भाजपेयी , मोदी, संघाचे फुकटे ब्रह्मचारी स्वयंसेवक आधी यांची लग्ने तरी लावा.
मग बाकीच्यांच्या ३ पोरांचं बघूया.
---------------
एकमेव पोरीचा बाप असलेला पं. उद्दामलाल महामेरु
जावूद्या हो...
त्यांचे हे नेहमीचेच आहे...
विषय समजावून घेता काहीतरी लिहीत बसतात.सिक्क्षनाचे असे पण परीणाम...
बाकी उद्दाम साहेब हे १००% हिंदू आहेत असेच मला वाटते.त्यांचा हिंदू धर्माचा अभ्यास सुरु आहे.
उद्दाम साहेब एखादा नेता अविवाहित आहे म्हणजे पूर्ण संघटना अविवाहित असेल असा पोरकट विचार का करताय .
अविवाहित आहेत म्हणून त्यांना फुकटे म्हणणे तुमच्या सारख्यांना शोभा देत नाही . ज्यांना परवडत असेल ते काढतील ३ पोरं . तुम्ही थंड घ्या कि जरा :)
पूर्ण संघटना अविवाहित आहे, असे मी लिहिलेलेच नाही. जे अविवाहीत आहेत, त्यांची लग्णं तरी लावा आधी, इतुकेच म्या लिहिले.
संघाचे स्वयंसेवक वार लावून जेवतात, असे ऐकून आहे.
आणि ते घर सोडून समाजासाठी पूर्णवेळ राबतात.. त्यांच्या राबण्यासमोर वारावर जेवण्यासाठी मालकाला येणारा खर्च नगण्य आहे.
जरा ८ दिवस असे बाहेर राहुन बघा.. म्हणजे कळेल.
+ १
रात्रं दिवस उन्हा तान्हात राबतात ते दिसत नाही.
आमच्या कडे प्रचारक जेवायला यावा म्हणून आम्ही अजून पण जीवाचा आटा-पिटा करतो. ४ दिवसांत त्यांना ४०० बोलावणी असतात.जावू दे, संघाचा प्रचारक , ही काय गोष्ट आहे, हे त्यांना कधीच समजणार नाही.
असेल बुवा. आम्ही तर कधी असल्या अफवा ऐकल्या नाहीत. समजा हे खरं असलं तरी आपल्या संघटनेतल्या इतर स्वयंसेवकांकडे जेवण्याने देशाच्या तिजोरीवर भार येत नाही किंवा करदात्यांचा पैसा वापरला जात नाही. साधी सर्दी झाली तरी जनतेच्या खर्चाने विमानाच्या प्रथम वर्गातून अमेरिकेत जाऊन उपचार घेऊन वर त्यागमूर्ती म्हणून मिरविण्यापेक्षा वार लावून जेवणे हे कितीतरी पटीने चांगले.
तुम्हाला आहे ना एक मुलगी, द्या एखाद्या होतकरू संघ स्वयंसेवकाला…
नाही तरी तुम्हाला त्यांच्या (संघ वाल्यान्च्या) लग्नाची इतकी चिंता आहेच… एका दगडात दोन पक्षी !!!
राSSSSSSSSSSजू राजूSSS
कहाँ गया तू.. अत्यंत डुप्लिकेट लेख वाटतो आहे. राजू वरच्या प्रश्नांस उत्तर द्यावेसे वाटत नाही का?
थोडावेळ टेलेब्रँडची जाहीरात पाहील्यासारखे वाटत होते. आधी असे असे अमूक अमूक होत होते आणि आता कसे ते सोडल्यावर चान चान आहे.
@@वरील विचार मंथन हे राजू भारतीय ह्यांच्या बरोबर होत असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्यांनी मध्येच तोंड खूपसू नये, ही विनंती.
>>
फक्त राजू भारतीय यांच्याबरोबर चर्चा करायची असल्यास खफ किंवा व्यनी आहेच की. *SCRATCH*
@ मुद्दाम गहन विचार करणार्यांना समजत नाही
समजलं.. मग चालु द्या. मला वाटलं की तुमचं परत 'त्या' सारखं इथं पण काही सिक्रेट आहे ;)
@का तुम्ही पण त्यातलेच >>
नाही हो.. गहन विचार कुठला? आत्ता कुठं शींपल विचार करायला शिकायचा प्लान आहे.. बघु फ्युचरमधे जमलं तर..
