हे आपले वैयक्तिक मत आहे याचा मी आदर करतो पण ते सार्वजनिक ठिकाणी व्यक्त केलेच पाहिजे असे नाही असे मला वाटते.
त्यांना पंडित हि पदवी भारतरत्न भीमसेन जोशी आणि पंडित जसराज यांच्या हस्ते दिली गेली. हि दोन माणसे दिग्गज आहेत असे महाराष्ट्राची जनता मानते. आणि त्यानी श्री हृदयनाथ मंगेशकर यांना पंडित पदवी देणे हे मान्य केले याचा अर्थ त्यांची(हृदयनाथांची ) काहीतरी लायकी असावी. "निदान पंढरपूर प्यासेंजर मध्ये गाणे" म्हणायच्या लायकीचे असावेत असे मला वाटते. निवडुंग, जैत रे जैत असे चित्रपट किंवा सागर प्राण तळमळला, मोगरा फुलला इ गाण्यांना संगीत देणे हे सर्व सामान्य माणसाचे काम नाही.
असो आपले मत आपल्यापाशी.
जाऊ द्या डॉक... संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ असा की गरज पडल्यास तोडफोड करावी, स्वतःचे कपडे फाडावेत, गाढवासारखे ओरडत गावभर फिरावे, पण काहीही करून प्रसिद्धी मिळवावी. आता ती मिळवण्यासाठी काही जण या धाग्यावर धिंगाणा घालत आहेत.मला मज्जा वाटली, अंतस्थ हेतू कळला की तुम्हालाही वाटेल :-)
घटं भिंद्यात् पटं छिंद्यात् कुर्यात् रासभरोहणम् |
येनकेनप्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ||
शेवटच्या ठिकाणी 'प्रसिद्धा महिला भवेत्" असेही टाकता येईल. वृत्तात तर बसतेच, शिवाय स्त्रीद्वेष्टेपणाचा आरोपही दूर करता येईल =))
ऑं प्रतिसाद संपादित? का म्हणे ? विमेंनीच केला की अजुन कोणी? मला तरी त्यात काहिच वावगे दिसत नव्हते. असे प्रतिसाद मिपावर साधारणपणे आढळतातच. काही शब्द गाळाल्याने हा प्रतिसाद म्हणजे दात काढलेल्या सापासारखा वाटतो आहे. आधीच्या प्रतिस्सादात मस्त धग होती. आमच्या विमेंचा अस्सल प्रतिसाद वाटत होता. हा म्हणजे रॉबर्ट लुडलुमची कादंबरी चंपा कान्हेरेंनी पुर्ण केल्यासारखी वाटते आहे.
संपादक विनंती न करता पण प्रतिसाद संपादित करतात तर !
@विश्वनाथ मेहेंदळे….
हे पहा , मला जे वाटले ते मी म्हटले , जर तुम्हाला पटल नसेल तर ठीक आहे असते प्रत्येकाचे मत पण दुसऱ्याला गाढव ठरवताना स्वतः त्याच स्वरात केकाटणे योग्य आहे का?
बाकी राहिला प्रसिद्धीचा प्रश्न तर इथे खोट्या( पण मजेशीर ) नावाने वावरणाऱ्या बहुतांशी लोकांमध्ये कसली आलेय डोंबलाची प्रसिद्धी ?
काही आठवड्यांपूर्वी एक पाकिस्तानी मला बोलताना म्हणाला, "नूरजहाँ हिंदूस्थानातून निघून गेल्यामुळे लताला वाव मिळाला, अन्यथा नूरजहाँपुढे लता काहीच नाही" यावर काय उत्तर देणार !
चेकु यांची विचारखाज त्याच प्रकारची आहे...
