माण करण्याची काय गरज होती?
>>> कसाब म्हणजे पाकिस्तानची कारवाई हा काय मुसलमानांचा हिंदुंवर हल्ला होता ?
अर्थातच
>>> कमाल आहे !! गोधरा, १९९३ चे स्फोट हे बाबरी पाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या फाळणीची विषारी फळे आहेत त्याचा जाब संघाला विचारा !
आपण पूर्वी संघात असूनही आपले इतके अज्ञान कसे? गोध्रा किंवा १९९३ पूर्वीदेखील भारतात अनेक दंगली व बॉम्बस्फोट झालेल्या आहेत. ही कोणत्या घटनेची विषारी फळे होती? १९२१ मधील केरळमधील मोपल्यांची दंगल तर संघाच्या जन्माआधी झाली होती. १९४७ च्या दंगली, १९६८ ची भिवंडीची दंगल, १९८४ ची मालेगाव-भिवंडीची दंगल, १९८० पासून १९९२ पर्यंत होत असलेले बॉम्बस्फोट हे काय बाबरीमशीद्-गोध्रा प्रकरणामुळे झाले का? आणि गोध्रा येथे रेल्वेचा डबा पेटवून ६० कारसेवकांना जाळले नसते तर गुजरातची दंगल झाली असती का?
४७ नंतर ९१ पर्यंत ज्या अनेक धार्मिक दंगली झाल्या त्या काय राममंदिराच्या मुळे झालेल्या वैचारीक फाळणीमुळे (म्हणजे खरेतर वैचारीक फाळणी वगैरे काही न झालेल्या. फक्त काही लोकाना अशी कोल्हेकुई कायम करायची असते) झाल्या होत्या का? झालेच १८९२-९३ साली झालेल्या दंगली ही तथाकथित वैचारिक फाळणी (असेलच तर!) अनादि (म्हणजे इस्लामचे आक्रमण सुरु झाल्यापासूनची) अनंत आहे असे तुम्हाला वाटत नसेल तर खुषाल तुम्ही स्वतःशीच खोटे बोलत आहात असे समजा.
समस्या जितकी जुनी तितकी ती सोडविणे त्रासदायक! श्रीरामजन्मभूमीवरील मूळचे मंदीर उध्वस्त करून तिथे मशीद बांधली ही संतापजनक व दु:खद घटना ४५० वर्षांहून अधिक जुनी. स्वातंत्र्यानंतरची ४५ वर्षे सुद्धा ही समस्या सोडविण्याऐवजी लोंबकळत ठेवली गेली. त्यामुळे समस्येच्या उत्तराचा आघात प्रचंड असणारच.
बरेच मुद्दे मांडलेत, स्पष्टीकरण एकाचेही नाही. उदा: ४७ च्या आधीच्या जखमा भळभळत ठेवण्यामागे आज संघाचा काय स्वार्थ आहे? लव्ह जिहाद संघाची चाल आहे का? देशातल्या समस्त हिंदुंची भावना तुम्हाला कशी काय कळली? इत्यादि इत्यादि.
आणि हो, नसबंदी बद्दलही आम्हाला कळेल असं लिहा.
माफ करा, स्पष्टीकरण देण्याच्या मुद्द्यांची जंत्री आपण तयार केलीत तर एकेक मुद्दा पटलावर घेता येईल. १९५० साली घटनेने हे स्वतंत्र राष्ट्र आहे असे घोषित करताना आता इथे कुणी हिंदू आणि मुसलमान नाही, इथे सगळे भारतीय म्हणून राहतील असे स्पष्ट केले आहे. या स्पष्टीकारणामध्ये प्रचंड अर्थ आहे. हे उपासना पद्धतीवर आधारित भेद वैयक्तिक स्वरूपात जपता येतील पण त्याचा राजकीय वा सामाजिक लाभ उठवता येणार नाही आणि कायद्याने तसा भेद करता येणार नाही. त्यामुळे तोवर असणारे मुस्लिम राखीव मतदार संघ बंद झाले. ब्रिटीश कालीन संसदे मध्ये रीतसर मुसलमान आणि हिंदू यांच्या टक्केवारी नुसार जागा भरल्या जाणा-याची पद्धत - कायद्याने - स्वतंत्र भारतात बंद झाली. मग आता हिंदूंचे संघटन " हिंदू " म्हणून करण्याचे कारण काय ? १९२५ ते १९४७ त्या संघटना करण्याला काही अर्थ होता. कारण इंग्रज सरकार तो भेद जिवंत ठेऊन आपली वाट सुकर करत होता. आपल्याच म्हणजे भारतीयांचे सरकार आल्यावर हिंदू म्हणून घाबरण्याचे काही कारण नव्हते आज ही नाही ! तरी देखील संघ हिंदू संघटीत झाला पाहिजे असे म्हणतो, याला स्वार्थ सोडून दुसरे कiरणच नाही. १९४७ नंतर राम मंदिरा सारखे निरर्थक आंदोलन सोडले तर एका तरी राजकीय वा सामाजिक विषयासाठी एकत्रित हिंदू म्हणून दाद मागावी लागली आहे का ? दुसरे - लव्ह जिहाद ची किती प्रकरणे तक्रारी च्या स्वरूपात अखिल भारतात पोलिसांकडे दाखल झाली आहेत ? मुसलमान आणि हिंदू व्यक्तींमधला सरसकट विवाह वा प्रेम हे लव्ह जिहादच आहे असा संघवाल्यांचा सरसकट दावा आहे ! तसा प्रचार रीतसर ते करतात याचे अनेक पुरावे आहेत. ते इथे देण्यासारखे नाहीत.