संघाचा उपाय हा रोगापेक्षाही भयंकर आहे. त्यावर योग्य उपाय काढण्यासाठी आधी मूळ रोग समजून घेतला पाहिजे. मुस्लिमांमध्ये जननदर खूप जास्त असल्याने त्यांची संख्या वेगाने वाढते आहे व काही काळातच इतकी संख्या वाढेल की इतरांसाठी व देशासाठी नवीन समस्या निर्माण होतील हा मूळ रोग आहे. जिथे मुस्लिम अल्पसंख्य असतात तिथे ते लोकशाही, घटना, कायदेशीर हक्क इ. पुढे करून स्वतःचे वेगळे अस्तित्व व वेगळे कायदे मिळवितात. काही काळाने संख्या वाढली की आमच्यावर अन्याय होत आहे असा कांगावा करून स्वत:चे वेगळे राज्य, वेगळा देश मागायला सुरूवात करतात. त्यासाठी नंतर अतिरेकी कारवाया सुरू होतात. कालांतराने वेगळे राज्य, देश मिळविले की तिथून प्रथम इतरधर्मियांची हकालपट्टी करतात किंवा त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या मागे लागतात. शेवटी तिथे शरियत आणून कुराणावर आधारीत एक संपूर्ण मुस्लिम राष्ट्र तयार होते. पाकिस्तान व काश्मिरचा प्रवास असाच झालेला आहे. आता काश्मिरचे पाकिस्तान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फिलिपाइन्स, ब्रह्मदेश, चेचन्या इ. ठिकाणी मुस्लिमांचे वेगळे राज्य मागण्याच्या चळवळी सुरू आहेत. बोस्निया हा वेगळा मुस्लिम देश करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेतच. इंग्लंडलाही ही समस्या भविष्यकाळात भेडसावणार आहे. फ्रान्स, स्वित्झर्लँड, जपान, नॉर्वे इ. देशांनी ही समस्या ओळखून आतापासून पावले टाकावयास सुरूवात केली आहे.
त्यामुळे ही संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर देशविभाजन, अतिरेकी हल्ले, सशस्र दंगली इ. गंभीर समस्या निर्माण होतात हे ओळखून सर्वांनाच १ मुलापेक्षा जास्त मुले होउ न देणे हे सक्तीचे केले पाहिजे. हिंदूंनी ३ मुले जन्माला घालणे हा अत्यंत चुकीचा उपाय आहे.
"त्यामुळे ही संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर देशविभाजन, अतिरेकी हल्ले, सशस्र दंगली इ. गंभीर समस्या निर्माण होतात हे ओळखून सर्वांनाच १ मुलापेक्षा जास्त मुले होउ न देणे हे सक्तीचे केले पाहिजे. "
समान नागरी कायद्याच्या मसूद्यात हे पण येतेच.
अत्यन्त टोकाचि निष्ठा आणि अत्यन्त टोकाचा द्वेश हा फक्त सन्घाच्याच लोकान्कडुन होवु शकतो याचेच हे उदाहरण आहे.
सुरुवातीला सन्घाच काम केल्यावर सुद्धा किती टोकाचि मते तयार होतात !!!
नसबंदी संघ विचारांची नसून तुमची स्वतःची झाली आहे.
संघाचे काम करण्यासाठी तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली होती का ? मग कशाला गळा काढताय ?
काहीतरी बकून लोकांची सहानुभुती मिळवायची चीप ट्रिक आहे ही! आणि धागा काढून कुठे गायब झाला ? यातच सारे काही आले..
(बघा ना हो .. माझ्या आजीला मारले .. माझ्या वडिलांचापण खून झाला... असो. तशातलाच हा प्रकार आहे झालं!)
व्यस्त होतो काहि काळ त्यामुळे उत्तरे देता आलि नाहीत. विटेकर, प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ? मला जे दिसलं, दिसतंय, त्याच्या विषयी मी लिहीलं आहे ! आणि सहानुभुती तुम्ही मला कशी देणार ? वैचारीक नसबंदी चा अर्थ सरासार विचार न करता !!
