मिपावरील डॉक्टरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहे.
बाकी सिगरेटची सवय का लागते, कशी लागते, सुटत का नाही, सिगरेटचे दु:षपरिणाम वगैरे वगैरे मुद्यांबाबतचे विवेचन बरेच वरवरचे वाटले. वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून अधिक नेमकी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
सिगरेट/तंबाखूच्या व्यवसायातील उत्पन्नावर कर बसवून सरकारी खजिन्यात वाढ तरी होते हे एक चांगलं आहे. कारण सरसकट बंदी घातल्याने स्मगलिंगचं प्रमाण वाढेल आणि निदान जे ठरावीक निर्बंधाखाली एका प्रमाणात चाल्लं आहे ते बेसुमार प्रमाणात फोफावू शकेल. वर सरकारला करही मिळणार नाही.
सध्या सिगरेट पाकीटाची सरासरी किंमत काय आहे माहित नाही. पण १०० रू असेल आणि एक माणूस दिवसाला १ पाकीट असे २० वर्षे सिगरेट ओढत असेल तर त्याचा खर्च ७ लाख ३० हजार होईल त्यावर ड्यूटी २० टक्के असेल (तेवढी असावी असा अंदाज) तर त्याच्याकडून सरकारला १ लाख ४६ हजार 'मिळकत' होईल. त्यातून श्वसनरोगावर उपचारासाठी बांधावयाच्या इस्पितळांचा खर्च, ती चालवावयाचा खर्च वजा केला आणि प्रत्यक्ष त्या माणसाच्या उपचारांवर येणारा, तसेच त्याच्या आजूबाजूच्या नॉन-स्मोकर्सच्या आरोग्यावरील खर्च वजा जाता सरकारच्या तिजोरीत नक्की किती भर पडते? मला वाटतं उलट सरकारलाच आपल्या खिशातून थोडेफार पैशे त्यात टाकावे लागत असतील.
भारताचा विदा मिळाला नाही, पण सायबाच्या देशात भारीच गणित आहे:
२००५ साली सिगरेटीवरचा कर एकूण ९.९ बिलियन पौंड मिळाला आणि त्यावरचा खर्च ५.५ बिलियन पौंड होता.
परिणामी यूकेमध्ये सिगरेटींच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत! एका मार्लबरो लाईटसची किंमत ४५ रुपये आहे. (भारतात अंदाजे १० रुपये असावी.)
अशा उत्पादनांवर भरमसाट कर लावण्यात सरकारचा हेतू मिळकत करणे हा नसून फुकाड्यांना वाढीव किमतीचा बडगा दाखवून त्यांना परावृत्त करणे हा असतो. त्याचा कितपत उपयोग होतो हे जरा शंका घेण्यासारखंच आहे - किंमत आवाक्याबाहेर वाढली की फुकाडे स्वस्त (आणि जास्त हानिकारक) पर्यायाकडे वळतील. काहीकाही जण आपलं व्यसन पुरवण्यासाठी चोर्यामार्या करतील (गुटख्याची पाकिटं लुटण्यासाठी दुकान फोडलं वगैरे बातम्या येतात अधूनमधून).
निरीक्षण आणि मित्रांनी सांगितलेले अनुभव यांचा आधार घेऊन थोडक्यात विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. या निरीक्षणांना डॉक्टर मंडळींची पुष्टी मिळून अधिक तपशील मिळाल्यास खरंच बरं वाटेल.
वरील सगळी कारणे मान्य असली तरी स्मोकरला मित्र, मैत्रिण, नातेवाईक म्हणून 'दिलमे जगह' द्यायला नकोच वाटते. ते स्वभावानं वाईट असतील असं नाहीच म्हणत. कित्येक चेन स्मोकर्स अगदी गुणवंत असतीलच की! पण त्यांच्या त्या सवयीपायी अमचं आरोग्य धोक्यात येतय हेही बघणारच ना! अशा मनुष्याच्या कपडे, बॅकपॅक, पर्स सगळीकडे किती दर्प येतो. आम्हाला वाईट म्हटले तरी चालेल पण तो दर्प सहन करणं जमणार नाही. असा मनुष्य आजूबाजूला असला तर मी आधी जवळ कुठे ओकण्याची सोय आहे हे बघायला जाते. ते या स्मोकरला समजते का? तसेच ते गुटखावाले! आजकाल तर मेले बिल्डींगिच्या कोपर्यात बशिवलेल्या देवांच्या टाईल्सनाही जुमानत नाहीत. एकानं तर बरोब्बर देवाच्या टाईल्स सोडून आजूबाजूला रंगकाम केलं होतं. असा गुणवान मनुष्य वाईट कसा म्हणायचा?
