जर सैफ अली खान ला पद्मश्री मिळते तर सौ उषा मंगेशकराना मिळायला काहीच हरकत नाही. त्यांचा गाण्यांनी मराठीला कितीतरी समृद्ध केले आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.
अन्यथा पद्मश्री मिळण्यासाठी तीन खासदारांची शिफारस लागते आणि अशी शिफारस मिळवून पद्मश्री मिळवलेले डॉक्टर माझ्या पाहण्यात आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे उषा मंगेशकर ह्या अविवाहित आहेत. त्यांना सौ कशाला?
उषा मंगेशकरांनीही काही उत्तम अजरामर गाणी गायलेली आहेत. पिंजरा सिनेमातील लावण्या एक उदाहरण.
लता वा आशा ह्यांच्यासमवेत गायलेली काही गाणीही अविस्मरणीय आहेत. मला वाटते त्यांना पद्मश्री मिळायला काही हरकत नाही.
धागाकर्त्याला असे म्हणायचेय का कि लता दीदींच्या मागे मोदी नामक एक बलवान ग्रह लागला असून जे काही किटाळ आलेय ते ह्या मोदी नामक ग्रहा मुळेच आलेय?
असे असेल तर चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्या सारखे होईल
नावे आहेत . लताबाईंनी उषा , सुरेश वाडकर , राजमल पारेख यांची शिफारस केली आहे . सरोजवादक उस्ताद अमजद अली खान यांनी 6 जणांची शिफारस केली आहे ज्यात त्यांचे दोन मुलांचे नाव आहे .
असहमत. म्हणजे कसे आहे कदाचित बाप से बेटा सवाई असेल आणि बापच सर्वेसर्वा असेल तर सवाई बेट्याला पुढे आणल्याबद्दल घराणेशाहीचा आरोप त्या बापावर होणारच. त्या न्यायाने लताबाई उत्तम गायिका होत्या, सध्या खासदार आहेत (आहेत ना?), उषाबाई देखील उत्तम गातात मग शिफारस केली तर नातेवाईकाची शिफारस केली हा न्याय लावणे चूक वाटते. मग उर्मिला धनगरचे शिफारसपत्र द्यायला हवे होते का? नक्कीच नाही. ते ही देता येईल पण काही वर्षानी उर्मिलाचे कर्तृत्व सिद्ध झाले की मगच.
आणि लताबाईंनी अन्यही अनेक शिफारसी केल्या आहेतच की. असो.
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश मंगेशकर हे दोन्ही बांडगुळे आहेत केवळ लता मंगेशकर मुळे अवास्तव महत्व प्राप्त झालेले आहे .
बाकी राष्ट्रीय पुरस्कारांबद्दल (खुद्द भारतरत्न ) म्हणाल तर पिपाणी वाजवणाऱ्या व मिसाईल उडवणाऱ्या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना मिळतो .
बाकी राष्ट्रीय पुरस्कार हे फक्त आणि फक्त तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकानंच द्यावे असे ठाम मत आहे . पेटी वाजवून , तंबोऱ्याच्या तारा खाजवून, शंभर शतके ठोकून किंवा गाणी म्हणून थोडीच देशाचे भले होणार आहे ?
बाकी कै असो पण सचिनला भारतरत्न देणे म्हणजे मूर्खपणा आहे असे माझेही मत आहे. जर सचिनला द्यायचे तर विश्वनाथन आनंदला का नै द्यायचे? आपल्या हॉकीवीरांना का नै द्यायचे? क्रिकेट हा एकच खेळ मानला जाणार्या देशात सचिन मूळचा मोठा असला तरी जास्तच मोठा मानला गेलाय.
मी सचिनला बोललोय ह्या दिवाळीभेटीत, की बाबारे यापुढे समाजकार्यासाठी कुठे काही छदाम खर्च केलास ना की श्री श्री ग्रेट्थिंकरसाई यांना आधी कळव बरं.
