Welcome to misalpav.com
लेखक: पिंपातला उंदीर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

साधं दोन खोल्यांच्या घरात राहावे आणि सायकलने फिरावे असे ठरवणे म्हणजे ज्या कम्युनिटीत आजवरचे आयुष्य घालवले त्यापासून विभक्त होणे आहे.
इथेच ग्यानबाची मेख आहे. बहुतेक वेळा आईबाप "मला मिळालं नाही, आता पोराला मिळू दे" अशा भावनेने त्याला असल्या एकेक गोष्टी देत रहातात. त्यातूनच हे सगळं मला पाहिजे, आताच पाहिजे ही भावना वाढीला लागते. मग रात्री झोपण्यापुरता एक आडोसा एवढाच वेळ जरी घरात जात असला तरी ५०-६० लाखाचा २-३-४ बेडरूम्सवाला फ्लॅट पाहिजे. त्यासाठी ३०-४० लाखाचं कर्ज काढायचं. मग ते फेडण्यासाठी नवरा बायकोने दोघानी नोकरी करणे अपरिहार्य. नात्यातला एकजण प्रचंड पैसे कमावतो, पण ड्रायव्हिंग आवडत नाही म्हणून गाडी घेत नाही. कुठे जाता येत नाही म्हणून त्याचा मुलगा तक्रार करत होता. त्या मुलाला म्हटलं "अरे, बाबांना सांग की निदान नॅनो तरी घ्या, म्हणजे जवळपास तरी सगळ्यांना एकत्र जाता येईल." तर त्या १३ वर्षाच्या मुलाने मला काय उत्तर द्यावे? "ह्या: नॅनो? ती घेतली तर माझी मित्रांच्यात काय इज्जत राहिली?" म्हणजे या पोरांना गाडी पाहिजे, आणि ती नॅनो पण नको! ती टोयोटाच पाहिजे! मला सायकल चालवणारे माझे वडील आठवले एकदम!

ज्या समाजाने भौतिक सुखाची ध्येये ठरवून दिली आणि माणसाकडच्या खेळण्यांवरून त्याची किंमत करायला शिकवली, ती खेळणी तर आम्हाला मिळालीत; पण त्या भानगडीत आम्ही एका माईंडलेस कन्झुमरिझमच्या चक्रात अडकलोय आणि त्यात काही राम नाहीय हे कुठेतरी जाणवायला लागले आहे.
समाजात चांगले वाईट दोन्ही असते. त्यातुन काय घ्यायचे हे आपणच ठरवायचं असतं. स्पर्धा प्रगतीसाठी पोषक असावी, जीवघेणी नाही. किती धावायचं हे आपणच ठरवायचं असतं. दुसर्‍यांच्या (समाजाच्या) चुकीच्या विचारसरणीवर आपले आयुष्य बेतणे म्हणजे स्वतःकडे विचार करण्याची कुवत नसण्याचे प्रतिक ठरावे. विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पण सध्या एवढेच.

तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे आणि विचार चालू झाले आहेत म्हणून (आणि भविष्याचं भयावह चित्र डोळ्यासमोर स्पष्ट होत चाललंय म्हणून) हे सगळं बाहेर पडतंय. पण तुम्हाला सांगतो काका, स्वखुशीने कोणी या उंदीर शर्यतीत पडत नाही. यामागे वर्षानुवर्षांचे ब्रेनवॉशिंग असते. आज ज्या क्लासवॉरबद्दल एवढं बोललं जातंय ते फार पूर्वीपासून चालू आहे. ब्रेनवॉशिंग करून नाहीतर माणसाच्या डिग्निटीला आव्हान देऊन या शर्यतीत ओढले जाते. एक-दोन किस्से सांगतो. मी तसा निम्न-मध्यमवर्गातला. शाळेत उनाडक्या करणारा बॅकबेंचर. दहावीत मला शिक्षकांकडून केला जाणारा भेदभाव कळायला लागला. शिकवत असताना पुढच्या बेंचवरच्या तथाकथित हुशार मुलांनी काही कमेंट टाकली की आमच्या मराठीच्या बाई म्हणायच्या,"काय रे! सारखा काहीतरी मिश्कील बोलत असतो." आम्ही काही बोललो की राहा बेंचवर उभा नाहीतर जा वर्गाबाहेर. बारावीनंतरही जेव्हा आम्ही कॉलेजला बसने जायचो तेव्हा माझ्या एका श्रीमंत मित्राला त्याच्या वडिलांनी एमएटी घेऊन दिली. त्याच्या घरी पेढे घ्यायला गेलो तेव्हा सहज विचारले की एमएटी का घेतली, मोटारसायकल का नाही? तेव्हा त्याचे वडिल म्हणाले की अजून काही वर्षांनी तो मारुती घेईल तेव्हा आमच्या ऑफिसमधल्या कोणालातरी देऊन टाकू. जेव्हा सतरा-अठरा वर्षाच्या मुलाला हे ऐकवले जाते तेव्हा त्यातून काय अर्थ घ्यायचा हे त्याच्या तरूण रक्ताला कळत नाही असे नाही. पुढे नोकरी लागल्यावर स्वतःच्या कमाईने बाईक घेतली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू तरारले होते. असे अनेक प्रसंग आहेत. पण आता हळूहळू जाग यायला लागलीय. या वस्तू मिळवणे म्हणजे पुरुषार्थ नाही हे कळतंय आणि तोच पुरुषार्थ आहे असे ठसवले जाण्यात कोणाचा फायदा आहे हेही कळतेय. आमच्या नॉस्टेल्जियाला एका विषादाचीही किनार आहे. मागे वळून पाहताना कळते की आमच्या आधीच्या पिढीत बहुतेक लोक सरकारी नोकर होते. स्वातंत्र्यात जन्माला आलेली ती पहिली पिढी. देश-समाज उभारणीचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते. पण बहुतेकांनी वरकमाईतच धन्यता मानली. १० ते ५ ऑफिसमध्ये पाट्या टाकणारे आणि ऑफिसमध्ये आलेल्याला हाड-हाड करणारे कित्येक लोक माझ्या आजूबाजूला होते. उदात्त-भव्यतेच्या तोंडी गप्पा आणि प्रत्यक्ष आचरणातला फरक आम्हाला फार लहानपणी कळायला लागला. शिवाय या नॉस्टेल्जियाला खतपाणी घालणारा दुसरा मह्त्त्वाचा घटक म्हणजे भविष्याची जाणीव. ज्याचे आज थोडेफार वाचन आहे त्या माणसाला हे कळणे अवघड नाही की संपूर्ण जग एका क्रांतिकारक वळणावर येऊन ठेपले आहे. अगदी प्रगत देशांमध्येही बेरोजगार तरुणांची संख्या ४०% च्या आसपास जाऊन पोचली आहे. मोठमोठ्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. माणसाच्या भोगवादाची भरधाव गाडी नैसर्गिक मर्यादांच्या भिंतीवर आपटण्याची पुरेपूर शक्यता आहे. सध्या गरीब असलेल्यांनाच काय आमच्या पुढच्या पिढीलाही आमच्याइतके संपन्न आयुष्य मिळणे अशक्य होणार आहे. अशा परिस्थितीतही बरोबरचे लोक जेव्हा दोन-दोन घरे, दोन-दोन गाड्या घेतात आणि वंचित लोक नक्षलवादाकडे वळतात तेव्हा काहीतरी चुकतंय असंच वाटतं. त्याबाबतीत काहीतरी केले पाहिजे असे विचार तर सुरू झालेत. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे बळ येऊन कृती कधी होईल कोण जाणे? तोपर्यंत बालपणीच्या सुखी आठवणींचाच आधार आहे.

या लेखाशी अगदी थेट सुसंगत असेलच असे नाही परंतु वरती लिहिल्याप्रमाणे भविष्याचं भयावह चित्र डोळ्यांसमोर स्पष्ट होत चालल्याची आणखीन एक खूण चेपुवर काल बघितली - एक आकृती पाहिली त्यात आपण खरेदी करतो त्यातली बहुतांश उत्पादने जगातल्या फक्त दहा मोठ्या कंपन्या या ना त्या प्रकारे नियंत्रित करतात असे दिसते!! :( http://www.policymic.com/articles/71255/10-corporations-control-almost-everything-you-buy-this-chart-shows-how हे फार भयानक आहे. 'मुक्त' अर्थव्यवस्थेत जगातल्या दहा कंपन्यांची इतकी प्रचंड मक्तेदारी असणे हे खरेतर 'आर्थिक हुकूमशाही' प्रकारात मोडणारे आहे. परंतु या गोष्टी आपल्या जाणिवांपर्यंत पोचण्याएवढी उसंत आपल्याला मिळत नाही. आणि जरी या गोष्टी समजल्या तरीही आपण काय करु शकतो? सगळं प्रचंड अस्वस्थ करुन टाकतं!

हे तुम्हाला आत्ता कळलं? खरोखरीच आश्चर्य वाटलं म्हणून विचारतेय. प्रत्येक मोठ्या कंपनीचे किती ब्रांड असतात म्हण्जे काहीही खरेदी करा फायदा त्याच कंपनीचा. ठळक उदा. युनिलीवर.

खाद्यपदार्थांचे प्रोसेसिंग करणार्‍या काही बलाढ्य कंपन्यांबद्दल वाचले होते. ३० वर्षांपूर्वी ६० च्या आसपास असलेल्या या कंपन्या आता इतरांनी गिळंकृत्/नामशेष होत होत केवळ सहा उरल्या आहेत म्हणून, परंतु इतर उत्पादनांबाबतही तेवढीच भयावह स्थिती आहे हे माहीत नव्हते! :(

वरील सगळ्याच प्रतिसादांशी थोडी थोडी सहमत. खरंतर सगळंच पटलय आणि सगळच ज्याच्या त्याच्या दृष्टीनं बरोबर आहे. तरी ननिंशी जास्त सहमत कारण मी तशीच वाढले आणि आता भारतात असते तर जसे माझ्या पिढीच्या अनेकांचे चालले आहे तसेच चालले असते. बखोट धरून अभ्यासाला बसवलेल्यांच्या पुढच्या पिढीला "जा हुंदडा" म्हणताना कष्ट पडतात, पण पैसाताई म्हणते तसे बेसिक गरजा भागवल्यानंतर आयुष्य चांगलं , थोडं सोपं करण्यासाठीचे विचारही पटले.

