हायला गंमतच आहे.
मागच्या पानावर मी शिनेमाचे उदाहरण दिले तर आयुष्य षिनेमा नव्हे, असे मला संघी डोस दिले.
आता हेच संघाचे काम शिकायला षिनेमा बघायला सांगतात.
:)
गेली ८८ वर्षे वर्धिष्णु होणार्या एका जगन्मान्य संघटनेबद्दल आपण ही विधाने केली आहेत. कृपया आपण आपला वकूब सांगावा.असे अधिकाराने म्हणावे अशी आपण आपली काय क्षमता सिद्ध केली आहे ?
हे ध्यानात घ्यावे की, सुर्याजी पिसाळाने फितुरी केली म्हणून शिवप्रभुनां कमीपणा येत नाही !
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे
हे जरा उलगडून सांगाल का ? संघ कामाची आवश्यकता का आहे, त्याबाबत संघाची भूमिका काय आहे ? या विषयातील तुमचे आकलन काय आहे ? ते तुम्हाला नीट समजले आहे का ? "एके पूछ् देखीली तो म्हणे हत्ती झाडू सारखा" हा वस्तुस्थितीचा नसून त्याच्या वकूबाचा भाग असतो. अशी जाहीर विधाने करण्यापूर्वी एकदा आरश्यात तोंड बघायचे होते !आणि म्हणून मी तुम्ही स्वतः ची नसबंदी करुन घेतली आहे असे म्हणालो.
प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ?
जबरदस्ती नव्हती ना , मग काही दिवस सातत्याने काम करताना, केन्द्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क करताना तुमची बुद्धी काय ** खात होती का ? की एका रात्रीत संघकामाचा उपयोग नाही असा साक्षात्कार झाला ?
माध्यांनीं थुंकितां सूर्यावरी| तो थुंका पडेल आपणांच वरी |दुसऱ्यास चिंतितां अंतरीं| आपणास घडे ||२७|| द्शक ९ समास ३
...सम्पुर्ण सहमत....विटेकर तुमच्याशी.
राजू भारतीय जरा याचा प्रतिवाद करावा..आपण स्वताला 'कोणे एकेकाळचे स्वयम्सेवक' म्हणवता याचीच शन्का येते, पटत नाही. जे कधीच प्रत्यक्ष सन्घात गेले नाहीत केवळ कुठेतरी काहीतरी वाचुन आपली मते व्यक्त करतात आणि 'विचारवन्ताचा' आव आणतात अशापैकी एकाने लिहीलेला लेख वाटतो तुमचा. इतकी वर्षे सन्घात जाउनही सन्घाचे आकलन झाले नाही असे दिसते.
विनोद१८
उद्दाम नावाचा एक भयानक विनोदी डु.आय.डी. जन्माला आला आहे ह्याचा साक्षात्कार झाला. खरा आय.डी. असेल तर इतका बिंडोक माणूस मी दुसरा पाहिला नाही इतकेच म्हणेन.
चर्चा वाचतोय. कडाक्याची चर्चा होऊ द्या. फक्त व्यक्तिगत रोख आणि भाषेतील शब्दांचा तोल सांभाळावा, एवढेच म्हणेन.
बाकी, हम दो हम तीनचा नारा पटणारा नाही. (आता हम दो हमारे बारा कसे चालतात तो वेगळा मुद्दा) बाकी, शांततेने चर्चा चालू द्या. :)
-दिलीप बिरुटे
वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली.
संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
काकाश्री, ससंदर्भ सांगता का जरा? नाव-गाव सांगू नका...कुठल्या प्रांताची काय जबाबदारी होती आणि त्यानंतर राष्ट्रीय जबाबदारी काय होती एवढच सांगता का? तुमचा एकदा संघदृष्ट्या परिचय द्या म्हणजे झालं... नाही, थोडसं आश्चर्य वाटलं, कारण इतका सी.व्ही. टायप परिचय संघात करत नाहीत... तुम्ही बैठकांना वगैरे देत होता तसा साधा-सरळ परिचय द्या...
स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
यात मोठ्ठं काही आश्चर्य नाही.. संघात काहीही जबाबदारी नसणार्या स्वयंसेवकालाही हे करता येतं कारण हे सगळे अधिकारी सतत प्रवासात आणि संपर्कात असतात...
आता कळेल खरा संघीष्ट होता का नाही ते. ;)
संघीष्टांची एक खास पद्धत असते. ती दिसली तरी पुरे.
नाहीतर सदर लेख मी पूर्वीच म्हटल्या प्रमाणे टेलेब्रँडच्या जाहीरातीप्रमाणे वाटला.
सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
थोड्या फार फरकाने प्रत्येक पक्ष संघटना या मधे हेच असत. तो एकप्रकारचा कल्ट असतो. इथे पहा कल्ट विषयी http://www.misalpav.com/node/25873
if you are not with me you are with them अशी विचारश्रेणी लोकांना पटते चालते आवडते.
