Welcome to misalpav.com
लेखक: मारवा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

@वृध्द्दांच्या वठलेल्या मनाला पालवी फ़ुटेल. >>>> =)) @ज्येष्ठांकडुन विशेष अपेक्षा आहे. >>> calling चौ रा का का...! :-D

प्रेम ही मनाची एक भावनिक व बौद्धीक यांचे मिश्रण असलेली अवस्था आहे. अर्थात प्रेम हे आंधळे असते व डोळसही. प्रेम व कामवासना यांचा काहीही संबंध नाही. प्रेम हे स्त्रीपुरूष या संकुचित विषयापेक्षा फार मोठे विशाल आहे. प्रेम म्हणजे एखाद्या गोष्टीतील गुणांच्या योगाने उत्पन्न झालेले आकर्षण. अर्थात गुण म्हणजे काय याची व्याख्या व्यक्तिसापेक्ष असल्याने कारण वेगळे परिंणाम एकच असे होउ शकते. उदा. स्ट्रेट ड्राईव्ह मस्त मारतो म्हणून सचिन विषयी प्रेम तसेच प्रचंड नम्र संयमी म्हणून सचिन विषयी प्रेम असे होउ शकते. कोणत्याच गुणाची पारख नाही आवड नाही अशी व्यक्ती प्रेमात पडणे दुरापास्त असते. प्रेमात पडण्याचे प्रमाण एकूणच पुरूषांमधे स्त्रीयांपेक्षा अधिक असते. मला वाटते कौतुकाची लेव्हल हे कारण असावे. वरील फोटोतील चुंबनाच्या फोटोविषयी. हा फोटो १९७७ चे सुमारास " लाईफ" च्या अंकात मी पाहिलेला आठवतो. या फोटोतील जी नर्स आहे तिने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले होते. व त्यावर सुमारे वीस बावीस ललना हा " क्लेम" घेऊन पुढे आल्या होत्या.