आसं बगा ते शुक्र आणि गुरू मंदी कमीतकमी ७८ कोटी व जास्तीतजास्त ११७ कोटी किलोमीटर अंतर आस्तया. उगाच फुड्च्या तितल्या यानाच्या फेरीत गफ्लत व्ह्वू नै म्हूनशान सांगिटलं ;)
=)) =)) =))
बाकी आमच्या मते तरी हा स्त्रीवाद्यांचा डाव आहे. ते विंग्रजीत म्हणतात ना, पुरुष सगळे मंगळावरचे अन बायका शुक्रावरच्या? म्हणून त्यांनी स्वतःचा ग्रह सगळ्यात मोठा मानला ;)
हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि...
भारतातली गरिबी+क्रिश३ चा गल्ला+निवडनुकिवरचा खर्च+क्रिकेटवरचा खर्च + पतंगावरचा खर्च+दिवाळीच्या फटाक्यांचा खर्च+गणपतीची वर्गणी+तुमचा आमचा खर्च+नेत्यांचे जीवन+सिनेतारकांच्या पार्ट्या+...
अरे काय चाल्लय काय, उचलले बोट आणि काढला धागा...
पण खात्री आहे कि हा विनोदी धागा आहे...म्हणुन फक्त प्रतिसाद सन्ख्या वाढवतोय..
वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण म्हणून बाकी प्रगती करायचीच नाही का? हे प्रकार खर्चीक असतातच! लोक गरीब आहेत, दोनवेळचे अन्न नाही, शौचालये नाहीत इ. प्रश्न सगळे निकालात काढून मगच आम्ही बाकीचा विचार करू असे ठरवले तर झाले कल्याण! जे गरीब आहेत त्यातले ५० टक्के लोक हे विचारी आहेत (असे धरून चालू)त्यांनी (वैध मार्गाने)गरिबी हटाव कार्यक्रम आपल्या कुटुंबापुरता कितपत हाती घेतलाय? पाणी नसलेल्या गावांनी पोपटराव पवारांकडून मार्गदर्शन घेण्याचा विचार केलाय का? अपल्या गल्लीत होणारे जातीय दंगे थांबवणे आपल्याच हातात आहे हे कितीजणांनी मान्य करून कृती केलीये (ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान टळेल)? यातलं कणभरही आपल्यापुरतंही करायचं नाही अन् मोहिमा थांबवायच्या याला काय अर्थ आहे? वाईट, आळशी लोकांसाठी दुसर्यांनीही आपली बुद्धी गंज चढवत ठेवायची. हेच शास्त्रज्ञ नंतर परदेशी निघून गेले की ब्रेन ड्रेनचे हळ्हळणारे विचार करायचे. समाजात सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी जागा आहे. गरिबांचा विचार गरीब बिच्चारे म्हणून होतो किंवा केल्यासारखा दाखवतात पण कित्येक बुद्धिवंत मुलामुलींना आपल्या देशात साजेसे, योग्यतेचे काम मिळत नाही. परदेशी जाण्याची संधी मिळेलच असे नाही. त्यांचे मानसिक हाल किती असतात याचा विचार कुठे केला जातो? त्यांचाही विचार व्हायला हवा. सगळ्या देशात गरीबी हटाव होईपर्यंत या बुद्धिवंतांनी काय करायचे? वाट बघत बसायची? असे असेल तर महाराष्ट्राने बिहार सुधारेपर्यंत वाट बघायला हरकत नाही. शेवटी देशबंधू आहेत ते आपले!
वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण म्हणून बाकी प्रगती करायचीच नाही का?
माझा कोणत्याही प्रगतीला विरोध नाही, देशातल्या कोणत्याही व्यक्तीचा देखील प्रगतीला विरोध नसावा ! पण ज्या मूलभुत सुविधा आवश्यक आहेत त्या नसताना मंगळावर यान पाठवुन फायदा काय ? रस्ते नसलेल्या देशात नक्की ही कुठली प्रगती ?