"नूरजहाँ हिंदूस्थानातून निघून गेल्यामुळे लताला वाव मिळाला, अन्यथा नूरजहाँपुढे लता काहीच नाही"
ह्यावर गावसकरांचा एक किस्सा प्रसिध्द आहे. ८० च्या दशकाच्या आरंभी जेव्हा भारताचा संघ पाकिस्तान दौर्यावर गेला होता तेव्हा तिथल्या भारतीय वकिलाततीने दोन्ही संघासाठी सहभोजनाची व्यवस्था केली होती व त्यात पाकिस्तानातील काही प्रसिध्द व्यक्तींना आमंत्रित केले होते ज्यात नूरजहाँ ह्या ही होत्या. भारतीय संघाची ओळख करुन घेताना नूरजहां जेव्हा सुनिल समोर आल्या तेव्हा ओळख करुन देणार्याने त्यांना सांगितले " ये तो मशहूर बल्लेबाज सुनिल गावसकर है. आप तो इन्हे जानतेही होंगे" त्यावर नूरजहांबाई उत्तरल्या " नही जानते! हम तो सिर्फ इम्रान खान को जानते है!".
पुढे तो ओळख करुन देणार्याने सुनिलला विचारले " ये पाकिस्तान कि मशहूर सिंगर नूरजहां है! आपने तो इनके गाने सुने होंगे!" त्यावर हजरजबाबी सुनील उत्तरला " नही. जिसने एक बार लता मंगेशकरजीका गाना सुना है उसे किसी और के गाने सुनने कि इच्छा ही नही होती"
गावास्कारांचाच किस्सा आहे
सायबाच्या लॉर्डस वर कोट घातल्याशिवाय आत सोडत नाही, खेळाडूंना सुद्धा येताना कोटातच यावे लागते,मग सायबाची हि प्रोटोकॉल ची खुमखुमी जिरवायला गावस्कर लॉर्डस वर लुंगी घालून फिरले होते असे ऐकून आहे,जाणकारांनी प्रकाश टाकावा.
सचिन मैदानावर इशांत शर्माला पाणी पोचवतोय... दिग्विजय खाकी चड्डी, पांढरा शर्ट, काळी टोपी आणि हातात दंड घेऊन संध्याकाळी शाखेत चाललाय आणि दाऊद इब्राहिम बायकोबरोबर मंडईमधे कोथिंबीर विकत घेतोय....हृदयनाथ पंढरपूर एक्स्प्रेसमधे गाताहेत...
अशी दृष्ये उभी राह्यली डोळ्यासमोर...
नुकतेच वाचण्यात आले कि बंगाल मधील एका सदगृहस्थाला सरकारने त्याचे नाव थोडेसे बदलून पुन्ह: एकदा पद्मश्री दिली.
तरी या असल्या बिरुदाना फार महत्व देण्यात अर्थ नाही. सरकारने ही बिरुदे पहिल्यांदा घोषित करताना त्यांचा उपयोग पद्मश्री अमुक अमुक किंवा अमुक अमुक पद्म्भूष्ण असा करू नये असे सांगितले होते. तरीसुद्धा सब चलता है.
बाकी त्या गृहस्थांची शिफारस करणारी दोन्ही वेळची मंडळी कोण होती हे RTI ने जाणून घेणे मनोरंजक ठरेल.
लताबाईंनी उषा , सुरेश वाडकर , राजमल पारेख यांची शिफारस केली आहे . सरोजवादक उस्ताद अमजद अली खान यांनी 6 जणांची शिफारस केली आहे ज्यात त्यांचे दोन मुलांचे नाव आहे .
हि पेरलेली बातमी म्हणूनच मोदिस्तुतीचा परिणाम वाटते आहे.
हि 1300 जणांची यादी rti अतंर्गत उघड झाली आहे .
यामध्ये राजील शुक्ल , मोतीलाल व्होरा , पंडीत जसराज , अमर सिंग ,सुशील कुमार शिंदे , सलमान खुर्शिद , विजय दर्डा यांनी दोन ते 9 जणांची शिफारस केली आहे
माहितीचा स्त्रोत जरी RTI असला तरी बातमी पेरलेलीच आहे तशी नसती तर फक्त लता बाईंचा उल्लेख वशिलेबाज म्हणून करण्याची काय गरज होती ? अमजद अलींचा पुसट तरी उल्लेख असणे स्वाभाविक नाही का ?
शिवाय मोदींच्या समर्थकांच्या बाबतीत हल्ली हा पॅटर्न झाला आहे.