पतंजलींच्या योगसूत्रातील पहिलेच सूत्र आहे: अथ योगानुशासनम. ओशोंच्या पतंजलींवरील प्रवचनात याचा विस्तृतपणे उहापोह केलेला आहे. त्यात 'अथ' याचा अर्थ काहीसा इथे जी गाडी,घर इ. झाल्यावर 'व्हॉट नेक्स्ट' अशी स्थिती येते, ती, असे ओशो सांगतात. थोडक्यात म्हणजे अशी स्थिती आली, की स्वतःच स्वतःला अनुशासनबद्ध करण्यापासून सुरुवात करत हळूहळू अष्टांगयोगाची साधना करावी, त्यातून संपूर्ण जीवनाला नवी दिशा मिळून ते अधिकाधिक सार्थक होइल, वगैरे. अर्थात हा विषय फारच मोठा आहे. 'कला' ही सुद्धा एक उत्तम दिशा.

या धाग्यावरची चर्चा बरीच रोचक होऊ लागलीय. अपेक्षेप्रमाणे काहीजण लेखकाच्या मानसिक गोंधळाशी सहमत आहेत तर बर्‍याच जणांनी त्यांची उत्तरे अगोदर शोधून ठेवलेली आहेत किंवा त्यांची अंमलबजावणीही सुरू केली आहे. बर्‍याच जणांनी "घर-गाडी-बँक बॅलन्स" याची तरतूद झाल्यावर काय काय करता येईल याबाबत बरेच छान मुद्दे पुढे आणले आहेत. अर्थात काही अपवादात्मक व्यक्ती सोडल्या तर "घर-गाडी-बँक बॅलन्स" हे तीन मुद्दे बहुतेक सगळ्यांच्या मनात पहिलेच असतात. असं मीच नाही तर मास्लोव्ह पण म्हणतो ;) मात्र आपले हे उद्दिष्ट्य साध्य झाले की मग काय ? असा विचार मनात तेव्हाच मनात येतो जेव्हा आपण मागच्या पिढीची स्वप्ने आपल्या जीवनात उधार घेतो... मूळ लोचा हाच आहे... तो असा: या लेखातल्या उदाहरणात पूर्ण झालेल्या सगळ्या गोष्टी ही "मागच्या पिढीची स्वप्ने" होती... कारण त्या काळातली कठीण परिस्थिती आणि उपलब्ध असलेली संधी पाहता मध्यमवर्गियाला "घर-गाडी-बँक बॅलन्स" ही स्वप्ने वाटण्याएवढीच कठीण गोष्ट होती. आजच्या काळात त्या गोष्टी जरी सहजशक्य नसल्या तरी खूप अशक्य नक्कीच नाहीत आणि त्या पुर्‍या केलेल्या ३० वर्षिय व्यक्तींची संख्या फार कमी तर नक्कीच नाही... हे तर लेखातच म्हटलंय ! याचा अर्थ लोचा परिस्थितीचा नाही... चुकीच्या स्वप्नांचा आहे. "अपयश नाही तर छोटे ध्येय हा गुन्हा आहे" (Low aim, not failure, is crime !) असे म्हणतात ते यासाठीच ! उपायः १. स्वप्ने पाहताना कंजूसी करू नका. बदलत्या काळात कालची स्वप्ने आजची सामान्य वस्तुस्थिती बनत असतात. आपल्या आईवडिलांची जुन्या काळची त्यांच्याबद्दलची (तुमच्या बद्दलची नाही !) स्वप्ने आपण आज लवकर वास्तवात आणली तर त्यात आनंद आहे पण ते अभिमानास्पद असेलच असे नाही. शिवाय त्यांनीच त्यांच्या खांद्यावर तुम्हाला उभे करून दूरवरचे क्षितिज बघायची संधी दिलीय. ते त्यांना न दिसणारे क्षितीज गाठा आणि त्यांना व स्वतःला चकीत करा ! आता जरा वेगळे विचार / उपायः २. मला काय करायचे / मिळवायचे आहे हे तर ठीक आहेच. आपण आपले प्रयत्न पणाला लावून अनेक गोष्टी मिळवतो. पण त्यामागेही आईवडिलांचा मोठा हातभार तर असतोच पण समाज-देश-जग यांचाही काहीना काही हातभार लागलेला असतोच... तर "घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावे" असा प्रयत्नही करायला हरकत नाही... जेवढा जमेल तेवढा, आपापल्या शक्ती आणि इच्छेप्रमाणे. हे सुख काही वेगळंच असतं ३. असं म्हणतात की हुशार माणसं आयुष्यात तीनदा तरी पेशा/व्यवसाय बदलतात ! एकच एक पेशा/व्यवसाय केल्यावर काही काळाने, विषेशतः आर्थिक स्थैर्य आल्यावर, माणसाला त्याचा कंटाळा वाटू लागतो. याचा अर्थ असा की त्या पेशा/व्यवसायाने सर्वात पहिली गरज पुरी केली आहे पण ती व्यावहारीक तडजोड होती. आणि त्यात वावगे असे फार काही नाही. जर शक्य असेल तर, अश्या बदलाच्या शोधाला लाग की ते काम करताना कंटाळा येणार नाही. खूप धमक असली तर तुमच्या एखाद्या छंदाला व्यवसायाचे रूप द्या... आयुष्यभर कंटाळा येणार नाही. महत्वाची सूचना: हा शेवटचा विकल्प अर्थातच जोखमीचा आहे आणि त्याबाबतचा निर्णय ज्याने त्याने केवळ पूर्ण विचार करूनच नाही तर व्यावसायिक कोष्टक (business plan) बनवून पूर्ण अभ्यासांती आणि आपल्या मगदुराप्रमाणे घ्यायचा असतो. हे केवळ डिस्क्लेमर नाही तर वस्तुस्थितीही आहे.