@ बॅटमॅन
५ रुपयात पोटभर जेवण मिळते हा क्रूर विनोद ज्या देशात सहजते ने केला जातो... तिथे हा धागा विनोदी वाटल्यास दोष नसावा !
रस्ते नसलेल्या देशात नक्की ही कुठली प्रगती ?
प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत असते ना! संशोधन हा प्रकार (बर्याच क्षेत्रातले) खर्चीकच असतो. काही प्रगती कुटुंब पातळीवर, काही गावपातळीवर, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपात असते तशी ही जगाच्या पातळीवर आहे. पातळी बदलली की खर्चाचे प्रमाण बदलते, किंवा (बरेचदा) बदलायला हवे. कित्येक गावांनी आपाला पाण्याचा, विजेचा आणि रस्त्याचा प्रश्न श्रमदानाने सोडवलाय की! आता मी फार याबाबतीत बोलत नाही कारण यातली कोणतीही गोष्ट मी केलेली नाही. एक दोनदा पुण्यात असताना आमच्या सोसायटीपुरता प्रयत्न म्हणून काही गोष्टी कराव्यात असे मनात येईपर्यंत दहा नकारच आले. उदा. सोलर पॅनल्स ब्सवणे, आमच्या एरियातील वीज बिले, घरांचे टॅक्स भरताना तिथे मिळणारी सेवा सुधारावी म्हणून काही विचार केला होता पण प्रतिसाद फारसा मिळाला नाही. निदान आपल्यापुरते काही प्रश्न चाम्गल्या मार्गाने सोडवण्याचा विचार होता. आता तर ऑनलाईन होतात ही कामे म्हणून ठीक आहे. त्यावेळी तसे नव्हते.
प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत असते ना!
ज्या देशात माणसांठी रस्ते नाहीत तिथे मंगळयान काय कामाचे ? प्रश्न खर्च किती होतो ते महत्वाचे नसुन तो कोणत्या कारणासाठी केला जातोय आणि त्याने सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडतो या बद्धल आहे.
बरं ठीक आहे. आपण आधी रस्ते बांधणी हातात घेऊ. त्यासाठी जे बजेट असते तेवढ्याच खर्चात ते काम होईल असे तुला वाटते का? ही कंत्राटे कशी मिळतात, कोणाला दिली जातात हे वेगळे साम्गावयास नको (त्याचं डिट्टेलवार वर्णन करू शकेन इतकं लहनपणापासून हेच बघितलय पण बोलणे अवघड आहे ना). एवढे करून रस्त्यांचं आयुष्य किती असतं? म्हण्जे परिस्थिती जैसे थे झाली ना!
म्हण्जे परिस्थिती जैसे थे झाली ना!
अगदी बरोबर ! मग अशा देशाचे मंगळ अभियान सुद्धा काय कामाचे ? कारण शेवटी परिस्थीती जैसे थे अशीच राहणार ना ?
अमेरिका देखील असाच उध्योग करते,पण तिथे रस्ते हे रस्त्यां सारखेच असतात ना ? तिकडच्या लोकांना श्रमदान करावे लागते का ?
काही अंशी सहमत आहे.
पण अशा प्रत्येक गोष्टींचा विचार केला तर मग नक्की कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे ठरवणे अवघड होते.
उदा :
अन्न हवे.संरक्षणावर खर्च कशाला हवा आहे
आरोग्य हवे आहे. रस्ते बांधणीवरचा खर्च कशाला करताय
सर्वाना शिक्षण हवे आहे. विमानतळासाठी खर्च कशाला?
हा विचार निवडणूकीतील सवंग भाषणांसाठी ठीक आहे. जनतेला असे विचार भावतात.
या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.
उदा देशाच्या सुरक्षेसाठी अद्ययावत सैन्यदल हवे. सर्वांगीण आरोग्यासाठी संशोधन तसेच औषध निर्माण उद्योग असायला हवेत. औषधे इकडेतिकडे नेण्यासाठी रस्ते हवेत. रस्ते बांधणीसाठी वाहन उद्योग , सिमेंट उद्योग हवेत्.लोकाना शिक्षण हवे त्यासाठी संशोधन हवे. हे सगळे असेल तरच एकात्मिक विकास शक्य आहे.
