Welcome to misalpav.com
लेखक: निमिष सोनार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

निव्वळ भंगार मालिका , नाटकी अभिनय , वेषभुषा रंगभुषा सातवाहकालीन करायची का चोप्रा च्या महाभारत सिरीयल प्रमाणे यामध्ये सगळाच गोंधळ झालाय . च्याआयला आता शिव्या पण देण जमत नाय इथ .

सहमत. अत्यंत टुकार मालिका. एकाच भागात तिरस्करणीय झालेली.

जेव्हा कोणाही पात्राचे बालपणीचे प्रसंग दाखवतात, तेव्हा ते अतिशय 'बालिश' असे का चित्रित केले जातात? गणपती, हनुमान, पांडव-कौरव, कॄष्ण, आदी सर्वांचे बालपण असे चित्रित केले जाते, की ते व्रात्य्/खोडकर/निरागस कमी आणि बिनडोक जास्त वाटतात. आणि कमीत कमी बाल कलाकारांचा अभिनय अतिरंजित, ओव्हरअ‍ॅक्टिंग केल्यासारखा असतो. मला अभिनय, संस्कृती, कला, यातलं कदाचित जास्त कळत नसेल, पण हे बालकलाकार/बाल-पात्रे नॉर्मल अभिनय करत नाहीत, हे नक्कीच जाणवते.

+१ 'किसीकोभी सडकसे उठाके सुप्परश्टार बना सकता हूं'.. टाईप वाटतय. इतर रिअ‍ॅलेटी शोजमधे किती मस्त टॅलेंटेड मुले असतात नै?.. यात बहुतेक प्रोड्युसरच्या पै-पाहुण्यांची पोरं भरलीयत..

अख्ख्या मालिकेत शकुनी बोलता बोलता एक डोळा सहजपणे मिटून घेतो तेवढंच जरा बघण्यासारखं वाटलं. बाकी
च्याआयला आता शिव्या पण देण जमत नाय इथ .
अगदी याच माझ्याही भावना आहेत या मालिकेबद्दल.

खूपच छान मालिका आहे. पहिल्या एपिसोड पासून पाहत आहे. अत्यंत भव्य-दिव्य आणि अभ्यासपूर्ण हाताळणी. अभिनय, संगीत ... अवर्णनीय. . .

अतिशय सुंदर मालिका आहे. शकुनीचे पात्र करणारा तर खरोखर कसलेला अभिनेता आहे. काही गोष्टी मात्र मला खटकल्या म्हणजे- १. सर्व राजकुमारांच्या गळ्यात जानवे दाखवलेले आहे. ते का हे समजलेले नाही. २. महाभारत काळात सर्व ज्ञान हे तोंडी पठण केले जाई, लिखीत नव्ह्ते त्यामुळे ते काळाच्या ओघात नष्ट झाले म्हणतात असे असताना ध्रूतराट्र द्रोणांना लिखित संदेश कसा पाठवतो

शकूनीची वेशभुषा जॅक स्पॅरो (Pirates of the Caribbean) सारखी वाटते ना? जॉनी डेप ने शकूनीची भुमिका चांगली निभावली असती....

१. सर्व राजकुमारांच्या गळ्यात जानवे दाखवलेले आहे. ते का हे समजलेले नाही. >>>>>>> क्षत्रियांची मुंज व्हायची त्या काळी २. महाभारत काळात सर्व ज्ञान हे तोंडी पठण केले जाई, लिखीत नव्ह्ते त्यामुळे ते काळाच्या ओघात नष्ट झाले म्हणतात असे असताना ध्रूतराट्र द्रोणांना लिखित संदेश कसा पाठवतो >>>>>>>> नाय पटले बाकी हि मालिका आणि महादेव हि मालिका घरात आवर्जून बघतात कारण त्या सास-बहु आणि रियालिटी शोज च्क़ फालतूपणा बघण्यापेक्षा निदान हे बरे.(बरे नाही चांगलेच )

पहायला हवी एकदा , पण काही म्हणा , ९० च्या दशकात पाहिलेल्या या मालिकाच मनात घट्ट बसलेल्या आहेत,त्यामुल्ळे त्याच '' ओरिजिनल'' बाकी सगळ्या बकवास ,अशी भावना होते खरी!