गोंधळाशी सहमत आहे. परंतू "व्हॉट इज द पॉईंट?" असा प्रश्न पडलेली ही आपलीच पिढी नाही. अगदी वेदांपासून ते अलिकडे नित्शे पर्यंत बर्‍याच लोकांनी लिहिलय यावर. "पॉईंट" प्रत्येकजण आपला आपला शोधून काढत असतो. वरती क्षीरसागरांनी म्हणलय तसं काही लोक आध्यात्मात उत्तर शोधतात (हा टॉलस्टॉयचा अ‍ॅप्रोच होता). तर काही लोक कलेमध्ये. एकच-एक उत्तर देता येणार नाही हे खरेच आहे. (अल्बेर कामूचे "द मिथ ऑफ सिसिफस" वाचले नसल्यास वाचा असे सुचवेन.)

आमची पिढी "मोठी स्वप्ने बघा" " नॉट फेल्युअर बट अ लो एम इज अ क्राईम" आणि "अंथरुण पाहून पाहून पाय पसरावे" ....." बेडकीने बैल होण्याची स्वप्ने बघु नयेत" "रोड लेस ट्रॅव्हल्ड" "महाजनो येन गता स पंथः" या असल्या द्वीधा मनस्थीत बर्‍याचदा आडकली आहे.

मुळात आपल्याकडे जी संन्यासाश्रम व्यवस्था होती ती सर्व संसारिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यावर यायची . म्हणजे त्यात आयुष्याचा बहुतांश वेळ जाणार असे कुठेतरी गृहीत धरले होते. पण हल्ली मुलांचे संगोपन सोडले तर बहुतेक (सर्व नाही पण बहुतेक ) गोष्टी या तिशीतच पूर्ण होतात . वरती अनेकांनी वाचन ,समाजसेवा , ई . पर्याय सुचवले आहेत पण वरती नगरी निरंजन म्हणतात तसे हे फारच वरवरचे आहे. किंवा समस्येचे simplification आहे. कारण माझ्यासकट अनेक जण या गोष्टी करत आहेतच . पण यासाठी फावल्या वेळातले छंद , १० ते ५, आणि फारस seriously न घेता आयुष्य मस्त एन्जॉय करायचे यापलीकडचा अजून काही option आहे का हे जाणून घ्यायला आवडेल . काहीजनाच्या प्रतिसादातून पण खूप चांगले मुद्दे मिळाले हे नाकारता येत नाही : )

जगणं आनंददायी, अर्थपूर्ण, सफल, आणि नो टेन्शनवालं करायला एकच ऑप्शन आहे... आणि ते फार सिंपल आहे. किंबहुना त्या ऑप्शनला फाट्यावर मारल्यामुळेच सर्व अडचणी सुरू होतात. त्या गुरुकिल्लीचं नाव आहे "प्रेम". जेंव्हा केंव्हा उपलब्ध क्षण व्हॉट नेक्स्ट म्हणुन आ वाचुन उभा असेल तेंव्हा लक्षात घ्या कि प्रेम फॅक्टर मिसींग आहे. त्या क्षणाला थ्री मॅजीक वर्ड्स वापरुन गच्च मिठी मारा, मग बघा तोच क्षण आनंदाचे किती दालनं उघडतो ते. असं करत करत या जन्मावर शतदा प्रेम करावे अशी अवस्था येते. चिल्ल मामु.

फोटोत काय असते? जन्म तारीख, मरण तारीख माझ्या फोटोत असेल जन्म तारीख आणि फॉरेवर. असे माझे साहेब म्हणायचे. वयाच्या ७५ वर्षी महत्वाकांक्षी प्रकल्प. किडनी स्टोन, ब्लड प्रेशर वर इतर मंडळी ची ऐसी की तैसी. दिवसाला कमीत कमी १५ कमीटेड. आयला हे व्हॉट नेक्स्ट म्हणजे काय असते?