आणि इतर सर्व समाज हा पुरोगामी आहे असा समज करून घेणे हे सोयीस्कर असले तरी हितावह खचितच नव्हे. कोणताही फ़्यासिस्ट विचार हा मानसिक असुरक्षिततेतून जन्माला येतो. स्वत:च्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले की सगळी तत्वज्ञाने खुंटीला टांगली जातात. सामान्य जनतेच्या ह्याच मानसिक स्थितीचा फायदा उठवणे हेच प्रत्येक समाजातील प्रस्थापित वर्गाचे लक्ष्य असते. ह्या देशात आधीच अस्तित्वात असलेल्या चातुर्वर्ण्य आणि जातीभेदामुळे हे काम अजूनच सोपे झाले आहे. संघ काय करतो आणि काय नाही यापेक्षा एक समाज म्हणून आपण आपल्या भूतकाळातील दुष्कृत्यांची आणि त्या कृत्यांविषयीच्या वर्तमानातील अभिमानाची सामुदायिक जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत का हे अधिक महत्वाचे आहे.
हिंदूंचे संख्याबळ
हिंदू समाज हा अल्पसंख्य होईल अशी हाकाटी करण्याआधी हिंदू म्हणजे नेमके कोण ह्या प्रश्नाचे उत्तर मिळणे हे अत्यावश्यक आहे. जर हिंदू हा एक धर्म असेल तर पितृभू आणि पुण्यभू ही वांशिक आणि भौगोलिक बंधने स्वत:च्याच धर्माला घालणे म्हणजे स्वत:च्याच धर्माच्या प्रसाराला पायबंद घालणे नव्हे काय?
ऐतिहासिक काळापासून विचार करायचा झाला तर ह्या देशात मुस्लिमांची संख्या मुख्यत: धर्मांतराच्या आधारे वाढली आहे. जन्मदराच्या आधारावर नव्हे. जर अल्पसंख्य होण्याची इतकीच धास्ती वाटत असेल तर स्वत:च्या धर्माचा प्रसार करून इतर धर्मियांना स्वधर्मात घेणे हा अधिक चांगला मार्ग असू शकत नाही का?
इथे धर्मांतर करणे म्हणजे छळाने किंवा कपटाने असा अर्थ अपेक्षित नाही. बौद्ध धर्म हा ह्याच भूमीत उगम पावून सर्व आशिया खंडात पसरला तो काही छळ-कपट करून नव्हे. जे याच भूमीत निर्माण झालेला बौद्ध धर्म करू शकतो ते आजचा हिंदू धर्म का करू शकत नाही?
हे नक्कीच होऊ शकते. परंतु त्यासाठी धर्म आणि वांशिकता ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत आणि त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.
त्याला प्रचार म्हणण्यापेक्षा पश्चातबुद्धी म्हणणे योग्य होईल. जे आदिवासी आपल्याच देशात हजारो वर्षे राहत आहेत त्यांच्यापर्यंत बाहेरचे मिशनरी अगोदर पोचतात आणि मग आम्हाला जाग येते? ह्याचा अर्थ काय? जर हे मिशनरी आदिवासींपर्यंत पोचले नसते तर हे कार्यक्रम झाले असते काय? प्रत्येक वेळी कोणीतरी आक्रमण केल्याशिवाय आम्हाला आमच्याच धर्माचा प्रचार करण्याची आठवण का होऊ नये?
ह्याचे मुख्य कारण असे आहे की ह्या धर्माकडे स्वत:चे असे एकच निश्चित तत्वज्ञान नाही. त्यामुळे प्रचार नेमका कशाचा करायचा ह्याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसते. गेल्या हजार वर्षांचा इतिहास चाळून पाहिला तर असे दिसते की आशिया खंडात जिथे जिथे हिंदू धर्म पसरलेला होता तिथे आज इतर धर्मांनी आपापले बस्तान बसवले आहे. हे अल्पसंख्य होण्याचे भय इतर धर्मांना न वाटता केवळ हिंदू धर्मियांनाच का वाटावे? कायम कोणत्यातरी धर्माच्या आक्रमणाला प्रतिक्रिया म्हणूनच जर हिंदू धर्माचा प्रचार होणार असेल तर गेल्या हजार वर्षांत जे घडले त्यापेक्षा फार काही वेगळे येत्या हजार वर्षांत घडेल असे वाटत नाही.
