अगदी सुरेख लेखन !
..........माझी आई नेहमी म्हणते चर्चेने प्रश्न सुटतात
या वाक्यातील " माझी आई नेहमी म्हणते..." हा भाग .".. चर्चेने प्रश्न सुटतात" या भागापेक्षा अधिक महत्वाचा आहे हे मी स्वानुभवाने सांगु शकतो !
आधी जे काही तो म्हणाला ते ऑफिस मधल्या प्रेशर मुळे आणि अतिउत्साहाच्या भरात तो म्हणाला त्याच्या मनात असं काही नव्हतं हे ही त्याने मान्य केलं. कारण माझी आई नेहमी म्हणते चर्चेने प्रश्न सुटतात.
हे बाकी प्रकर्षाने पटले.
काही प्रश्न
टोयोटाचा नबंर काय ?
गाडीच्या पुडच्या काचेवर कोणत्या देवाच नाव रेडियम ने लिहले आहे ?
डेस्क बोर्ड वर गणपतीची मुर्ती स्थापन केली का ?
''बेबी ऑन बोर्ड '' ही पाटी मागे कधी टांगणार आहात ?
बाकी लेख आवडला.
अभिनंदन नवीन गाडीबद्दल...अगदी मनापासुन....आणि लेखनपण खुसखुशीत आहे.
पण टोयोटा आणि देशी हे परदेशात अगदी समीकरण आहे. हो..हो..लगेच अगदी अंगावर यायची गरज नाही...अत्यंत भीकार टमरेल गाड्या आणि येता जाता लेकाचे रीकॉल्स करत असतात....
- वाट्या...
पण इतर देशांतील लोकही टोयोटा आणि हाँडा या गाड्यांना तितकीच पसंती देतात आणि त्याचे कारण म्हणजे विश्वासार्हता. २ लाखांहून अधिक माईल्स चालवूनही रेग्युलर मेंटेनन्स शिवाय काही मोठा खर्च न करावा लागणे ह्या कारणास्तव लोक ह्या दोन ब्रॅन्ड्स ना पसंती देतात.
रीकॉल्स वगैरे सर्वच कार कंपन्या करतात. अगदी mercedes, BMW, Bentley वगैरे सुद्धा. त्यांचा ग्राहकवर्ग कमी असल्याकारणाने तितके गाजत नाहीत इतकेच. टोयोटाचा अगदी अलिकडचा सर्वात गाजलेला अन इंटेन्डेड अॅक्सिलरेशनचा रीकॉलही फ्लोर मॅटमुळे होत होता. त्याच वेळेस अमेरिकेत मंदी आलेली असल्या कारणाने बी अमेरिकन बाय अमेरिकन (फोर्ड, जीएम, शेव्ही इ.) ही घोषणाही वारंवार होत होती त्यामुळे ह्या जॅपनीज कार मधील दोषाला वाजवीपेक्षा अधिक प्रसिद्धीही मिळाली. खरे तर टोयोटा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत बनत आहेत आणि फोर्ड, जीएम, शेव्ही ह्या साउथ अमेरिकेत. असो.
टोयोटाच्या कोणत्याच रीकॉलचे कारण आग वगैरे लागून अथवा जीवघेणा अपघात होऊन कोणाचा जीव गेला असल्याचे मला तरी आठवत नाही.
रीकॉल हे तुमच्या आमच्या सुरक्षिततेसाठीच असतात आणि फुकटात दुरूस्त करून मिळतात त्यामुळे त्या बद्दल त्रागा करण्यात काही अर्थ नाही.
अहो एखाद्या सॉफ्ट्वेअर प्रणाली मधे सुद्धा bugs असतातच, इथे तर चालती फिरती कार आहे आणि जगभरात कितीतरी व्यक्ती प्रकृती आणि environmental conditions. So there is only so much they can do to get everything right the first time.
अवांतराबद्दल क्षमस्व.
पुन्हा संयमित वातावरणात चर्चेला सुरुवात झाली.>> आधी जे काही तो म्हणाला ते ऑफिस मधल्या प्रेशर मुळे आणि अतिउत्साहाच्या भरात तो म्हणाला त्याच्या मनात असं काही नव्हतं हे ही त्याने मान्य केलं. >>>>कारण माझी आई नेहमी म्हणते चर्चेने प्रश्न सुटतात.>>>
अगदी जबरदस्त! मस्त लिहिलंय! ठाण्याचे गोडबोले आणि पुण्याचे जोशी आणि त्यांच्या संयमित चर्चा वगैरे भन्नाट आवडल्या. यानिमिताने आमच्याही पहिल्या गाडीची आठवण झाली!