हे म्हंजे असं झाल मी जपान बघितला नाही म्हणजे जपान देशच नाही या भुतलवर.
त्यानी छदाम खर्च केले आणि २४ वर्षांमध्ये मिडीयाला याची एकहि बातमी मिळू नये?.... एफेसायची बातमी मिळते ,पण याच्या छदामाची मिळत नाही ,बहुदा तो जपानमध्ये समाजकार्य करत असावा....
तुम्हाला एवढ्या वर्षात एकही बातमी दिसली नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. सचिनचा नाही. शिवाय सचिन त्याच्या समाजकार्याचा गवगवा करत नाही हा त्याचा मोठेपणा. जरा गुगलुन पाहिलेत तर ढीगभर लिंका मिळतील. बोलण्याआधी आधी थोडातरी अभ्यास करत जा की. उगाच उचलली जीभ की लावली टाळ्याला.
येस! सचिन अजिबात गवगवा करत नाही. मुंबईत असाल तर जरा अनाथाश्रम आणि अश्याच संस्थांना भेट देउन या. मी होते तोवर तरी शाळेच्या बॅग्स, अन वह्या पुस्तक सचिन कडुन मिळालेली ऐकली आहेत. बाकी सुद्धा बरेच काही करत असेल् पण क्रिकेटमध्ये एव्हढी प्रसिद्धी मिळत असताना बाकी कोणत्याही प्रसिद्धीची हाव दिसत नाही सचिन मधे.
जाऊ दे संस्कार असतात ते. त्यांना नाही उमगायचे.
शिवाय सचिन त्याच्या समाजकार्याचा गवगवा करत नाही हा त्याचा मोठेपणा.
परंतु गेले काही दिवस ह्या क्रिकेट मधील देवाचा इतका अनावश्यक गव गवा नव्हे दाजीपुर च्या जंगलातील गवा रेडा झाला आहे !
अशी काही वातावरण निर्मिती झालीय कि जणू काही २ ० ० वी टेस्ट खेळल्यावर वानखेडे वर वैकुंठातून विमानच सचिन ला घ्यायला येणार आहे .
@अशी काही वातावरण निर्मिती झालीय कि जणू काही २ ० ० वी टेस्ट खेळल्यावर वानखेडे वर वैकुंठातून विमानच सचिन ला घ्यायला येणार आहे.>>> तो प्र सार माध्यमांचा अचरटपणा आहे. त्यात तेंडल्याचा काय दोष???
पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे नावही नीट आठवत नसणार्या लोकांना त्यांच्याबद्दल इतकी गरळ ओकताना पाहिले नव्हते.
सरकारच्या सुदैवाने हृदयनाथ मंगेशकरांना पद्मश्री पूर्वीच मिळालेली आहे. लताबाई आणि आशाबाई अशांसारख्या कसलेल्या गायिकांच्या आवाजाचे सोने होईल अशा अनेक महान रचना ह्या संगीतकाराने रचलेल्या आहेत. एक विचारी, बुद्धीमान, अभ्यासू व्यक्तिमत्व असेच आजवर मी ह्या कलाकाराला मानतो.
अशा स्वयंभू कलाकाराला बांडगूळ म्हणून लेखकाने आपली पातळी सोडली आहे असे वाटते.
साहित्य संगीत कला विहीना
साक्षात पशु पुच्छ विषाणहीना
असे (बहुधा) भर्तृहरी म्हणून गेला आहे त्याची आठवण झाली. साहित्य, संगीत, कला ह्यापैकी कशातही गती नसणारे शेपूट व शिंग नसणारे पशुच आहेत. असे पशु गवत खात नाहीत हे पशुंचे भाग्यच म्हणायचे!
वरील संगीतावरील हिणकस शेरेबाजी वाचून हा श्लोक आठवला, नव्हे त्याची प्रचिती आली.
