Welcome to misalpav.com
लेखक: आनन्दा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बी पट्टीतल दुसरा घोडा डी-४ वर आणता येईल. पण मग आतापर्यंत लावलेला सगळा कोट मोडीत निघेल.

त्याचा घोडा एफ २ वर अडकलाय आणि त्याचा वेळ कमी होतोय! आता कार्लसनचा हत्ती सुद्धा अ‍ॅक्टिव होतोय. आनंदने घोडा खेळला ई४ वरती?!! वॉव!!

मॅग्नसने एफ पट्टीतून हत्तीने चेक देताना जी पट्टीतले प्यादे निर्धोक केले. दोन प्यादी अधिक असलेल्या मॅग्नसला आता मारामारी करायला मोकळीक. शेवटी फक्त राजे राहिले तर हे जी प्यादे विना-अडथळा वजीर बनू शकते.

हत्तीदेखील सुरक्षित हलवायला हवा आधी त्याला. नाहीतर डिस्कवर्ड चेक देऊन आनंद त्याला मटकावू शकतो. बहुधा ई-६ ला मागे जाईल.

एवढी काय घाई आहे हो त्याला पुढे नेण्याची. राहू द्या तिथेच शेवटपर्यंत. कोणी हात लावत नाही त्याला.

असे कॉमेंटेटर म्हणताहेत - हत्ती डी ८! खेळायला हवी होती. आनंदचा सगळा भर ई ६ प्याद्यावर आहे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत काळी मोहोरी त्या प्याद्याच्या भोवती फिरत राहणार एकदा का ते पडले की डाव गेला मग आनंदची स्थिती अवघड आहे!

हत्ती थेट ८ व्या फळीत मागे नेला????? काय कळंना. कार्ल्याने एकदम थेट मागे घेतला?? हुदिनी अचानक डाव बरोबरीत दाखवू लागलाय.

काळ्याची दोन जास्त प्यादी आणि पांढर्‍याचे पोझीशनल अ‍ॅडवांटेज असा सामना आहे! घोडा डी ४, आता घोड्याने डी४ वरचा घोडा मारणे गरजेचे आहे. उंट ई८ वरती अडकलाय. आनंदचा घोडा डी४ वर येऊ शकेल हे बहुदा त्याने मिस केले!

काय पोझीशन आहे!! दोन हत्ती शेवटच्या पट्टीत आहेत प्यादे ई ६ वर थ्रेट करते आहे पांढरा हत्ती सातव्या पट्टीत आहे आणि काळ्याकडे एक पासपॉन आहे!! खतरनाक. तालच्या डावांची आठवण व्हावी असे चित्र!!