… आणखीन एक ! इथे मला प्रसिद्धी कशी मिळेल ? वा मिळते ? खच्चुन हजारेक मिपा सदस्यांमध्ये प्रसिद्धी साठी म्हणताय का ? पण असे काही म्हणजे तुमच्या लेखी सवंग वगैरे लिहिण्याने हि प्रसिद्धी कशी काय बुवा मिळते ? आणि मग त्या प्रसिद्धीचे लोक इथे काय करतात ? नोकरी मिळते ? मिपाच्या निवडणुका होतात ? की अवार्ड फंक्शन असते आणि अवार्ड मिळते ? की माझे होर्डिंग लावले जाते ? म्हणजे नेमके मिळते काय - असा तुमचा दावा आहे ? मिपा मध्ये लेखन करण्याचा तुमचा वा अन्य लोकांचा प्रसिद्धी मिळवणे हा हि एक हेतू असतो का ? पण पुन्हा तेच - या प्रसिद्धीतून सदस्यांना काय काय लाभ होतात ? याचे उत्तर तुम्ही द्यायला माझ्या पेक्षा लायक आहात कारण आपण मला मिपावर सिनियर आहात ! चला उत्तर द्या !!
मी मिपा वर आपल्यापेक्षा सिनिअर वगैरे काही नाही,किवा आपण समवयस्क (मिपावर) आहोत असे समजु,सवन्ग प्रसिद्धी असे वाटण्याचे एक कारण म्हणजे आपण आजपर्यन्त ईतक्या दिवसात कुठल्याही धाग्यावर एकही प्रतिकिया लिहिलेली दिसली नाही,तसेच आपण हा नवा धागा सुरु केला तो सुद्धा सन्घ परिवार आणि हिन्दुत्व या विषयावर्,कारण हल्ली एक फेशनच झाली आहे सन्घ परिवार,मोदी हिन्दुत्व या वर टिका करुन झटपट प्रसिद्धी मिळवण्याची जी माझ्यामते सवंग आहे.
संघ पद्धतीने परिचय आपण कसा करता ? तो कसा करतात ? परिचय करून देण्याची पद्धत कुठे आणि संघातल्या कुणी लिहून ठेविली आहे ? आपण कोणत्या अभ्यासवर्गात परिचय करून देण्याचे प्रशिक्षण घेतले ? आपल्या गावातले भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते किंवा भाजप चे कार्यकर्ते किंवा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते किंवा संस्कार भारती चे कार्यकर्ते तुम्ही म्हणता तसाच परिचय करून देतात का ? ( बाय द वे ; भारतीय मजदूर संघाचा कार्यकर्ता पाहिलाय का कधी ? ) आणि पद्धतीने परिचय करून न देणा-यांना संघातून काढून टाकण्याचा अधिकार हल्ली पु. मोहनजीनि आपल्याला दिलाय का ? आणि शेवटी समजा ज्या कुठल्या स्तैल ला आपण संघ स्तैल परिचय म्हणता तो इथे करून द्यायला मिपा हे साप्ताहिक विवेक आहे का, म्हणजे संघ परिवारातील काही बाही ? मुद्दाचे बोला हो, मी खरा की खोटा याचा काय सबंध ?
संपादितकृपया वैयक्तिक शेरेबाजी करू नये.: संपादक मंडळ
बस बस बस... थँक्यू... :)
इथे अनेक संघाशी संबंध आलेले लोक आहेत... तुमची ऑथेंटिसिटी की काय म्हणतात ती चेक करायची होती... ती करवून दिलीत... और क्या चाहिये... :)
मी खरा की खोटा याचा काय सबंध ?
अहो चिडताय काय असे? तुमचा धागा आहे...त्यात तुम्ही बरंच काहीबाही सांगत आहात... गुरूसुद्धा पारखून घ्यावा म्हणतात... तुमचे विचार पटवून घेण्याआधी तुम्ही खरे की खोटे ते तपासायला नको का?
