Welcome to misalpav.com
लेखक: कुमारकौस्तुभ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मृत्युदंड देणार्‍या जल्लादाची मानसिकता काय असेल, सीमेवरच्या जवानाची काय असेल, वा असेच आणखी काही, या विचारात पडलोय लेख वाचून.. समोरच्याशी आपली काहीही वैयक्तिक दुश्मनी नाही हे माहीत असताना.. कुठून आणत असावेत माणसे मारण्याचा उत्साह.. मूळ लेख मस्त रोचक आणि माहितीपूर्ण !

सीमेवरच्या जवानाची काय असेल, कदाचित या प्रश्नाचे अंशतः उत्तर येथे मिळेल असे मला वाटते बघा ट्राय करुन http://fair-use.org/international-journal-of-ethics/1915/01/the-ethics-of-war

मृत्युदंड देणार्‍या जल्लादाची मानसिकता काय असेल,
या विषयावर मागच्याच रविवारी दूरदर्शनने एक अप्रतिम मल्याळम चित्रपट दाखवला होता, अदूर गोपालकृष्णन यांचा Nizhalkuthu (उच्चार माहीत नाही) नावाचा. अत्यंत डिस्टर्बिंग आहे. पण हा प्रश्न पडला असल्यास जरूर पहावा.

नक्कीच. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही कथा आहे. कलियप्पन हा एक जल्लाद. त्याने रहायचं गावाबाहेर, पण त्याला विशेष मान, राजाकडून भरपूर पगार, सुविधा वगैरे. एखाद्याला फाशी दिली, की तो फास त्याने घरी आणून टांगून ठेवायचा. गावातील श्रद्धा अशी की त्या दोराची राख त्याने कुणावर फुंकली, की त्याचा आजार बरा होतो. तोही हे काम भक्तिभावाने करत असतो. मात्र, म्हातारपण येत आहे, तसा तसा तो पश्चात्तापाने पोळला जात आहे. शेवटची फाशी ज्याला दिली होती, तो माणूस निरपराधी होता हे त्याला शेवटच्या क्षणी कळलं होतं हे तो आपल्या मुलाला सांगताना दिसतो. दारुच्या नशेत बुडून जाऊन तो मनातील खळबळ विसरायचा प्रयत्न करत आहे. असे असताना, राजाचा सेवक एका 'नि:संशयपणे दोषी' अशा माणसाच्या फाशीची आज्ञा घेऊन येतो. कलियप्पन जीव तोडून ती नाकारण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं ऐकून कोण घेणार? गावातील लोकांना आशा वाटू लागते की पूर्वीचा फाशीचा दोर संपत आल्यामुळे येणारा प्रश्न आता सुटेल. आणि या पार्श्वभूमीवर गावातल्या दोघांची चर्चाही चालू असते की 'फाशीचे पाप कुणाच्या माथ्यावर? फाशी देणार्‍याच्या की आज्ञा देणार्‍या राजाच्या' यावर त्यातील एक अशी माहिती देतो, की ते पाप लागू नये म्हणून फाशीच्या निर्धारित वेळेच्या आधी राजा त्या फाशी जाणार्‍याच्या सुटकेची आज्ञा देतो. ती आज्ञा अशा वेळेस पाठवली जाते, की ती तुरुंगात पोहोचेपर्यंत फाशी आटपलेली असली पाहिजे. म्हणजे पाप तर राजाला नाही, पण फाशीही दिली जाईल. आणि या व्यवस्थेचा अर्थ म्हणजे, जल्लाद हाच शेवटी पापी ठरतो. फाशीच्या दिवसापर्यंत कलियप्पनची तब्येत खूप ढासळते. त्याच्या मनातील पश्चात्ताप धुवून काढायच्या प्रयत्नात तो सतत थंड पाण्याने आंघोळ करु लागतो. गावकर्‍यांच्या मते ती त्याची 'साधना'असते. प्रत्यक्ष फाशीच्या आदल्या संध्याकाळी तुरुंगात जाऊन रहावे लागते. त्याला जागं ठेवण्यासाठी परंपरेप्रमाणे गोष्टी सांगितल्या जातात. पण गोष्ट ऐकता ऐकता तो मनाने पोळत जातो. त्या कथेतील लोकांच्या जागी त्याला आपण, आपलं कुटुंब दिसू लागतं. आणि शेवटी जेव्हा त्याला कळतं, की खरा आरोपी उजळ माथ्याने फिरत असून फाशी जाणरा माणूस निरपराध आहे, तेव्हा तर तो पूर्ण कोसळतो. ही मोठीच आपत्ती असते, कारण ठरलेल्या वेळेत फाशी झाली नाही, तर सुटकेची आज्ञा येणार. म्हणून त्याच्या मुलाकडून ती फाशी दिली जाते. राजाला पाप लागत नाही, आणि जल्लादाचं पाप चालू राहतं. या कथेला अनेक निरनिराळे पदर आहेत. ज्या दोराने एका मनुष्याला फाशी दिली, त्याच दोराच्या राखेने अनेकांना जीवन मिळवून देणे ही त्या जल्लादाच्या मनातील अपराधीपणाची भावना धुवून काढण्यासाठीची व्यवस्था असेल काय? फाशी जाताना निरपराधी माणसाने आपल्याला फाशी देणार्‍यालाच आपल्यावरील अन्याय सांगणे, म्हणजे त्याला जल्लादाबद्दल काहीच राग वाटत नसावा का, त्याची अगतिकता कळत असावी का? आपला स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला मुलगा फाशीच्या, आपल्या एकमेव उत्पन्नाच्या विरोधात बोलतो हे माहीत असूनही तो त्याला विरोध कधीच करत नाही. त्याच्या स्वतःच्याच भावनांना मुलाच्या विचारांतर्फे वाट मिळत असेल का? त्याचं कुटुंब सुखात जगत असताना त्यांचं क्षणाक्षणाला जळणं अक्षरशः कळतं, जाणवत राहतं. पण तो अगतिक असतो. जग त्याच्यामुळे सुखात असताना तो मात्र स्वतःच्याच निंदेला पात्र असतो. मला अनेक जाणवलेल्या गोष्टी नीटशा मांडता आल्या नाहीयेत. पण हा चित्रपट जरूर पहावा असा आहे. कसाबच्या फाशीच्या वेळी त्या फाशी देणार्‍याचा उदो-उदो चालला होता, तो हा चित्रपट बघताना खूप आठवला. :(

धन्यवाद. 'शॅडो किल' असा अर्थ दिला होता त्याचा. लोक-महाभारतातील एका कथेचा संदर्भ आहे असं विकीवर दिलं आहे. मलातरी ते इंटर्प्रिटेशन फारसं पटलं नाही/ कळलंच नाही...