वडापाव, आपल्या २-३ मित्रांना स्मोकिंगची सवय घालवण्यात यशस्वी कसे झालात ते लिहा कि! बाकी लेख चांगलाच आहे.संतुलित राहून लिहिला आहे. आदतसे मजबूर म्हणून स्मोकिंग करणारे व स्मोकिंग मधे धन्यता मानणारे हे भिन्न लोक आहेत. बाकी आता सिगारेट परवडत नाही म्हणुन विडी ओढणारे लोक दिसतात. सिगारेट ची तल्लफ आली की विचारशक्ती नष्ट होते.कळत पण वळत नाही अशी अवस्था होते. हे केवळ सिगारेट बाबतच आहे असे नाही तर सर्व व्यसनांबाबत हे होते. आत्ता सिगारेटचा विषय चाल्ला आहे म्हणुन सिगारेट एवढेच. मिले धूर मेरा तुम्हारा तो धूर बने हमारा असे राष्ट्रिय ऐक्य या फुकाड्यांमधे फार पटकन होते.
क्रेझी ताईंनी लिहिले ते वैतागून. निदान आपण अवहेलनेस/ तुच्छतेस पात्र आहोत हे जाणीव झाल्यावर तरी ते विचार करतील अशा अपेक्शेने त्यांनी लिहिले आहे.पण काही वेळा त्याचा उल्टा परिणाम होतो. ते अधिक कोडगे बनत जातात. होय आहोत आम्ही फुकाडे. आम्ही आमच्या पैशानी फुकुन फुकुन मरु नाही तर काही करु तुम्हाला काय घेण देण आहे अशी बेफिकिरी तयार होते. आपल्या मिपावर देखील आदरवाईज सुसंस्कृत असणारे फुकाडे आहेत. काही लोक व्यसनाच्या आधिन आहे हे कबूल करतात तर काही छे छे आपल सगळ कंट्रोल मधे असत असे म्हणुन व्यसन आपल्यावर स्वार नसून आपण व्यसनावर स्वार आहोत असे काहीस सांगण्याचा प्रयत्न करतात. शेवटी एकदा त्यांना आपल मानल कि आपण त्यांना दोषांसकट स्वीकारत असतो.
( फुकून सवरुन भागलेला )
आपल्या २-३ मित्रांना स्मोकिंगची सवय घालवण्यात यशस्वी कसे झालात ते लिहा कि!
वडापाव लिहितीलच - माझेही दोन पैसे.
अनेक मित्रांना अनेकदा "सिगरेट सोड" असे सांगणे होते आणि जर एखाद्याला खरंच सिगरेट सोडायची इच्छा असेल तर "मला सोडायची आहे पण जमत नाही" असे उत्तर मिळते. या वेळी हळूच व्यसनमुक्ती केंद्राचा प्रस्ताव डोक्यात सोडून द्यायचा.
मला पुण्यातले मुक्तांगण हे एकच व्यसनमुक्तीकेंद्र माहिती आहे.
व्यसनमुक्ती केंद्र ऐकल्याबरोब्बर नकारात्मक प्रतिक्रिया येतात. "अरे मी इतकापण व्यसनाच्या आहारी गेलो नाहीये!" "मी माझी मी सिगरेट सोडतो पण तिकडे नाही जाणार" "बघू.." अशी उत्तरे मिळतात. मात्र अशावेळी आपणच चिकाटीने मुक्तांगणमध्ये जाण्याचा आग्रह धरावा.
व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाणे म्हणजे "तेथे अॅडमीट होणे" असा एक समज असतो. मात्र ओपीडी द्वारेही उपचार होतात. आठवड्यातले ठरावीक दिवस ओपीडी सुरू असते. अधिक माहिती मुक्तांगणच्या वेबसाईटवर मिळेल.
मी शक्यतो प्रत्येक व्हिजीटला मित्रासोबत थांबायचा प्रयत्न करतो.(शनिवारी सकाळी १० ते १ च्या दरम्यानची वेळ मला सोयीची असते!)
प्रत्येक व्हिजीटला पुढीलप्रकारे मानसिक व शारिरीक तपासणी होते,
१) जनरल कौन्सीलींग
२) मेडीकल कौन्सीलींग
३) हेल्थ चेकप व त्यानुसार औषधे
जनरल कौन्सीलींगमध्ये व्यसनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणार्या वाईट गोष्टी व त्याचे दुष्परिणाम सांगून व्यसनाचे नक्की कारण काय असावे हे पाहिले जाते व आणखी माहिती उदा. सिगरेट ओढण्याच्या नक्की वेळा, किती सिगरेट्स वगैरेही केसपेपरवर नोंदले जाते.
मेडीकल कौन्सीलींगमध्ये सिगरेटमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम व त्यामुळे होणारे दैनंदिन त्रास (पित्त, बीपी, अपचन वगैरे) हे ही सांगीतले जातात.
