३ क्वार्टर 'ओम' मारल्यावर हिरोला बाइक चालवता येते, थंडी वाजते, आणि रात्रीच्या वेळी समोरुन येणार्या कारमधली 'लाईन' ओळखून तिच्या कारला ठोकता पण येते !? :-D 'सुपरहीरो'च आहे की हा.. नुसता निशःब्दच नाही, गतप्राण झालोय मी.. ;-) च्यायला, तीन क्वर्टर मारल्यावरही माझी कल्पनाशक्ती एवढी तरल होणे शक्य नाही..:-D.
आयुष्यात कधी भेट झालीच तर तुला ' ओल्ड मंक' किंवा म्हणशील तर सिक्कीममध्ये मिळते ती 'मंक' शेपच्या वाटलीतली रम भेट माझ्याकडून.. एवढा बेक्कार हसायचा चान्स दिलास तू, भाऊ.. =)) =))
कात्रे साहेब या कथेचा शेवट अशी करता येऊ शकतो का बघा .
दामिनीच्या नवर्याने चौकशी केल्यावर त्याला निलेश च्या दामिनिवरील प्रेमाबद्दल कळाले …….
मग त्याला निलेश च्या दामिनिवरील खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार होऊन तो संगम मधल्या राजेंद्रकुमार सारखा स्वतः च्या डोळ्यावर जळती मेणबत्ती मारून आंधळा होतो आणि निलेश आणि दामिनीच्या लग्नाला होकार देतो.
……………… मग त्याला निलेश च्या दामिनिवरील खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार झाला आणि दामिनिनेच त्याचे प्रेम नाकारले म्हणूनच निलेश या अवस्थेला पोचला या निष्कर्षावर पोचला . दामिनीला धडा शिकवण्यासाठी मग निलेश आणि दामीनीचा नवराच लग्न करण्याचा निर्णय घेतात.
मंदार,
तुमच्या लेखनात सफाई आहे. पण फक्त एका प्रसंगाला वा घटनेला कथेचा आत्मा करण्यापेक्षा कथेतल्या पात्रांची व्यक्तिमत्व , त्यांच्यातले परस्पर संबध (केमिस्ट्री) ठळकपणे समोर येउ दया. मग कथेत जान येईल कथा मोठी होईल पण हरकत नाही , भरपूर वेळ घेवून लिहा.
बाकी दारु ओल्ड मंक होती की RC की signature हे तितकेसे महत्वाचे नाही. तसेच क्वार्टर किती झालेत हे ही महत्वाचे नाहीत.
दामिनीशी झालेला प्रेमभंग रमेश शी बार मध्ये होत असलेल्या गप्पांतून वाचकांसमोर समोर आला असता तर अजून काही संवादातून त्याची उद्विग्नताही वाचकांना कळाली असती. कदाचित त्याच्या दु:खाने वाचकांचे अंतःकरण हेलावले असते. आणि विनोदी अंगाने येणा-या प्रतिक्रिया कमी आल्या असत्या.
फक्त कथानक सांगू नका, कथा फुलवा... All the best.
माझी कथा तुम्हाला आवडली नाही हे तर माहीत होते पण ती वाचून तुम्हांस मोठा धक्क बसलाय आणि तुमचे मानसिक संतुलन बिघडलेय हे आता समजले. आता तुमच्या या अवस्थेला अप्रत्यक्षपणे मीच जबाबदार आहे असल्याने तुमच्या वरील तिरसट प्रतिक्रियेबद्दल मी काही नाराजी व्यक्त करु शकत नाही.
असो. तुम्हाला लवकर बरे वाटावे ही सदिच्छा.
Get well soon मामू...
>>>तुमचे मानसिक संतुलन बिघडलेय हे आता समजले.
बळंच?
तुमच्या कथेसारखं एक वाक्य विजुभाऊंनी कोट केलं म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं?
मग अशा अनेकानेक वाक्यांनी/परिच्छेदांनी भरलेली कथा लिहीणाराची मन:स्थिती कशी असेल बरं?
