Welcome to misalpav.com
लेखक: चतुरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ई ४ असे प्यादे पुढे टाकले तर काय असा विचार करतोय. घोडा कुठे जाऊ शकेल?

त्या घोड्याला उचकवण्यात अर्थ नाही. बहुदा कॅसलच करेल तो आता.

घड्याळ जरा मागं पडलंय. १७ मिनिटे जास्त घेतलीत मॅग्नुसपेक्षा. तिकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे.

घोड्यांचे एक्स्चेंज घडवून आणायचा डाव असावा. त्यामुळे मग बी प्यादे सी ३ मधे येऊन हत्तीला बी स्तंभ मोकळा मिळतो आणि हत्ती थेट बी ३ पर्यंत धडक मारु शकतो. दुसर्‍या बाजूने आनंदचा काळा उंट ई५ मधून सी ३ मधल्या घोड्यावर मोर्चा लावयला येऊ शकतो...असं काहीतरी..

कार्ल्सन ने घोडा एक्स्चेंज केला तर, पण ते थोडे अशक्य वाटते. आनंदचा काळा उंट किवा घोडा ई५- शक्य आहे. पण मग आनंद किल्लेकोट करणार आणि वजीराला हत्तीचा सपोर्ट देणार.

आपली चापलुसी इथेही दाखवायला हवी का हो मि. सुंदर. कशी माणसं ही च्यामारी. ह्यॅ:

दहा वेळा अम्मा, अम्मा चा घोष करायला मिळायला नको का? वीस कोटी काय उगीच दिलेत होय!! :)

घोडा ई५ मधे येऊन वजिराला मागे हटवायला बघणार असेल. कारण आता उंटाचा सपोर्ट असल्याने वजीर ई४ असा घोड्यावर येऊ शकत नाही.

प्याद्यांची संख्या समान आहे आणी सगळी प्यादी समोरासमोर आहेत. त्यामुळे प्याद्यांच्या रोलरकोस्टरला आपोआपच खीळ बसली! पांढरा घोडा बी आणि ई५ दोन्हीकडे येऊ शकत नाही. आता आनंद कॅसल करुन घेईल बहुदा.

ई७ मधे घेतलाय आनंदने आणि मग उंट डी७ कारण सी६ च्या प्याद्याला सपोर्ट.

बहुतेक त्याचे दोन्ही हत्ती कार्लसनच्या वजिराच्या बाजूला आणायचे असावेत. तिकडून बी स्तंभ उघडा आहे आणि कार्लसन तिकडे हत्ती चटकन आणू शकत नाहीये!

तुम्ही आम्ही जर बुद्धिबळ खेळत असलो तर गेम खूप खुला आणि बेसिक लेवलला असतो. हे दोघे जसे खेळताहेत ते पाहता पुढची खेळी काय असेल हे सांगणे कठीण आहे. मुळात एक खेळी ठरवून, प्यादी विकसित करून पुढे जातच नाहीयेत दोघे जण. ह्या क्षणी कार्लसन कडे एक घोडा ज्यादा आणि दोन हत्ती आहेत त्यावर गेम चा निर्णय लागायला हवा पण तो लगेच आक्रमण करणार नाही, समोरच्याचा पेशन्स पाहणार आणि आनंद काही पुढे जाणार नाही.

आता सी ६ वरचे दुबळे प्यादे एक्प्लॉईट करायला बघणार. घोडा ई४ मधे आणला त्याने. आता पुढची खेळी घोडा सी ५ अशी होऊन डी७ वरच्या उंटावर दबाव येणार आणि ए८ वरचा हत्ती धोक्यात येऊ शकतो. आनंदची पोझीशन नाजूक होत चालली आहे.