कदाचित मी पुर्वी दुरदर्शन वर पाहिलेल्या मालिकेचा परिणाम असेल पण मला नविन मालिका अजिबात आवडली नाही. आधीच्या मालिकेत कृष्ण (नितिश भारद्वाज) आणि भिष्म (मुकेश खन्ना) यांनी वठवलेल्या भुमिका पाहिल्यावर त्यांच्या जागी इतर कोणी कलाकार पाहणे अशक्य आहे. सौरभ राज जैन याच्या महादेव मालिकेतल्या विष्णुच्या भुमिकेमुळे तो ठिक वाटतो. अरव चौधरी नवीन भिष्म म्हणुन नक्कीच शोभत नाही. हरीश भिमाणी यांच्या 'समय' या आवाजात सांगितलेली कथा त्यावेळी ऐकायला छान वाटत असे. गुंफी पेंटल यांच्या शकुनीसमोर नवीन गेटअप मधला शकुनी विचित्र वाटतो. केकता कपुरच्या शकुनीपद्धल न बोललेलेच बरे. गिरीजा शंकरच्या धृतराष्ट्रापेक्षा नविन धृतराष्ट्र नक्कीच खटकतो. विरेद्र राझदान यांच्या विधुर पद्धलही तेच मत. मोठेपणीचे कौरव आणि पांडव अजुन आले नाही आहेत. आधीच्या महाभारतात गांधारीच्या डोळ्यांवर पांढरी पट्टी होती. केकता कपुरने ती काळी केली आणि आता इथे लाल. राजकमल यांच्या संगीतातले, राही मासुम रझा यांनी लिहिलेले, राजकमल आणि महेंद्र कपुर यांनी गायलेले सुरुवातीचे गाणे केवळ अप्रतिम. दुरदर्शनवर महाभारत पाहिलेल्यांना ही मालिका रुचलेली नाही. केकता कपुरची मालिका डब्यात गेल्यावरसुद्धा पुन्हा ही मालिका बनवण्याचे धाडस केले हेच निर्मात्याचे मोठे धाडस. केकता कपुरने तिच्या महाभारतामध्ये केलेल्या चुका नविन महाभारतामध्ये टाळता आल्या तर छानच. कदाचित आणखी २०-२५ वर्षांनी पुढच्या पिढीला ही नविन मालिका आवडेलही. तोपर्यंत कदाचित महाभारताच्या आणखी दोन चार आवृत्या निघालेल्या असतील. हे माझे वैयक्तिक मत आहे.

अतीशय सुंदर मालिका. मालिकेतला प्रत्येक प्रसंग एखाद्या समीक्षकाच्या दृष्टीने पाहून कथानकामध्ये व पात्रांमध्ये अगदी बारकाईने शोधून खोट काढायचीच,कारण जुन्या महाभारतापेक्षा चांगली ही मालिका असूच शकत नाही असं ठरवून बघणार्यांना ही मालिका नाही आवडणार कदाचित... अर्थात यात त्यांचा काही दोष नाही. बी आर चोप्रांच्या महाभारताचा प्रभावच इतका प्रचंड होता. 1988 ते 1990 अशी 2 वर्ष त्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. मी कधी जुनी मालिका पाहिली नव्हती कारण तेव्हा माझा जन्मच झाला नव्हता. पण नवीन महाभारत मात्र मी एकही भाग मिस न करता आवर्जून पहाते. त्यातली पात्र,त्यांचा अभिनय, भव्य सेट आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रसंगानुरूप दिली जाणारी कृष्णाची शिकवण ...सगळ्या बाजूंनी मला ही मालिका अगदी परिपूर्ण वाटते. कुतूहलापोटी मी यूट्यूब वर जुन्या महाभारतातले काही भाग पाहिले,पण महाभारताची कथा वाचून तिच्यातल्या पात्रांची जी प्रतिमा माझ्या मनामध्ये तयार झाली होती त्या प्रतिमेच्या अधिक जवळची मला नव्या महाभारतातली पात्र वाटली. जुनंही छानच आहे पण मला नवीन आवडलं..आणि कदाचित भविष्यात आणखी नवीन मालिका महाभारतावर आली तरी मला सध्याचीच मालिका आवडत राहील...कारण कदाचित या मालिकेचा प्रचंड प्रभाव माझ्यासारख्या जुनं महाभारत न पाहिलेल्यांवर आहे...

