Welcome to misalpav.com
लेखक: कुमारकौस्तुभ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

उत्सुकता वाढलीय . जाणकारांच्या प्रतिसादा ची वाट पाहतो

यासंबंधी महाभारतातले उल्लेख तर स्पष्टच आहेत. नंतर ही प्रथा बंद झाली तरी उत्तर भारतात पंजाबात मृत नवर्‍याच्या धाकट्या भावाशी लग्न करणे या स्वरूपात अलीकडे पर्यंत चालू होती. अद्याप चालू असेल तर माहित नाही. यावर आधारित राजेन्द्र सिंह बेदींच्या "एक चादर मैली सी " ची आठवण झाली. या कादंबरीवर आधारित एक उत्कृष्ट सिनेमा आला होता आणि त्यात हेमामालिनी आणि ऋषि कपूर यांची सुंदर कामे होती. इतर गोष्टींबद्दल चर्चा वाचायला आवडेल. पुत्रप्राप्ती हाच उद्देश दिसतो आहे. म्हणजे जर मुलगी झाली तर परतून नियोग करत असावेत. अशा मुलीच्या पालन पोषणात काही अडचण येण्याचे कारण दिसत नाही. जसे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केल्यावर द्रुपदाला २ मुले मिळाली. धृष्टद्युम्न आणि द्रौपदी. त्या दोघांनाही द्रुपदाची मुलेच म्हटले गेले.

लेखात उल्लेख केलेल्या नियोगसंततीला समाजमान्यता होती हे धाडसी विधान आहे का ? तसं असतं तर साधूने फळ दिलं, प्रसाद दिला वगैरेसारख्या कथा दिसल्या नसत्या. @ पैसा एक चादर मैली सी... अतिशय सुंदर सिनेमा. धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल माझ्या मित्राने उप्र मधल्या एका परंपरेबद्दल सांगितलं होतं. त्याच्या साईटवर एका कामगाराने तो बाप बनल्याबद्दल पेढे वाटले. तेव्हां दोघातिघांनी त्याला विचारलं कि वर्षभरात तू गावी गेला नाहीस तरी हे कसं झालं ? तेव्हां त्याने सांगितलंकि हमारे भाई लोग है न ! त्या वेळी नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडलो असल्याने या घटनेवर खूप हसलो. पुढे मित्राने थाप मारली कि काय असं वाटू लागलं. असं कुठं असतं का असं वाटू लागलं. नंतर प्रवास आणि वाचन यामुळे अनेक ठिकाणच्या अविश्वसनीय प्रथा कळू लागल्या. भारत काय चीज आहे हे कळलं. मग उप्रत जायचा योग आला. नेहमी जाणाने ओळखी झाल्या होत्या. तेव्हां मित्राच्या किश्श्याचा विषय ( जो अजूनही डोक्यात घोळत होता) काढला. तेव्हां त्याने जे काही सांगितलं ते मित्राच्या किश्श्याला पुष्टी देणारं होतंच, पण गरिबीतून येणा-या अपरिहार्यतेला आपण हसलो याबद्दल पश्चात्ताप करायला लावणारंही होतं. चार पाच भाऊ, बहिणी, आई वडील असं कुटुंब. शेतीचा तुकडा असला तरी तुटपुंजं उत्पन्न. ओला-सुका दुष्काळ. रोजगाराचा अभाव. अठरा विश्वे दारिद्र्य हा शब्दही या दारिद्र्याचं वर्णन करायला कमी पडावा. स्थानिक जमीनदार किंवा धनदांडग्यांची जवळपास राबवून घेण्याची वृत्ती. यातून मार्ग काढण्यासाठी कुटुंबातल्या एका सदस्याला मुलूखगिरी करावी लागते. त्याने पैसे पाठवायचे, त्यातून इतरांनी शेतीची कामं चालू ठेवायची. कधी कधी एकापेक्षा जास्त सदस्यही गरजेनुसार गाव सोडतात. येण्याजाण्याचा खर्च नको म्हणून ते सदस्य तिकडेच राहतात. वंश चालवण्यासाठी घरातील इतर सदस्यांकडून कार्यवाही केली जाते. ही प्रथा उप्र मधल्या काही भागात अस्तित्वात होती. आता (कदाचित इतर ठिकाणचं पाहून) त्यात फरक पडत चालला आहे. कामगार आता आपल्या जोरूला घेऊन शहरात येतात किंवा अधूनमधून गावाकडे जातात.