वंदनीय पिशी अबोली ताई ,
नमस्कार ,
आता - घडाभर तेल संपले असेल तर - मुळ मुद्द्यांवर आपले मत प्रदर्शन करून आम्हाला उपकृत कराल का ? आणि मी चिडत वेगैरे नाही हो . आणि चिडलो असतो तर संपादक मंडळाला मी ही तक्रार केलीच असती ना !.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत तुमचे काय मत आहे ? समान नागरी कायदा आला पाहिजे का नको ? या कायद्याला संघाने कधी विरोध केला?
राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. तो वाचा आणि सांगा सुप्रीम कोर्ट कम्युनल आहे का ?
"मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत तुमचे काय मत आहे ? समान नागरी कायदा आला पाहिजे का नको ? या कायद्याला संघाने कधी विरोध केला?राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. तो वाचा आणि सांगा सुप्रीम कोर्ट कम्युनल आहे का ?"
जावु दे...
आधी बघावे गुगलून, अडल्यास बघावे विकीला
हाच आमचा मार्ग एकला
रा. स्व. संघाचा एके काळचा माफक सदस्य आहे मी. नुसताच स्वयंसेवक. गल्लीस्तरावरही कांही कार्य केलेले नाही. त्यामुळे कांही भाष्य करण्याची योग्यता नाही.
वाचत राहीन.
ज्या उद्देशाने धागा काढला आहे तो सफल होईल असे वाटते आहे.
अळीचे फुलपाखरू झाल्यावर फुलपाखरू सूर्याजी पिसाळ होते का ?
वाल्याचा वाल्मिकी होतो तेव्हा वाल्मिकी सूर्याजी पिसाळ ठरतो का ?
फुलनदेवी माणसात येण्यासाठी डाकूगिरी सोडते तेव्हा ती डाकूगिरीशी गद्दारी करते का ?
नक्षलवादी सामान्य नागरिक म्हणून जगण्यासाठी शरण येतात तेव्हा त्यांना पिसाळ म्हणतात का ?
पिसाळ कोण प्रवाहातले कोण, बाबा ?
"अळीचे फुलपाखरू झाल्यावर फुलपाखरू सूर्याजी पिसाळ होते का?
वाल्याचा वाल्मिकी होतो तेव्हा वाल्मिकी सूर्याजी पिसाळ ठरतो का?"
वरील दोन्ही उदाहरणे ही स्वतःच स्वतःची उत्क्रांती करण्याचा मार्ग आहे.अळी किंवा वाल्मिकी हे कुठल्याही सामाजिक कळपाचे सदस्य न्हवते.
"फुलनदेवी माणसात येण्यासाठी डाकूगिरी सोडते तेव्हा ती डाकूगिरीशी गद्दारी करते का?"
तिने डाकूगिरी का सोडली? तर तिला जिवंत रहायचे होते.संधी मिळताच तिचा खून झालाच.
"नक्षलवादी सामान्य नागरिक म्हणून जगण्यासाठी शरण येतात तेव्हा त्यांना पिसाळ म्हणतात का?"
संघाची तुलना फक्त संघा बरोबरच करता येते.तुम्ही निदान उदाहरण तरी संघाला शोभेल असे देत जा.
"पिसाळ कोण प्रवाहातले कोण, बाबा ?"
आता तुम्हीच सांगा पिसाळ कोण ते......मला तर तुम्ही खरोकरच संघात होतात का? असा प्रश्र्न पडला आहे.कारण ज्याला संघाची स्थापना का आणि कशी झाली? आणि त्यानंतर ५/६ वर्षांतच त्याचे परीणाम काय झाले? हे माहीत असलेला स्वयंसेवक असा धागा काढणार नाही.
ज्या पोटतिडीकेने तुम्ही लिहीले आहे त्याच पोट तिडीकेने इथे कधीच खालील गोष्टीची चर्चा आपल्या मुस्लीम बांधवांनी केली नाही.
१. समान नागरी कायदा.
२. आझाद मैदान निषेध.
३. मुझ्झफर नगरचा निषेध.
४. घुसखोर बांगला-देशींचा (मग तो हिंदू असो की मुसलमान) निषेध.
५. मुस्लीम आंतकवाद्यांचा निषेध.
अजून एक लक्षांत घ्या, भारत हा पुर्वीपासूनच "दार-उल-हरब" मानल्या गेल्या आहे.आज जितक्या सहजतेने तुम्ही हे एक भारतीय म्हणून लिहू शकता, इतक्या सहजतेने इथलेच काय पण कुठलाही मुस्लीम, ईंडीयन मुजाहिदीन, दावूद इब्राहिम किंवा रझा अॅकॅडमी बद्दल बोललेला नाही.