बर्याचदा एखादे संशोधन कशासाठी आवश्यक आहे असा प्रश्न पडतो. कदाचित त्यावेळेस ते संशोध आणि तदनुषंगीक उद्योग हे बाल्यावस्थेत असतात. उदा: इलेक्ट्रीक एनर्जी निर्माण करणार्या मायकेल फॅरॅडे ला विचारले गेले होते की विद्युत शक्तीचा उपयोग काय? त्याने उत्तर दिले होते की नवजात बालकाचा तरी तसा काय उपयोग असतो? पण आज आपण बघतो बहुतेक जग विद्यूत उर्जेवर अवलंबून आहे.
अनेक संशोधने ही त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला उपयोगी नव्हती मात्र त्यानंतर त्याचा मानवाला जीवनमान सुधारण्यासाठी खूपच उपयोग झालेला आहे. उदा :मायक्रो ओव्हन, मोबाईल , कम्युनिकेश क्रान्ती इत्यादी.
देशावरचे कर्ज आणि संशोधनावर होणारा खर्च यांचा परस्पर संबन्ध लावणे हास्यास्पद वाटते. अमेरीकेला आपल्यापेक्षा जास्त कर्ज आहे.म्हणून त्यानी नासा वर होणारा किंवा सी आय ए वरचा खर्च हा कधीच कमी केला नाही.
कर्ज होईल म्हणून एखादी गोष्टच टाळणे हा पलायन वाद होतो. काही कर्जे धरणे बांधण्यासाठी / रस्ते बांधण्यासाठी घेतली जातात. त्यांची परतफेड ही नीट प्लॅनिंग करून देश देतच असतो.
ज्या देशात माणसांठी रस्ते नाहीत तिथे मंगळयान काय कामाचे ?
हे विचारणे म्हणजे घरात दोन मुले असतील तर मोठा मुलाला ताप आलेला असताना धाकटा मुलगा जेवूच कसा शकतो असे विचारण्यासारखे आहे.
ज्या देशात माणसांसाठी रस्ते नाहीत त्या देशात..........
या गाळलेल्या जागा आयपील स्पर्धा हव्यात कशाला / ऑलिंपीक स्पर्धेत सहभाग कशाला / विमानतळ कशाला हवे / रणगाड्यांवर खर्च कशाला / अद्ययावत हॉस्पिटले कशाला / निवडणुकांवर खर्च कशाला / टीव्ही सीरीयल्स वर खर्च कशाला / क्रिकेट सामन्यांवर खर्च कशाला
असे अनेक प्रश्न विचारले जावु शकतात. ( या पैकी पहिला प्रश्न खरोखरच विचारकरण्याजोगा आहे.)
संशोधन हे त्याच्या जागेवर असते. इतर प्रश्न त्यांच्या जागी. एकमेकांत सरमिसळ करु नये
आपले लोक टीनपाट क्रिकेट टीम खरेदीत ह्या पेक्षा जास्त पैसे लावतात, त्यांना शिकवायला हवं हे सगळं. जेवढे पैसे या मोहिमेवर खर्च झालेत तेवढ्यामधे आज हमरस्त्यांच्या रस्तारुंदीकरणाची काँट्रॅक्टपण घेत नाहीत ठेकेदार.
बरं हे पैसे कुठल्याही जीवनावश्यक, पायाभूत, मूलभूत वगैरे काय असते त्या सगळ्या गोष्टींना ढीगभर पैसे उपलब्ध करून उरलेल्या पैशांचे जे विज्ञानविषयक तरतूदींसाठी राखीव बजेट केले जाते तिथून येतात. त्यामुळे गरीब, गरजू वगैरे वगैरेंनी वाईट वाटून घेऊ नये. त्यापेक्षा त्यांनी कचरा कचरापेटीत टाकणे, त्याची विल्हेवाट निट लावली जाते का हे पहाणे, साधे सोपे नियम न मोडणे आणि करचुकवेगिरी न करणे इतक्या साध्या गोष्टी केल्या तरी पुरे.
