Welcome to misalpav.com
लेखक: आनन्दा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

राजा इ ३ च्या जागी घ्यावा असे ते कॉमेंट्र्री सजेस्ट करत होते. पण आनंद ने दुसरा मुव्ह केला त्याचा काय परीणाम होणार?

बहुधा मॅग्नस चेक्सची झड लावू शकतो. ती टाळण्यासाठी राजा प्यादे नि हत्तीच्या आड सुरक्षित करणे हा हेतू असेल. हे करत असतानाच राजा ए आणि बी पट्ट्यांकडे सरकल्याने मॅग्नसच्या पुढे येऊ पाहणार्‍या प्याद्यांना अटकाव करण्यात आपल्या प्याद्याला आधार देणे हा ही हेतू असू शकतो.

घोड्यामागे राजा घेण्यात तो धोका होता की राजा दोन पट्ट्यात अडकला असता! आणि वजिराच्या बाजूची दोन प्यादी काळ्या राजासह पुढे सरकली असती. आता घोड्याने डी२ घर धरल्याने हत्ती तिथे येऊन चेक देऊ शकत नाही.

आनंदचा राजा मागे गेला बी२ मधे. आता हत्ती घोड्यावर येणार ई३ मधे.मग बहुदा आनंदचा सी १ मधला हत्ती सी ३ मधे येऊन घोड्याला सपोर्ट करेल असा अंदाज.

आनंदने हत्ती वरती का घेतल म्हणे. आता हत्ती घोडा आणि हत्ती उंटाचे बळी दिले गेल्यानंतर अनुषंगाने दोघांचेही एक एक प्यादे सुद्धा मरणार. मग आनंद दुबळा नाही का पडत एका प्याद्याने?

नो मारामारी! मॅग्नुसने ह्त्ती डी३ मधे आणला. आता बहुदा हत्ती सी ४ मधे आणेल आनंद

हत्ती डबल झालेत हे इसरायचं न्हाई. उंट उचलाया एक हत्ती तिकड न्हेला आनंदनं ते त्ये हिकडं पटात घुसतील न्हवं.

राजा हलला उंट आणि घोडा गेले. आता दोन दोन हत्ती आणि मॅग्नुसकडे ३ तर आनंदकडे २ प्यादी! अजूनही डाव डायनामिक आहे. मॅग्नुस जिंकण्यासाठीच खेळतोय! तो ड्रॉसाठी जाणार नाही असे दिसते.

ई स्तंभातून हलू शकत नाही! कारण तो हलला रे हलला की आनंदचा हत्ती ई८ मधून बाहेर पडतो आणि वजीर होणे अटळ! त्यामुळे मॅग्नुसला प्रॅक्टिकली एकाच हत्तीने खेळायला लागणार आहे. तसेच आनंदचे आहे त्याचा हत्ती ई८ मधून निघू शकत नाही. पण आता मॅग्नुसला त्याच जी ६ वरचे प्यादे वाचवायला लागेल. कारण पुढची खेळी आनंदची हत्ती जी १ अशी प्याद्यावर हल्ला करणारी असेल.

कार्लसन ने मारामारी केली तर त्याला फायदाच आहे ! त्याचे २ पॉन्स दो बाजूला आहे ..एका राजाने ते डीफेंड करणे जमणार नाही.

तिसर्‍या पट्टीत आलेत. आणि राजा ए२ मधे गेलाय. आता बी३ चे प्यादे घेतले तर हत्तीने बी८ मधे चेक देईल आनंद आणि राजाने हत्ती घेतला प्याद्याचा वजीर होईल!

पण कार्ल मात्र लढत सोडायला तयार नाही! आनंद सारखा अनुभवी सामना टाय चे प्रेडिक्शन चुकेल असे नसताना कार्लचा अट्टहास गाढ्वापणा समजायचा की आत्मविश्वास ?