तुम्ही संघात होता असे म्हणता, पण संघाची स्थापना का झाली?
आणि तुम्हाला अजून पण असे वाटते का, की आता संघाने त्याचे विसर्जन करावे?
वरील विचार मंथन हे राजू भारतीय ह्यांच्या बरोबर होत असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्यांनी मध्येच तोंड खूपसू नये, ही विनंती.
दुसर्यानी तोंडं का खुपसायची नाहीत? खाजगी सवाल जबाबच करायचे तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत का द्यायचे?
का, ही वेबसाइट म्हणजे फक्त तुमची पुण्यभू आणि पितृभू आहे आणि आम्ही कोणी इराणमधून आलो आहोत की काय?
:)
दुसर्यानी तोंडं का खुपसायची नाहीत? खाजगी सवाल जबाबच करायचे तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत द्यायचे की.
का, ही वेबसाइट म्हणजे फक्त तुमची पुण्यभू आणि पितृभू आहे आणि आम्ही कोणी इराणमधून आलो आहोत की काय?
त्याचे काय आहे...
मी शक्यतो ज्याने धागा काढला आहे, त्याच्याशी किंवा ज्याला काही किमान वैचारीक पातळी आहे त्याच्याशी विचार मंथन करतो.
आपली आणि माझी वैचारीक किंवा सामाजिक पातळी जुळणे शक्यच नाही.कारण आपण नावाप्रमाणेच उद्दाम आहात.त्यामुळे आपण आमच्या पासून दुरच रहा.ही विनंती आहे.
दुसरी गोष्ट...."आम्ही कोणी इराणमधून आलो आहोत की काय?"
ते मला माहीत नाही, पण आपण भारतीय असाल तर... आपण अद्याप...
१. समान नागरी कायदा.
२. आझाद मैदान निषेध.
३. मुझ्झफर नगरचा निषेध.
४. घुसखोर बांगला-देशींचा (मग तो हिंदू असो की मुसलमान) निषेध.
५. मुस्लीम आंतकवाद्यांचा निषेध.
ह्या विषयी निषेध का व्यक्त केला नाही?
देशात समान नागरी कायदाच आहे. ज्याने त्याने आपला धर्म पाळावा हाच तो समान नागरी कायदा.
बहुपत्नीत्वाची चाल हिंदू धर्मातही होती. आणि ती हिंदुंनी स्वतः होऊन कयदा करुन बंद केली. तुम्ही ही चाल बंद करा, असा 'त्यान्नी' फतवा नव्हता काढला. आता तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घेतला, तर त्याला बाकीच्यानी काय करायचे?
ते पोटगीच्या कायद्याचेही तसेच. अस्ले आत्मघातकी कायदे करायला कोण सांगितले होते? उगाच दुसर्यांना दोष का द्यायचा?
प्रतिक्रिया
हिंदू आणि मुसलमान या केवळ
ह्म्म्म्म!
या रेषा कृत्रिम आणि स्वार्थी
रेषा कृत्रिम आणि स्वार्थी
???
वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला
+१०००००००००
वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला
संघ कार्यकर्ते आणि वैचारीक
वैचारिक बदलाचा प्रवास....
@ राजू भारतीय ...
तुमचा आबा झालाय !
@ राजू भारतीय ...
>>> अहो राम मंदिर हे फक्त
४७ नंतर ९१ पर्यंत ज्या अनेक
४७ नंतर ९१ ?????
का अभ्यास कच्चा आहे वाटतं
समस्या जितकी जुनी तितकी ती
हे राहिलंच
स्पष्टीकरण....
मुसलमान आणि हिंदू व्यक्तींमधला सरसकट विवाह वा प्रेम हे लव्ह जिहा
?????? !
… आणखीन एक !
धन्यवाद
सगळ्या वाक्यांशी सहमत
मला पहिला परिच्छेद खोटा वाटत
का ?
का बरे खोटा ?
सोड ना!
क्या बात क्या बात प्यारेआबा..
मी खरा की खोटा ......! धन्य आहे !!!
बस बस बस... थँक्यू...
होप आय एम नौ इनफ मोडेस्ट !
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत
इथे वाचायला वेळ कुठे आहे?
३००+
३०० + होतील ही!
माफक सदस्य.
संघाविषयी कधीही आपुलकी नव्हती पण......?
काय हे ....?
@ राजू भारतीय ...
मला लेखाचा पहिला परिच्छेद १००
का बरे ?
सरळ सरळ सांगा न राव धाग्या चे
:)
@ राजू भारतीय ...टाळी एका हाताने कधीच वाजत नाही...
.
दुरुस्ती
@ उद्दाम...
.
Pagination