या लेखाचे लेखक हे कधीही संघाशी संबंधित नव्हते या निष्कर्षावर मी आलो आहे. संघविरोधकांची ही एक चाल असते. मी आधी संघात होतो असे सांगून तिथल्या जातीयवाद वगैरे कारणांमुळे मी बाहेर आलो असे सांगणे ही एक पध्दत आहे. वाचणार्याला वाटावे की प्रत्यक्ष संघात असलेला माणूस तिथे जातीयवाद आहे असे सांगतो व बाहेर पडतो, म्हणजे तिथे नक्कीच जातीयवाद असणार. प्रत्यक्षात हा गोबेल्स नीतिने केलेला अपप्रचार असतो.
असो. आता खालील मुद्दे पाहू.
>>> ३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
यांच्यावर नक्की कोणती राष्ट्रीय जबाबदारी आली होती?
>>> राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल.
समजा राष्ट्रीय आंदोलन नसले तर काय फरक पडतो? या देशात अनेक गोष्टी राष्ट्रीय तर सोडाच पण स्थानिक पातळीवर नसून देखील होतात.
>>> सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा.
असा कोणताही दुभंग संघाने निर्माण केलेला नाही. या देशातील सर्व नागरिकांना समान कायदा असावा, एखाद्या विशिष्ट धर्माचे फाजील लाड होऊ नयेत, सीमेवरील काश्मिरसारख्या राज्याला स्वायत्तता देऊन ते कायमस्वरूपी भारतापासून दुरावण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगणे इ. गोष्टी म्हणजे दुभंग निर्माण करणे नसून ती देशहिताचीच भूमिका आहे.
>>> त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे.
लव्ह जिहाद हा प्रकार अस्तित्वात आहे. जरा वाचन वाढवा. दुभंग हे राष्ट्रीय पाप १९४७ पासून नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने निर्माण केले आणि त्यानंतर "मुस्लिमांचा भारतातील राष्ट्रीय संपत्तीवर सर्वात पहिला हक्क आहे" असे अत्यंत पक्षपाती विधान करणार्या मौनमोहन सिंगांपर्यंत ही घातक परंपरा सुरूच आहे.
>>> सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
असा कोणताही गैरसमज संघस्वयंसेवकांच्या डोक्यात, रक्तात किंवा मनात नाही. हा केवळ तुमचा कल्पनाविलास आहे.
>>> अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही.
हे तुम्ही कोण ठरविणार? तसं पाहिलं तर या देशाला काँग्रेसची सुद्धा इतर कोणाचीच आवश्यकता नाही.
>>> संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.
हे कोणी सांगितले तुम्हाला? या बाबतीत काही पुरावे द्या. १९९५ - १९९९ या काळात पुणे-मुम्बई द्रुतगती मार्ग, मेळघाटात प्रथमच झालेले डांबरी रस्ते, सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प, कृष्णा खोर्यातील पाणी अडविण्याचे प्रकल्प, नदीजोड संकल्पना इ. प्रगतीची कामे संघाशी संबंधित असलेल्यांकडूनच झालेली आहेत हे लक्षात घ्या.
>>>> - कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो.
प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्ये दोष आहेत हे शाळकरी मुलगा सुद्धा सांगू शकेल. त्यासाठी संमोहनाची अजिबात गरज नाही. संघ समांतर व्यवस्था उभी करतो म्हणजे नक्की काय करतो. जरा सोदाहरण स्पष्ट करा.
>>> वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची.
बर. असे प्रयत्न कोण करतात ते सांगाल का?
>>> समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते.
संघाचे कोणते सामाजिक प्रकल्प हे तद्दन सत्ताकेंद्री, मनुष्य केंद्री व आतबट्ट्यातले आहेत याची जरा यादी देता का?
>>> संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत.
अत्यंत हास्यास्पद विचार. आपण काय लिहिले आहे ते २-३ वेळा नीट वाचा व त्यावर मनन करा. त्यातील अर्थहीनता व अतार्किकता तुमच्या लक्षात यावी हीच सदिच्छा.
>>> भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर.
कोणी पाडल्या या रेषा? आणि कोणाच्या स्वार्थासाठी पाडल्या गेल्या?
>>> त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
कशा पुसणार या रेषा? ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत व भळभळत ठेवल्या जाण्याचे तुम्हाला दु:ख वाटते व त्यामागे स्वार्थ, कपट व देशाचे अतोनात नुकसान आहे असे तुम्हाला वाटते.
पण १९४८ च्या गांधीवधाच्या जखमा, १९९२ च्या जखमा, २००२ च्या जखमा इ. वखवखत व भळभळत ठेवल्या जाण्याचे तुम्हाला दु:ख वाटत नाही का व त्यामागे स्वार्थ, कपट व देशाचे अतोनात नुकसान आहे असे तुम्हाला वाटत नाही का? तसे वाटत असेल तर त्या जखमा कायम उघड्या ठेवणार्यांविरूद्ध तुम्ही काय करणार आहात?
हेचं म्हणतो मी. ह्यांना संघ म्हणजे काय काँग्रेस वाटला काय अशी दुफळी माजवुन फायदा मिळवायला. मला वाटत नाही ह्या गृहस्थांना साधी शाखेची प्रार्थना पण येत असेल म्हणुन.