मी इयत्ता आठवी मध्ये होतो तेव्हा जुने महाभारत मी पाहिले होते. ते मला आठवते. ते ही आवडले. पण ते प्रथम होते म्हणून कदाचीत असेल. पण तरीही नवे त्यापेक्षा छान आहे असे मी म्हणेन. तुलना करायचीच झाली तर यावेळेस चा कृष्ण पूर्वीच्या कुष्णापेक्षा सरस आणि प्रभावी वाटतो. नेहेमीच जुने तेच सोने असे नसते. कदाचित लोक नवे महाभारत स्वीकारू शकत नाहीत कारण पाहिल्याशी तुलना होते आणि पाहिल्याशी तुलना होतच राहाणार कारण हा मनुष्य स्वभावाच आहे कि माणूस आयुष्यातली पहिली गोष्ट, व्यक्ती, भावना कशीही विसरत नाही. खरे कि नाही ? पण त्याचा अर्थ असा नाही जी त्यानंतर आयुष्यात येणार्‍या इतर गोष्टी पहिल्या गोष्टीपेक्षा / व्यक्तीपेक्षा सरस नसतीलच !! काय ? पटतंय का? स्वयं विचार किजीये. !!! :-)

महाभारत कथा हजारो वर्षे जनमानसात टिकून राहण्याची कारणे बघू जाता मुळातच अत्यंत अद्भुत, जटिल, वैविध्यपूर्ण आणि सशक्त कथानक, त्यातील नाट्यपूर्ण घटनाक्रम, व्यापक तत्वज्ञान, सत्व-रज-तमोगुणी पात्रे, नवरसांचा परिपोष करणारे प्रसंग वगैरे सर्व गोष्टी संत-पंत कवींच्या रचना आणि शेकडो वर्षांपासून गावोगाव कीर्तनादि पारंपारिक पद्धतीने केले गेलेले त्यांचे सादरीकरण यात असल्याचे दिसून येईल. आधुनिक काळात मात्र असे कवी, कीर्तनकार इतिहासजमा झाल्याने ही परंपरा आता आधुनिक तंत्रज्ञानाचा सहारा घेऊनच पुढे चालवणे भाग आहे, त्यातूनच नवनवीन पिढ्यांना महाभारत निदान ठाऊक तरी होईल. यातून विशेष जिज्ञासा जागृत होणारे महाभारताचा अधिक सखोल अभ्यास करण्यास प्रवृत्त होतील, अशी आशा करूया. तस्मात हे कार्य अर्थलाभासाठी का होईना, जे कुणी करत असतील, ते अभिनंदनास पात्र होत. हे काम तसे कठीण आणि जटिल आहे हेही खरेच. या सर्व बाबी लक्षात घेता कशी का असेना, महाभारतावर एक तरी मालिका सुरु आहे, हेही नसे थोडके. वैयक्तिक आवड-निवड ही प्रत्येकाची असतेच. मला स्वतःला आजवर आलेली कोणतीच मालिका काही खास वाटलेली नाही. बीबीसी निर्मित रोमन साम्राज्यावरील मालिकांसारखे काही करणे आपल्याला केंव्हा जमेल?

तर बीबीसीलाच भरीस घालून अशी मालिका काढायला लावले जाऊ शकते..
बीबीसी निर्मित रोमन साम्राज्यावरील मालिकांसारखे काही करणे आपल्याला केंव्हा जमेल?