बाकी आपली कथा नेमकी कुठून 'प्रेरित' झालेली असावी याचा अंदाज करतोय. :)
माझ्या कथेवरील कोणतीही प्रतिक्रिया त्या धाग्यावर दिली तर समजू शकतो.
मी या धाग्यावर टाकलेली प्रतिक्रिया वाचताना माझे इतर लेखन आठवून त्यांचा ओढून ताणुन संदर्भ देणे चुकीचे आहे.
एखाद्या पोस्टवर (मूळ लेखन वा प्रतिक्रिया) प्रतिक्रिया देतान फक्त त्या पोस्ट मध्ये "काय लिहिले आहे" त्यावरच प्रतिक्रिया व्यक्त करावी. ती पोस्ट "कुणी टाललीये", "टाकणा-याचे आधीचे लेखन" ई संदर्भ गरजेचे नाहीतच.
कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट सहन करता येत नसेल तर अवघड आहे. विशेषतः इथे या कथेवरचे प्रतिसाद पाहिले तर कारण लक्षात येईल.
मला कमेंट सहन करता येत नाही वगैरे अनुमान काढू नये. माझ्या कथेवर कमेंट करण्यासाठी तिचा धागा आहे ना , तिथे कितीही तीव्र कमेंट आली तरी ते मी समजू शकतो. पण इतर ठीकाणी मी काही लिहिले असेल तर त्यावर कमेंट करताना माझ्या त्या कथेचा संदर्भ ओढुन ताणुन जोडणे न समजण्यासारखे आहे.
वो मराठी कथालेखक राव तुम्च्जी कथा एवढी बी भारी नवती कि इजुभौंचे संतुलन बिन्तुलन बिघडल.
"मोकालाया दाही दिशा " ह्येच्या एवढी तुमच्या कथेमदी कीचक नाय बगा !
कोणत्याही लेखनावर (खास करुन ते ललित लेखन असेल तर) त्यावर प्रतिक्रिया देताना कोणताही इतिहास, भूगोल माहित असणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही. तसेच सदस्य मिपावर नवीन आहे की जुना याने काही फरक पडत नाही. मिपा हे केवळ एक व्यासपीठ आहे. ती पोस्ट कुठेही असू शकते.
मंदार यांची ही कथा वाचून मला जे वाटले ते मी व्यक्त केले, त्याकरिता मला त्यांच्या जुन्या लेखनाचा अभ्यास करायची गरज नाही. झालंच तर त्यांना माझी प्रतिक्रिया अनुचित वाटली असे जाणवत नाही. तरी मला हा निरर्थक वाद वाढविण्यात रस नाही. मी मंदार यांना जे सुचविले त्या मुद्यांवर अधिक काही चर्चा करायला आवडेल.
एखादी कथा तितकीशी दर्जेदार नाही वाटली आपल्याला,म्हणून त्या लेखकालाच दर्जाहीन (?) ठरवण्याचा इतका अट्टाहास ? मिपा सदस्यान्कडून हे अपेक्षित नव्हते .
माझ्या इतर कथान्चा सन्ग्रह इसाहित्य प्रतिश्ठान तर्फे २ महिन्यापुर्वी प्रकाशित झाला ,त्याला भरघोस आनि चान्गला प्रतिसाद मिळाला ,हे इथे नमूद करू इच्छितो .
http://www.esahity.com/2013/09/blog-post_28.html
मी इत्के दिवस मजा म्हणून घेत होतो, पण टवाळक्या आणि कुचाळक्याच करायच्या असतील ,तर नेट वर येताच कशाला राव?
पति-पत्नी रथाची दोन चाके. दोन्ही असली, तरच संसाराचा रथ चालणार, तद्वत या दोन्ही 'निशब्द' कथा आहेत. एक-दुसर्याशिवाय अधुर्या. दोन्ही वाचल्यावरच खरा वाचनानंद लाभणार.
http://www.misalpav.com/node/25166
एखादी किरकोळ कथा वाचून मानसीक संतुलन बिघडण्याइतके कोणी इथे असेल असे वाटत नाही.