>>> ह्यांना संघ म्हणजे काय काँग्रेस वाटला काय अशी दुफळी माजवुन फायदा मिळवायला.
१०१ टक्के सहमत! समाजात दुफळी माजवून आपली पोळी भाजून घ्यायला संघ म्हणजे काँग्रेस नव्हे.
...हा जाणीवपूर्वक टाकण्यात आलेला धागा आहे, हा जो कोणी 'राजू भारतिय' नामक धागाकर्ता बोगस दिसतोय. तो स्वयम्सेवक असणे श्क्यच नाही, नुसती काडी लावून मजा बघतोय तो. त्याला आता प्रतिवाद न करणे हेच उत्तम.विनोद१८
ओ राजु भारतीय , ते राम मंदीर राहु द्या हो , राम आपला तुमच्या आमच्या सारखा गरीब बिचारा माणुस ...
तुम्हाला हुबाल माहितीये का हो ? त्याचे मंदीर कुठे आहे ? किंव्वा बामियान विषयी तुमचे काय मत आहे ? किंव्वा हगिया सोफिया चर्च विषयी तुमचे काय मत आहे ? किंव्वा "विष्णोर्ध्वजःस्थापितः" असे लिहिलेला शिलालेख कुठे आहे हो ? ब्रिक लेन सिनेगॉग विषयी आपल्याला काय माहीती आहे ?
असो . झोपलेल्यांना जागं करता येतं , झोपंचं सोंग घेतलेल्यांना / किंव्वा डोळ्यावर कातडी ओढुन घेतलेल्यांना कितीही समजावले तेरी काय समजणार ?
||तुका म्हणे उगी रहावे| जे जे होईल ते ते पहावे ||
ब-याच मिपाकरांप्रमाणेच मी पण लहानपणि शाखेत जात होतो. आता जरी प्रत्यक्ष शाखेत जात नसलो तरी संघाबद्दल कटु भावना मनात नाहीत. धागाकर्त्याचि कमालिची टोकाची भुमीका बघुन आश्चर्य वाटले.
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो.
हे तर नविनच काहितरी.. देशात बिनकामाच्या कितीतरी संघटना , व्यक्ती आहेत. त्यामानाने संघ निश्चीतच निरुपद्रवी आहे.
आणखी एक मुद्दा म्हणजे वरील लेखावर आलेल्या ब-याच विचीत्र प्रतिक्रीया..मिपावर फारसे प्रतिक्रीया वगैरे देणे होत नसले तरी नियमीतपणे मिपा वाचत असतो. ब-याचदा थट्टा मस्करी चालु असते पण खालच्या पातळीवर पोहोचत नाही. परंतु सदरील लेखावर अतिशय हिनकस प्रतिक्रीया पाहुन वाईट वाटले. :( विशेषत: पेठकर काका यांच्या सम्यक, शांत प्रतिक्रीयेवर उद्दाम यांची त्यांच्या नावाप्रमाणेच आलेली आलेली प्रतिक्रीया वाचुन वाईट वाटले.
माझा थोडा गोंधळ झाला . सदरील पोष्ट त्या व्यक्तिने copy paste करुन टाकली आहे .सोबत मिपाची लिंक दिली आहे . त्या व्यक्तिचे म्हणणे मांडलेले नाहि त्यामुळे सदरील व्यक्तिच लेखक आहे का याबद्दल गोंधळ होत आहे .
तथास्तु, माझे लिखाण चेपू वर कुणीतरी चिकटवले आहे हे वाचून गंमत वाटली. कृपया इथे त्याची लिंक देता का ?
अन्य : मुद्द्याला बगल देऊन मुद्दा मांडणा-यावर हल्ला करायची संघवाल्यांची खोड मला पूर्ण परिचित आहे. चर्चा मुद्यांवर करावी अशी माझी विनंती आहे. गंमत अशी आहे इथे " मी सलग दहावर्षे संघाचे काम करतो आणि सलग चार वर्षे तरी नियमित शाखेत गेलो आहे असे ठाम पणे सांगून राजू भारतीय जे म्हणतो ते अमुक अमुक कारणांनी चुकीचे आहे" असे कुणी म्हणतच नाही. बहुतेक सगळे - मलातरी - लांबून संघाला सदिच्छा व्यक्त करणारे किंवा शरियत देशभर लागू होईल म्हणून भयगंडाने पछाडलेले युवक दिसत आहेत. तसा भयगंड निर्माण करणे हीच संघाची व्यूहरचना आहे आणि त्याला बळी पडलेले नागरिक मला मिपावर वावरताना दिसत आहेत. त्यामुळे माझ्या मुद्यांवर चर्चा करायची सोडून मी खरा की खोटा याचवर बहुतेक चर्चा चालू आहे.