तुमचा पहिला मुद्दाच परत वाचलात तर लक्षात येईल की या मोहिमेचा उद्देश फक्त क्षमता दाखवण्याचा नसून त्यातून आर्थिक नफा कमावण्याचासुद्धा आहे. आज आपण ज्या सगळ्या टेक्नॉलॉजीज वापरतो त्या सगळ्या अशा स्पेसरेस आणि टेक्नॉलॉजी रेसेस मधूनच जन्माला आल्यात. जेव्हा आपले उपग्रह पृथ्वीच्या कक्षांमधे स्थापित करण्यात येत होते तेव्हाही आपल्याकडे गरीब होतेच पण म्हणून तेव्हा ह्या गोष्टी थांबवल्या असत्या तर आपली इतर पिछाडीवर राहिलेल्या देशांप्रमाणेच आपली अवस्था असती (कदाचित असल्या गप्पा मारायला स्वस्त इंटरनेट, फोनही उपलब्ध झाले नसते)
हे असले जळकू लेख अमेरीकन, युरोपिअन पत्रकारांनी लिहीले तेव्हा गंमत वाटली होती. पण आपलेच लोक जेव्हा असे लिहीतात तेव्हा मात्र वाईट वाटते.
याऐवजी मंगळावर सोने सापडले तर? असा विचार करा.
खुप खुप वर्षांपूर्वी या देशाला आधुनिक शस्त्रांची गरज काय असा एका महान नेत्याने विचार केला. हा विचार किती "बरोबर" होता हे आपल्या हुशार शेजार्याने लागलीच दाखवून दिले होते.
जरी समजा सोने मिळाले तर त्यावर हक्क कुणाचा असेल? इंधनासाठी आधीच कुरघोड्या चालल्यात.. आणी इंधन मिळाले तरी ते तिथले इंधन आपण इथे वापरणार कसे?
भारताने शोधले म्हणुन इतर देश (उदा- अम्रिका, रश्या) गप्प बसतील?
असे प्रकल्प जाहीर हेतूंखेरीज खेरीज प्रामुख्याने महत्वाच्या लष्करी आणि देशाच्या सुरक्षा-संबंधी संशोधनासाठी राबवले जात असतात, हे नमूद करू इच्छितो.
दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव इ. च्या संशोधन मोहिमांमधेही हा महत्वाचा भाग असतो.
असे प्रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत.
युद्ध आणि त्यासंबंधित संशोधन, यातून 'सामान्य नागरिकांच्या' दैनिक जीवनास अतिशय उपयोगी असे तंत्रज्ञान निर्माण केले गेले असल्याचा इतिहास आहे.
कदाचित ओकांसारखे सैन्यात दीर्घकाळ काम केलेल मिपाकर, आणि विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील मिपाकर यावर प्रकाश टाकू शकतील.
असे प्रकल्प जाहीर हेतूंखेरीज खेरीज प्रामुख्याने महत्वाच्या लष्करी आणि देशाच्या सुरक्षा-संबंधी संशोधनासाठी राबवले जात असतात, हे नमूद करू इच्छितो.
दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव इ. च्या संशोधन मोहिमांमधेही हा महत्वाचा भाग असतो.
असे प्रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत.
युद्ध आणि त्यासंबंधित संशोधन, यातून 'सामान्य नागरिकांच्या' दैनिक जीवनास अतिशय उपयोगी असे तंत्रज्ञान निर्माण केले गेले असल्याचा इतिहास आहे.
माझ्या माहिती नुसार लष्करी उपग्रह पूर्णपणे वेगळे आणि वेगळ्या क्षमतेचे असतात... कुठल्याही डिफेन्स रिलेटेड प्रकप्ला बद्धल ही मोहिम नक्कीच नाही.तसेच हा रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत हे ठावुक असल्यानेच असे प्रश्न प्रकर्षाने विचारावेसे वाटतात.
