गढ्या शासनाच्या मालकीच्या व्हायला पाहीजेत असं का ?
कपडे, जोडे, मंगळसूत्र, बादली, मग, टमरेल यांच्याबद्दल काय ?
शंभर टक्के सहमत.
तसा हा विषय फार मोठा आहे, आणि कुणाचा यावर अभ्यास असेल, तर त्याने अवश्य विवेचन करावे, असा आहे. आजमितीला सुध्द्धा, तेही तरूण पीढीपैकी, या राजेलोकांबद्दल प्रचंड आदर असणारे अनेक लोक आहेत. आणि त्यात काहीही गैर आहे, असे वाटत नाही. गढ्या, राजवाडे इ. पैकी प्रत्येक हकिगत वेगळी असणार. याबद्दल सरसकट विधान करता येणार नाही. सर्वच देशातील प्रासाद वगैरे त्या त्या देशातील मौल्यवान प्रमुख सांस्कृतिक ठेवा असून देशासाठी मिळकतीचा स्त्रोत आहेत. जे प्रासाद सरकार जमा झाले, त्यांची वाताहात झाली, उलट वंशजांनीच नीट जपणूक केली, असेही दिसते.
या संस्थानिकांनी विविध संस्था,ट्रस्ट स्थापण करुन त्या नावे हजारो एकर जमिनी वर्ग केल्या आहेत. त्यावर ट्रस्टी यांचेच बगलबच्चे असतात, कायदा करणारे हेच लोक असल्याने त्यात पळवाटा ठेऊन आपल्या गढ्या यांनी वाचवल्या आहेत.
भारत निर्माण झाले त्यावेळी सर्व स्न्स्थानीकावर इंग्रजांची suzerainty होती. त्यांनी सर्व संस्थानिकांना स्वतंत्र होण्याची किंवा भारतात अथवा पाकिस्तानात विलीन होण्याची मुभा दिली होती. त्यांतर भारत सरकारच्या ( म्हणजे वल्लभभाई पटेलांच्या ) हिकमती मुळे जवळ जवळ सर्व संस्थानिक भारतात विलीन झाली. त्यावेळी सर्व स्न्स्थानिकांच्या खालील अटी भारत सरकारने मान्य केल्या-
१. त्यांचा राजमहाल अथवा गढी अथवा किल्ला (ल्ले ) त्यांच्याच ताब्यात रहावे.
२. त्याना विजेचा उपयोग मोफत असावा.
३. त्यांच्या गाड्यांवर त्याना स्वत:च्या number प्लेट लावू द्याव्या.
वगैरे वगैरे.
या तहाच्या अटी प्रमाणे किल्ले अथवा महाल आज सुद्धा स्न्स्थानिकाञ्च्या मालकीचे आहेत.
या शिवाय प्रत्येक संस्थानाच्या महसुलावर आधारित एक वार्षिक रक्कम ( privy purse ) देण्याचे करार झाले होते.
नंतर इंदिरा गांधी यांनी one time settlement करण्याचे ठरवले आणि वार्षिक रक्कम देणे बंद केले.
होना! एकतर स्वतः काही पराक्रम केला नाही. नुसते आपले सातारकर भांडतायत कोल्हापूरकरांशी, कोल्हापूरकर भांडतायत सातारकर आणि नागपूरकरांशी, सगळे मिळून भांडतात शिंद्यांशी, शिंदे भांडतात होळकरांशी. बिनकामाचे लेकाचे.
हो. आणि वर हेच लोक एक्मेकांना धोतरबडवी सल्ले देणार आणि देश धर्माला खड्ड्यात घालणार. गण्या (शिर्के फेम. फुटु देत डोळे, सोलु देत जीभा वाले) पेक्षा हे काय वेगळे? सगळॅ एकाच जातीचे.
भारतातेल संस्थानिकांनी राजवाडे , पैसा गिळंकृत करुन वर पुन्हा पेन्शन खाल्लेली आहे, हे भयाणच आहे. एकीकडे जे स्वातंत्र्यासाठी लढले त्यान्ना दीडकीभर पेन्शन आणि यान्ना मात्र वाडे, महाल, पेन्शन.