प्रश्न पडणे हे एकाच वेळी चांगले आणि वाईट दोन्ही आहे असे वाटते. चांगले अशासाठी की असा प्रश्न पडतो आहे म्हणजे संवेदनशीलता जागी आहे! वाईट अशासाठी की लहान वयात असा प्रश्न पडूनही उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत तर आयुष्य नीरस, शुष्क, कंटाळवाणे वाटू लागते. कोणत्याही भौतिक सुखाने समाधान होत नाही. १९८० च्या आसपास जन्मलेल्या बहुतांश मध्यमवर्गीय पिढीचे आत्ताचे आर्थिक स्थान हे त्यांच्या आईवडिलांच्यापेक्षा सुस्थितीचे आहे असे समजायला हरकत नाही. त्यांच्या आईवडिलांपैकी एकाने किंवा बर्‍याचदा दोघांनी नोकरी करुन मुला-मुलींची शिक्षणे केली, त्यांना शिक्षणाबरोबरंच आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बरेचदा त्यांचे स्वतःचे आर्थिक स्थानही बर्‍यापैकी राखण्यात ती पिढी यशस्वी झाली, त्यामुळे निवृत्तीनंतरही आर्थिक स्वावलंबन टिकून राहिले. आर्थिक अवलंबित्व हा कुटुंबसंस्था एकत्र ठेवणारा एक मुख्य घटक असतो असे मला वाटते. आपल्याला कोणाची तरी गरज आहे, आवश्यकता आहे या जाणिवेतून एकत्र राहून मग तडजोडी केल्या जाऊ शकतात. एकमेकांना मदत केली जाते. वर उल्लेखलेल्या पिढीची(किंवा त्याच्या १०/१५ वर्षे आधी जन्मलेल्यांची बर्‍याचजणांची सुद्धा)एक अडचण अशी असते की आई-वडील स्वतंत्र असल्याने ते जवळ असून त्यात अवलंबित्व नसल्याने एकप्रकारचा तुटलेपणा, तडजोड न करण्याची वृत्ती बर्‍याचदा दिसते. "मी का म्हणून अ‍ॅडजस्ट करु? मला काय गरज आहे?" असे होऊ शकते. त्या पिढीने त्यांच्या आईवडिलांची, बर्‍याचदा कुटुंबातीला इतरांची लहान बहिणी, भाऊ यांचीही जबाबदारी घेतलेली असते. त्यासाठी कष्ट केलेले असतात. त्या सगळ्यात त्यांचे स्वतःच्या कुटुंबाचे (नवरा/बायको, मुले) यांची जबाबदारी घेऊन स्वतःचे घर, पैसा, निवृत्तीनंतरची सोय या सगळ्यात त्यांचे वय जवळपास पन्नाशी पार करुन जात असे. सतत काही ना काही ध्येय डोळ्यासमोर असेच (मग ते स्वखुशीने स्विकारलेले असो की जबाबदारी म्हणून तुमच्याकडे आलेले असो). शिवाय आयुष्य त्यामानाने एवढे धावपळीचे नव्हते. नोकर्‍यांना बर्‍यापैकी स्थैर्य होते, कामाचे तास ठराविक होते, सामाजिक सरमिसळ मोठ्या प्रमाणात घडलेली नव्हती त्यामुळे एका चाकोरीतून जात राहणे बर्‍यापैकी फायद्याचे होते. १९८० च्या आसपासच्या पिढीला शिक्षण मिळून नोकरीची वेळ आली तोपर्यंत आयटीसारखी नवीन क्षेत्रे खुणावत होती. ज्यात पगार भरपूर होते, कामाचे तास आणि ताणही जास्त होते, शिका, पाहिजे तिकडे जा असा आई-वडिलांचा पाठींबाही होता. 'एक या दो बस' मुळे घरच्या जबाबदार्‍याही अतिशय मोजक्या किंवा जवळपास नसल्यातच होत्या. सामाजिक सरमिसळ प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. संस्कारांची, मूल्यांची पडझड/बदल झपाट्याने होत होते. एकदा का शिक्षण होऊन नोकरी लागली की पैसा येत गेला. स्वतःचे घर असावे या जाणिवेतून मग स्वतंत्र घराची मागणी सुद्धा जोर धरु लागली. मुलींचे शिक्षण आणि नोकर्‍या या मुलांच्या बरोबरीने असल्याकारणाने त्यांनाही स्वतंत्र घर असणे, घरच्या जबाबदार्‍या कमी असणे याची सवय झाली होती. अशा अनेक कारणांनी स्वत:ची नोकरी, घर, पैसा यापलीकडे जाऊन काही जग असते याची जाणीव हळूहळू पुसट होत गेली. यात त्या पिढीचा काही दोष आहे असे नाही तर सामाजिक अभिसरणाचा हा एक साईडईफेक्ट आहे असे मला वाटते. व्यवस्थित पैसा आणि स्वतःचे घर असल्याखेरीज लग्नाच्या बाजारातही मागणी कमी असणे हे कशाचे द्योतक आहे? त्यामुळे तुम्हाला काय वाटते किंवा मिळवायचे आहे यापेक्षा इतरांनी काय मिळवले आहे आणि त्यांना काय वाटते आहे हाच एकप्रकारे मापदंड बनत गेला/जातो. व्यवहारी जगात हे पूर्णपणे चुकवता येणे अतिशय कठिण असते परंतु तुमची नेमकी गरज काय आहे? कुठे थांबलात तर चालू शकेल? याचा अंदाज येणे फार महत्त्वाचे. तिशीतच गाडी, घर, पैसा हे सगळे होणे आणि तशी अपेक्षा असणे हे चूक आहे असे मला वाटते. प्रत्येक ट्प्प्यावर योग्य परिपक्वता येत गेली की ती ती गोष्ट मिळवण्याचा आनंद असतो. हल्ली मी बर्‍याचदा (विशेषतः आयटीमध्ये) ३० वर्षांचे मॅनेजर्स झालेले लोक बघतो. त्यावेळी मनात येते की मॅनेजर होऊन ५-१० माणसांची टीम सांभाळण्या एवढी परिपक्वता तिशीत येत असेल का? नुसते काम माहीत असून उपयोग आहे का? त्यामागचा माणूस वाचू शकण्याची पात्रता काही अनुभवानंतरच येते असे माझे मत आहे. तसे नसेल तर मग खाजगी आयुष्य आणि कामाचे आयुष्य यातल्या ताणांचे व्यवस्थापन नीट होत नाही आणि सगळीकडचाच ताण वाढत जातो. आयुष्य हे एकाचवेळेला अनेक अंगांनी फुलत जात असते. पहिली दहा वर्षे भरपूर पैसे कमवू, मग व्यायाम करु, त्यानंतर छंद जोपासू, मग सहलीला जाऊन घेऊ असे तुकड्या तुकड्यांनी आयुष्य जगता येत नाही. प्रत्येक टप्प्यावर अग्रक्रम बदलते असले तरी सगळेच मुद्दे थोड्याफार फरकाने विचारात घेत पुढे जाता आले तर ते संपन्न आयुष्य होते. यात कुठेतरी स्वत्:चे पोट पुरेसे भरले की इतरेजनांचाही विचार करायची फुरसत आपण ठेवायला हवी. त्याने निरपेक्ष देण्याचे समाधान मिळते. तो आनंद तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळवून देतो. आणखीन एक जाणवणारा मुद्दा म्हणजे शालेय आणि कॉलेजच्या शिक्षणासोबतच किंबहुना जास्त महत्त्वाचा असा व्यवहार शिक्षणाचा किंवा दुनियादारीचा अनुभव पुढल्या पिढीला देणे ह्यात मागल्या पिढीचे पालक बर्‍याचदा कमी पडले असे वाटते. आम्हाला कष्ट पडलेत ना मग तुम्हाला नको, हे चूक आहे. गाडीचे चाक हे रस्त्यावर असलेल्या पुरेशा घर्षणामुळेच स्थिरपणे चालू शकते अन्यथा अगदी गुळगुळीत रस्त्यावर जरा ब्रेक लागला की गाडी घसरलीच! या नव्या पिढीची मानसिक ताण सहन करण्याची क्षमता, अडचणींना तोंड देण्याची क्षमता, मनाविरुद्ध गोष्टी झाल्या की त्यातून मार्ग काढण्याची क्षमता या कमी तर झालेल्या नाहीत ना अशी शंका येते. अडचणी या येणारच आणि त्या सोडवण्यातच आयुष्याचे यश आहे हा गाभा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत भकास आणि मोकळे वाटत राहणार. कोणतेही सुख चटकन न मिळता थोड्याफार अपयशातून, अडचणींमधून मिळते तेव्हा त्याची लज्जत, किंमत आणि आनंद फार वेगळ्या दर्जाचा असतो. वरती पेठकर काकांनी, इस्पिकचा एक्का यांनी आणि इतरांनीही अतिशय चांगले मुद्दे मांडले आहेत. त्या मुद्यांचा विचार व्हावा आणि त्यातून मार्ग सापडावा ही सदिच्छा! खूप दिवसांनी एक चांगली चर्चा वाचायला मिळाल्याचे समाधान वाटले.