हेल्थ चेकपमध्ये वजन, बीपी वगैरे तपासले जाते व त्यानुसार औषधे, टॉनीक्स आणि त्यांचे प्रमाण ठरवले जाते. (औषधांमध्ये निकोगम नावाचे एक निकोटीयुक्त च्युईंगम दिले जाते - गरज असल्यास)
औषधांद्वारे प्रामुख्याने पुढील गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
१) भरपूर आहार, पुरेशी झोप व शरीराचे योग्य वेळापत्रक
२) निकोटीन सेवन हा शरीराचा एक भाग झाल्याने ठरावीक वेळानंतर शरिराकडून निकोटीनची मागणी होते. या गरजेसाठी निकोगम दिले जाते.
३) व्यसन थांबवल्यानंतर / कमी केल्यानंतर शरीराची निकोटीनची मागणी व पुरवठा अचानक गडबडल्याने शारिरीक त्रास होतात. टॉनीक्स व औषधांद्वारे यावर उपचार केले जातात.
४) हळू हळू संपूर्णपणे व्यसन सोडण्यावर भर दिला जातो.
प्लीज नोट - वरील माहिती संपूर्णपणे निरीक्षणातून, डॉक्टर व कौन्सलर्सना 'सहज' विचारलेल्या माहितीतून मिळाली आहे.
या संपूर्ण उपचारपद्धतीमध्ये स्वत: व्यसन सोडण्याची इच्छाशक्ती अत्यंत महत्वाची आहे - जर एखाद्याला व्यसन सोडायचेच नसेल तर आपण काहीही करू शकत नाही.
मुक्तांगणची एका व्हिजीटची फी ५० रू आहे.
***********************************************
मुक्तांगणद्वारे ५ मित्रांचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला.
दोन मित्र संपूर्णपणे व्यसनमुक्त झाले (एक जण खैनी व एक जण सिगरेट् + दारू)
एक मित्र सात आठ महिने व्यसनमुक्त राहून ऑफीस व कौटुंबीक कारणाने पुन्हा सिगरेट ओढू लागला.
एक जण पुन्हा आहे त्याच प्रमाणात सिगरेट ओढत आहे.
एका मित्रासोबत दोन तीन आठवड्यांपूर्वी पहिली व्हिजीट झाली - त्याने सिगरेटचे प्रमाण दिवसा १० / १२ वरून २ / ३ पर्यंत कमी केले आहे.
***********************************************
तंबाखू मुळे किती माणसे अकाली मृत्यू पावतात याची भारतातील एक अत्यंत उपयुक्त सांख्यिकी http://www.rctfi.org/resources/India_Tobacco_Economics_summary_en.pdf .
सर्वांनी मुळापासून वाचावी अशी आहे म्हणूनच त्याचे भाषांतर केलेले नाही.
भारतात गरिबांच्या स्वस्त करमणुकीवर?(" एका अनर्थ मंत्र्यांच्या अर्थ् संकल्पिय भाषणातील उतार्यावरून") कर लावलेला नाही. यापेक्षा दांभिकपणा काय असू शकतो? गरीब मेले तर काही फरक पडत नाही आज मला मते मिळाली पाहिजेत.
इंग्लंडात (राष्ट्रीय आरोग्य योजना NHS) ने प्रसिद्ध होणार्या (२ ० ० २ - ० ३ ) हानी बद्दल वाचलेली एक गोष्ट आठवते आहे.
""साधारण पाच बिलियन पौंड हे तंबाखू मुळे होणार्या रागांचा इलाज करण्यासाठी खर्च होतात पण नवीन तरुणांना सिगारेटच्या जाळ्यात ओढण्यासाठी सिगरेट कंपन्या पन्नास बिलियन पौंड जाहिरातींवर खर्च करतात. (जुने फुक्ये आपला ब्रेंड सहज बदलत नाहीत). जोवर हा असमतोल सुधारत नाही तोवर तंबाखू ने होणार्या रोगावर होणारा खर्च कधीच कमी होणार नाही""
म्हणजेच केवळ तंबाखूच्या सर्व उत्पादनांवर जबरदस्त कर बसवला पाहिजे असे नव्हे तर त्याच्या सर्व तर्हेच्या उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्ण बंदी घातली पाहिजे.
आपल्याकडे ५५५ किंवा ऑफिसर स्पेशल मिनरल वोटर , फोर स्क्वेअर कैसेट्स, रेड अण्ड व्हाईट चड्डी इ इ ब्रान्ड विकास चालू आहे. हि उत्पादने आपल्याला कोठेतरी मिळतात काय? यासारखा दांभिकपणा काय असू शकेल. माणिकचंद आपले मराठी चित्रपटाचे पारितोषिक समारंभ प्रायोजित करतात, रेड आणि व्हाईट शौर्याचे पुरस्कार देतात
ब्रान्ड विकास काय आहे हे खाली पहा- महिंद्र आणि महिंद्र ट्राकटर्स हे अमेरिकेत निर्यात केले तरीही कुणी विकत घेत नव्हते म्हणून त्यांनी तेथील राज्यांमध्ये बास्केट बॉल , फुटबॉल इ इ च्या राज्यस्तरीय स्पर्धांना प्रायोजित करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचे ट्राकटर्स तेथे हातोहात खपू लागले.