भारतीय जनतेला वर्षानुवर्षे मूर्ख बनवण्याचे काम या संस्थानिकानी केले. देशभक्ती / प्रांतभक्तीच्या नावाने आम जनता यान्नी शताकानुशतके लढवली आणि त्याचा एंड प्रॉडक्ट काय? तर गोळा झालेली संपत्ती ही त्यांची खाजगी मालमत्ता ! म्हणजे 'देशप्रेम' हा त्यांचा फ्यामिली बिझनेस झाला नै का?
याउलट, मुघल इंग्रजांविरुद्ध कडवेपणाने लढले आणि अखेर तुरुंगात जाऊन मेले. त्यांची संपत्तीही देशाला काही अंशी परत मिळाली. इतक्या पुण्याईवर मुघल हे प्रातःस्मरणीय ठरवायला हरकत नसावी , नै का?
ही अख्खी पोस्ट आजच्या महान राजकारण्यांना अगदी जशीच्या तशी लागू होते. :)
तुम्ही उल्लेख केलेला कुरुंदवाड चा राजवाडा आज अस्तित्वात नाही. तीनशे, साडेतीनशे वर्षांपासुन दिमाखदार पणे उभा असलेला राजवाडा ह्या वर्षी एप्रिल मे मध्ये जमीनदोस्त करण्यात आला.
अवांतरः राजवाडा पाडु नये म्हणुन मध्यंतरी एका पक्षाने आंदोलन केलेले, पण खाजगी मालमत्ता असले कारणाने काही होउ शकले नाही.आता त्या जागेवर घर संकुल बनवण्याचा पटवर्धन राजे साहेबांचा मनसुबा आहे असे कळाले.
-आसिफ
राजवाडयाच्या सर्व भागात मुक्त संचार केलेला आणि त्याला जमिनदोस्त होताना हळवा झालेला..
सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले याना या जागा द्याव्यात. सी एस टी पासून लाल किल्ल्याप्र्यंत ढीगभर वास्तू भारतीय जनता आनंदाने वापरत आहे. लोकोपयोगी कामांना जागा नाही आणि नॉस्टाल्गियाच्या नावानं असल्या रावबहाद्दुरांचे फोटो आणि त्यांच्या रखेल्यांची भांडी कुंडी ठेवायला जनतेच्या हक्काच्या जागा कशाला वापरायच्या? एखाददुसरा हॉल ठेवावा. पण मुख्य जागा आणि संपत्ती सरकारजमाच व्हायला हवी.
इंदिरा गांधींनी या बांडगुळांची पेन्शन बंद करुन एक चांगला पायंडा पाडला. या जागा ताब्यात घेऊन याला लोकशाही राजवटीचा पुढचा अध्याय जोडला जायला हवा.
ज्या जागा अद्यापही संस्थानिकांकडेच आहेत, त्यांच्याबद्दल हा लेख आहे. तुमचा अभ्यास वाढवायचा असेल तर कुरुंदवाडात येऊन बघून जा. अजुनही भारतात अनेक ठिकाणे असलीत, तिथे फिरुन या.
मला एक सांगा भारतातील किंवा जगातील जे काही राजे किंवा संस्थानिक झालेत्,त्या सर्वानी आपली मालमत्ता फक्त जनतेला ठकवुन मिळवली होती का? जी काही किल्ले किंवा गढ्या उभ्या आहेत त्या १०० % जनतेवर अत्याचार करणार्यानी ऊभ्या केल्या आहेत? अहो ज्याच्या मनगटात धमक होती किंवा ज्याना आपल्या जिवाची पर्वा नव्हती असे त्यात कित्येक योध्दे होते. त्यानी पराक्रम गाजवला त्यानी संपत्ती मिळवली. ज्यानी जनतेवर अत्याचार केले त्याची संपत्ती जनतेने उठाव करुन लुटली आहेच ना.जर तुमचे आमचे पुर्वज भ्याड किंवा भाडखावु असतील तर आपल्याला ह्यातले काहिच मिळणार नाही. उगाच ह्याचा वाडा का नाही मिळाला,किण्वा त्याची जमीन का सरकार जमा झाली नाही असे दाखले देण्यात काय हाशिल आहे?त्याच्या मनगटात आज जोर आहे ते लोक सोन्याचा धुर काढत आहेत,तुम्ही पण कष्ट करुन मिळवाना संपती आणि त्यावर बांधा ना महाल. मुकेश अंबानीने आज जगातील सर्वात दिमाखदार महाल उभा केलाच आहे ना?तुम्ही आम्ही फक्त आम्हाला राखिव कोटा द्या व ह्याचा वाडा व जमीन सरकार जमा करुन आम्हाला वापरायला द्या हेच तुणतुणे वाजवत राहणार आहे.