लेखात उल्लेख केलेल्या नियोगसंततीला समाजमान्यता होती हे धाडसी विधान आहे का एखादी प्रथा जेव्हा समाजात व्यवस्थित खोलवर रुजते वापरात आणली जाते तेव्हाच तिच्या संदर्भात निरनिराळे नियम घालुन देण्याची निकड निर्माण होत असते. शास्त्रकार यावर इतके नियम बनवितात व्याख्या निश्चीत करतात या सर्व गोष्टी एखाद्या समाजमान्यता नसलेल्या किंवा कमी प्रमाणात प्रचलित असलेल्या परंपरे बाबत घडत नाहीत. एके काळी तर कानीबालीझम ही सर्वत्र ( सर्व जगांत) प्रचलित होता तर नियोग कोणती मोठी गोष्ट आहे ?

छान लेख! .. काही वर्षांपूर्वी याच विषयावर अमोल पालेकरांचा "अनाहत" हा पिक्चर आला होता. सोनाली बेन्द्रे-बहल'ने त्यात राणीचा रोल केला होता. (बहुधा) गिरिश कर्नाड'जींनी राजाचे काम केले होते. पण या पिक्चरमध्ये नियोगासाठी जो पुरुष दाखवला होता, तो राजाच्या सगोत्र वंशातला वगैरे नव्हता. फक्त तो सशक्त, निरोगी असावा, अशी राजाची अपेक्षा असल्याचे दाखवले होते...........

ओह.. येस्स... राजाचे काम 'अनन्त नाग'जींनी केले होते. बहुधा दीप्ती नवल देखील आहे मूव्हीमध्ये... दीड तासाची एक सुन्दर मूव्ही!!!! ... :)

जाणकार म्हणजे श्रॄती, स्मृती, पुराणांची माहिती असलेले हो.
धत्तेरेकी!! म्हणजे आम्ही यातून बाद झालो. आम्ही आपले कळ-फलक सरसावून बसत होतो.

आजच्या काळात हि अशी गुंतागुंत निर्माण करण्याची गरजच नाही. शुक्राणू पेढया (स्पर्म बैंक ) सर्वत्र उपलब्ध आहेत. तेंव्हा बर्याच पुरुषांच्या वीर्यापासून तयार केलेले(pooled) शुक्राणू वापरून कृत्रिम गर्भधारणा करता येते त्यात विविक्षित एका पुरुषाचे शुक्राणू वेगळे काढता येत नसल्यामुळे मुलाच्या पितृत्वावर दावा ठोकण्यासाठी कोणी येत नाही. आणि स्त्रीची कोणतीही भावनिक गुंतवणूक न झाल्याने पुढची गुंतागुंत टळते. शिवाय यौनशुचीता(तथाकथित) राखल्याने त्या स्त्रीचा नवरा सुद्धा खुश असतो. बाकी स्त्रीला पुरुषसुख(नियोग वगैरे) मिळवायचे इतर मार्ग आहेत पण तो इथला विषय नाही.

स्त्रीची कोणतीही भावनिक गुंतवणूक न झाल्याने पुढची गुंतागुंत टळते
या एकाच वाक्यात डॉक्टरांनी धाग्याचा "विनियोग" केला आहे.( त्यापुढच्या वाक्यावर बोलायला नवा 'आयोग' नेमावा लागेल ही गोष्ट वेगळी!)

आजच्या काळात हि अशी गुंतागुंत निर्माण करण्याची गरजच नाही. शुक्राणू पेढया (स्पर्म बैंक ) सर्वत्र उपलब्ध आहेत. तेंव्हा बर्याच पुरुषांच्या वीर्यापासून तयार केलेले(pooled) शुक्राणू वापरून कृत्रिम गर्भधारणा करता येते त्यात विविक्षित एका पुरुषाचे शुक्राणू वेगळे काढता येत नसल्यामुळे मुलाच्या पितृत्वावर दावा ठोकण्यासाठी कोणी येत नाही. आणि स्त्रीची कोणतीही भावनिक गुंतवणूक न झाल्याने पुढची गुंतागुंत टळते. शिवाय यौनशुचीता(तथाकथित) राखल्याने त्या स्त्रीचा नवरा सुद्धा खुश असतो.
सहमत ……