दुसरे : इथे प्रसिद्धी मला कशी मिळणार ? हा काय बालिशपणा आहे ? मुभा असल्यामुळे मी माझे प्रत्यक्ष नाव गाव दिले नाही. जसे अन्य शेकडो लोकांचे ही इथे नाही. त्यामुळे मी आपल्या काहीजणांच्या शेजारी रहात असलो तरी त्यांना राजू भारतीय कोण हे समजणार नाही, मग प्रसिद्धी कशी मिळते आणि प्रसिद्धी साठी धागा काढला म्हणजे नेमके काय ? आणि ही प्रसिद्धी मिळाल्यावर नेमका फायदा काय होतो ? कुणाला ? त्यामुळे या मुद्याचा खुलासा असा की हा धागा काढण्याचा प्रसिद्धी हा हेतू नसून माझ्या मनात कित्येक वर्षे काही सांगायचे राहून गेले होते ते सांगणे हा आहे. या सांगण्यातून कुणाला काही फायदा झाला तर उत्तम. माझे म्हणणे अमान्य असेल तर तसे अधिकारवाणीने खुशाल सांगावे. कुणाला वैयक्तिक दुखावण्याचा हेतू तर अजिबात नाही, हे एका इझम वर चे भाष्य आहे. तरीही जर कुणी दुखावले गेले असेल तर शतश: माफी मागतो.
संघ स्थापना ज्या काळात म्हणजे १९२५ सालची परिस्थिती आणि १९४७ नंतरची परिस्थिती या मध्ये जमीन अस्मान चा फरक आहे . हिंदू समाज अक्षरश: अनाथ आहे अशी तत्कालीन परिस्थिती होती . सावरकरांची स्थान बद्धता, टिळकांचे ऑगस्ट १९२० मध्ये जाणे आणि महात्मा गांधीचे आगमन या तीनही घटनांचा तत्कालीन हिंदू नेत्यांवर एका अर्थाने आघातच होता - विशेषता: डॉ मुंजे यांच्यावर ! डॉ मुंजे यांच्या घरी डॉ केशव बळीराम हेडगेवार शिक्षणासाठी नागपुरात राहिले होते . संसदेतला डॉ मुंजे हा हिंदूंचा बुलंद आवाज होता . हिंदूंचा कैवार घेणारे म्हणजे हिंदू समाजामध्ये लढायची वृत्ती निर्माण करणारे प्रयत्न हवे होते म्हणून शाखा हा प्रकार सुरु झाला , म्हणजे सुरुवात मैदानात करू चार भिंतीत नाही ही भावना होती. त्या वृत्तीबरोबरच हिंदू समाज संघटीत झाला तर एकत्रित हिंदुसामाजाचाही राजकीय निर्णय घेताना विचार करावाच लागेल अशी ही भावना होती . संसदेतली डॉ मुंजे यांची भाषणे, त्यांचे पत्रव्यवहार अभ्यासले तर संघ स्थापने मागचा हेतू आणि संघ जन्माला घालण्यामागाची परिस्थिती याचा पूर्ण अंदाज येइल. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदूंचा कैवार घेण्याची गरज इंग्रजांनी मुस्लिमांचे अतोनात लाड करण्यातुन निर्माण झाली . लाडाचे अनेक दाखले देता येतील त्यातला एक महत्वाचा पुरावा म्हणजे मुसलमानांचे राखीव मतदार संघ . वगैरे . पण स्वातंत्र्या नंतर तशी परिस्थिती नक्की नाही . मुसलमानांचे लाड काही प्रमाणात काँग्रेस करते हे मान्य आहे पण त्यांना ते फार करता येतेच असे नाही कारण त्याचे त्यांना मतपेटीतून प्रचंड फटके बसले आहेत . आणि आजकाल मुसलमान त्यांना जुमानतच नाहीत . उत्तरप्रदेश , दिल्लीतली मुस्लिम बहुल प्रभाग पहा ना ! त्यामुळे हिंदूंचे संघटन करण्याचा मुळ १९२५ सालचा हेतू आता उरला नाही .
संघाची स्थापना का झाली हे तुम्हाला खरेच माहीत नाही !
दुसरी गोष्ट : इतके बाईट्स वाया घालवून संघ देशाच्या प्रगतीमधील अडसर कसा आहे हे तुम्ही सांगितलेच नाहीत!
तुमचा नेमका प्रोब्लेम काय आहे ? उगाच गरळ ओकायची आणि टी आर पी वाढवायचा काय ? तुमचा नेमका विरोध कशाला आहे ? हिंदूंचे संघटन करायला आहे की संघाने राजकारण करायला आहे की राम मंदिराला आहे की परावर्तानाच्या कामाला आहे ? की " संघ " या शब्दाचीच तुम्हाला अॅलर्जी आहे?
तुमच्या शंका आणि तुमच्या भावना जर खरोखरच प्रामाणिक असत्या तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचवल्या असत्या ( तसा तुम्हाला अॅक्सेस होता असे तुम्हीच म्हटले आहे) आणि गेले ४० वर्षापासून संघात जात असल्याने हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की तुमचे शंका निरसन नक्की झाले असते. संघात प्रमाणापेक्शा जास्त लोकशाही आहे , सहीष्णुता आहे ( आणि हा संघकामाच्या गतीचा अडथळा ही आहे ) मुस्कट्दाबी तर अजिबात नाही , हे मी खात्रीने सांगु शकतो ! 'एकचालकानुवर्तित्व' हा व्यवहारातील सोयीचा भाग आहे, त्याची मूळे " राजा- प्रजेचा विश्वस्त " या भारतीय संकल्पनेत आहेत. संघातील सारे निर्णय हे " बैठकीत ठरल्याप्रमाणे च होतात, त्यात व्यक्तिपूजा अजिबात नसते .
तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत ( मा. मधुकरराव देवल , मा. आप्पा पेंडसे..) ही थोर माणसे संघानीच घडवली , व्यक्ती तितक्या प्र्कृती या न्यायाने त्यानी रचनेच्या बाहेर काम करायचे ठरविले आणि तसे दिव्य काम करुनही दाखवले. त्यानी कधीही संघाची बदनामी केली नाही , मतभेद असले तरीही!
तेव्हा , अजूनही वेळ गेली नाही , चर्चेने वाद संपतात, योग्य त्या स्थानिक कार्यकर्त्यांना भेटा, तुमच्या शंका विचारा, पूर्वग्रह ( आणि अहं) बाजूला ठेवून चर्चा करा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे नक्की मिळतील.
तसा प्रय्त्न पूर्वी केला असेल तर पुन्हा एकदा प्रयत्न करा. या धाग्याप्रमाणे जाहीर बोलू जाल तर नाचक्की तर होईलच पण त्यापेक्षा लोक बघतील बघतील आणि दुर्लक्ष करतील आणि तुम्ही अधिक फ्रस्टेट व्हाल !
तो निखिल वागळे सकाळ - संध्याकाळ बोंब मारतो , काय संघाला फरक पडला ? संघात करायचे बदल संघात राहूनच करता येतील. ज्याच्या खांदावर पालखी आहे तोच पालखीचा दिशा आणि गती ठरवतो... तुटे वाद संवाद तो हीतकारी !
आणि हे ही नाही पटले तर .. संघाचे काम करत नाही तर मग तुम्ही नेमके कोणते अन्य विधायक ,समाजहितैषी, देश हिताचे काम करता ते आम्हांला सांगा.ते संघापेक्षा कसे चांगले आहे ते सांगा.. आणि ते जर संघापेक्षा जास्त चांगले आहे तर ते संघापेक्षा अधिक वेगाने पुढे का जात नाही ? की " संघद्वेष" हेच तुमचे आता जीवीत कार्य आहे ?
राजु , माणसांचे काम आहे, मतभेद होतात, घरातही भांड्याला भांडे लागते पण म्हनून कोणी आपलेच नाक कापून दुसर्याला अपशकुन करण्याचा विचार करत नाही अथवा घरात ढेकूण झाले म्ह्णुन कोणी घर जाळायला निघत नाही. असे केल्यास त्याला "नमक-हरामी" किंव खाल्ल्या थाळीत छेद केला असे म्हणतात...
बाकी निर्णय तुमचा आहे .. सरतेशेवटी .. माझे एक आवडते वाक्य लिहितो आणि थांबतो..
Principles (संघ विचार)are like Lighthouse ! if you don't follow the Lighthouse , it is you , who will be at loss ! Lighthouse is there as it is guiding many forever !
- Stephen Covey
संघाची स्थापना का झाली हे तुम्हाला खरेच माहीत नाही !
ओके मग तुम्ही सांगा ! संघाची स्थापना का झाली ?
दुसरी गोष्ट : इतके बाईट्स वाया घालवून संघ देशाच्या प्रगतीमधील अडसर कसा आहे हे तुम्ही सांगितलेच नाहीत!
माझ्या लिखाणात व्यवस्थित ते आले आहे. १) हिंदू आणि मुसलमान हा दुभंग निर्माण करून स्वातंत्रोत्तर काळात ही जिवंत ठेवला आहे. १९४८ साली भारत सरकारला प.पु.श्री. गुरुजींनी दिलेले प्रतिज्ञा पत्र पहा. मोतीबागेत आज खास हे पत्र मिळविण्यासाठी चक्कर मारा. फक्त सांस्कृतिक आणि सामाजिक काम करू असे प्रतिज्ञापत्र दिल्यावरच बंदी उठली आहे. त्यावेळी "मंदिर वही बनाएंगे" हा अजेंडा ही नव्हता आणि तसे म्हणण्याचे धाडस ही नव्हते. माझे वैर ना रामाशी आहे ना रामदासांशी आहे. माझे भांडण रामाचे राजकारण करणा-या बरोबर आहे. रामाचे काय आणि कसे राजकारण संघाने केले असा भाबडा प्रश्न नका मला विचारू, प्लीज २) आणखी एक दुभंग आहे. संघाने एक "अव्यक्त समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात प्रयत्न केला आहे. संघाबाहेर संघा इतके किंवा संघापेक्षा चांगले काही होऊच शकत नाही असा सहज स्वयंसेवकांचा समज असतो. संघाबाहेरच्या माणसांची ओळख "तो कॉंग्रेस चा, हा कम्युनिस्ट अशीच सहजपणे बोलण्यातून केली जाते." आपले काम हिंदू समाजाचे संघटन करण्याचे आहे त्यात सगळे असतील, कॉंग्रेसवाले, समाजवादी, कम्युनिस्ट …. ! पण ते प्रत्यक्ष शाखेत जाणारे वा परिवारातल्या कुठल्या संघातानेतले नसतील आणि अन्य कुठे कार्यरत असतील तर ते आपले नसतात ( जसे तुमच्या पुण्यात : श्री गजानन एकबोटे ). तुमच्याच लिहिण्यात खाली ते सहजपणे उतरले आहे ना ! संघापेक्षा चांगले काम करता का ? आणि ते संघापेक्षा ज्यास्त वेगाने का जात नाही ? …. हा स्वयंसेवकांचा उद्धट पणा नव्हे का ? याच धर्तीवरच मोठा दुभंग म्हणजे जे जे अन्य सरकारे करतील ते सगळे फालतू आणि त्याच विषयावर बौद्धिके चालतात. उदाहरणार्थ : अ) संघाचा १९८९ साला नंतर सुरु झालेल्या संगणीकरणाला विरोध ! आपण जुने स्वयंसेवक आहात जरा आठवून बघा, केवढा प्रचंड विरोध संघाने केला होता. भारतीय समाजाच्या दुर्दैवाने संघजर पॉवरफुल असता तर.....