मग ही भीक नाही तर काय आहे?
तेंव्हाचे शिरपेच अन मोरचेल मिरविणारे, रयतेकडून जुलमाने खंडरुपी धन गोळाकरून अनेक बेगमा/ उपस्त्रिया ठेवणारे, स्वतंत्र गाडीतून फिरणारे, आपल्याच नातेवाईकाला मोठ्या अधिकराच्या जागा देणारे, अनेक नोकर-चाकर पदरी बाळगणारे, मन रिझवण्यासाठी शिकार करणारे, कधी नर्तकीच्या वा गाणारीच्या कलेचा मद्य धुंद होउन अस्वाद घेणारे अन इंग्रजांपुढे लाचार असणार्या पण स्वकियांपुढे मुजोर असणार्या संस्थानिकांमध्ये आणि आजच्या नगरसेवक-आमदार-राज्य मंत्री-खासदार-केंद्रिय मंत्री ह्यांच्यात काय फरक आहे. किरकोळ तपशिलात फरक असेल पण तीच मुजोरी, तीच भ्रष्ट सिस्टीम, आपल्या मुला-नातवंडांसाठी, वारसांसाठी अमाप जमिनी इस्टेटी, कंत्राटांमधून प्रचंड नफा/ लाच, बदल्या करण्यासाठी लाच, घोटाळे, निवडणूकांमध्ये अफरातफर, आलिशान सरकारी महाल, लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा, शिकारी, प्रोटोकॉलच्या नावाखाली झडणारे सॅल्यूट्स, स्वतःच्या मुलाला मंत्रीपद मिळण्यासाठी आटापिटा... यादी खूप मोठी आहे. मी तर म्हणेन तेव्हांच्या संस्थानिकांपेक्षा अन इंग्रजांपेक्षासुद्धा हे आत्ताचे नीच राजकारणी खरे भारतद्रोही आहेत. कसली लोकशाही आहे आपल्याकडे..थट्टा मात्र आहे. निवडणूकांच्या काळात मतदारांना पाच पाच हजार वाटण्याचे प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. जाऊ देत, हा सगळा विषयच बीपी वाढविणारा आहे, त्यामुळे हतबल होण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरलेले नाही.
१८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते. त्यांचा स्वतःचा दिल्लीतील वाडा हा इंग्रजांचा किल्ला म्हणून वापरात होता.
त्यांचे वंशज आता केंद्रीयमंत्री म्हणून दोन्ही मोठ्या पक्षांतर्फे मिरवतात.
१८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते.
झाशीची राणी आणि तात्या टोपे यांच्याविरुद्ध…याला झाशी संस्थान बळकवण्याची जयाजीरावाची इच्छा आणि पेशवा-शिंदे कटू संबंधाची पार्श्वभूमी होती.
१८५७ स्वातंत्रलढ्याच्या मुख्य प्रवाहाशी याचा संबंध नाही.
हा लढा मोडून काढण्यात राजपुतान्याचा सिंहाचा वाटा होता.
उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला शिंदे आणि होळकर या दोन सरदारांनी, परंतु त्याचे श्रेय पुण्यात बसणार्या पेशव्यांनी घ्यायचे असे चालू होते.