या संदर्भात काही आणखी काही लिहावेसे वाटते आणि काही प्रश्न विचारावेसे वाटतात. राजवाडे लिखित भारतीय विवाह सन्स्थेचा इतिहास आणि पा वा काणे यांचे काही लेखन वाचून मला असे वाटते की गेल्या पाचशे वर्षात भारतीय स्त्रीला परंपरांच्या जोखडात अडकवण्यात आले आहे. भारतीय कुटुंब पद्धती सुरुवातीला स्त्री प्रधान होती, असे दिसते. भारतीय स्त्रिया कुटुंब, अर्थकारण, वंश-वारसा यात स्वतंत्र निर्णय घेऊ शकत होत्या. एकाच कुटुंबात एकाच आईची पण वेगवेगळे पिते असलेली मुले असत. पण हळू हळू यात फरक होत गेला. पुरुष प्रधान कुटुंबे आली. त्याची कारणे सांगायची ही जागा नव्हे. अपत्य (येथे पुत्र हा शब्द मुद्दाम टाळला आहे) प्राप्ती करिता नियोग हि सर्वमान्य पद्धती होती. यात कोणी कसे नियम घातले आहेत या पेक्षा त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक गरजा यावर अधिक लक्ष देणे मला योग्य वाटते. येथे लेखकाचा अपमान करायचा हेतू नाही. पण एका विशिष्ट प्रथा किंवा चाली मागील तर्क समजला तर मग नियम योग्य की अयोग्य हे देखील कळायला सोपे जाईल. चाणक्य हा अर्वाचिन भारतातील एक ज्ञात व्यक्ती असून तो जर या नियोग पद्धतीबद्दल नियम लिहित असेल तर हि पद्धत चाणक्य काळात वापरली जात असेल असे म्हणायला हरकत नाही. त्या काळात मानवाचे आयुर्मान कमी होते. युद्धे होत असत व प्राणहानी होत असे. पुनरुत्पादन ही एक ' अत्यावश्यक' गरज होती. यांत्रिकीकरण कमी होते. त्यामुळे मेहनतीची कामे खूप असावीत आणि म्हणून पुरुष संतती आवश्यक होती. त्यामुळे त्या काळात स्त्रियाही या बाबतीत एक सामाजिक गरज म्हणूनही नियोग पद्धतीने अपत्य प्राप्ती करून घेत असाव्यात. येथे मी हे नाकारत नाही की, पुरुष प्रधान संस्कृती, एकत्र कुटुंबातील संपत्तीचा हिस्सा राखणे आदी हेतू प्रमुख शकतात. पण येथे मी एक नमूद करू इच्छितो की, 'सती'म्हणून विधवा स्त्रीला पेटवून देण्यापेक्षा तिला अपत्य प्राप्तीची संधी देणे केव्हाही चांगले. फक्त तिच्यावर नियोग लादु नये. अलीकडच्या काळातील सुधारणावादी याला एक मूर्खपणा देखील म्हणतील व यामुळे स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही इत्यादी मुद्दे आणतील. पण येथे एक गोष्ट विसरून चालणार नाही. त्या काळात बहुतांश म्हातारी माणसे मुलांच्या आधाराने वृद्धापकाळ घालवीत असत. त्यामुळे हक्काचा आधार मिळवण्याची एक तरतूद म्हणून नियोग कडे बघणे आवश्यक आहे. आता या पार्श्वभूमीवर नियम कसे बनवायचे व कसे पाळावे ते ज्याचे त्याला माहित. येथे मला काही प्रश्न विचारावेसे वाटतात: १) स्पर्म बँक - आय वी एफ इत्यादी कृत्रिम पद्धत अपत्य प्राप्तीकरिता वापरली जाते. पण यात बहुतांश केसेस मध्ये खूप गुंतागुंत झाल्याचे ऐकू येते. ज्या स्त्रीवर आय वी एफ किंवा तत्सम इतर प्रणाली वापरल्या जातात त्यांना गरोदर पणात व प्रसूती मध्ये फार त्रास काढावा लागतो. अशा काही केसेस बघितल्या आहेत. यात वैद्यकीय व्यावसायिकांचे आर्थिक संबंध देखील गुंतले आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेतलेली दोन डॉक्टर भावंडे दत्तक मुलाचा / मुलीचा पुरस्कार करताना या सगळ्या गुंतागुंतीपासून दूर राहायला सांगताना बघितली आहेत. खरेच या आधुनिक उपचार पद्धती अपत्य प्राप्ती साठी चांगल्या आहेत का? २) अपत्यहीन जोडप्याकरिता मी दत्तक सुचवतो. परंतु बहुतांश मंडळीना ते मुल 'आपले' वाटत नाही. काहीना आय वी एफ किंवा तत्सम इतर प्रणाली परवडत नाही. अशी मंडळी खरेच नियोगाचा मार्ग अवलंबू शकतात का? ३) योनी शुचितेचा फाजील बाऊ करणाऱ्या आपल्या समाजात नवर्याला 'आपले' मुल नसले तरी चालेल पण तो 'बायकोचे' मुल स्वीकारू शकेल का? ४) शिक्षणाच्या प्रसारानंतर स्त्री आर्थिक दृष्टा स्वयंपूर्ण आहे. तिला वर्गमित्र आहेत, कार्यालयीन सहकारी आहेत. अशी स्त्री आजच्या काळात अश्या एखाद्या पुरुषाकडून अपत्य प्राप्ती ( नवरयाला अंधारात न ठेवता) करून घेऊ शकेल का? (टीप : मी क्वचितच लिहितो. त्यामुळे शब्द निवड चुकणे, शुद्ध लेखन न जमणे शक्य आहे. चुकांबद्दल क्षमा असावी)