पुष्कर जोशी : आपण अगदी शोधून नेमके चुकीची उदाहरणे आणि चुकीच्या लिंका दिल्या आहेत. कदाचित आपण दिलेले उदाहरण त्यातल्या त्यात आदर्श असू शकते ! स्वामी असिमानंद यांच्या शबरी कुंभा विषयी आपण लिहीले आहे ती डायरेक्ट मिशन-यांना आव्हान देणारी खेळी होती. पण आपण असे म्हणू शकता की असेच काही प्रयत्न करून धर्मांतर रोखता येऊ शकते आणि त्याचे आपण समर्थन करू शकता. गरज आहे ती त्या भागात म्हणजे डांग, पेठ, कळवण, डहाणू, इत्यादी भागात आदिवासींच्या ( संघाच्या भाषेत वनवासींच्या ) सामाजिक उत्थानाची ! धार्मिक कार्यक्रम करून लोकांना जोडता येते ही अत्यंत वेडपट संकल्पना आहे. त्यांचे शिक्षण,आरोग्य या विषयी आदिवासींना निश्चिंत असण्याची गरज आहे आणि कार्यक्रम तसे दिले पाहिजेत. हो, हो तुम्ही मला कदाचित असे सांगाल की कल्याण आश्रमाच्या आश्रम शाळा आहेत, औषधे पुरविण्याची व्यवस्था आहे वगैरे - पण गेल्या एकसष्ट वर्षात ( कल्याण आश्रमाची स्थापना १९५२ ची ) काय आणि किती परिणामकारकता साधली आहे याचे आकडे आतल्या गोटातल्या लोकांना विचारा ! परिणामकारकता साधली असती - तर बाहेरच्यांकरीता एकच मोजपट्टी पुरेशी आहे - चोपन्न वर्षांच्या कल्याण आश्रमाच्या कामानंतर धर्मांतर रोखण्यासाठी असिमानंदना डांग मध्ये धार्मिक कार्यक्रम करून आदिवासींना वश करावे लागले आणि इतर धर्म प्रसाराकांसाठी शक्ती प्रदर्शन करावे लागले. एकसष्ट वर्षात - शहाणे करून सोडावे सकळ आदिवासी- हे कल्याण आश्रमाला आणि पर्यायाने संघाला जमले नाही. याचे एकमेव कारण तसा प्रामाणिक उद्देशच नाही. केवळ संघटने साठी संघटना बांधून त्याच्या जाहिराती इतर ठिकाणी वापरून संघटन शाबूत ठेवणे या पलीकडे आजवर तिकडे काही घडत नाही. बरे यासाठी मी आपण घात केला असे म्हणालो नाही. ज्या लिंका आपण दिल्या आहेत त्या मध्ये स्वामी असिमानंदांची ( नबकुमार बिभूतीभूषण सरकार : मूळ गांव कमरपुकार, जिल्हा हुगळी, प. बंगाल ) गोडवी हिंदूंचे तारणहार म्हणून गाईली आहे. पण हे असिमानंद बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्याखाली गेली अनेक वर्षे जेल मध्ये आहेत. हे असिमानंद फ़ेमस यासाठी आहेत की त्यांनी अटक झाल्या झाल्या काही अवधीतच त्यांच्या सगळ्या सहका-याची नावे पटापट सांगून टाकली! ( नकारात्मक कमीटमेंट ही नाही ) या देशात ठीकठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप लोकांचे बळी घेणा-या लोकांचा आपण उदोउदो करणार असाल ( ते कोणत्याही जाती धर्माचे असोत ) तर ते जबाबदार भारतीयाचे लक्षण नव्हे. मी ही ( जन्माने आणि वैयक्तिक आचारणात) हिंदू आहे पण मला अशा देशद्रोही ढोंगीलोकांची लाज वाटते.