साहित्य, संगीत, कला ह्यापैकी कशातही गती नसणारे शेपूट व शिंग नसणारे पशुच आहेत.
जर एखादी व्यक्ती एका कलाकालावर टीका करत असेल तर त्या व्यक्तीला कला साहित्य इत्यादी क्षेत्रा मधील अजिबात माहिती नसते हे तुमचे अजब गजब तर्कट शास्त्र ऐकून अंमळ मजा आली !
उषा मंगेशकरांना बांडगुळ म्हणन अतिशय चुकीचे आहे. खरतर अतिशय सुरेल गातात त्या. अन हृदयनाथांबदल काय सांगाव? एकच चाल जी त्यांनी बांधली आहे ती देते. माझ्या मते तरी या चालीसारखी चाल नाही इतर कोणत्याही गाण्याला.
आणि हो! मला कलेच्या क्षेत्रात राजकारण करणार्या लोकांचा अतिशय तिरस्कार आहे, तरीही कला ही कलाच अन तीची दाद दिली पाहिजेच. तुम्ही ज्याला तारा खाजवुन म्हणता ती खाजवण्याची क्षमता यायला अख्खी जिंदगी खर्ची पडते.
'गाढवाला गुळाची चव काय' अशी एक मराठीतली म्हण आठवली.
दुसरी गाढवाबद्दलचीच म्हण म्हणजे 'गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता'.
छान म्हणी आहेत मराठीत. आपातै तुला आणखी कुठली म्हण माहिती आहे? :)
हो तर भरपूर म्हणी आहेत जश्या गाढवावर आहेत तश्या अयातोबांवर देखील आहेत
"आयजीच्या जीवावर बायजी" किंवा "आयत्या बिळात नागोबा" इत्यादी इत्यादी
मराठी खूपच समृध्द आहे !
म्हणी राहू देत, पण पु.लं. च्या "रावसाहेब" मधल एक वाक्य आठवल, "त्यांच्यासारखी एक तान घेउन दाव रे! मुळव्याध होते का नाही बघ तुला" अस काहीस वाक्य आहे ते.
ती परवा अतिवास ताईंची आंजी बोलली होती शतशब्दकथेत "काहीही म्हनल तरी चालत, फक्त हळु म्हनायच" तस जे काही अस उगा उचलली जीभ असेल ते मनातच बोलत जा.
पब्लिकमध्ये बसुन काहीही बोलता येत म्हणुन फारच बेताल बोलु नये.
चेतन कुलकर्णी आगे बढो!
एकच फाईट वातावरण टाईट.
चेतनचा नाही करायचा नाद, बाकीच्यांना घालू दे वाद.
बाकी आपल्या उदात्त विचारांनी आम्ही सद्गदित झालो आहोत.
असो. जमल्यास... मोठे व्हा.
पेटी वाजवून , तंबोऱ्याच्या तारा खाजवून, शंभर शतके ठोकून किंवा गाणी म्हणून थोडीच देशाचे भले होणार आहे ?
मिसळपावावर जास्तीत जास्त उंडगे प्रतिसाद देणार्यालाही पद्मश्री मिळायला हवी. कारण हीही एक कलाच आहे. :)
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश मंगेशकर हे दोन्ही बांडगुळे आहेत केवळ लता मंगेशकर मुळे अवास्तव महत्व प्राप्त झालेले आहे .
एकदम सहमत..
आणि ह्या बांडगुळांची गाणी इथे सापडतील..
http://www.aathavanitli-gani.com/Sangeetkar/Hridaynath_Mangeshkar
http://www.aathavanitli-gani.com/Swar/Usha_Mangeshkar
पण लिस्ट बघायला गेलात आणि बांडगुळांची म्हणुन ऐकायची नाही असं ठरवलत तर पंचाईतच होईल हो तुमची..
म्हणजे बघा काय काय ऐकता येणार नाहीये तुम्हाला..