वरील चर्चेत फक्त आयटीत अचाट आणि अफाट कमाई करणार्‍या पिढीचाच विचार झालेला दिसतो आहे. किंवा निदान तिच जमात डोळ्यासमोर दिसते आहे. पण प्रत्यक्षात आय टी व्यतिरिक्त फार मोठा तरूणवर्ग महागाईशी, राजकिय, सामाजिक परिस्थितीशी झगडताना दिसतो. लग्नाचे वय झाले पण वेगळी सदनिका नसल्याने किंवा आई-वडिलांसमवेत राहण्याच्या इच्छेमुळे कित्येक तरूण मुलांची वये लग्नावाचून वाढताना दिसत आहेत. शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, चर्चा, आंतरजाल आदी माध्यमातून मुलींचा दृष्टीकोन बदललेला जाणवतो आहे. खुपशा प्रसंगात मुलीच, आलेल्या स्थळांची छाननी करून मुलांना नाकारत आहेत. म्हणजे हा अधिकार फक्त मुलांनाच आहे असा माझा मुद्दा नाहिए. पण तिशीतच घर, गाडी घेणारे, घेऊ शकणार्‍या तरूणांचे प्रमाण किती आहे?
नोकरी, घर, पैसा यापलीकडे जाऊन काही जग असते याची जाणीव हळूहळू पुसट होत गेली. यात त्या पिढीचा काही दोष आहे असे नाही तर सामाजिक अभिसरणाचा हा एक साईडईफेक्ट आहे असे मला वाटते.
मला वाटतं, संगणकाद्वारे एकतर्फी ज्ञानाचा आणि मनोरंजनाचा बदाबदा कोसळणारा धबधबा, ज्यात 'विचार' करायला फार कमी असणारा किंवा अजिबात नसणारा वेळ ह्याने एकतर स्वतः विचार करण्याची सवय हरवली आहे. तसेच आंतरजालावर॑ व्यक्ती समोर नसल्याने तसेच नांवेही खरी नसल्याने कसेही बोला/लिहा आणि आपल्या वैफल्याला वाट करून द्या. शाब्दीक आसूड ओढून असूरी आनंद मिळवा ह्या सवयीत क्षणैक आनंदासाठी जगायची सवय लागत गेली आहे. शाश्वत आनंदाचे मुल्यच कमी झाले आहे. त्याने आयुष्यात पोकळी निर्माण होऊन 'पुढे काय?' ह्या विचारांनी हातपाय गाळणार्‍यांची संख्या वाढते आहे. चांगली संगत, प्रत्यक्ष समोरासमोर मुद्देसुद चर्चा, चांगल्या विचारांचे आदानप्रदान, संवेदनशिलता आणि चराचरावरील प्रेम ह्या मुल्यांच्या आधारे आयुष्य सुकर होईल, असे वाटते.

