एक महत्वाचा विषय चर्चेला आला. अभिनंदन.
शरीरात जे महत्व रक्ताचं तेच आयुष्यात पैशाचं. त्याबद्दल जागरुक असणं आवश्यक आहेच. नौकरी पेशा करणार्यांपेक्षा ज्यांचे बिझनेस, दुकानं असतात त्यांच्याकडे मुलांना अर्थसाक्षर करण्यावर भर दिसतो... पारंपारीक बिझनेस कम्युनीटी, ज्यांना सिंधी-मारवाडी असे सर्वनाम दिलं जातं, तिथे हमखास हे आढळेल. तसं पाहिलं तर शैक्षणीक जीवनातच या ज्ञानाचा अंतर्भाव असावा... पण आपल्या शिक्षण व्यवस्थेत पीटी, नागरीकशास्त्र वगैरे विषयांना जो सन्मान मिळतो ते बघुन अर्थसाक्षरता घरातुनच सुरु झाली तर बरं असं वाटतं.
अर्थक्षेत्र - एक उपेक्षित क्षेत्र - एक उपेक्षित धागा वाटत आहे. :-(
कारण बहूतेक -
१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा ह्या बाबत सॉलिड परफॉर्मन्स असल्याने काहीही लोचा नसावा, समस्या संपली असावी असे उपलब्ध माहितीवरून दिसते आहे. व्हॉट्स नेक्स्ट? :-)
अवांतर - महत्त्वाचा विषय आहे पण बहुदा चर्चाविषय म्हणुन आवडत नसावा लोकांना.
@ सहज
१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा ह्या बाबत सॉलिड परफॉर्मन्स असल्याने काहीही लोचा नसावा, समस्या संपली असावी असे उपलब्ध माहितीवरून दिसते आहे. व्हॉट्स नेक्स्ट?
वास्तविक ज्यांच्याकडे पैसा आहे ती मध्यम वयीन पिढी (४०-४५)स्वतःतच मश्गुल आहे असे वाटते किंवा स्वतःच्याच कर्तुत्वाने हुरळून गेली आहे असे वाटते.मागच्या पिढीकडे लक्ष नाही आणि पुढच्या पिढीचा सुसंगत विचार नाही. शाळा, क्लासेस,ट्युशन,मोल्स,एम सी डी, सी सी डी ह्यातच ते गुंगले आहेत. अर्थसाक्षरता, संवाद कौशल्य वगैरे विसरून स्क्रींनपुढे बसणारी पिढी तयार होते आहे.मोबाईल, संगणक,tab तत्समची गुलाम पिढी होते आहे. संगीत, चर्चा, उत्तम लेखक गायक देणारी मराठी संस्कृती कुठे सरकते आहे? न्युक्लिअर कुटुंबव्यवस्थेची बीजे पेरली गेली आहेत आणि मग आमच्यावेळी असे नव्हते हा गळा काढण्यापलीकडे आपण काय करतो आहोत?
अर्थ साक्षरता म्हणजे काय असा प्रश्न भले भले विचारतात तेव्हा खूप वेदना होतात पण त्यात त्यांचा दोष नाही कारण त्यांचे आईवडील कसा संसार "चालवत" होते ते कधी त्यांनी सांगितले नाही आम्ही विचारले नाही आणि आता १०० पैकी ९० कथांमध्ये आई - वडिलांनी कसे आम्हाला घडवले ह्याबद्दल कृत्रिम, सहानभूती गोळा करण्यासाठीचे लेखन हजारो मैल लांब आपल्या आईवडिलांकडे लक्ष ना देता अनेक माध्यमातून लिहिले जाते
वर बरेच अवांतर झाले आहे कारण आर्थासाक्षर्ते बरोबर येणारे अनेक विषय आहेत जे टाळता येत नाहीत. असो.
लेखातील सर्व मुद्द्यांशी सहमत.....
आपण ज्या ओढीने दशहरा पाटीवर अंकांची सरस्वती काढून साजरी करतो तेवढ्या उत्साहात लक्ष्मी पूजन साजरे करत नाही. अपवाद मराठी व्यापारी वर्ग . जोपर्यंत money rolling आणि profit बुकिंग संकल्पना समजून अमलात आणत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे.
तळटीप - मी स्वतः सुद्धा सध्याच्या घडीला सुशिक्षित नोकर वर्गातील आहे पुढे बघू कितपत झेप घेतायेते स्व बळावर....
प्रतिक्रिया
अजून एक उत्तम लेख......
अर्थ साक्षरता आवश्यक आहेच.
समस्या नसावी
समस्या सुरु झाली आहे का?
लेखातील सर्व मुद्द्यांशी सहमत