Welcome to misalpav.com
लेखक: Madhavi_Bhave | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

http://www.91mobiles.com/compare/Swipe/MTV+Slash/vs/Swipe/MTV+Volt+1000/vs/Swipe/All+in+One+Tab.html ऑनलाइन ऑर्डर देणार असाल तर कोण कमी किंमतीत आणि फ्री डिलिव्हरी देतो बघा..माझ्यामते १० हजारमध्येही चांगला मोबाइल येइल्...स्वाइप,कार्बन्,लेनोवो चे फोन फिचरबाबत जबरा आहेत. फोन चे आयुष्य फारतर २-३ वर्षे असते त्यामुळे post sell service ची फार चिंता करु नये असे माझे मत

आपण दिलेल्या बजेट मध्ये सध्या अनेक चांगले मोबाइल उपलब्ध आहेत. नोकिया, samsung, सोनी ह्या बाजारातिल दादा कंपन्या आहेत. नोकिया लुमिया मधे विन्डोज ऑपरेटिंग सिस्टीम तर samsung, सोनी यामध्ये android ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि post sell service ही कोणतीही कंपनी असली तरी डोकेदुखीच असते. Nokia lumia 620, Nokia lumia 625, Samsung Galaxy Grand Duos GT-I9082, Samsung Galaxy Core I8262, Sony Xperia M , Sony Xperia L ही आपल्यासाठी काही सजेशन्स आहेत. यातील नोकिया फोन हे सिंगल सिम कार्ड तर Samsung फोन हे डबल सिम कार्ड मध्ये उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी http://www.flipkart.com येथे तुलना करा, आपल्या मित्र परिवारामधील फोन हाताळून पहा व निर्णय घ्या..

प्रेषक, Madhavi_Bhave,
हा प्रश्न मिसळपाव वर विचारू शकतो कि नाही ते मला माहित नाही,

शिद माफ करा पण मला आपला प्रश्न कळला नाही? मला विचारायचे होते कि असा प्रश्न आपण विचारू शकतो का मिसळपाववर. ह्यात काही चुकले असेल असे मला तरी वाटत नाहि.

"एखादा किंवा आपण हा/ असा प्रश्न मिपावर विचारू शकतो का?" असं विधान असेल तर लिहिणारा स्त्रीलिंगी/ पुल्लिंगी असला तरी फरक पडू नये, असो! :)

स्त्रिलिंगी पुल्लिंगीने मोबाईल कोणाता वापरावा यामधे फरक पडत नसावा !

नोकिया ल्युमिया घेउन टाका. ब्रँड आहे आणि नोकिआ चे फोनं वापरायला दणदणीत असतात. तुमच्या बजेट मधे आणि गरजेसाठी ल्युमिया ७२० पुरेसा आहे. ल्युमिया ७२० सॅमसंग घेणार असाल तर बरेचं पर्याय उपलब्ध आहेत. पण पोस्ट सेल्स सर्विस च्या नावानी ठणठणाट आहे. (नोकिआ चा पंखा)

राजेंद्र मेहेंदळे, मिनेश, अलबेला सजन, आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. बाकी काही जणांना उगाचच मूळ विषयाशी कसलाही संबंध नसलेली प्रतिक्रिया देवून काय मिळते ते त्यांनाच माहित.

ब्राऊसर ला अ‍ॅड-ऑन्स इन्स्टॉल करायचे, व्यवस्थित चालतात मराठी साईट्स. शक्यतो मॉझिला आणि क्रोम ला काहीही त्रास होत नाही.

माझ्याकडे ल्युमिया नाही. मित्राकडे आहे. त्यानी UC Browser इन्स्टॉल केलं आहे आणि त्याच्यावर फायरफॉक्स चे ईंटरचेंगेबल अ‍ॅड-ऑन्स इन्स्टॉल केले आहेत (लँग्वेज आणि फाँट पॅक). मी त्याच्याकडुन नीट माहीती करुन घेऊन उद्या इथे पद्धत पोस्ट करीन.

