Welcome to misalpav.com
लेखक: वडापाव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मी जन्माने मराठा पण पौरोहित्य शिकलोय आणि नात्यातल्या लोकांकडे करतो सुद्धा. पण बर्याच वेळा माझ्या शास्त्रोक्त पुजेपेक्षा माझी जात आडवी येते. त्या मुळे मी नक्की कोण हा सुद्धा प्रश्नच उभा रहातो.

मित्रा तुला काम करायच असेल तर , फक्त "मी हिंदू पुरोहित आहे" असे सांगत जा . आणि यावरंही कुणि काही बोललं ,तर "मी ,सावरकरांनी सांगितलेली -जात मानतो" असेही ठणकावायला विसरू नको! ------------ या विषयाधारित पुढिल गोष्टी आपण मेसेज मधे बोलू. :)

मी तर तो इतिहास वाचलेल्या ,खासकरून ब्राम्हणब्राम्हणेतरांपैकि काहींना "कोणत्याही जातितला पुरोहित" ही कल्पना उचलून धरलेलं पाहीलय! :) आणि मी स्वत: ३ ब्राम्हणेतर मुलांना वेदोक्त षोडशोपचार पूजा शिकवली आहे,ते सावरकर 'पचल्या' मुळेच!

सावरकर खरोखरच पचलेत का? मग ती गाय नावाची उपयुक्त पशू कधी पचवताय?

जर जातपात मानत नसाल तर स्वतः किंवा स्वतःचे झाले असल्यास आपल्या मुलांचे तथाकथित 'नीचांतर्जातीय' लग्न करण्याची धमक आहे काय? नै म्हणजे सावरकर पचण्याची टेस्ट बीफ खाणे हीच असेल, तर मग मुद्दाम नीचांतर्जातीय लग्न करणे हीच जातिभेद न मानण्याची टेस्ट असली पाहिजे, नै का.

विशेषतः आयव्हरी टॉवरमध्ये बसून नुस्ते विचार प्रसवणार्‍या नकर्त्यांनी आचरण केले पाहिजे, नैतर एक विचारमैथुन यापलीकडे त्याला अर्थ नाही. अन जेव्हा कर्त्यांशी नकर्ते भांडतात ते पाहणे मनोरंजक अन तितकेच केविलवाणे असते. अत्रुप्त आत्मा यांनी सुधारणावादी म्हणता येईल असे काहीतरी केलेय तरी किमान, तुम्ही काय केले म्हणून तुम्हाला असे पचकायचा अधिकार प्राप्त झाला? तेही सांगाच एकदा. की नुसते हम बोलेसो कायदा? ते ग्रेटथिंकर नरके अन सोनवणीसारख्यांना इतिहासकार वगैरे म्हणतात अन तुम्ही सुधारक बिहेवियरची टेस्ट बीफ खाण्याशी जोडताय. नक्की प्रॉब्लेम काय आहे तुम्हा लोकांचा? तथाकथित उच्चजातीय मुलीने डिच वगैरे तर केले नाही ना =))

शांत कॅटवुमनभर्तारा शांत! ;) संपादकांना नम्र विनंती, काही धागे सातत्याने अकारण वर राहून काही चांगले धागे खाली जात आहेत. किमान लिखाणपातळी सुद्धा न ठेवता सुरु असलेल्या ट्रोलिंगचा कंटाळा आला आहे. लोकानुनय करण्याच्या नादात संस्थळाची पातळी खालावली जाण्याची भीती वाढली आहे. वेगळं लिखाण करुन आपल्या भूमिका मांडण्याची संधी प्रत्येक आयडीला असताना अकारणच नको ते जातीविषयक वाद उकरुन काढण्याची संधी काही आयडी शोधत फिरताना दिसत आहेत. लक्ष घालावे. बाकी तुम्ही म्हणत असाल तर आमच्या चपला आमच्याकडे आहेतच. :)

>> नीचांतर्जातीय लग्न ह्याचा अर्थ लागलाय का त्यांना आधी विचार. नायतर संधीविग्रह करुन सांग जरा !! :))

जाऊ द्या मित्र हो.............. आमचे एक ज्येष्ठ व्यावसाईक असल्या तात्विक-निर्बुद्धांना म्हणायचे ना,,,तसं म्हणतो मी --- तितकाच तो!

मला वाटतं आता या धाग्यावर वेगळीच चर्चा चालू आहे, सारखे लक्ष ठेवून कंटाळा आलाय. वाचनमात्र करते आत्तातरी. नंतर बघता येईल. काय हो वडापाव महाराज, ठीक आहे ना?