( उर्वरित प्रतिसाद काही नामोल्लेख असलेने व्यनी केला आहे )
>>> " मी सलग दहावर्षे संघाचे काम करतो आणि सलग चार वर्षे तरी नियमित शाखेत गेलो आहे असे ठाम पणे सांगून राजू भारतीय जे म्हणतो ते अमुक अमुक कारणांनी चुकीचे आहे" असे कुणी म्हणतच नाही.
तुमच्या मूळ लेखातील व नंतरच्या प्रतिसादातील अनेक चुका अनेकांनी सकारण दाखवून दिलेल्या आहेत. तुम्ही दिलेले ऐतिहासिक संदर्भ चुकीचे असून संघाविषयी तुम्ही व्यक्त केलेले विचार अनेकांनी सप्रमाण खोडून टाकलेले आहेत. तरीसुद्धा "पडलो तरी पाठ वर" या उक्तीप्रमाणे तुमचे वरील वाक्य आहे.
तसे नव्हे, गुर्जी, मि काय म्हणतो "सलग दहावर्षे संघाचे काम करतो आणि सलग चार वर्षे तरी नियमित शाखेत गेलो" असा खरच कुणी इथे आहे का ? कारण तुम्ही चुका दाखविल्या वगैरे म्हनालात ना, ते खुपच बाळ्बोध आहे हो. त्या उत्तरांकडे - तुमच्या सकट - फारसे पहावेसे वाटत नाही. मी उत्तरे अनेकांना दिली आहेत, अगदी मुद्देसुद. काही जणांना अगदी व्यनी करुन उत्तरे दिली आहेत. माई भागुंगा नाही, काळजी नक्को.
"सलग दहावर्षे संघाचे काम करतो आणि सलग चार वर्षे तरी नियमित शाखेत गेलो" असा खरच कुणी इथे आहे का ?"
३-३.५ वर्षांपुर्वी सलग १४ वर्ष शाखेत नियमित जात होतो साधा स्वयंसेवक म्हणुन. अजुनही जायची इच्छा आहे, पण प्रभात आणि सायम दोन्ही वेळा सध्या मोकळ्या नाहीत म्हणुन बंद आहे. दसरा परेड/ रखिपोर्णिमेला छोट्या प्रमाणात अजुनही निघते. शाखा हिंदु मुस्लिमांमधे मतभेद करते असं तुमचं मत आहे. मी शाखेत जात होतो तिथे २ मुस्लिम बंधु लहानपणी शाखेत यायचे (आधी नुसतं खेळायला मिळतं म्हणुन यायचे). त्यांचे आई वडील उच्चशिक्षित होते त्यांनीही कधी विरोध केला नाही. दोघही सगळ्यांच्या बरोबर संघाची प्रार्थना म्हणायचे. पांडुरंगाची वारी येते दर वर्षी तिथे जेवण वाढायला मदतही करायचे. दुर्दैवानी त्यांच्यातला एकजण अपघातामधे गेला. दुसरा आता इथे राहात नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, मी जितका भारतीय आहे तितकेच ते दोघही होते. संघ हिंदुत्ववादाकडे झुकणारा असला तरी दुसर्या धर्मांना आदराची वागणुक देणारा आहे. तुमचा धर्म मिटऊन आमचा धर्म वाढवु असं कुठ्ल्याही शाखेत शिकवत नाहीत.
संघात वरिष्ठ पातळीवर जाऊनही आपल्याला साध्या संघ प्रार्थनेचा अर्थ समजलेला नाही. कृपया एकदा प्रार्थना म्हणा आणि मनन करा. नाही समजला तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारा.