>>> पण हे असिमानंद बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्याखाली गेली अनेक वर्षे जेल मध्ये आहेत. हे असिमानंद फ़ेमस यासाठी आहेत की त्यांनी अटक झाल्या झाल्या काही अवधीतच त्यांच्या सगळ्या सहका-याची नावे पटापट सांगून टाकली! ( नकारात्मक कमीटमेंट ही नाही ) या देशात ठीकठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप लोकांचे बळी घेणा-या लोकांचा आपण उदोउदो करणार असाल ( ते कोणत्याही जाती धर्माचे असोत ) तर ते जबाबदार भारतीयाचे लक्षण नव्हे.
स्वामी असीमानंद, साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहीत व इतर ६-७ जणांना तद्दन खोट्या आरोपांखाली अडकवून ठेवले. ते ऑक्टोबर २००८ पासून विनाजामीन अटकेत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास सुरवातीला महाराष्ट्र पोलिस, नंतर महाराष्ट्र एटीएस, नंतर एसआयटी क्र. १, नंतर सीबीआय, त्यानंतर एसआयटी क्र. २ व नंतर एनआयए अशा विविध तपाससंस्थांनी करून व त्यांच्याविरूद्ध पुरावा तयार करण्यासाठी जंगजंग पछाडून सुद्धा कणभरही पुरावा तयार करता आलेला नाही. त्यामुळे त्यांना पकडून ५ वर्षे होऊनसुद्धा आजतगायत न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेले नाही. या सर्वांचा कबुलीसाठी अनन्वित छळ करण्यात आला. प्रज्ञासिंगला अश्लील व्हिडिओ दाखविणे, अन्नात मांस मिसळणे असेही प्रकार केले. तिला कॅन्सर झाल्याचे तपासणीत उघड झाल्यावरसुद्धा उपचारासाठी १ मिनिटही सोडलेले नाही. तिच्या वडीलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा तिला सोडले नव्हते. असीमानंदांचा अनन्वित छळ करून खोटा कबुलीजबाब लिहून घेण्यात आला. कारगिल युद्धात लढलेल्या कर्नल पुरोहीतांना सुद्धा यात विनाकारण अडकविले आहे. भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी २००९ च्या निवडणुकीच्या तोंडावर या सर्वांवर खोटे आरोप लावून त्यांना पकडले व नंतर इतके आटोकाट प्रयत्न करूनसुद्धा आरोपपत्र दाखल करण्याएवढासुद्धा पुरावा मिळालेला नाही. पुरावा मिळणारच नाही कारण मुळातच आरोप खोटे आहेत.
तुम्हाला यातील धादांत खोटेपणा लक्षात आला नाही याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही.
प्रतिक्रिया
.
का पेटताय एवढे जर वैस दमानी
@ बलि....
.
@ उद्दाम
उद्दाम साहेब एखादा नेता
@ बलि...
हुच्च????
.
मिपावर बरेच जण ते लहान असताना
हो
@ आनंदा....
.
आमच्या झुमरीतलैय्या बुद्रुकला
+१
असेल बुवा. आम्ही तर कधी
तुम्हाला आहे ना एक मुलगी,
च्यायला पेटलेत विमे.
अहो ते एका आयडी चे असतील तर
मिपा
भोंदू
वाचले ....भावना पोचल्या ...
@@वरील विचार मंथन हे राजू
.
@ यसवायजी....
@ मुद्दाम गहन विचार करणार्
@ एस वाय जी....
अरे ओ राजु
आहे
संघाचा उपाय हा रोगापेक्षाही
१०० % सहमत....
बघ मुवि, काहीही गुंता न होऊ देता
बेंबट्याचं नाव घेते माझा'च'
पहिल्या पानावर पाहा
अत्यन्त टोकाचि निष्ठा आणि
ज्याला, संघाची स्थापना का झाली?
+१००
तद्दन फालतू लेख
आहे !
घरात हिंदु, घरात मुसलमान, समाजात फक्त भारतीय !!
अहो पण तुम्ही कितीतरी
मुळात संघ ही एकच संघटना फ़्यासिस्ट आहे
ते आजचा हिंदू धर्म का करू शकत
आणखीन काही दुवे http://www
http://webcache
हे जे काही चालले आहे
पुष्कर जोशी, तुम्ही घात केला !!
>>> पण हे असिमानंद बॉम्ब
तुम्हाला यातील धादांत खोटेपणा
आठवल म्हणुन
Pagination