ही माहिती अति गोपनीय असल्याने तुम्हा-आम्हापर्यंत कधीच पहुचत नाही. अश्या काही महत्वाच्या प्रकल्पाशी संबंधित काही उच्च अधिकारी, संशोधक परिचयात होते, पण ते या बद्दल अवाक्षरही बोलत नाहीत, असा अनुभव आहे. अमेरिकन एम्बसीत अनेक वर्षे काम केल्याने याबद्दल थोडासा अंदाज आहे, एवढेच. म्हणजे परदेशी वकिलाती, मोठ्या संशोधन मोहिमा या हिमनगाप्रमाणे असतात. त्यांच्या कामापैकी फार थोडा भाग जाहीर असून मुख्य भाग गोपनीय असतो.
आपल्याला उघडपणे दिसते, त्यापेक्षा जग फार वेगळे, गुंतागुंतीचे, गोपनीय, अकल्पनीय, अद्भुत, खतरनाक आणि अज्ञात असते राव. हे सर्वच बाबतीत खरे आहे.
रस्ते वा अन्य सुविधांसाठी मंजूर होऊन खर्च होणार्या रकमेचा मोठा हिस्सा विविध लोकांच्या घशात जात असल्याने आपल्या इकडे त्या समस्या वर्षानुवर्षे तश्याच रहातात, त्या तशाच राहू देण्यातूनच दर वर्षी नवी कंत्राटे दिली जाऊ शकतात, हे सर्वविदित आहेच.
माहिती अधिकाराचा उपयोग करून याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे सुचवतो.
जिथ सधन व्यक्ति हि दारिद्ररेषेखालील योजनेत नाव लागव म्हणुन धडपडतो तिथ गरीबी सारखा प्रश्न कधि सुटण्याचा सुतराम शक्यता वाटत नाहि . त्यामुळे सर्वच आघाडीवर योग्य ते पाऊल उचलेच पाहिजे
जगातले बरेचसे लोक पीडित वा गरीब राहातात कारण
दुसर्यास गरीब ठेवणे ही एक मूलभूत मानवी विकृती आहे.( प्रेरणा म्हणा हवं तर ! )
बरेच जण आळशी, कल्पना शून्य असतात . म्हणून वरील मूलभूत प्रेरणेला खत पाणी मिळते.
या कारणे सामान्य लोकांचे हाल व श्रीमंत लोकांची चंगळ यात सनातन झगडा होतो. विशेष म्हणजे हा झगडा आहे असे
अति गरीब व अति श्रीमंताना वाटतच नसते. आता सुद्धा पहा या मंगळ अभियानाला मुकेश्॑ अंबानीचा विरोध असणार नाही ना मोलकरणीचा. वरचा लेख लिहिलेले हे मध्यम वर्गीय आहेत यात सर्व आले.
आता सुद्धा पहा या मंगळ अभियानाला मुकेश्॑ अंबानीचा विरोध असणार नाही ना मोलकरणीचा.
स्वतःचे पोट भरलेले असले की कुठलाही इतर विचार सहज करता येतो... बरं इथे तुम्ही मुकेश अंबानीच्या विरोध करण्या बद्धल म्हणताय... जरा त्यांच्या बायकोच्या हल्लीच झालेल्या वाढदिवसात झालेला खर्चाचा आकडा शोधुन पहा बरं !
तुला काय करायचय त्या खर्चाशी? तू तुझ्या बायकोच्या वादीला १००० रुपये खर्च केलास तर बापरे किती हा खर्च म्हणणारे किती गरीब आणून दाखवू? मग तुझी बायको किंवा मी आणि माझ्यासारख्या लाखोजणी फक्त किराणामालाची बिले भागली आणि वर्षाला दोन कपडे मिळाले की खूष राहणार्या आहोत का? कालच झालेल्या दिवाळी पाडव्याला नवर्यांनी (आपापल्या, प्रत्येकी एक) बायकांना ओवाळणीत काय दिलय ते बघितलस तरी उत्तर मिळेल. (नाही, असा धागा मी काढणार नाही, खरी उत्तरे मिळण्याची अपेक्षा नाही, मीही तसे देणार नाही). (बाणा, आता माझा धागा आला की तू चार प्रतिसाद दे म्हणजे सहज १०० प्रतिसाद होतील).