जोवर तंबाखू उत्पादनाच्या जाहिरातीवर संपूर्ण बंदी आणि त्यांवर जबरदस्त कर बसवले जात नाहीत तोवर कठीण आहे.
वाळवी मुळापासून खणली नाही तर वर वर वाळवी नाशकाचा उपयोग होत नाही हे सरकारच्या डोक्यात शिरत नाही असे नाही.
अर्थमंत्र्यांना एकूण कराच्या काही टक्के पैसे निवडणूक निधीसाठी दिल्याने त्यावरील कर वाढत नाही हे आता गुपित राहिलेले नाही.
कालाय तस्मै नमः
अजुन १ कारण असु शकतं.
व्यावसाईक :- प्रोफेशनची गरज म्हणुन. म्हणजे काही 'डील' टेबलावर बसल्यावर(च) फायनल होतात किंवा बॉस टेबलावर कसा मन्-मोकळेपणाने बोलतो. मग टेबलावर बसलं की स्मोकींग तर जोडीनं आलंच की..
(या टाईपला काय म्हणातात? डिप्लोमॅटीक?)
याला स्वतःला फसवणे म्हणतात.
कोणत्याही व्यवसायाची हि गरज नाही. तुम्ही सिगारेट पीत नाही म्हणून जर तुमचा व्यवसाय वाढत नसेल तर तुम्ही व्यवसायाला लायक नाही असेच म्हणावे लागेल. चार रुपयांच्या काडीची जर तुम्हाला व्यवसायासाठी "गरज" लागत असेल तर आपण अंतर्मुख होऊन आपल्या कौशल्यात काय कमतरता आहेत ते शोधून काढणे अत्यंत आवश्यक आहे
व्यवसाय कोणता आहे यावर अवलंबुन आहे. याला 'स्वत:ला फसवणे' म्हणु शकत नाही.
फार जवळचं उदाहरण सांगतो.
मी निप्पाणीचा. निपाणी गाव तंबाखूसाठी अख्खे इंडीयामे वर्ल्ड फेमस है. गल्ली-बोळात तंबाखूचेच व्यापारी आहेत. (लखोबा लोखंडेना आपण ओळखत असालच :) )
कित्येकांना इथे नाईलाजास्तव बिडी आणी तंबाखू टेस्ट करावा लागतो. नाहीतर वडीलोपार्जीत, इतक्या फॉर्मात चालणारा धंदा सोडुन द्यावा लागेल किंवा इतरांच्या शब्दावर विश्वास ठेउन माल खरेदी करावा लागेल.
याला मी व्यावसाईक गरज म्हणालो. बाकी तुमचे इतर मुद्दे मान्य आहेत हेवेसांनल.
हे फक्त माझ्या माहितीतील. अशा अजुन केसेस असतील.
तंबाखूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे (मनोविकार शास्त्राप्रमाणे). दुर्दैवाने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात इतर व्यसनाइतका(दारू, अफू कोकेन इ) फरक पडत नसल्याने हा एक मानसिक आजार आहे हे मान्य करण्यास सगळे व्यसनी तयारच नसतात. खालील लेख मुळातून वाचावा म्हणजे तंबाखू आणि त्याचे व्यसन का आणि कसे लागते आणि ते सोडविण्या साठी काय करावे लागते हे स्पष्ट होईल.
आणि ते व्यसन नाही, आमच्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे, व्यवसायासाठी मित्र जोडण्यासाठी समाजात लोकप्रिय होण्यासाठी आवश्यक आहे अशा तर्हेचा युक्तिवाद लोक का करतात हेही स्पष्ट हॊइल. काही भाषा शास्त्रीय आहे त्यामुळे जरा कठीण वाटते सावकाश वाचल्यास अर्थ स्पष्ट होतो.
मला स्वतःला अनुभव नाही पण काही मित्रांकडुन असे ऐकले आहे की सकाळी सिगरेट किंवा तंबाखू शिवाय 'होतच' नाही. आता 'न होणे' याला मानसीक आजार कसे म्हणावे? ही तर शारीरीक क्रिया/बाब आहे ना?
जरा इस्कटून सांगता येइल का बघा..
जर फक्त प्रातर्वीधीचा विचार केला तर बर्याच जणांना सकाळच्या चहाशिवाय होतच नाही.. चहाचे व्यसन हा सुद्दा मानसीक आजार असु शकतो का?
फुंकणं वाईट, फुकाडे नव्हे....