मी बातमी लोकसत्ता मध्ये वाचली , तिथे लताबाईचा उल्लेख फक्त यादी देण्यापुरता आहे .
मथळा पद्मपुरस्कारातील वशीलेबाजी बद्दल आहे .
सगळी कडे बातमी पेरता येत नाही .
कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की पद्म पुरस्कार देतान मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर केला जातो . त्यामुळे पुरस्कारार्थींना आर्थिक लाभ होत असतो .
मा. सम्पादक,
हल्ली मिपावर एकुणच 'भि.....ट प्रतिसाद' वाढताहेत, केवळ तसे स्वातन्त्र्य आहे म्हणून त्याचा दुरुपयोगच होताना दिसतोय हे वरील काही प्रतिक्रिया (चिखलफेक) वाचुन आपल्याही लक्षात आले असेलच [ मुळ मुद्दा सोडुन चर्चा भलतीकडे भरकटवणे तेही जाणीवपूर्वक व नसलेली अक्कल फार असल्यासार्खे दाखवून टीका करणे त्यामुळे काहीन्ना 'विकृत आनन्द होतो' हे सरळ सरळ दिसते आहे. ], मला वाटते मिपाचा असा आखाडा होउ नये याची काळ्जी आपण घ्यावी.
बाकी 'चेकु_८५ महाराज' तुमचा पन्ढरपुर प्यासेन्जरचा प्रवास कायम सुखाचा होवो त्याला माझ्या शुभेच्छा....... लगे रहो.विनोद१८
अचानक लताबाईंवर असले किटाळ यावे हा योगायोग वाटत नाही.
योगायोग असू शकेल असे वाटते.पद्म पुरस्कार देताना 'फिल्डिंग' लावली जातेच कारण कला क्षेत्राचा प्रॉब्लेम हा की त्यात नक्की नि़कष कोणते लावायचे ह्याला काही मर्यादा नाहीत. लोकप्रियता,शास्त्रशुद्धता,मेहनत,गुणवत्ता ह्या सर्वांची गोळाबेरीज कदाचित म्हणता येईल. हल्ली दाक्षिणात्य ख्यातनाम गायिका एस. जानकी ह्यांनी पुरस्कार नाकारला होता.उत्तर भारतिय्-विशेष करून हिंदीत करीयर करणार्या कलावंतांना सरकार नेहमी झुकते माप देते असे त्यांचे म्हणणे होते.त्यात तथ्यही आहे.
आणि कोणी किती वजन वापरले तरी निर्णय सरकारचाच असतो ना?
हो.कार्यकर्ते सुभाष अग्रवाल ह्यांना शिफारस करणार्यांची यादी मिळाल्याने काय फायदा झाला ठावूक नाही.एखाद्या कलावंताची शिफारस करणे ह्यात गैर काय ते कळले नाही.
लताबैनी मोदीची स्तुती केली , तर घाबरायचं कशाला?
लताबैनी बाजपेयींची स्तुती केली , त्यानंतर ते पडले.
आता जरा दम धरा, मोदीही पडतील.
लताबै काँग्रेसला लई लकी आहेत. :)
पुण्यातल्या शिवाजी मार्केट मध्ये 'भेजा' ३००-३५० रु. किलॉने मिळतो.
प्रॉब्लेम हा आहे की लोकं तोच घेउन येतात. अर्थात काहिच नसण्यापेक्षा मेलेल्या बोकडाचा असणे वाईट नाही म्हणा.
कोणतीही कला असो..ती संगीत,चित्रकला,वादनाची ख्याती किंवा कोणत्याही खेळात तुम्ही अग्रेसर असाल तर तुम्ही समाज उपयोगी काहिच केले नाही हे म्हणणे शुध्द मुर्खपणा आहे. खरतर समाज बनतो तो सुसंक्रुत लोकांच्या सहभागा मधुन.समाजाची किंवा एकाद्या देशाची लायकी त्याच्या सैन्यबळावर जर ठरत असती तर चीन ने खेळात व इतर कलात आपली पत वाढवायचा प्रयत्न केला नसता.काही लोकांचे प्रतिसाद तर इतके गटारु आहेत कि त्यात दगड मारावासा वाटत नाही.