एक तर पेशव्यानी सातारच्या गादीला नामधारी बनवले होते वर पळीपंचांगानुसार युद्धाचे मुहुर्त काढायचे ,असला पोरखेळ शिंदे व होळकरांना मानवणार कसा?
त्यातच नर्तकीचे प्रकरण, दारुबाजपणा , ध चा मा करण्याची या पेशव्यांची अनैतीक वृत्ती . शिवभुपाचे स्वराज्य पेशव्यांनी कवडीमोलाने उधळायचा सपाटा लावला होता. त्यामुळेच पेशवे शिंदे यांच्या संबंधात कटुता आली.
पानिपतच्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून भाऊसाहेब पेशवे व विश्वासराव पेशवे हुतात्मा झाले होते. त्याच युद्धात मल्हारराव होळकर युद्ध सोडून निघून आले होते.
शिंदे ,होळकरांची खडी फौज होती, तर पेशव्यांच्या ताफ्यात अर्धेअधिक बाजारबुणगेच होते.
त्यात परत फुकट जेवणारे, तीर्थयात्रा करणारे भोळसट बायाबापुडे घेऊन सदाशिवभाऊ युद्धाला आले होते .या असल्या बाजारबुणग्यांमुळे लाख मराठा तिथे कापला गेला.या बाजारबुणग्यांनीच अर्धी रसद खाऊन संपवली होती.
युद्ध कूटनीती करायचे सोडून ब्राह्मणभोजने आणि तिर्थक्षेत्री जिर्णोधार करण्यात पेशवाई मश्गुल होती .यामुळे मराठ्यांची चाल धीमी पडली .अशा मुर्खांसाठी होळकर कशाला जीव धोक्यात घालतील?
आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते.
आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते.
पानिपतात प्रत्यक्ष हजर असलेला अवधचा नबाब सुजाउद्दौला याचा दिवाण काशीराज याने त्या एकूण प्रकरणावर काही वृत्तांत लिहिला आहे. त्याचे भाषांतर कोणा ब्राऊन नामक इंग्रजाने केलेय आणि शेजवलकरांनी ते आपल्या ग्रंथात वापरलेय. त्यात स्पष्ट दिलेय की लढाईच्या दुसर्या दिवशी काही मंडळी सुजाकडे आली आणि डेड बॉडी दहनाकरिता मागू लागली. विश्वासरावांची बॉडी पेंढा भरून काबूलला नेऊ म्हणून पठाण मागे लागले होते पण त्यांना मनवण्यात कसेबसे यश आले. सदाशिवरावभाऊंचे धड दुसर्या दिवशी मिळाले. शीर कापले होते. त्या धडावरचे भरजरी कपडे, अलंकार व काही जखमा, विशेषतः १७५९ साली पुण्यातल्या गारपिरावर एका गारद्याने केलेला वार, इ. ताडून पाहता ते भाऊचेच आहे याची खात्री पटली. पण शीर काही मिळाले नाही. पुढे काही वेळाने एका पठाण सैनिकाने ते कापून जमिनीत पुरून ठेवले होते असे कळाले. मग ते उकरून ताब्यात घेतले आणि दहन झालेय रणभूमीवरच.
अस्सल पुरावे बघण्याचे कष्ट न घेऊन सोनवणी आणि नरके यांच्यासारख्या रेम्याडोक्यांच्या भजनी लागणारी तुमच्यासारख्यांची पिलावळ आजकाल वाढत लागली आहे. कधी हे ग्रहण सुटणार देव जाणे.
नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू, तुम क्या जानो सच्चाई क्या होती है. अश्वत्थाम्याला खरे दूध काय ते माहितीच नव्हते म्हणतात, पाण्यात पीठ मिसळून तेच खात असे गरिबीमुळे. पुढे हस्तिनापुरात खरे दूध प्याला ते त्याला आधीच्या सवयीमुळे आवडेचना तशी गत झालीये तुमची =))
सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड लोक तुमचे गुरु, या दाढीवाल्याने अनेक ऐतीहासिक अस्सल कागदपत्र नष्ट केल्याचे सांगितले जाते. संस्थानिक ,वंशज यांच्याकडून कागदपत्र मिळवायची आणि नंतर गहाळ करायची .शिवाजीँचे धर्मनिरपेक्ष स्वरुप लोकांसमोर येऊ नये याची पुरेपुर खबरदारी ही आरेसी बांडगुळे घेत असतात. या दाढीवाल्याची लबाडी कळल्यानंतर एका संस्थानिकाने याला काठीने बदडून हाकलून दिले होते.