खुसखुशीत लेख. अगदी असाच प्रसंग काही दिवसांपूर्वी आमच्या घरात घडला.
महिना झाला तरी गाडी शोधतोच आहोत हे जेव्हा अवगत झालं तेव्हा आमचाही थोडा थोडा वाहनसौख्यातल्या शनिवर विश्वास बसायला लागला.
आमचे अहो 'कन्या' राशीचे असल्याने संशोधकांच्या वरताण संशोधन करतात. चार महिने अॅनालिसिस करुन शेवटी आमच्याही खानदानातल्या पहिल्यावहील्या गाडीचं आगमन महिन्याभरापूर्वी झालं. आणि तीही टोयोटाच! :-) फक्त आमची चलती का नाम कॅम्री..
राक्षसाचा जीव पोपटात वगैरे कसा असायचा तसं आता नवऱ्याचा जीव त्या गॅरेज मधल्या गाडीमध्ये आहे. पहिले काही दिवस मला घरात सवत आल्याचाच फील आला "इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको, सांभाळ तुटेल, मोडेल, एका जागी स्वस्थ बस, मला एकाग्रतेने गाडी चालवू दे, बोलू नको वगैरे वगैरे आणि या बाबतीत तो कुठल्याच चर्चेला तयार नव्हता. माझाही नाईलाज झाला. पण सुरुवातीचे दिवस असे खडतरपणे पार केल्यावर आता मात्र आयुष्य खूपच सहज सोप्प झालंय. घरातून निघताना, "गाडीची चावी घेतलीस का?" असं विचारतानाही आनंदाच्या उकळ्या फुटतात.
आकर्षक आणि देखण्या गाडीचं नुकतंच पदार्पण झालं. पुढे-मागे कप होल्डर्स आहेत, गाडीचा आणि सीट्चा रंगही बरा आहे, ए सी आणि सीडी प्लेअर अगदी दणक्यात चालतोय आणि ड्रायव्हरच्या बाजूची जागाही अगदी भरभक्कम आणि सुट्सुटीत आहे.
वर्णन आवडले. ४ महिन्यांपूर्वीचे आमच्या घरातील सगळे प्रसंग आठवले. गाडी घेण्याआधीची सगळी चिकित्सा आणि घेतल्यानंतर नवऱ्याकडून गाडीला मिळणारी अति प्रेमाची वागणूक.
अत्त्तिशय सुरेख, खुसखुशीत लेखन.
माझे पहिले वाहन हे सेकंडहँड 'मोटरसायकल' होते. मी मस्कतात आणि बायको चिपळूणात होती.
तिला पत्रातून कळविले,
'कालच तिला मित्राकडे पाहिले. पाहताक्षणी आवडली. अगदी कोणाच्याही नजरेत भरावी अशी. मित्राला म्हणालोही तसं. तर तो म्हणाला, 'आवडली?' तर म्हंटलं,' हो! फार सुंदर आहे'. तिच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. मित्र म्हणाला, 'हवी आहे तुला? घेऊन जा.'
काल रात्री घेऊन आलो घरी. कालची रात्र फार फार सुखात गेली. आयुष्यभर जिची नुसती स्वप्नेच बघितली ती आज माझी होती....स्वतःची.
सुझुकी २५० मोटरसायकल.
पत्र वाचताना बायकोला अर्थातच घाम फुटला होता.
प्रतिक्रिया
मस्त
चायला लग्नाआधी आणि
सहमत
मस्त लिहिलंय!
खुसखुशीत लेख.
क्या बात है!
झकास
..........माझी आई नेहमी म्हणते चर्चेने प्रश्न सुटतातया वाक्यातील " माझी आई नेहमी म्हणते..." हा भाग .".. चर्चेने प्रश्न सुटतात" या भागापेक्षा अधिक महत्वाचा आहे हे मी स्वानुभवाने सांगु शकतो !(No subject)
"संयमित"
हुम्म्म्म
दिवाळी जोरात आहे.
छान लिहिलंय
//_काही प्रश्न_//
उत्कृष्ट
लेखन अगदी गुदगुल्या केल्यागत
मस्त....
*****
मस्तच..
भन्नाट लेखन, खुप आवडलं..
टोयोटा..
लेख आवडला. प्रतिसादातील समीकरणाशी अंशतः सहमत
चौकार आणि षटकार
खुसखुशीत!
+१
मस्तच!!!
आकर्षक आणि देखण्या गाडीचं
खुप छान लेख.
मस्तच.
मस्त लेख
:)
मस्तं.
तरल आणि नर्म विनोदी लेखनाचं
आमचीही कोरोलाच आहे हो जुइ बाई
संयमित वातावरणात शांतपणे