मोदींचे समर्थन करणार्यांचे पुरस्कार काढून घ्या. ़़काँग्रेसची मागणी.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/---/articleshow/25607694.cms
भारतरत्न लताबाईंचे नाव घ्यायची हिंमत नाही झाली. पण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षाने जाहीरपणे अशी निर्लज्ज मागणी केली आहे की मोदींचे समर्थन करणार्या लोकांचे पुरस्कार काढून घ्यावेत. विशिष्ट मतपेढीच्या लोकांच्या टाळ्या घेण्याकरता हे विधान केले गेले की काय?
आता हे त्या चांदुरकराचे वैयक्तिक मत आहे काँग्रेसचे नाही अशी (नेहमीची यशस्वी) मखलाशी ऐकायला मिळते का ते बघू या!
पण ज्याने ही मुक्ताफळे उधळली आहेत त्याला असे वाटते का की हे पुरस्कार काँग्रेसने दिले आहेत म्हणजे ते ज्यांना दिले ते आता काँग्रेसचे मिंधे आहेत आणि त्यांना कुणाही काँग्रेसविरोधी लोकांशी चांगले संबंध ठेवायचा हक्क नाही?
लताबाईंना भारतरत्न दिले म्हणजे ते काँग्रेसने त्यांच्यावर केलेले उपकार आहेत असा ह्या नादान चांदूरकराचा समज असल्यास तो त्वरित दूर झाला तर बरे. अशा वैचारिक दुगाण्या झाडून काँग्रेसची लोकप्रियता वाढेल असे वाटत असल्यास अशा नेतृत्वाला कोपरापासून प्रणाम!
प्रतिक्रिया
पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीत
असो आपले मत आपल्यापाशी.
असो आपले मत आपल्यापाशी.हेच म्हणतो ! :)सहमत...
जाऊ द्या डॉक... संस्कृतमध्ये
+१
छान आणि मिस्किल
>>>रासभरोहणम्
काहीही करून प्रसिद्धी मिळवावी
काहीही करून प्रसिद्धी मिळवावीकंच्या प्रसिद्धी ची गोष्ट करताय तुम्ही?तुम्ही मिपावर मिळवताय ती. एका
+१
ऑं प्रतिसाद संपादित? का
हा म्हणजे रॉबर्ट लुडलुमची
ही मी मला पटेल तेच उघडपणे
संपादक विनंती न करता पण
...
+११११
"नूरजहाँ हिंदूस्थानातून निघून
सहमत. जब्री किस्सा आहे.
गावास्कारांचाच किस्सा आहे
सचिन मैदानावर इशांत शर्माला
हृदयनाथ पंढरपूर एक्स्प्रेसमधे
हृदयनाथ पंढरपूर एक्स्प्रेसमधे गाताहेत...एक्स्प्रेसमधे नवे प्यासेंजर !! =))मला वाटते......
खरच! लय मोठा माणूस
धागा भरकटला .
सरकार द जवाब नही
लताबाईंनी उषा , सुरेश वाडकर ,
हि पेरलेली बातमी ...
माहितीचा स्त्रोत जरी RTI असला
ए बी पी माझा वर आली होती
मी लेखात दिलेल्या लिंक विषयी
फाकडाजी
माहिती अधिकार
पुरस्कार
मोदींच्या स्तुतीची किंमत ?
प्रॉब्लेम काय आहे ?
निकष
.
ह्याचा अर्थ लता तै कोन्ग्रेसी
अरे मित्रा..
पुण्यातल्या शिवाजी मार्केट
अगदी अगदी
.
खरतर प्रतिसाद देताना विचार करुन द्यायला हवेत.
काही लोकांचे प्रतिसाद तर इतके
काही लोकांचे प्रतिसाद तर इतके गटारु आहेत कि त्यात दगड मारावासा वाटत नाही.चपखल शब्द !!!१११++++
राष्ट्रीय पुरस्कार ही काँगेसची मालमत्ता?
राष्ट्रीय पुरस्कार कुणा एका
अशी दनादन (विधाने) चांदुरकर
काँग्रेस भारत देशाच्या
आणि फेकू सत्तेवर आले तर
Pagination