'फुकाडे' हा शब्द माझ्यासाठी तरी नवा आहे. माझ्या तरूणपणी (म्हणजे तसा कांही अजून म्हातारा झालो नाहीए मी पण....) माणसांची वर्गवारी ३ विभागात केली जायची. थुंके, फुंके आणि भुंके. पान-तंबाखू खाऊन थुंकणारे थुंके, विडी-सिगरेट पिणारे फुंके आणि ह्या दोन वर्गावर तोंडसुख घेणारे 'भुंके'.
मी पहिली सिगरेट इयत्ता ७वीत प्यायलो होतो. मित्रांच्या संगतीत. (त्यांना दोष देत नाहीए) पण मला अज्ञात असणार्या सुखाचा(?) परिचय मला माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठ्या असणार्या मित्रांमुळे झाला. तेंव्हा 'सिगरेट' पिण्याचा सामुदायिक कार्यक्रम गावाबाहेर (हो, त्याकाळी मुंबईच्या टोकाला असलेलं पण मुंबईच्या हद्दीत असणारं आमचं 'दहिसर' गाव हे गावंच होतं) मीठागरावर तोही वर्षातून एकदा-दोनदा (वार्षिक परिक्षा संपल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत) व्हायचा. पहिली सिगरेट प्यायली जायची ती 'कूल' नांवाची मेन्थॉल मिश्रित असायची. एक्सट्रॉ स्ट्राँगची गोळी खाल्यासारखं थंड वाटायचं. चोरून करावे लागण्यामुळे 'थ्रील' वाटायचं. आपण कांहीतरी वेगळं करतो आहोत अशा विचारांनी सिगरेट प्यायली जायची. घरी जाण्याआधी भरपूर बडीशोप खायची. हात कडूमेंदीच्या झाडाला चोळायचे जेणे करून घरी सिगरेटचा वास येऊ नये. उन्हाळी सुट्टीत १-२ वेळा हा कार्यक्रम व्हायचा. नंतर सुट्टी संपून शाळा सुरू झाली की सगळं बंद. नंतर एकदम पुढच्या वर्षी पुन्हा उन्हाळी सुट्टीत. पण कशी कोण जाणे २-३ वर्षातच दर शनिवारी सकाळी शाळेत जाताना (मित्राच्याच टपरीवजा हॉटेलात मागे एक खोली होती त्या खोलीत आम्ही ३-४ शाळकरी मित्र सिगरेट फुंकायचो) एक सिगरेट पिण्याची सवय लागली. पुढे आठवड्यातील एक सिगरेट कॉलेजला गेल्यावर 'रोज एक' ह्या स्तरावर पोहोचली. नोकरी लागल्यावर १/२ पाकीट आणि भारतातील नोकरी सोडून मस्कतला येईपर्यंत रोज एक पाकिट सिगरेट 'लागायची'.
'थ्रील' ह्या भावनेतून सुरू होऊन सिगरेटचे व्यसन लागले. धुम्रपानाच्या दु:ष्परीणामांवर अनेकदा चर्चा व्हायची. सिगरेट ओढणार्यांत आणि न ओढणार्यांबरोबरही. तिथे 'सिगरेट सोडली पाहीजे' ह्या विचारांचे बीज मनांत रुजू लागले. पण प्रत्यक्ष कृती घडत नव्हती. अनेक मार्ग चोखंदळून पाहिले. 'जसे एकदम सोडू नये, हळू हळू कमी करत नेउन सोडावी' अशा स्वत:ला सोयिस्कर असणार्या सल्ल्यांनुसार प्रयत्न केले. कधी एकदम पूर्णतः बंद केली पण २-३ दिवसांत सर्व निग्रह ढासळून पुन्हा सुरु व्हायची. घरात होणारे वादविवाद (कुठल्याही कारणाने), ऑफीसातील तणाव, कांही खास आनंदाचे क्षण, कांही एकटेपणाचे क्षण अशा अनेक (आता फुसक्या वाटणार्या) कारणांनी निग्रहाने दूर केलेली सिगरेट पुन्हा जवळ केली जायची.