असा बेभान हा वारा पासुन ते इंद्र जिभी जंभ पर.. मग कशी काळ नागिणी ते वार्याने हलते रान.. परत गझला म्हणाल तर केव्हा तरी पहाटे ते मालवुन टाक दीप.. (अरेरे.. अचानक खुपच सहानभुती वाटली हो तुमच्या बद्दल)
अभंग म्हणाल तर ओम नमोजी पासुन ते रुणुझुणु पर्यंत्..(अगं आई ग.. नशिबाचे भोग)
आणि हो ते काय बाई सांगु पासुन लाजरा न साजरा मुखडा वगरे बरीच गाणी येतील हं लिस्ट मध्ये..
पण शेवटी बांडगुळच ती.. त्यांच्या गळ्यात सुर असले म्हणुन काय झालं? त्यांची गाणी वेड लावणारी असली म्हणुन काय झालं? त्यांनी केलेली गाणी गुण्गुणताही येणार नाहीत इतकी अवघड असली म्हणुन काय झालं?? ती दोघे एका मोठ्या गायिकेची भावंडे आहेत ना.. संपला विषय..
पद्म पुरस्कारासाठी लताबाईंनी उषा मंगेशकराच्या नावाकरता वशिला लावल्याचा आरोप आहे.
कुणी पुरस्कार दिल्याने मंगेशकर भावंडे मोठी झालेली नाहीत. पुरस्कार देऊन उपकार केल्याची भावना ठेवणार्यांनी आपली लायकी दाखवून देवू नये.
ह्रीशिकेश नव्हे हृदयनाथ (नशीब कानिटकर नाही म्हटले)
एखाद्या कलाकाराबद्दल बद्दल काही माहिती नसेल तर निदान गप्प राहणे हा पहिला आणि ते वयाने मोठे असतील तर आदर देणे हा दुसरा नियम पाळावा.
ह्या दोन दिग्गजांनी जे सुमधुर संगीत कण आपल्याला दिले आहे त्याच्याबद्दल काहीच वाद नसावा.
अनावधानाने झालेल्या चुकी दुरुस्ती बद्दल धन्यवाद !
ओके तुम्ही तुमच्या चष्म्यातून बघा मी माझ्या !
तरीही हे गृहस्थ पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीत
अश्या पुरस्कारांनी असल्या "हव्वा " बनवलेल्या लोकांचे महत्व तर वाढतच नाही पण त्या पुरस्काराचे मात्र घटते .
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश मंगेशकर हे दोन्ही बांडगुळे आहेत केवळ लता मंगेशकर मुळे अवास्तव महत्व प्राप्त झालेले आहे .तरीही हे गृहस्थ पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीत
यात काहितरी वेगळा छुपा अविर्भाव स्पष्ट दिसतोय. कदाचित काही वैयक्तीक कारण असू शकते. नाहीतर या दोन अत्यंत गुणी कलाकारांचे संगीत ऐकलेल्या, अगदी फक्त कानसेन असलेल्या माणसालासुद्धा, इतक्या खालच्या पातळीवर येवून मिपासारख्या खुल्या मंचावर असे काही म्हणवले नसते.
अवांतरः मी तर या त्यांच्या गुणांच्या मानाने फार कमी प्रसिद्धी मिळालेल्या दोघांही कलाकारांचा चाहता आहे.
केवळ सूत नाही हो... या द्वयिंचे संगीत ऐकलेत तर योग्य मार्गाने नेणारा मोठ्ठा दोरखंड सापडेल. मी कोणी संगीतज्ञ नाही, पण त्यांच्या संगितातले भले बुरे समजण्याएवढे कान पुरे आहेत इतके नक्की. शिवाय तुम्ही तुमचा निषेध दर्शवायला जे शब्द वापरलेले आहेत ते परत वाचलेत तर तुम्हाला दोरखंडही दिसेल.