'आता गंमत अशी आहे की आपल्या संस्कृती त तर या साध्या निरुपद्रवि वीर्यदान पेक्षा ही अधिक प्रगत अधिक प्रभावी अशी नियोगा ची विलक्षण परंपरा होती. व तिला मुख्य म्हणजे धर्म व जन मान्यता ही होती.' --- नियोगामध्ये एका स्त्रीची अगतिकता आहे. इतर ठरवतील त्या पुरुशाशी संभोग करावा लागे आणि गर्भधारणेची चिन्ह दिसेपर्यंत म्हणजे अनेक वेळा करावा लागे. शारीरिक जवळकी बरोबर भावनिक जवळीक होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे . असे झाल्या नंतर इतर मंडळी हे सर्व दिव्याचे बटन दाबल्यासारखे बंद करीत असत. सध्याची tecnology उपलब्ध नसल्याने वंश चालू ठेवण्या साठी नियोग हा अपरिहार्य मार्ग स्वीकारावा लागत होता. या उलट अलीकडे तिला मुल हवे कि नाही हे स्त्री स्वत: ठरवू शकते. तसेच विर्यदाता पुरुषाची ओळख गुप्त ठेवली जाते.आणि हे समाजानी मान्य केले आहे. अशा अपत्यांना अनैतिक स्मब्दधातून निर्माण झालेली मूले असा शिक्का लागत नाही.. vicky donor हा चित्रपट पाहिला नाही. त्या मुळे त्याच्या कथे बद्दल लिहू शकत नाही. २. सद्याचे नियोग चे उदाहरण म्हणजे एकलव्य हा हिंदी सिनेमा. त्यात राजाला अपत्य होऊ शकत नसल्याने राणीबरोबर संभोग करण्याचे काम एकलव्य या नावाच्या त्याच्या सरदारावर सोपवले जाते आणि आणि तो ते काम राजनिष्ठे च्या भावनेच्या विरुद्ध आहे हे माहित असून ही करतो. अमिताभ बच्चन यांनी एकलव्य ची भूमिका केली आहे. ३.नियोगी, नेगी, अशी आडनावे आहेत . त्यांचा उद्ग्म या नियोग प्रथेतून झाला आहे का ?

३.नियोगी, नेगी, अशी आडनावे आहेत . त्यांचा उद्ग्म या नियोग प्रथेतून झाला आहे का ?
नुकतेच माझ्या नेगी नावाच्या मित्राला तिळे झाले आहे.

मला मुळात समाजाचा येनकेनप्रकारेण मुल हे व्हायलाच हवे हा हट्टच समजू शकत नाही. नैसर्गिक रित्या झालं मुल तर ठिक... नै तर नै काय फरक पडतो? बाकी, चालु दे.