माझे वडील स्मोकर नव्हते. पण वयोमानानुसार उद्भवलेल्या श्वसनसंबंधी आजारपणातून त्यांना इस्पितळात दाखल केले असता त्या इस्पितळात श्वसनसंबंधी रोगांशी झगडणारे असंख्य रुग्ण पाहिले. तिथल्या डॉक्टरांशी कांही औपचारीक चर्चाही झाली. आणि सिगरेट सोडण्याच्या विचारांनी मनांत वेग घेतला. त्या आजारपणात वडिल गेले. (१९९६). सिगरेट सोडण्यावर फार वरचेवर उर्मी मनांत दाटून यायची. अनेक लेख, निकोटीनने काळवंडलेल्या फुफ्फुसांची चित्र पाहण्यात आली. हृदयविकार आणि धुम्रपानाचा संबंध आणि धुम्रपान करणार्यास, धुम्रपान न करणार्यांपेक्षा, हृदयविकाराने मृत्यूची शक्यता चौपट असते असे एका लेखात वाचण्यात आले. तसेच, धुम्रपान सोडल्यावर १० वर्षेतरी असा धोका राहतो. नंतर तो इतरांइतकाच राहतो, असेही त्यात दिले होते. हे वर्ष होते २००२. बस्स..! ठरवलं... सिगरेटला हातही लावायचा नाही. घरातील उरलेले पाकिट, लायटर, रक्षादान सर्व सर्व घराबाहेर काढून कचर्यात फेकून आलो. (वाईट वाटलं. असं वाटलं.. निदान एक तरी.. अगदी शेवटची म्हणून ओढावी.. पण नाही... सोडायची म्हणजे सोडायची .. नो दया-माया असं म्हणून जड अंतःकरणाने सर्व वस्तू फेकून दिल्या).
तो दिवस होता ८ फेब्रूवारी २००२. त्या लेखात दिलं होतं सिगरेट सोडायला असा दिवस निवडा ज्याचं तुमच्या आयुष्या कांही विशेष महत्त्व आहे. ८ फेब्रूवारी हा माझ्या एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस. सिगरेट सोडली. सुरुवातीला भयंकर अस्वस्थ वाटलं. मनाचा निग्रह मोडेल अशी भिती वाटल्याने सरळ झोपूनच टाकलं. दुष्ट विचारांनी आपला बळी घेऊ नये म्हणून मोकळावेळ असेल, करायला हातात कांही काम नसेल (अशा वेळेलाच सिगरेटची प्रकर्षाने आठवण येते, गरज भासते) तर सरळ झोपा काढायचा असा सपाटा लावला. ३-४ दिवस कठीण होते. पण ते सरले. सिगरेटची गरजेची तीव्रता हळूहळू कमी होते आहे हे जाणवून उत्साह वाढला. आठवडा उलटला. जेंव्हा जेंव्हा आठवण यायची तेंव्हा तेंव्हा मुलाला दिलेले ते एक वचन आहे असा विचार करत, वचन मोडलं नाही. तीव्रता अजून कमी झाली. महिना...वर्ष.. आणि सिगरेट सुटली.
बहुतांश सिगरेट पिणार्यांना ती वाईट आहे आणि सोडली पाहिजे असे वाटत असते पण प्रयत्न अपुरे पडतात. शरीरातील निकोटीनची पातळी खाली आली की भयंकर अस्वस्थ वाटू लागतं आणि बिचार्यांचे निग्रह डळमळीत होऊन कोसळतात. सिगरेट सोडण्याच्या प्रयत्नात एक जरी सिगरेट प्यायलं किंवा मित्राच्या सिगरेटचा एक झुरका जरी घेतला तरी सर्व प्रयत्न मातीमोल होतात. सिगरेट पिऊन झाल्यावर वाटतं 'च्यायला.... उगीच प्यायलो. आता नाही प्यायची' पण ह्याची पुनरावृत्ती होते आणि शेवटी 'छे: बुवा! ही सिगरेट कांही सुटणार नाही आता' अशा सोयिस्कर विचारांनी सिगरेट सोडण्याचा प्रयत्नच सोडून दिला जातो.
फुंकणं नक्कीच वाईट आहे पण फुंके (किंवा फुकाडे) वाईट नाहीत तर 'बिचारे व्याधीग्रस्त जीव' आहेत. त्यांना प्रभावी समुपदेशनाची गरज असते. मला तर वाटतं, आपल्या ओळखितल्या, ज्यांनी सिगरेट सोडावी असं आपल्याला त्यांना केईएम सारख्या सरकारी इस्पितळातील श्वसनविकार वॉर्ड मध्ये फिरवून आणावं. तिथेच त्यांचे समुपदेशन करावं. आणि त्याच्या प्रयत्नांना प्रेमाने साथ द्यावी. त्यांना वाळीत टाकल्यासारखे करू नये. (त्याने ते अधिकच व्यसनाधिन होतात). मी नेहमी एक विचार करायचो. हे व्यसन म्हणजे माझ्या जीवावर उठलेला एक राक्षस आहे. ह्या व्यसनातून सुटका होण्यासाठी माझा ह्या बलाढ्य राक्षसाशी सामना/संघर्ष आहे. पण मी सिद्ध करेन की तो ताकदवान नाहीए तर माझी इच्छाशक्ती त्याहून कितीतरी बलाढ्य आहे. आणि ह्या बलाढ्य इच्छाशक्तीचा पराजय होऊ नये म्हणून मी स्वतःकडेच दूरून पाहात, वेळ प्रसंगी स्वत:लाच शाब्दिक फटकार्यांनी, माझाच धीर वाढवत, Yes, you can DO it. चा मंत्र जपत अखेर स्वतःला व्यसनमुक्त केलं.