आत्ताशी तर कुठे सुरू होतिये मालिका...... इतक्यात शिव्या का घालताय? प्रथमदर्शनी चांगलं चाललंय. ते ओव्हरअ‍ॅक्टिंगचं म्हणाल तर कुठ्ल्याही ऐतिहासिक / मायथॉलॉजिकल मालिकेत ते असतंच. मालिकेचा सल्लागार देवदत्त पटनाईक कॉर्पोरेट क्षेत्रात आदरानं घेतलं जाणारं नाव आहे. त्यांचा दृष्टिकोन परंपरागत समजांपेक्षा काही बाबतीत वेगळा आहे. त्यानी आपल्याला सुद्धा महाभारताबद्दल आपल्या नेहेमीच्या सरधोपट विचारांपेक्षा एक नवा आयाम मिळू शकेल. मला स्वतःला श्रीकृष्णाला सूत्रधार करण्याची कल्पना आवडली. मुख्यतः युद्धप्रसंगांमधला फिल्मीपणा प्रथमच महाभारत बघणार्‍यांना आवडू शकतो. आणि पात्रांचं म्हणाल तर चोप्रांच्या महाभारतात सुद्धा जेव्हा मोठेपणीचे कौरव पांडव इंट्रोड्यूस केले गेले तेव्हा ते हास्यास्पदच वाटले होते. पण त्यांना ते पात्र जगायला थोडा अवधी लागलाच. ह्या महाभारतातले कौरव पांडव फुल सिक्स पॅक वाले आणि किमान दुर्योधन भीम २४ इंची बायसेप्स वाले असावेत हीच अपेक्षा. शिवाय द्रौपदी महाभारतात वर्णिल्याप्रमाणे असावी :). बघूया तर काय होतंय ते. जे.पी.

द्रौपदी महाभारतात वर्णिल्याप्रमाणे असावी
महाभारतातील द्रौपदीच्या वर्णनाचे मूळ श्लोक मराठी अर्थासहित द्यावेत, ही विनंती.

मूळ संस्कृत महाभारत अर्थातच वाचलेलं नाही (आणि वाचलं तरी कळणार नाही). पण भाषांतरातल्या स्वयंवरपर्वातल्या १८६ व्या भागात वर्णिल्याप्रमाणे - " Of eyes like lotus-petals and of faultless features endued with youth and intelligence, she is extremely beautiful. And the slender-waisted Draupadi of every feature perfectly faultless, and whose body emitteth a fragrance like unto that of the blue lotus for two full miles around..." एकंदरच द्रौपदी ही अतिशय कणखर आणि जहाल विचारांची स्त्री असणार. रूपा गांगुली द्रौपदी म्हणून फिट्ट होती. पण वैयक्तिक मला द्रौपदीच्या व्यक्तिमत्वाचं एखादं वेगळं इंटरप्रिटेशन बघायला आवडेल. महाभारत मुळातच इतकी क्लिष्ट कलाकृती आहे की तिथे वाचणार्‍याच्या कल्पनाशक्तीला प्रचंड वाव आहे. आणि जर कोणी ह्या महाकाव्याची मालिका बनवत असेल तर त्याला ते स्वातंत्र्य दर्शक म्हणून आपण द्यायला हवं. कोणी त्या व्यक्तिरेखा कंटेम्पररी दृष्टिकोनातून दाखवत असेल तर त्यात गैर काय? असला आमचा अर्जुन सिक्स पॅक वाला तर कुठे बिघडलं? उगाच prejudice मनात ठेऊन कशाला बघायची एखादी कलाकृती? चित्रगुप्तजी - हे खास तुमच्यासाठी - तुम्हाला कदाचित आधीच माहिती पण असेल हा इसम. पण मला तरी त्याचं काम आवडलं. त्याचं चेपूचं पान देखील आहे. कदाचित माझा नाविन्याची हौस चा सदरा ह्या सदरात पडल्यामुळे मला हे महाभारत आवडत असेल. जे.पी.

@ जे पी मॉर्गनः वा. छानच आहेत चित्रं. द्रौपदीला पणाला लावताना युधिष्ठिराने तिचे जे वर्णन केले होते (म्हणे) त्याचे मराठी पुस्तकातील वर्णन माझ्याकडे आहे, ते शोधून इथे देईन. मात्र त्याविषयी मूळ संस्कृत श्लोक काय आहे, हे ठाऊक नाही. युधिष्ठिराचे वर्णन एकंदरित प्रसंगाला आणखीनच काळीमा लावणारे आहे. ते वर्णन ऐकून कौरव चेकाळले, यात आश्चर्य नाही.