बाकी माझी प्रतिक्रीया या कथेत काय भर टाकता येईल याच्यासंदर्भात होती. नवर्याला/ बायकोला पट्ट्याने बडवणार्या कथा केवळ एखाद्याचीच मक्तेदारी असेल असे मी तरी मानत नाही.
एखाद्याला काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लिहीणाराने लिहीत जावे. टीका झाली तर ती हसतखेळत घ्यावी.
जर टीका बोचरी वाटत असेल तर अभीव्यक्तीचा आग्रह ठेवू नये ही अम्मळ सूचना.
असो. रच्याकने माझे मानसीक संतुलन हरवलेय हा शोध लावल्याबद्दल "वाढदिवसाच्या शुभेच्छा"..
टीका झाली तर ती हसतखेळत घ्यावी.
जर टीका बोचरी वाटत असेल तर अभीव्यक्तीचा आग्रह ठेवू नये ही अम्मळ सूचना.
काय टीका करायची ना ती माझ्या कथेच्या धाग्यावर येवून करावी... कुठेपण उगाचच कुरापत काढण्यात काय धन्यता.
असो. आता हा निरर्थक वाद मला वाढवायचा नाही. या धाग्यावर फक्त या (म्हणजे नि:शब्द) कथेबद्दल बोलायला /सकारात्मक चर्चा करायला मला आवडेल.
या कथेत मी कुठेही तुम्च्या कथेचा संदर्भ थेट दिलेला नाही. कथेत काही अॅड करण्यासाठीची ती सूचना होती.
त्यामुळे कोणाला मिरच्या झोंबण्याचे कारण नव्हते.
अवांतर : या कथेवर एक विडंबन लिहून दुसरा स्वतन्त्र कथेचा धागा काढला गेला होता http://misalpav.com/node/25166
या कथेच्या कथालेखकाने तो धागा हसतखेळत घेतला.
सकारात्मक चर्चेबद्दल.... या धाग्यावर ओल्डमंक च्या कीक बद्दल चर्चा झालेली आहे.
फक्त एका कॉमेन्ट्स मुळे जर कुरापत काढली असे वाटत असेल तर मग बोलणेच खुंटले. असो. मलादेखील असल्या कुरापतखोरीत इन्टरेस्ट नाहिय्ये.
सकारात्मक म्हणायचेच असेल तर "या पुढे माझ्याकडून हा विषय बंद" हे सकारात्मक वाक्य.
त्यांना सदर कथा फाॅरवर्ड करत आहे. बघा खालील video:
Watch "100 crore ka Qtiyapa : Bollywood Qtiyapa (ft. Anurag Kashyap)" on YouTube - https://youtu.be/veLfT68kJ8w
प्रतिक्रिया
एकदा रजनीकांत नेटवर आपलेच
काय खतरा लिहितोस, भाऊ..
च्यायला, तीन क्वर्टर
तेच ना राव
मंदार
या कथेचा शेवट
दया ! रिसबुड दया!
हो आणि मग....
तो अर्धमागधी मधे डॉ. होता.
म्हंजे नक्की काय? मागधीचा
च्या मारी...
छान
माताय पुन्हा एकादा भैताड
एका प्रसंगाला कथेचा आत्मा करणं टाळा
धन्यवाद
अरे हो दामिनी रमेश ला
थोडी विश्रांती घ्या बरं वाटेल...
>>>तुमचे मानसिक संतुलन
जिथल्या प्रतिक्रिया तिथेच द्याव्यात ना...
+१११११११११११११११११११११११११११११
+१११११११११११११११११११११११११११११ प्यारे१ साठी आहे
कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट
कमेंट योग्य ठिकाणी असावी
एवढी बी भारी नवती
लोचा!
कोणत्याही लेखनावर (खास करुन
एखादी कथा
404 - Page Not Found
लिन्क
नेट
पति-पत्नी रथाची दोन चाके
एखादी किरकोळ कथा वाचून
हा हा हा :) "वाढदिवसाच्या शुभेच्छा"..
योग्य ठिकाणि करा ना टीका
या कथेत मी कुठेही तुम्च्या
ही घ्या लिन्क
अनुराग कश्यप आगामी सिनेमा साठी कथानकाच्या शोधात आहेत .
हा हा हा
Pagination