हा संघर्ष... ही लढाई... हे युद्ध.. सोपे नाही. व्यसनग्रस्ताला तुमच्या तिटकार्याची, नांवं ठेवण्याची, बोटं दाखविण्याची नाही तर प्रेमाची, सहकार्याची प्रभावी समुपदेशनाची, इस्पितळ भेटींची, आरोग्यपूर्ण आणि निकोटीनने भरलेल्या फुफ्फुसांच्या चित्रांची आणि भावनिक आधाराची गरज असते.
पेठकर काका.
सिगारेटचे व्यसन हे केवळ शारीरीक नसते. त्याचा आपल्या विचारांशी घनिष्ठ सम्बन्ध असतो.
सिगरेटमुळे मेंदूत काही अॅमिनो अॅसिड्स निर्माण होतात. त्याचे बरे वाईट परीणाम होतात्.सर्वसामान्य स्तिथीत ही अमिनो अॅसिड्स ( स्टिरीऑईड्स ) मेंदूत नैसर्गीक रित्या गरजेनुसार केली जातातच मात्र त्याची सिगरेटशी संगती जुळली जाते. ही सम्गती ज्यावेळेस अखादा तोडू शकतो त्याच वेळेस सिगरेट सोडता येते.
उदा :आपण काही विचार करतो तेंव्हा सिगरेट ओढतो. विचारांवर निर्णय घेतला की वाक्यानंतर पूर्णविराम देतो त्द्वत सिगर्ट विझवली जाते. आपन ज्या गोष्तीचा विचार करत होतो तो विचार पुन्हा मनात आला की मेंदू त्याचा पूर्वी ओढलेल्या निकोटीनशी असलेला संबन्ध आठवून निकोटीनची इच्छा व्यक्त करतो. सिगरेट ओढाविशी वाटते.विचार बदलत जातात, विचारांची निकोटीनशी संगती बदलत जाते.
एक वेळ अशी येते की निकोटीनशिवाय मेंदू विचार करणे/निर्णय घेणे बंदच करतो. या अवस्थेला मनूष्य पूर्ण व्यसाधीन झालेला असतो.
विचार या कृती/घटने शी असलेली सिगरेटची संगती आपण ज्या क्षणी ओळखून तोडू शकतो त्या क्षणे सिगरेट सुटू शकते. अर्थात याला निर्धाराची अवश्यकता असते.
विचारांची सिगरेटची सम्गती तोडण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक हवा असतो
व्यसनाधीन मनुष्य हा एकप्रकारचा रोगी असतो हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पेठकर काका .. तुमचे प्रामाणिक कथन खूप खूप आवड्ले ! त्याचा अनेकांना उपयोग होईल..
सिगरेटच का सर्वच व्यसनांसाठी मनो निग्रह हा महत्वाचा आहे.
स्वानुभवावरुन सांगतो.. सिगरेट इतकच खाण्याचे व्यसन वाईट आहे .. सुटता सुटत नाही ! जाम आड्कलो आहे त्यात. जीभेचे चोचले काही केल्या संपत नाहीत.. गेली ४५ वर्षे रोज किमान २ वेळा जेवतो , मधे खाणी आणि चहा आहेच पण लोभ सुटत नाही..त्याचे शारिरिक परिणाम देखील सिगरेट ईतकेच भयंकर आहेत !
प्रतिक्रिया
वाचतोय.
सिगारेटचे/तंबाखूचे आणि तत्सम
सिगरेट/तंबाखूच्या व्यवसायातील
सरकारला प्राप्ती होते?
भारताचा विदा मिळाला नाही, पण
वरवरचेच आहे.
वरील सगळी कारणे मान्य असली
हे लोण पसरत चाललय.....
काय दिवस आले आहेत...