कुमारी चाऽपि पांचाली वेदीमध्यात् समोत्थितः। सुभगाः दर्शनीयांगी वेदीमध्या मनोरमाः॥ श्यामा पद्मपलाशाक्षी नीलकुंचित मूर्धजः। मानुषं विग्रहं कृत्वा साक्षात् अमर वर्णिनी॥ नीलोत्पल समो गंधो यस्यः क्रोषात् प्रवायती। या विभर्ति परं रूपं यस्य नास्त्यूपमा भुवी॥

परंतु मी लेखांना टीआरपी भेटला नाही म्हणून दिशाभूल करणारे परीक्षण लिहायला सुरुवात केली नाही/करणार नाही... तुम्ही छान लिहता पण मार्केटिंग तुमचा पिंड नाही , मला जलजीवा आवडले होते तुम्हाला लिहायला आवडते तर लिहते रहा पण दिशाभूल ठरनारी परीक्षणे लिहून स्वत:चे अद्न्यान दाखवू नेए चित्रपट आवडला वा नाही हे कोणीही लिहू शकते परन्तु परीक्षण लिहायला प्रत्येक चित्रपट बघायचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक असतो तेव्हां ते रसिकांचे मन जिंकु शकते...

भिकार मालीका , टुकार परीशण . तुमच्या क्रिश च्या *** परिशणावरुण , चित्रपट पाहिलेला - तथास्तु

सुरवातीला ह्या मालिकेत खूप अतिशयोक्ती दाखवल जायचा . त्यामुळे मी comedy मालिका बघतेय असंच वाटायचं . पण आता खूप सुधारणा झालीये आणि मला हि मालिका खूप आवडायला लागलीये
शकूनीची वेशभुषा जॅक स्पॅरो (Pirates of the Caribbean) सारखी वाटते ना? जॉनी डेप ने शकूनीची भुमिका चांगली निभावली असती....
अफगाण वेशभूषा असेल ती . गांधार अफगाणिस्तान मध्ये होतं ना
महाभारत काळात सर्व ज्ञान हे तोंडी पठण केले जाई, लिखीत नव्ह्ते त्यामुळे ते काळाच्या ओघात नष्ट झाले म्हणतात असे असताना ध्रूतराट्र द्रोणांना लिखित संदेश कसा पाठवतो
पटल नहि. ते लोक काही मागासलेले आदिवासी नवते . असे संदेश सर्रास पाठवले जायचे आणि त्याखाली राजाची सही म्हणून राज्याची मोहोर उठवली जायची . जे.पी.मॉर्गन च्या मताशी सहमत आहे

सर्व कौरव-पांडव हे शूटिंगसाठी त्यांच्या डॉन बॉस्को किंवा दिल्ली पब्लिक स्कूलमधून सरळ सेट वर आल्यासारखे वाटतात. विशेषतः त्यांच्या कटिंगांमुळे. त्यांच्या आया वगैरे बाया पलिकडे शांपूच्या जाहिरातीचे शूटिंग आटोपून तश्याच लगोलग इकडल्या सेट वर आलेल्या चिकन्या चमेल्या वाटतात.

जुन्या महाभारतात सुद्धा अनेक चुका होत्या. निष्कारण फक्त चुका शोधायचेच ठरवले तर चुका सापडणारच. जुन्या महाभारतात एकदा (चुकून अनावधानाने असेल) दुर्योधन (पुनीत इसार) म्हणाला होता, "हमे यहा ड्यूटी है" त्याने इंग्रजी शब्द वापरला होता....

आख्खी महाभारत मालिका यू ट्यूबवर उपलब्ध आह बी आर चोप्रांचीे. तुम्ही म्हणत आहात ती चूक कुठे आहे ते दाखवून देउ शकाल का?

मह्याकडे ११ जीबी महाभारत अनं १४/१५ जीबीचं रामायण बी हाय बरं ! सांगी देलं तर बर पडीन शोध्याले !