चेतन कुलकर्णी अहो ठीक आहे तुम्हाला नाही आवडत या दोघांची गाणी ( आता असतात काही माणसे कर्मदळीद्री त्याला कोण काय करेल )
पण म्हणून इतक्या खालच्या पातळीला येऊन बोलायचे ? अहो ते हृदयनाथ मंगेशकर तुमच्या आमच्या आजोबांच्या वयाचे असतील किमान तेव्हढा तरी आदर दाखवा.
तुमच्या सारख्या आत्ताच्या पिढीच्या(?) शिकलेल्या माणसांकडून अशा प्रकारची वक्तव्ये खूप वेदना देणारी वाटतात हो.
बरोबर.. बाकी काही नाही पण वयाचा आदर व्हायलाच हवा.
त्यांना एवढे पुरस्कार मिळालेत, पंडित अशी पदवी मिळाली आहे. त्यांनी अत्यंत प्रसिद्ध मराठी गाण्यांना चाली लावल्या आहेत.. काही गाणी स्वतः गायली आहेत..
तसेच उषा मंगेशकरांचेही, त्यांची गाण्याची लिस्ट पहा. आणि मग मत बनवा..
उगाच सारेगमप मध्ये परीक्षक म्हणुन आले तेव्हा त्यांच बोलणं आवडलं नाही, दिसायलाच आवडले नाहीत..वागणंच आवडलं नाही.. एखाद्या कार्यक्रमात शिष्ट्च वागले असल्या फडतुस कारणांसाठी जर इतकी टोकाची मत बनवली असतील तर मात्र तुमच्या बुद्धीला सलाम..
मी ग्रस आणि हृदयनाथ मंगेशकरांचा एक कार्यक्रम पाहिला होता. त्यात पंडितजिंचा आवाज काही फार्सा चांगला येते नव्हता, लोकांना ग्रेस ह्यांच बोलणं ऐकण्यात जास्त रस होता, तबलावादक खुप भाव खाऊन गेला वगैरे कारणांमुळे पंडितजी वैतागले होते. ते जाणवत होतं.. पण म्हणुन ते रेल्वे मध्ये गाण्याच्या लायकीचे आहेत असं होत नाही. वय माणसाला बदलतं.. पण म्ह्णुन त्यांची आयुष्यभाराची मेहनत पाण्यात जात नसते.
शिवाय एखाद्या बद्दल इतकं वाईट बोलताना आपला त्या क्षेत्रातला अनुभव काय? समज किती? ह्याचा तरी किमान विचार करावा.
बोलताना आपला त्या क्षेत्रातला अनुभव काय? समज किती? ह्याचा तरी किमान विचार करावा.
नाही हो. इथे हा नियम पाळायचा नसतो. ( हा नियम काटेकोर पाळला तर ९० % धागे, ९० % प्रतिसाद बाद धरावे लागतील. ) :)
९० % धागे, ९० % प्रतिसाद बाद धरावे लागतील
तुम्ही न्यायमूर्ती काटजू यांच्या पायाचे तीर्थ पिता का?
नाही मी फक्त अक्वागार्ड चेच पाणी पितो (तुमच्या संभावित प्रश्नांचे उत्तर !)
बाकी राष्ट्रीय पुरस्कारात पण "घराणेशाही " बाळसे धरू लागली कि काय?
प्रतिक्रिया
जर सैफ अली खान ला पद्मश्री
सौ?
धागाकर्त्याला असे म्हणायचेय
फक्त लताच नाही
सदर यादीमध्ये 1300 लोंकाची
ते काहिही असो. पण
अगदीच तसे नाही
+1
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश
हे अतीच
बॅट फिरवणार्याने आजपर्यंत
हे विधान उपरोध होता अशी आशा
अलीकडे मिपावर उपरोधिझमची लागण
बाकी कै असो पण सचिनला
म्हणुनच
त्यानी छदाम खर्च केले आणि २४
तुम्हाला एवढ्या वर्षात एकही
येस! सचिन अजिबात गवगवा करत
सहमत !