फरक पडता है भाय... वंशवृद्धी हा सर्व प्राण्यांचा मूलभूत स्वभाव आहे. तसे नसते तर (मानवाची सगळी सफर इतक्या महाविनाशातून झालेली आहे की) आपण आज मिपावर चर्चा करायला आस्तित्वातच आलो नसतो.

ते सगळं ठिक.. समाजाला/इतरांना फरक काय पडतो? मुल होऊ नयेत असं म्हण्णं नै.. स्वतःला मुल व्हावसं वाटणं वगैरे बद्दल शंका/आक्षेप नाही. ती झालीच पाहिजेत या समाजाच्य हट्टामागचा तर्क समजत नै एखाद्याला नै झाली मुलं तर नै.. तुम्हाला (पक्षी समाजाला) काय फरक पडतो.. कशाला इतकं पिडावं/वेगळी वागणूक द्यावी त्यांना??

एखाद्याला नै झाली मुलं तर नै.. तुम्हाला (पक्षी समाजाला) काय फरक पडतो.. कशाला इतकं पिडावं/वेगळी वागणूक द्यावी त्यांना??
आता "मूल न होणे" बरोबरच "स्वेच्छेने मुल होवू न देणे" (म्हणजे पालकत्वाची आवड नसल्यास) ही संकल्पना देखील रुजू लागलीय. याला सहसा DINK (Double income no kids) असे म्हणतात कारण बहूतेकरुन स्त्री-पुरुष (नवरा बायको वा लिव्ह ईन पार्टनर्स) दोघेही करिअर मध्ये व्य्स्त आणि करियर मध्येच अधिक रमणारे असतील तर असा निर्णय घेतात. तसेच "लिव्ह-ईन" चे प्रमाण वाढू लागले आहे आणि "लिव्ह-ईन" जोडपे सहसा मुल जन्माला घालत नाहीत, समाजाचे बंधन तर त्यांनी झुगारलेले असतेच.

मुळाअत DINK चा समाजाशी फारसा संबंधच येत नाही. त्यांची केसच वेगळी आहे. (ते त्यांच्या जागी योग्य असतीलही - मी द्वीधेत आहे) मात्र समागम करूनही + माफक इच्छा असूनही मुले होत नाहित त्या जोडप्यांना समाजात इतकं पिडलं जाताना बघितलं आहे की त्या प्रकाराची तिडीक बसली आहे.

नियोग प्रघात रूढ झाला त्यावेळी आपला वंश आणि आपले आडनाव पुढे चलू राहिले पाहिजे अशी सर्वांची समजूत असे. तसेच आपली ऐहिक संपत्ती आपल्या मागे घरातच रहावी आणि आपल्याला पिंड दान करण्यासाठी पुत्र असला पाहिजेच अशी धारणा होती. विशेषत: राजघराण्यात वंशज असणे आवश्यक होते. या सगळ्यावर तोडगा म्हणून नियोग चा प्रघात निर्माण झाला. नंतर दत्तक घेण्याचा प्रघात सुरु झाला. त्यामुळे नियोगाला महत्व राहिले नसावे असा माझा तर्क आहे.

वरील नियमांप्रमाणे कुंती/माद्रीला देवांकडून झालेली पुत्रप्राप्ती "लिगल" ठरते का? कर्णाचं एकदा सोडून द्या, पण
-नवरा जिवंत अथवा मृत असो त्याला अगोदर्च पुत्र असेल तर नियोग करता येत नाही. २-नियोगासाठी नेमलेला बिजीन हा नवर्यााचा भाउ अथवा सपिंड अथवा सगोत्र ( पतिचा) अथवा स्वजातीचा (पतिच्या) च असला पाहीजे अन्य पुरुष अलाउड नाही.
ह्यातल्या पहील्या नियमानुसार तर युधिष्ठीरानंतर झालेली मुले 'इनव्हॅलिड अ‍ॅब इनिशियो" ठरतात. तसेच, "पुरुषाच्या" पुत्रप्राप्तीसाठी ही सोय असल्याने माद्रीलाही पुत्रप्रप्तीचा अधिकार नव्हता, नाही का? मग ही मुले "पांडव" कशी आणि त्यांची बाजू न्याय्य कशी? .... झाली काडी टाकून. (पेटल्यास बघू.) ;-)