त्यानी UC Browser इन्स्टॉल केलं आहे आणि त्याच्यावर फायरफॉक्स चे ईंटरचेंगेबल अ‍ॅड-ऑन्स इन्स्टॉल केले आहेत (लँग्वेज आणि फाँट पॅक).
UC Browser वर फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन्स चलतात?? माझ्याकडे पण UC Browser आहे,पण त्यावर फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन्स नाहि इन्स्टॉल होत.

८.१ अपडेटनंतर नाही. आता माझ्या स्वतःकडेच ल्युमिया आहे. माझ्याकडे कुठलीही मराठी साईट चालायला त्रास होतं नाही.

मी सध्या नोकिया लुमिया ५२० विन्डोज ८ हा वापरतोय. खुप छान फोन आहे व त्यावर मराठी दिसते. बहुतेक विन्डोज ७ ( ५१०,६१०,७१० इ )मराठी दिसत नाही.माझ्या फोनवर आता पर्यंत जे पण अप्स लोड केलेत ते व्यवस्थित चालतायत .इन्ट्रनल मेमरी ८ जीबी आहे. त्यामुळे मेमरी कार्ड अजुन टाकलेले नाही. M S office ( word,Exell.PPT)हे ही आहे. महत्वाचे म्हणजे ह्या फोन मध्ये नोकीया मप्स (Maps) आफलाइन मोड मध्ये ही वापरु शकतात वा नेविगेशन पण करु शकतात . दुसरे म्हणजे नोकीय म्युजिक हे फ्रि व लाइफ टाइम आहे. छान फोन आहे हा. अंवांतर..... Samsung च्या बर्याच फोन मध्ये,खास करुन Android model समोरील पार्टीला इको साउंड एकु येतो असे मा़झा अनुभव आहे.

मिसळपाव व्यवस्थित दिसते• हा प्रतिसाद लुमिया ५२० वरुन कुठल्याही अॅड आॅन। न वापरता लिहित आहे•

बरच काय बोलायची ईच्छा आहे . पण आमी ज्युनियर सदस्य हाव मनुन गप बसताव

तुमी बोला सोयरं. हिकडं नेणतेच लै बोलतेत. :) ............................................................... सगळ्या डुआयडी ह्या आमच्याच शाखा हैत ;)

पिक्सटेल MD543I हे मॉडेल घेवून टाका. I हे आपल्यासाठीचे मॉडेल आहे. किंमत १२७५३/- ऑल ईन्कूसीव्ह फिचर्सः मोठी स्क्रीन- ७.४३ ईंच Screen: 7.43" Caoacitive, Capacitive Touch Screen (If you need other type of touch screen you can order that one.) This is a MultiOS Phone. (If you want, you can install any versions of OS available in the Market like: Java, BADA, Simbian, Android, Windows etc.) Factory Setting: Android based (Upgradable to future versions also.) Dolby Sound with BOSE Speakers Camera: 25Mega Pixel HD supported Wireless FM with Recording and Scheduling Audio Record Support of all media file type. Price: Rs. 12753/- (All Inclusive) ही कंपनी ओईएम आहे. सॅमसंग, नोकीया, अ‍ॅपल, ब्लॅकबेरी यांची. केवळ आपल्याकडे ही कंपनी सप्लाय करते. :-) :-) :-)

पाभेंच्याच शब्दात या मोबाईलची माहिती http://www.misalpav.com/node/25374

अँड्रॉईड चा सद्ध्या अतिरेक होत चाललाय. विंडोज हटके आहे. विंडोज अँड्रॉईड पेक्षा फास्ट आहे, लाइट आहे, आणि वापरायला छान वाटतं. सोशल साइटस चं सिंक्रोनायजेशन यात मस्त आहे. ही काही प्रमुख वैशिष्ट्ये विंडोज ची. मला तरी आवडतो लुमिया. बाकी अँड्रॉईड ची ही आपली वैशिष्ट्ये आहेतच.