दसरा परेड ? परेड हा शब्द सहामहिने शाखेत गेलेला स्वयंसेवक ही उच्चारत नाही ! दसरा परेड राखी पौर्णिमेला ? खुक्क !! राखी पौर्णिमा अशी सुद्धा परिभाषा कोणत्याच प्रांतात संघात कुठेच प्रच्लीत नाही....! आपण खरेच शाखेत जायचा ? पुढे, आपण सामान्य स्वयंसेवक असल्याने आपल्याशी संघाच्या व्युहरचने विषयी बोलण्यात काही अर्थ नाही. त्या पुढचे, सलग चौदा वर्षे शाखेत जाणा-या तो अगदिच सामान्य असल्याशिवाय सामान्य ठेवतच नाहीत कारण अहो कार्यकर्त्यांचि वानवाच तितकी आहे. आता हिन्दु मुस्लिम - मुसलमानांविषयी संघाला काही अड्चण नसेल तर " गर्व से कहो हम हिंदु है" कशासाठी ? बाबरी पाडुन - मुस्लिम समाजाच्या विरोधात जाउन मंदिर कशाला ? का तुमच्या सारख्या भाबड्या मनाला असे वाटते की बाबरी पाडून संघाने मंदिर उभे करायला मुसलमानांचि हरकत नव्हती ? आणि शेवटि प्रार्थने विषयी मुसलमानांविषयी संघाचा काही ग्रह नसेल तर प्रार्थनेत "...त्वया 'हिंदूभुमे' सुखं वर्धितो ..." कशाला ?
दसरा परेड ? परेड हा शब्द सहामहिने शाखेत गेलेला स्वयंसेवक ही उच्चारत नाही ! दसरा परेड राखी पौर्णिमेला ?
ऑब्लिक (/) चा अर्थ आणि वापर का करतात ते शिका हो कोणाकडुन तरी आधी. दसर्याला घरोघरी जाऊन सोनं वाटतात आमच्यासारखे सामान्य स्वयंसेवक. राखीपोर्णिमेला भगव्या राख्या सुद्धा बांधतात घरोघरी जाऊन. आता तुम्हाला शाखा किंवा संघ माहितीच नसल्याने आणि छापील माहिती वरुन तुम्ही टिका करत असल्याने तुम्हाला हे वाटणं साहाजिकच आहे म्हणा.
आपण सामान्य स्वयंसेवक असल्याने आपल्याशी संघाच्या व्युहरचने विषयी बोलण्यात काही अर्थ नाही. त्या पुढचे, सलग चौदा वर्षे शाखेत जाणा-या तो अगदिच सामान्य असल्याशिवाय सामान्य ठेवतच नाहीत
ज्या संघटनेनी आपल्याला मान सन्मान दिला, राष्ट्र्पातळीवरची जबाबदारी दिली (तुम्ही ती बे-जबाबदारपणे पार पाडलीतच). त्या संघटनेमधे एक सामान्य कार्यकर्ता म्हणुन काम करायला माझी कधीचं ना नव्ह्ती किंवा नाहीये. सामान्य तर सामान्य हो, पण अजुन तुमच्यासारखं संघाला **ण दाखवुन बाहेर नाही पडलो. (आता तुम्ही दाखवलं का तुमच्या लाथ बसली हा स्वतंत्र वादाचा मुद्दा होऊ शकतो). सामान्य म्हणा अतिसामान्य म्हणा संघाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ आहे आणि मरेपर्यंत राहीनही.
गर्व से कहो हम हिंदु है
ह्याच्यामधे दुसर्या धर्माला शिव्या दिलेल्या, निंदा-नालस्ती केलेली कुठे आढळली नाही बॉ.
बाबरी पाडुन - मुस्लिम समाजाच्या विरोधात जाउन मंदिर कशाला ? का तुमच्या सारख्या भाबड्या मनाला असे वाटते की बाबरी पाडून संघाने मंदिर उभे करायला मुसलमानांचि हरकत नव्हती ?
तुमचं घर पाडुन तुमच्या शेजारच्यांनी अतिक्रमण केलं तर तुम्ही कायदेशिर कारवाई कराल का त्याची परवानगी घेउन रितसर आपल्या खर्चानी त्याच्या घराची वास्तुशांत करुन द्याल?
आणि शेवटि प्रार्थने विषयी मुसलमानांविषयी संघाचा काही ग्रह नसेल तर प्रार्थनेत "...त्वया 'हिंदूभुमे' सुखं वर्धितो ..." कशाला ?
सिलेक्टीव मिनिंग काढु नका. पुर्ण प्रार्थना वाचा, वाटल्यास आमच्यासारख्या "अतिसामान्य" लोकांकडुन अर्थ समजुन घ्या.
"परेड" विषयातले आपले विचार प्रदर्शित नाई केले ? संघात कुठली आणि कसली " परेड" असते ?
राखी पौर्णिमा असा शब्द संघ परिभाषेत नाही, पण तो तुम्ही वापरला म्हणजे संघ तुम्हाला समजला नाही, हे मान्य न ?
पूर्ण प्रार्थना पण अर्थासकट म्हणून दाखवतो पण जर शाखेत मुसलमान यायचे अणि त्यांना काही प्रोब्लेम नाही तर प्रार्थनेत " त्वया हिन्दुभूमे …" असे का म्हणतात ? या प्रश्नाला अशी बगल द्यायची नाही. उत्तर द्या. लहान मुलांना खेळायला जायचे असते, त्यांना तुमचे म्हणजे संघवाल्यांचे छक्केपंजे नाही समजत, अहो !