विषयाचा आवाका फार आहे. आयटी व्यतिरिक्त समाजाचा मोठा वर्ग हा फारच भीषण वास्तवातून जातोय हे खरेच आहे. उद्याच्या जेवणाची चिंता असलेल्या समाजाचं "व्हॉट नेक्स्ट?" हे खूप वेगळं आहे! :( परंतू इथल्या लेखाच्या अनुषंगाने जो प्रातिनिधिक मध्यमवर्गीय समाज मी डोळ्यांसमोर घेतला त्यानुसार वरची प्रतिक्रिया होती.

खूप दिवसांनी एक चांगली चर्चा वाचायला मिळाल्याचे समाधान वाटले.
सहमत. ही चर्चा पुढे चालत राहून या मुद्द्याच्या वा लोचाच्या सगळ्या अंगांवर प्रकाश पडावा, जे काहीसे गोंधळात आहेत त्यांना भक्कम आधार, मर्गदर्शन आणि दिशा मिळावी.

सततच्या स्पर्धात्मक्तेने आता चेलेंज हे चेलेंजही वाटतच नाही.... मग वोट नेक्स्ट वाटणार नाही काय ? यश अपयश या गोष्टी आता कमालीच्या यांत्रिक झाल्यात तेंव्हा उगा हे राहीलय ते राहिले म्हणताना खरच या राहिलेल्या गोष्टी किती मिस होतात याचा विचार केला तर उत्तर विशेष नाही हेच असते. काहीही मिस हॉट नाही तेव्हांच नोस्टेल्जियाचा आधार घेउन आमच्या वेळी यांव अन त्यांव करावेसे वाटते... :(

भाऊ, हेच एग्झॅक्ट दुखणं आहे. आयुष्य हे जगण्यासाठी आहे. आपल्या नशीबाने विचार करणारा माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत हे लक्षात घ्याल त्यादिवशी जगण्याची, आयुष्याची खरी किंमत कळेल. नाहीतर घरात मांजर कुत्रे फार काय मुंग्या आणि पालीसुद्धा त्याच त्याच गोष्टी करत वर्षानुवर्षे जगत असतात. त्यांना कंटाळा आल्याचे कुणी पाहिले आहे? कंटाळा आणि वैफल्य हा फक्त माणसाला भेडसावणारा प्रश्न दिसतो आहे. तसेही इथे येणारे बहुसंख्य लोक हे आयटीत किंवा तत्सम क्षेत्रात काम करणारे आहेत. हा लेख त्या पिढीचे बर्‍यापैकी प्रतिनिधित्व करतो; पण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या कितीशी आहे? खेडेगावातील अल्पशिक्षित, कामगार वर्गातले, शेतकरी यांना यापेक्षा मोठे प्रश्न पडतात. उद्याचे जेवण कुठून येईल? पाऊस पडेल का? शेतीमालाला बरा भाव येईल का? त्यांना असले सगळे विचार म्हणजे चैनीची बाब आहे. कलेच्या क्षेत्रात काम करणार्‍या अभ्याचा प्रतिसाद पुरेसा बोलका आहे.

कंटाळा आणि वैफल्य हा फक्त माणसाला भेडसावणारा प्रश्न दिसतो आहे.
अर्थातच. कारण यांत्रिकतेचा तिटकारा मानवच करू शकतो. म्हणुनच विचार(आणि त्या बरहुकुम कृती) करायची क्षमता खरच कितपत वरदान आहे हां प्रश्न तेंव्हाच आ वासून उभा राहतो जेंव्हा विचार केल्याने प्रश्न संपूर्ण सुट्त नसतात हे समजते. अभ्याचा प्रतिसाद वाचला आहे! तरतरीत प्रतिसाद आहे. माझी टुडू लिस्ट त्याहुन भयंकर अन मोठी आहे पण प्रश्न हां आहे की यातल्या किती गोष्टी फार मिस करेंन ? PHP यांवे म्हणून अभ्या असा किती जीव ओतणार आहे ? तसे असेल तर मीच त्याला 1 वर्षात दृपलसाराखे फ्रेमवर्क फ्रॉम स्क्रेच लिहायला तरबेज करेन म्हणतो. पण प्रश्न त्याची टुडुलिस्ट तो खर्च किती मिस करतोय ? थोडक्यात एक्विलिब्रिअम अवस्था थोड्याफार फरकाने त्याचीही झालेली आहेच.... किंबहुना बहुतांश प्रतिसदकांची तीच अवस्था आहे... कोणी ते मान्य करतेय, कोणी तीला समजुन घेतय, कोणी अस्वीकार करतय, या प्रकारे आपले मन प्रकट करते आहे... परन्तु कृतिमधुंन या अवस्थेपासून कोणीही दूर भासत नाही