मलाही हाच प्रश्न पडला आहे .कोणता मोबाईल घेऊ ?त्यामुळे मी फोन परीक्षण करणाऱ्या या वेबसाईट नेहमी वाचतो .(१)http://gadgets.ndtv.com/reviews (2)http://www.gogi.in/ (3)http://techradar.com/

Micromax Canvas Music A88 चांगला आहे. आणि स्वस्त पण. Micromax चे नवीन अधिक महागडे मोडेल्स पण पाहू शकता. पण नोकियाइतका चांगला कॅमेरा त्यात नाही (5 mp आणि flash असूनही). Camera चांगला हवा असेल तर Nokia with Carl Zeiss lens is best. पण Windows पेक्षा Android चांगले असे मला वाटते. Android मध्ये सर्वात चांगला कॅमेरा कुणाचा ते नाही सांगता येणार.

विंडोज तेव्हाच वापरणं इष्ट जेव्हा कस्टमाईझेशन करण्यात फार रस नाही. (पन्नाशी उलटलेल्यांना उत्तम). अन्यथा अ‍ॅन्ड्रॉईडला पर्याय नाही. त्यांच्याइतका अ‍ॅप सपोर्ट, स्क्रीन आणि ओएस कस्टमाईझेशन दुसरी कोणतीही ओएस देऊ शकत नाही. १५-१७ मध्ये एक से एक अ‍ॅन्ड्रॉईड सध्या बाजारात आहेत. सोनी एक्पेरिया एल, झोलो चे बरेच फोन्स आहेत. सॅमसंग शक्यतो टाळाच. जाम च बंडल फोन्स राव. (मी स्वतः सॅमसंग वापरत असल्यामुळे स्वानुभव) एक्स्पेरिया एल बघा, भन्नाट फोन आहे. तगडी स्क्रीन क्वालिटी, उत्तम आवाज, कॅमेरा, बॅटरी, सगळंच भारी आहे.

माझ्या मित्राकडे नोकिया लुमिया ६२० आहे. मराठी लेखन उमटत नाही. चौकोनी बॉक्स दिसतात. काही उपाय आहे का ? -दिलीप बिरुटे

भारताबाहेरून आणला असावा. भारतात मिळणार्‍या लुमिया ६२० मध्ये व्यवस्थित मराठी दिसतं. आणि देवनागरी कीबोर्डसुद्धा आहे त्यात

हे स्क्रीनशॉट्स पहा. मित्राच्या लुमिया ६२० वर घेतले आहेत. अगदी व्यवस्थित मराठी दिसतंय. sdf आणि हा देवनागरी कीबोर्ड.. dh

इन्टॉल केलेल्या कीबोर्डमधली मराठी अक्षरं दिसणं वेगळं.. ते लक्षात आलं. पण ब्राउजरमधे मिसळपाव वगैरे उघडल्यावर त्यात: १.मराठी लेखांच्या जागी चौकटी दिसणं. २. मराठी अक्षरं लेखात दिसतात पण लॉगिन करण्याच्या अथवा कॉमेंटच्या बॉक्समधे टाईप करु गेल्यास इंग्रजीच उमटते. किंवा कसे याविषयी स्क्रीनशॉट्स किंवा कन्फर्मेशन देता येईल का?

त्याच्या मोबाईल मधे दिसत नाही. सेटींग वगैरे मधे काही फेरफार करावे लागतात काय ? परदेशातून वगैरे काही त्याने आणला नसावा.... -दिलीप बिरुटे

मला माइक्रोमेक्सचा पोस्ट सेल्स सर्व्हिस अतिशय चांगला अनुभव आहे, नवीन अनड्रोइड फोन घेऊन २ दिवस झाले होते आणि टच पॅडला काही प्रोब्लेम आला होता, तक्रार नोंदवली त्याच्या दुसऱ्या दिवशी रिप्लेसमेंट ओर्डर मिळाली. पुण्यात फक्त बिबवेवाडीला सर्व्हिस सेंटर आहे खास अनड्रोइडचे.

सारसबागेजवळ पाटील प्लाजा मध्ये सर्विस सेंटर आहे, तेथे गेलो होतो, तर नंबर येईपर्यंत १तासापेक्षा जास्त थांबवे लागले. कारण (सर्विससेंटरमधील काम करणार्‍या मुलांच्या म्हणण्याप्रमाणे) पुण्यात माय्क्रोमॅक्सचे स्मार्टफोनसाठीचे एकमेव सर्विससेंटर तेच आहे. तासाभरात एकहि अशी केस दिसली नाही, की जेथे २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी कमिट केला असेल.