शिवाय सचिन त्याच्या समाजकार्याचा गवगवा करत नाही हा त्याचा मोठेपणा.परंतु गेले काही दिवस ह्या क्रिकेट मधील देवाचा इतका अनावश्यक गव गवा नव्हे दाजीपुर च्या जंगलातील गवा रेडा झाला आहे ! अशी काही वातावरण निर्मिती झालीय कि जणू काही २ ० ० वी टेस्ट खेळल्यावर वानखेडे वर वैकुंठातून विमानच सचिन ला घ्यायला येणार आहे .किंगफीशरचं इमान पवाराच्या
@अशी काही वातावरण निर्मिती
बापरे!
-^-
साहित्य, संगीत, कला ह्यापैकी कशातही गती नसणारे शेपूट व शिंग नसणारे पशुच आहेत.जर एखादी व्यक्ती एका कलाकालावर टीका करत असेल तर त्या व्यक्तीला कला साहित्य इत्यादी क्षेत्रा मधील अजिबात माहिती नसते हे तुमचे अजब गजब तर्कट शास्त्र ऐकून अंमळ मजा आली !उषा मंगेशकरांना बांडगुळ म्हणन
'गाढवाला गुळाची चव काय' अशी
हो तर भरपूर म्हणी आहेत जश्या
म्हणी राहू देत, पण पु.लं.
मला पण पु . ल . च्याच "असा
चेतन कुलकर्णी आगे बढो!
चला.
.
या न्यायाने उद्दामरावांना
ये तो
+१
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश
+१११
...
पद्म पुरस्कारासाठी लताबाईंनी उषा मंगेशकराच्या नावाकरता वशिला लावल्याचा आरोप आहे.कुणी पुरस्कार दिल्याने मंगेशकर भावंडे मोठी झालेली नाहीत. पुरस्कार देऊन उपकार केल्याची भावना ठेवणार्यांनी आपली लायकी दाखवून देवू नये..
आधी नीट नाव घ्यायला शिका
अनावधानाने झालेल्या चुकी
असहमत
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश मंगेशकर हे दोन्ही बांडगुळे आहेत केवळ लता मंगेशकर मुळे अवास्तव महत्व प्राप्त झालेले आहे .तरीही हे गृहस्थ पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीतयात काहितरी वेगळा छुपा अविर्भाव स्पष्ट दिसतोय. कदाचित काही वैयक्तीक कारण असू शकते. नाहीतर या दोन अत्यंत गुणी कलाकारांचे संगीत ऐकलेल्या, अगदी फक्त कानसेन असलेल्या माणसालासुद्धा, इतक्या खालच्या पातळीवर येवून मिपासारख्या खुल्या मंचावर असे काही म्हणवले नसते. अवांतरः मी तर या त्यांच्या गुणांच्या मानाने फार कमी प्रसिद्धी मिळालेल्या दोघांही कलाकारांचा चाहता आहे.यात काहितरी वेगळा छुपा
यात काहितरी वेगळा छुपा अविर्भाव स्पष्ट दिसतोय. कदाचित काही वैयक्तीक कारण असू शकते=)) सुतावरून(चुकीचा ) स्वर्ग गाठता तुम्ही बुवा !केवळ सूत नाही हो... या
@ चेतन कुलकर्णी
बरोबर.. बाकी काही नाही पण
.
अच्छा..
९० % धागे, ९० % प्रतिसाद बाद
९० % धागे, ९० % प्रतिसाद बाद धरावे लागतीलतुम्ही न्यायमूर्ती काटजू यांच्या पायाचे तीर्थ पिता का? नाही मी फक्त अक्वागार्ड चेच पाणी पितो (तुमच्या संभावित प्रश्नांचे उत्तर !) बाकी राष्ट्रीय पुरस्कारात पण "घराणेशाही " बाळसे धरू लागली कि काय?अरेरेरे! हे पण दिवस आले का
Pagination