Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हो खरे आहे, इथेच असे नाही तर शेजारच्या १-२ मराठी संकेतस्थळांवर देखील माझे लेख आणि प्रतिसादांचे प्रमाण असेच व्यस्त सापडेल. याबद्दल दिलगीर असलो तरी नाईलाजदेखील आहेच. पोटापाण्यासाठी चाकरी करताना आणि सोबत ईतर छंद आणि आवडी जपताना माणूस सोशलसाईटवर एक ठराविक वेळच देऊ शकतो, तो मी देतो. पण माझा बराचसा मित्रपरीवार ऑर्कुट समूहांवर असल्याने चर्चा आणि शक्य झाल्यास दिवसाच्या दोनचार गप्पा तिथेच मारल्या जातात. त्या वेळातला बराचसा भाग तिथेच दिला जातो. माझे फेसबूक अकाऊंटसुद्धा मी आठवड्यातून कधीतरी एकदाच चेकतो. तरीही, मराठी संकेतस्थळे किंवा मिसळपावचे बोलायचे तर आवडीच्या विषयानुरुप वाचणे होतेच, कथा वा लेख असेल तर आवडले असा प्रतिसाद कुठेकुठे देतोच, चर्चांच्या धाग्यात मात्र न उतरता फक्त वाचायचे काम करतो मग भले कितीही हात शिवशिवत का असेना, कारण मग ती फॉलो करावी लागते अन ते जमेलच असे शक्य नसते. थोडक्यात सांगायचे तर जसा तुमच्यासाठी मिसळपाव हा कट्टा आहे तसा माझा कट्टा दुसरीकडे ऑर्कुटवर आहे, फार पहिल्यापासून आहे, आणि एकाचवेळी सगळीकडे हजर राहू शकत नसल्याने मर्यादा येतात, मात्र ऑर्कुटचे दुकान पुढे मागे बंद पडल्यास आपसूक इथला वावर वाढेलच याची खात्री बाळगा.

त्याच्यां लय आयडी हायत . तिथुन प्रतिसाद देतात . =))

उद्या जर मी कोणाच्या लेखाला छान म्हटले याची परतफेड म्हणून माझ्या लेखाला कोणी छान आहे असा प्रतिसाद देत असेल तर ते मलाही नाही आवडणार. अर्थात अगदीच असा अर्थ तुमच्या वाक्याचा नसला तरी साधारण हे असेच झाले, गिव एण्ड टेक.

माझी शंका एकच आहे.... तुम्ही इथे लेख लिहीता पण इतर लेखांना प्रतिसाद का देत नाही? इथला प्रत्येक लेख तुम्हाला आवडलाच पाहिजे असा नाही, पण निदान तुमचे मत प्रकाशीत तरी करा... मी तर बर्‍याच वेळा १/२ वाक्यांत प्रतिसाद देतो. १००/२०० वाक्ये लिहिण्या इतका वेळ आहे. पण २ वाक्याचा प्रतिसाद देता येत नाही, हे काही पटत नाही...

तुमच्या शंकेचे उत्तर मी वरच्या पोस्टमध्ये दिले आहे. शक्य आहे ते आपल्याला पटले नसावे पण यामागचे खरे कारण तेच आहे तर वेगळे का सांगू? राहिला प्रश्न या पोस्टमध्ये आपण १००/२०० वाक्यांच्या लेखाची १/२ वाक्यांच्या प्रतिसादाशी करत असलेल्या तुलनेचा तर ती थोडी चुकीची आहे. लिखाणाला मी छंद म्हणून बघतो जसे कोणाला चित्र काढण्याचा असेल तर कोणाला एखादे वाद्य वाजवण्याचा. यासाठी वेळ त्यानुसारच निघतो. जसे काल हे ऑर्कुटवर मित्रांशी गप्पा मारताना सुचले तसे मी सरळ नेट बंद करून रात्री उशीरापर्यंत जागून लिहून काढले आणि मगच झोपलो. जसे एखादी आपली आवडती मैत्रीण चॅटवर बोलायला असेल तर आपण झोपेला तिलांजली देऊन रात्रभर तिच्याशी गप्पा मारत बसतो तसेच लिखाणाबाबतही माझे होते. बाकी आपल्या भावना समजू शकतो, त्यामुळे या वादात जिंकून मलाही फारसा आनंद होणार नसल्याने इथेच थांबतो.

फक्त २ आयडी हायेत इथं. ;) अर्थात त्यातूनही प्रतिसाद जेमतेमच आहेत, खोटे का बोला, पण दोघांची टोटल मारल्यास नक्कीच आकडा सुधारेल. :)

इथेच काय पण कुठल्याही वेब साईटवर आपन आपल्याला हवे तितके आय.डी. घेवू शकतो. मग मिपा वर पण डू आय डी असणारच ना?

ते चांगले कि वाईट हे वापर कसे करता त्यावर अवलंबून आहे. ऑर्कुटवर माझे एकेकाळी ८० प्लस होते, किंबहुना आताही आहेतच, फक्त सध्या ऑर्कुटचा पसारा मर्यादीत झाल्याने वापर नाही. येथील म्हणाल तर इथे मी लिखाण आणि वाचनच करत असल्याने ड्यू आय डी ची गरजच नाही. तरीही एक अतिरीक्त आहे तो अपघातानेच किंवा नाईलाजाने झालेला वा करावा लागलेला, पण त्याचा वापर पाहता त्याला ड्यू आयडी किंवा फेक न बोलता टोपणनावाने लिहितो असे म्हणू शकता. :)

छान. पण ते बोकड रक्ताला कसे काय चटावले बॉ? गवताला चटावले असते तर मानलं असतं एकवेळेस.

फॅण्टसी हो, ते साधेसुधे बोकड नव्हते तर तमाम मांसाहारप्रेंमींचा बदला घेणारे, आधी घेऊन झालेले आणि आता माझ्या मागे लागलेले होते..