मुद्दा आक्रमण करणा-यांचा नव्हता. मुसलमानांविषयी आकस संघाला नाही तर मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ? बाबरी पाडल्या नंतरचे दंगे सर्वदूर दोन हिंदू गटात झाले का ? ते दंगे हिंदू मुस्लिम दंगे नव्हते का ? संघाचे ( भाजपचे नव्हे ) किती पदाधिकारी, किती प्रचारक मुसलमान आहेत ? मुसलमानांना जर संघ आपले म्हणतो तर मुसलमानांचा एखादा तरी सण संघ साजरा करतो का ? कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते हि तुमच्या म्हणजे संघाबरोबर असतील तर त्यांना असे वाटत असेल ना की आपला एखादा सण संघाने साजरा करावा.
संघ हे हिंदूंचे कडवे संघटन आहे हे मान्य करा. त्यात मुस्लिम विरोध अद्यहृत आहे. ताकाला जाऊन भांडे लपवायचा प्रयत्न करू नका. फार मुसलमानांचा पुळका येउन जर आपण संघविश्वात वावरलात तर बहिष्कृत व्हाल. आणि संघातल्या बहिष्कृत स्वयंसेवकांचे हाल कसे होतात हे पहा. आपणांस ते दिसत नसतील तर आपल्या गावाचे नांव आणि आपले contact details द्या, मी तुम्हाला असे पीडित स्वयंसेवक दाखवतो, तुमच्या गावातले !!
त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे ही त्यांनी मारलेली लोणकढी थाप आहे. वास्तवात मी शाखेत जायचो तेव्हा शिवाजीने अफजलचा कोथळा बाहेर काढल्याचे सत्तरवेळा सांगायचे... 'त्यांची' संख्या वाढतीय यावर चर्चा झडायच्या..
एका विशिष्ट ज्ञातीचे लोक शाखा चालवायचे किंवा त्याच ज्ञातीचे लोक प्रमुख पाहुणे असायचे,गर्दी करायला आजूबाजुची पोरंटोरं बोलावयचे, ती पण प्रार्थना झाल्यावर टंगळमंगळच करायची.
एकंदर संघ म्हणजे ठराविक लोकांना' सायकोलॉजिकल एडव्हांटेज 'मिळावा यासाठी जगवलेली संघटना आहे.
प्रतिक्रिया
.
वैचारीक नसबंदी
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहेहे जरा उलगडून सांगाल का ? संघ कामाची आवश्यकता का आहे, त्याबाबत संघाची भूमिका काय आहे ? या विषयातील तुमचे आकलन काय आहे ? ते तुम्हाला नीट समजले आहे का ? "एके पूछ् देखीली तो म्हणे हत्ती झाडू सारखा" हा वस्तुस्थितीचा नसून त्याच्या वकूबाचा भाग असतो. अशी जाहीर विधाने करण्यापूर्वी एकदा आरश्यात तोंड बघायचे होते !आणि म्हणून मी तुम्ही स्वतः ची नसबंदी करुन घेतली आहे असे म्हणालो.प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ?जबरदस्ती नव्हती ना , मग काही दिवस सातत्याने काम करताना, केन्द्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क करताना तुमची बुद्धी काय ** खात होती का ? की एका रात्रीत संघकामाचा उपयोग नाही असा साक्षात्कार झाला ?कुर्हाडीचा दांडा गोतास काळ
..... रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी ..!!!!!
संघाचे आकलन एकदा निवासी शिबीर
उद्दाम
+९९९९९९९९९९९९९
@ आदिजोशी....
चर्चा वाचतोय. कडाक्याची चर्चा
गहन विचार करणारे....
हम दो हमारे बारा नाही
वयाच्या नवव्या वर्षापासून
हे सगळे अधिकारी सतत प्रवासात आणि संपर्कात असतात...
बुस्ल आय.
आपल्या घरी सरसंघचालक येऊन
राजू भारतीय
नसबंदीला समर्थन देणार्या
?
सर्व प्रतिसाद मोजले
या लेखाचे लेखक हे कधीही
हेचं म्हणतो मी. ह्यांना संघ
+१
जोक ऑफ द डे
+१
....सर्व मिपाकरान्ना
ज्ञान पाजळणे
वाचतोय
ब-याच मिपाकरांप्रमाणेच मी पण
नसबंदी ऐवजी खच्चीकरण असा शब्द वापरायचा असावा, असे वाटले..
ओके,बर, अच्छा, ठिक, .....!
असेच अनुभव येउद्यात...
**
लिंक द्या
व्यनि प्लीज
लिन्क
लिन्क
माफ करा
एका इझम वर भाष्य आहे !!
तुम्हाला अद्याप संघाची स्थापना का झाली? हेच माहीत नाही आहे....
संघ स्थापना.....
अभ्यास वाढवा ..
श्री विटेकर ....
>>> " मी सलग दहावर्षे संघाचे
तसे नव्हे, गुर्जी,.....
"सलग दहावर्षे संघाचे काम करतो
+१११
काइच्या काइ !
दसरा परेड ? परेड हा शब्द
सामान्य बॉ !!
त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे
Pagination