जे लहानपणापासून ऐकत आलो ते महाभारत म्हणजे लॉजिकची आई-बहीण आहे राव! मी तर पोराला महाभारत बघायला बंदी घालायच्या विचारात आहे. पहिल्याच भागात - "त्या राजानी (शंतनु) नदीशी (गंगा) लग्न केलं?" हा प्रश्न आला आणि नांदीच झाली. कर्ण सूर्याचा मुलगा म्हटल्यावर चिरंजीव "म्हणजे रोज सकाळी आकाशात असतो तो सूर्य? त्याचा मुलगा?" वगैरे विचारतो तेव्हा "ते सगळं खोटं असतं रे" म्हणण्या पलिकडे पर्याय नसतो. आता लोकं त्या गोष्टींमागचा कार्यकारणभाव विचारणारच. मग आताच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून महाभारताचं इंटरप्रिटेशन पण बदलायलाच हवं. जे.पी.

अगदी अलिकडले एक-दोनच 'एपिडोस' बघितलेत या मालिकेचे. शंभर कौरवांचा जन्म कसा झाला, आणि कुंती, माद्री ला तथाकथित 'देवां' पासून गर्भसंभव, हे कसे दाखवले होते, हे समजले नाही. यावर कुणी प्रकाश टाकेल का?

भीमाला वायुदेवाने डायरेक्ट कुंतीच्या हातातच दिले,
असं होय? याच विषयावर दादा कोंडके यांनी एक हिंदी सिनेमा बनवला होता ना? काय बरं त्याचं नाव?

...परदेशातल्या हॅरी पॉटर, स्पायडरमेंन, अ‍ॅलिस ईन वंडरलॅण्ड, गुलिव्हर ट्रूव्हल्स अशा काल्पनिक कथांना मात्र चांगले म्हणतो. पण आपल्याच भारतातील एक महाकाव्य (ज्यात थोडा काल्पनिकतेचा अंश आहे) त्याला मात्र उगाचच इकडून तिकडून, ओढून ताणून संशय जमा करून घेत नावे ठेवत आहोत. उलट मूळ कथा आणि त्यावर मालिका बनवणार्‍या निर्मात्यांच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. त्यातले तत्वज्ञान समजून घेतले पाहिजे. आग ओकणारा चायनीज ड्रेगन आपल्याला पटतो पण विषबाधा झालेला भीम पाण्यात पडल्यावर सापाने चावल्यावर असा कसा मुत्यू पासून वाचू शकतो असे आणि अनेक संशय आपण घेत राहातो आणि मूळ कलाकृती चा आनंद घेणे मात्र राहून जाते. रावणाला दहा तोंडे कशी आणि का? असाच आपण विचार करतो... कोळी चावल्याने पीटर पार्कर भिंतींना चिकटतो हे आपण आवडीने पाहातो पण क्रीश ला नावे ठेवतो... जेम्स बोंड चे काल्पनिक गेजेट तसेच खूप मारामारी करून त्याच्या अंगाला साधे खरचटत नाही हे आपण स्वीकारतो. पण भीष्माला इच्छामरण असे कसे मिळू शकतो यावर खल करत राहातो...

त्या हॅरी पॉटर, स्पायडरमेंन, अ‍ॅलिस ईन वंडरलॅण्ड, गुलिव्हर ट्रूव्हल्स यांची गोष्ट वेगळी. त्यांना लोक काल्पनिक कथाच मानतात. याउलट महाभारत, रामायण यांना काही लोक काल्पनिक न मानता, ते इथे घडून गेले होते. त्यावेळी स्टेम सेल टेक्नोलोजी, सरोगेशन, अण्वस्त्रे, विमाने वगैरे होती असा अनेकांचा ठाम विश्वास आहे.

बाकी हे नवीन महाभारत प्रेक्षणीय आहे. नुसत्या कथेनुसार प्रसंग दाखवण्यापेक्षा त्यांनी अनेक पात्रांमधील नाती, संबंध छान उलगडून दाखवले आहे. जसे कुंती जेव्हा युधिष्टीरास जन्म देते, तेव्हा माद्रीच्या मनात होणारी चलबिचल, आपल्याला कधी आईपण मिळणार अशी असुयेची छटा वगैरे छान रंगवले आहे.