तुला काय करायचय त्या खर्चाशी?
हेच म्हणतो मी काय उपयोग मंगळावर यान पाठवुन ? ;) बायडीला पाडव्याला खुष ठेवले तर दोन वेळ मला धड जेवायला मिळेल याची निदान खात्री तरी देता येईल ! ;) मंगळयान देइल का ती खात्री ? ;)
बाकी तू धागा काढच !
मला तरूण असताना गरीबांबद्द्ल कळवळा असे व श्रीमंताबद्द्ल चीड . आता असे वाटते की गरीबी वा श्रीमंती या काहीशा नशीबाने काहीशा वर सांगितलेल्या मूलभूत प्रेरणेने व काहीशा उद्योगी वा आळशी स्वभावाने येतात.
मंगळावर यान नेऊन एकच गोष्ट साध्य होईल. " आम्ही मंगळाला तुडविला आता पत्रिकेतील मंगळाला फेकून द्या बाजूला " अशी वैचारिक क्रांति होईल .( कदाचित) .
सगळे जग मूर्खाप्रमाणे सोन्याच्या मागे धावत आहे .पुराणकाळापासून सोन्याला चिकटलेल्या सगळ्या कविकल्पना बाजूला केल्या तर सोने केवळ एक चकाकणारा धातू आहे. पण या सोन्याच्या भ्रामक मोहापायी आपण भारतीय अब्जावधी डॉलर्स परकीय देशाना दान करत आहोत....!
दुसरे म्हणजे मन्गळावर सोने-चान्दी इत्यादी शोधण्यासाठी जायचे नसून भविश्यकाळात इन्धनाचे स्रोत ठरू शकणार्या अनेक वायू व मूलद्रव्यान्ची अतिशय महत्त्वाची माहिती मिळवणे हे एक महत्त्वाचे उद्दिशठ आहे .
इतरही अनेक उद्देश आहेत या मोहिमेपाठी . यास्तव भारताच्या सध्याच्या परिस्थितीत खर्चिक मन्गळ मोहीम राबवावी का? असा प्रश्न गैरलागू व अप्रस्तुत वाटतो.
प्रतिक्रिया
अतिशय विनोदी धागा. चालूद्या.
टेन्शन नको घेऊ सरकारचं,होऊ दे
(No subject)
इस्रोने वाघ पाठव्ला यानातून?
सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह
ते आहे हो, त्या मूळ लेखकाला
आसं बगा ते शुक्र आणि गुरू
येस्सार!!
एक्का काका त्या पोस्टर
त्याचा शुक्र वक्री असावा.
नाही त्याला शुक्रक्षय असावा....
=))
म्हणजे ते चित्र स्त्री (किंवा
शक्यता विचारार्ह आहे
च्याय्ला,
करतील, करतील, तसेही करतील
प्रथम ह्या धाग्याबद्दल..
+१११११११११
**
वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण
वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण
रस्ते नसलेल्या देशात नक्की ही
प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत
बरं ठीक आहे. आपण आधी रस्ते
म्हण्जे परिस्थिती जैसे थे
आणखी किती प्रयत्न करू माझे
ज्या देशात माणसांठी रस्ते
काही अंशी सहमत आहे.
रस्ते आणि यान संबंध ?
अतिशय सहमत !
अतिशय सहमत !
आपले लोक टीनपाट क्रिकेट टीम
मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर
याऐवजी मंगळावर सोने सापडले तर
जरी समजा सोने मिळाले तर
असे प्रकल्प
असे प्रकल्प जाहीर हेतूंखेरीज
गोपनीयता
+१००००००००००
:-)
अन्न सुरक्षा बीलामधली खर्चाची
This is our man!” “He can survive without water, food, light...
सनातन भाडण
ऑन डॉट.. +१११११११११११११११
आता सुद्धा पहा या मंगळ
तुला काय करायचय त्या खर्चाशी?
तुला काय करायचय त्या खर्चाशी?
बाणराव,
आपल्याला चंद्र तुडवता आला
सोने सोडा
Pagination