काही संघटनांनी यांची लायकी मराठी जनांपुढे आणली हे एक बरेच झाले .लोक जाब विचारायला लागले ,लोकांची चर्चेची वादाची तयारी असूनही हे कणाहीन इतिहासतज्ञ कुठे गायब झालेत हे त्या पासोड्या विठोबाला आणि पत्र्या मारुतीलाच ठाऊक.
बॅटमन,
तुम्ही ज्या तत्परतेने ग्रेटस्टिंकरसारख्या ब्राह्मणद्वेष्ट्या जातीयवाद्यांचे निराधार आरोप सप्रमाण खोडून काढत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन! खेडेकर, कोकाटे, नरके, सोनवणी इ. जातीयवाद्यांची पुस्तके हे वाचणार आणि इथे येऊन त्यातली गरळ ओकणार. पण तुम्ही त्यांचा प्रत्येक गलिच्छ आरोप सप्रमाण खोडून काढलेला आहे.
तूम्हीही ज्या तत्परतेने पुरंदरे ,मेहंदळे, बेडेकर या आरेसी बांडगुळांचे, जातियवाद्यांचे,इतिहासाची मोडतोड करणार्यांचे समर्थन करण्यासाठी जो आटापीटा करत आहात त्यासाठी आपले अभिनंदन.
पुरंदरे, पांडुरंग बलकवडे, मेहेंदळे, बेडेकर इ. स्वतंत्र प्रज्ञेचे व निष्पक्षपाती इतिहास संशोधक आहेत. ते काही इतरांसारखे सरकार स्पॉन्सर्ड जातीयवादी ब्राह्मणद्वेष्टे नाहीत. अर्थात तुम्हाला ते काय कळणार म्हणा? आणि तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा फारसा दोष नाही.
प्रतिक्रिया
जपणूक आणि वाताहात
या संस्थानिकांनी विविध संस्था
??
@ अन्या दातार....
@ ग्रे.थि.
अवांतरः अवध चा तो नबाब सजिद
संस्थानिकांचे हक्क आणि सवलती
विषयच संपला !!!
.
म्हणे संस्थानिक
हो. आणि वर हेच लोक एक्मेकांना
आयला....
भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही
मुघलांचे गोडवे गाणारे "हे"
तूमी खरे 'हे 'आहात, निजामाची
.
ख्या ख्या ख्या
भारतातेल संस्थानिकांनी
आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा...
.
.
पण मुख्य जागा आणि संपत्ती
.
सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज
.
सगळ्या द्या, त्या तूमचा खाजगी
आजकाल भिक देखिल धमकावुन मागितली जाते
जे स्वतःचे आहे ते जनतेने परत
तुमच्याकडे कुणी भीक मागितली
प्रश्न संस्थानिकांच्या
जनतेनी मागितली म्हणजे नक्की
राग येवु देवु नका भाऊ
नक्की काय फरक आहे ?
सहमत
दिल्लिचा पाटील.....Lol
http://shivsamarthyog
१८५७ च्या लढ्यात महादजी
१८५७ च्या लढ्यात महादजी
उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला
पानिपतच्या युद्धात अतुलनीय
युद्ध सोडुन पळुन गेले असे
शिंदे ,होळकरांची खडी फौज होती
आणि होळकरांनी माघार घेतली
तुम्ही सफेद दाढीवाल्याच्या
नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू
सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड
नरके, सोनवणी अन खेडेकर यांचे
+१
तूम्हीही ज्या तत्परतेने
पुरंदरे, पांडुरंग बलकवडे,
Pagination