Welcome to misalpav.com
लेखक: तिमा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

जसवंतीच्या वडिलांचा उल्लेख 'मुलगा' असा झाल्याने माझा गोंधळ झाला थोडा. लेखन 'हृद्य' आहे असंही म्हणवत नाही इतकं परिणामकारक आहे.

तो जीव बिचारा नांवालाच प्रौढ होता.त्याच्या आंत एक मुलगाच होता.म्हणून मुलगा असा उल्लेख केला आहे.

च्यायला. जरा जास्तच परिणामकारक होतं हे. :( असा एक जीव मीही जवळून पाहिला आहे त्यामुळे थोडेफार रिलेट करू शकतो. एका प्रथितयश डॉक्टरांचा मुलगा. बाकीची पोरे त्याची चेष्टा करीत, मी कधी करत नसल्याने माझ्याबरोबर बरंच बोलायचा. अर्धवट होता पण पूर्णपणे नाही. घरचे प्रॉब्लेम्स बरेच होते, ते त्याला कळायचे तेही सांगत असे. पण जनरल बोलण्यात जास्त संगती नसे. "कसलं गरम व्हायलंय!" "मी परवा त्या इंदरला कसला मारलो *&&^%!!" "सचिन काय झाप्पझाप्प शॉट मारला" "तुझी सायकल पूस रे, किती धूळ लागलीय" हे आणि इतर २-३ विषयच कायम बोलण्यात रिपीट व्हायचे. पण एक मॅच्युरिटी होती पोरात. त्याचा सख्खा भाऊ शिकला, मेडिकल परंपरा पुढे चालू ठेवली. पण याचे काय त्रांगडे होते कुणास ठाऊक. डीनायल मोड मध्ये गेला असावा बिचारा. पुढे ते कुटुंब दुसरीकडे रहायला गेल्यावर संपर्क तुटला. या लेखाच्या निमित्ताने त्याची आठवण झाली....

तिमा - सुंदर लेखन... शीर्षक जरा वेगळं चालं असतं का? जसवंती थोडी मोठी होईल तेव्हा तिचं आणि तिच्या बापाच्या भावविश्व कसं असेल याची कल्पना करून थोडं गलबललं...

मुलगा "नॉर्मल" नसल्याचं वाईट वाटलंच पण त्याच्याशी लग्न लाऊन दिलेल्या मुलीचही वाईट वाटलं. अर्थात त्यापलीकडे काय करू शकतो?

पूर्वी अशा ट्रॅजेडीज आसपास बर्‍याच दिसत. (अलिकडेही दिसतात पण पहायला वेळ कुणाला असतो ...?)