त्यातल्या किती गोष्टी मिस होतील याचे उत्तर देणे कठीण आहे. प्रत्येकाचे उत्तर वेगवेग़ळे असू शकेल. पण करायला किती ऑप्शन्स आहेत याचा काहीतेरी पॉझिटिव्ह विचार तरी डोक्यात राहतो ना! तसे तर जीवनावश्यक गोष्टी मिळवणे हेच आयुष्यात आवश्यक असते. पण आपण केवढा पसारा गोळा करतो. हमको मालूम है जन्नत की हक़ीकत लेकिन दिल को खुश रखने को ग़ालिब ये ख़याल अच्छा है!

पण एखादी गोष्ट नेमकी शब्दबध्द करणे वा शांतपणे मुद्देसुद मांडने हां माजा प्रांत नाही(मला दंगा करणे, विषय अनावश्यक भरकटवणे, उध्दार करूँ समोरच्याला शांत करणे च साध्य आहे) म्हणून agree to disagree इतकच बोलुन रजा घेतो, रच्याकने मी नाउमेद वगैरे अजिबात नाही हे नक्की.

छान लेख. दिग्गजांचे प्रतिसादही वाचनीय. प्यारेच्या पैसाताईंचे वय शोधण्याच्या प्रयत्नाला विशेष दाद ;)

आयला, असा पण अर्थ निघतोय काय? स्त्रिया १६ च्या पुढे सरकत नाहीत असा प्रवाद आहे, न मानल्यास वाद होतो.

१. आली लहर केला कहर... २. होवुदे तोटा भाऊ आहे मोठा.. ३. चर्चा तर होणारच होवु दे खरच... ४. एकच फाइट वातावरण ताईट ... ५. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत... 6. बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन... ७. मुलींचा दावा आहे ...... भाऊ छावा आहे... ८. एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे ९. .... भाऊ तुमच्यासाठी काय पण... १०. भाऊची डेरिंग कालपन ,आजपन,उद्यापन...... ११. आला कंटाळा केला घोटाळा... १२. अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच. १३. पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे. १४. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात. १५. असेल औकात.. तर भेट चौकात...

ऐन तिशीतच पुढे काय? असा प्रश्न पडनार्‍या नविन पिढीला काय म्ह्णावे? मोठे ध्येय नसल्याने असे होत असावे... रामरक्षेची जागा आता Android ने घेतली, त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली.... . माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण, मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन. . पुस्तकाची PDF झाली,रोज वेगळा BF अन रोज नवी GF आली... प्रगती होतेय सांगत घडणारी / बिघडणारी नवीन Online पीढ़ी आली... . अंगठे दुखतायत आता Type करून मानसं भेटतायतं आता Skype वरुन... . पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता, काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता... . मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय, Android Market मध्ये Temple Run जो आलाय... . व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected', पण शेजारधर्म 'Was Totally Disconnected'... . आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता, 'देव देव' काय करता,पूजा करायचं पण App आलाय आता.... . या 'Technology' मागे पळता पळता, लोकांनी पळणंच बंद केलय आता.... . विसरले सारे चव आईच्या भाजीची,शुर गाथा शिवाजीची, साथ पसरलीय सावध रहा Latest आलेल्या 'Technology' ची... वाट लावून टाकील भिका पाटील

>> कंपू असेल पाठिशी,तर १००प्रतिसाद गाठिशी! ते दिवस गेले.... रे जिकडे तिकडे मालक वा कंपन्या बदलतात पण चपराशी मात्र परमनंट होतात. ममो असो व नमो चपराशी तेच

अमोल उद्गिरकर यांनी छान विचार करायला लावणारे निरीक्षण मांडले आहे. तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?" सहज एक विचार मनाशी करून पहावा... माझ्या आजोबांचा प्रचंड मोठा वाडा जमीनजुमला होता. त्यामानाने वडिलांचे घर छोटे होते. माझे घर त्याहूनही लहान आहे. तर मागच्या पिढीच्यापेक्षा मी अधिक संपन्न कसा !

छान लेख पण इतक्या लौकर हा प्रश्न कसा काय पडतो बुवा ? आम्हाला अजून बर्याच गोष्टींवर लव करायचं आहे या जन्मा वर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

ज्या समाजाने भौतिक सुखाची ध्येये ठरवून दिली आणि माणसाकडच्या खेळण्यांवरून त्याची किंमत करायला शिकवली, ती खेळणी तर आम्हाला मिळालीत; पण त्या भानगडीत आम्ही एका माईंडलेस कन्झुमरिझमच्या चक्रात अडकलोय आणि त्यात काही राम नाहीय हे कुठेतरी जाणवायला लागले आहे. त्यातूनच सतत घाईचे, सतत बदलणारे आयुष्य आणि त्यातूनच हा नॉस्टॅल्जिया (आणि प्रसंगी रिग्रेशन) निर्माण झाला आहे.