हा हा हा :)
व्हिडीओ
वडापाव, आपल्या २-३ मित्रांना
आपल्या २-३ मित्रांना
आपल्या २-३ मित्रांना स्मोकिंगची सवय घालवण्यात यशस्वी कसे झालात ते लिहा कि!वडापाव लिहितीलच - माझेही दोन पैसे. अनेक मित्रांना अनेकदा "सिगरेट सोड" असे सांगणे होते आणि जर एखाद्याला खरंच सिगरेट सोडायची इच्छा असेल तर "मला सोडायची आहे पण जमत नाही" असे उत्तर मिळते. या वेळी हळूच व्यसनमुक्ती केंद्राचा प्रस्ताव डोक्यात सोडून द्यायचा. मला पुण्यातले मुक्तांगण हे एकच व्यसनमुक्तीकेंद्र माहिती आहे. व्यसनमुक्ती केंद्र ऐकल्याबरोब्बर नकारात्मक प्रतिक्रिया येतात. "अरे मी इतकापण व्यसनाच्या आहारी गेलो नाहीये!" "मी माझी मी सिगरेट सोडतो पण तिकडे नाही जाणार" "बघू.." अशी उत्तरे मिळतात. मात्र अशावेळी आपणच चिकाटीने मुक्तांगणमध्ये जाण्याचा आग्रह धरावा. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाणे म्हणजे "तेथे अॅडमीट होणे" असा एक समज असतो. मात्र ओपीडी द्वारेही उपचार होतात. आठवड्यातले ठरावीक दिवस ओपीडी सुरू असते. अधिक माहिती मुक्तांगणच्या वेबसाईटवर मिळेल. मी शक्यतो प्रत्येक व्हिजीटला मित्रासोबत थांबायचा प्रयत्न करतो.(शनिवारी सकाळी १० ते १ च्या दरम्यानची वेळ मला सोयीची असते!) प्रत्येक व्हिजीटला पुढीलप्रकारे मानसिक व शारिरीक तपासणी होते, १) जनरल कौन्सीलींग २) मेडीकल कौन्सीलींग ३) हेल्थ चेकप व त्यानुसार औषधे जनरल कौन्सीलींगमध्ये व्यसनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणार्या वाईट गोष्टी व त्याचे दुष्परिणाम सांगून व्यसनाचे नक्की कारण काय असावे हे पाहिले जाते व आणखी माहिती उदा. सिगरेट ओढण्याच्या नक्की वेळा, किती सिगरेट्स वगैरेही केसपेपरवर नोंदले जाते. मेडीकल कौन्सीलींगमध्ये सिगरेटमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम व त्यामुळे होणारे दैनंदिन त्रास (पित्त, बीपी, अपचन वगैरे) हे ही सांगीतले जातात. हेल्थ चेकपमध्ये वजन, बीपी वगैरे तपासले जाते व त्यानुसार औषधे, टॉनीक्स आणि त्यांचे प्रमाण ठरवले जाते. (औषधांमध्ये निकोगम नावाचे एक निकोटीयुक्त च्युईंगम दिले जाते - गरज असल्यास) औषधांद्वारे प्रामुख्याने पुढील गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. १) भरपूर आहार, पुरेशी झोप व शरीराचे योग्य वेळापत्रक २) निकोटीन सेवन हा शरीराचा एक भाग झाल्याने ठरावीक वेळानंतर शरिराकडून निकोटीनची मागणी होते. या गरजेसाठी निकोगम दिले जाते. ३) व्यसन थांबवल्यानंतर / कमी केल्यानंतर शरीराची निकोटीनची मागणी व पुरवठा अचानक गडबडल्याने शारिरीक त्रास होतात. टॉनीक्स व औषधांद्वारे यावर उपचार केले जातात. ४) हळू हळू संपूर्णपणे व्यसन सोडण्यावर भर दिला जातो. प्लीज नोट - वरील माहिती संपूर्णपणे निरीक्षणातून, डॉक्टर व कौन्सलर्सना 'सहज' विचारलेल्या माहितीतून मिळाली आहे. या संपूर्ण उपचारपद्धतीमध्ये स्वत: व्यसन सोडण्याची इच्छाशक्ती अत्यंत महत्वाची आहे - जर एखाद्याला व्यसन सोडायचेच नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. मुक्तांगणची एका व्हिजीटची फी ५० रू आहे. *********************************************** मुक्तांगणद्वारे ५ मित्रांचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला. दोन मित्र संपूर्णपणे व्यसनमुक्त झाले (एक जण खैनी व एक जण सिगरेट् + दारू) एक मित्र सात आठ महिने व्यसनमुक्त राहून ऑफीस व कौटुंबीक कारणाने पुन्हा सिगरेट ओढू लागला. एक जण पुन्हा आहे त्याच प्रमाणात सिगरेट ओढत आहे. एका मित्रासोबत दोन तीन आठवड्यांपूर्वी पहिली व्हिजीट झाली - त्याने सिगरेटचे प्रमाण दिवसा १० / १२ वरून २ / ३ पर्यंत कमी केले आहे. ***********************************************मुक्तांगणद्वारे ५ मित्रांचे
वाळवी मुळापासून खणली
अजुन १ कारण असु शकतं.
स्वतःला फसवणे
व्यवसाय कोणता आहे यावर
मानसिक आजार
मला स्वतःला अनुभव नाही पण
लेखाचा दुवा आला नाही.
धन्यवाद वडापाव, तुम्ही
फुकाडे वाईट नाहीत फुंकणे वाईट
व्यसनमुक्ती एक जीवघेणा संघर्ष....
आवडलं..
http://www.ncbi.nlm.nih.gov
पेठकर काका.
व्यसनाधिनता...
फारच सुंदर चर्चा
मानसिक दुर्बलता.