Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सुंदरच! >>>आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतर तत्वज्ञानांच्या मंदीरात शिरतांना तुमच्याकडे किमान काहीतरी बुद्धीमत्ता व तुम्हाला शिकवण्यास तयार असलेला गुरू ही आत्यंतिक गरज आहे. कबीराला व त्यापेक्षाही त्याच्या समोर असलेल्या आम जनतेला हे शक्यच नव्हते. त्यामुळे भक्ती हे एकमेव साधन कबीराने स्विकारले. महाराष्ट्रातही योगी ज्ञानेश्वर व पंडित वामन यांनीही हाच मार्ग अवलंबला. आणि >>>(६) या मार्गात "गुरू" हा घटक सर्वश्रेष्ठ होता, तो आणि फक्त तोच, तुम्हाला तारणारा असतो वरच्या दोन्ही मध्ये थोडा विरोधाभास वाटतोय का?

सुनो भाई साधो कहत कबीरा सुनो भाई साधो - या पालुपदात साधो शब्दाचा अर्थ मी साधक असा करतो, कारण फटकळ स्वभावाचा कबीर कुण्या साधूला उपदेश करण्याच्या भानगडीत पडणार नाही असे मी मानतो.

कबीरांच्या पदांत जी संबोधने आहेत, ज्यांना त्यांनी पुकारले आहे, त्यात एक सुसंगती आहे असे दिसते. ज्यांना त्यांची मते मान्य आहेत अशांना उद्देशून लिहलेल्या पदांत "साधो" वा "संत" असा उल्लेख येतो; भले पदांत अज्ञ जनांना उपदेश केलेला असो. इथे "आपल्या" माणसाशी बोलावयाचे असते. साधारण जनतेला उद्देशून केलेल्या पदांत "भाई" असा उल्लेख येतो. इथे त्याला आपुलकी दाखवून जवळ घ्यावयाचे आहे. ते जेव्हा "पंडित" वा "पांडे" असे म्हणतात तेव्हा कबीरांना पंडितांच्या भाषेत प्रतिवाद करावयाचा असतो. ते जेव्हा "जोगिया" ला पुकारतात तेव्हा दिसून येते की कबेरांचे अशा माणसाबद्दल फार चांगले मत नही. उलट "अवधू" ’अवधो", अवधूत" तेव्हा ते हटयोगी पंथातील माणसाशी त्यांच्या भाषेत बोलत असतात. त्यांनी या पंथात बरीच प्रगती केलेली होती. इथे समोरचा मार्गातील सहप्रवासी आहे. महाराष्टातील उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला लिहलेले पत्र. आपण पुढे जेव्हा कबीरांची पदे वाचाल/ऐकाल तेव्हा याकडे अवष्य लक्ष द्या. शरद