प्यादे एच ५ आता हत्ती पुढे काढून ई४ प्याद्याला सपोर्ट करायचा इरादा दिसतोय.
मॅग्नुसने उंट मारला. पुढल्या २ खेळ्या चटचट झाल्यात. एच प्यादी पटावरुन गेलीत.
काळ्याचा डाव सॉलिड आहे. अजूनतरी काही वीकनेस नाही.
फार हुषार आहे. डाव लाँग एंडगेमम्धे नेणे हे त्याचे उद्दिष्ट तो साध्य करतोय. आनंदला प्यादी सुद्धा सहज सरकवता येणार नाहीत. रुक एंडगेम तर आनंदसाठी चांगला नाहीच्.\जी ३ प्यादे सरकवले.
पहिल्यांदा मॅग्नुस विचारात पडलेला दिसतोय.
गुरुची विद्या गुरुला करण्याशिवाय आनंदकडे पर्याय दिसत नाही. तुला लाँग एंडगेम हवाय का घे मग आणि त्यातही मी जिंकून दाखवतो!
या संपूर्ण सामन्यात कार्लसन आनंदला कोणत्याही डावात फार मोठे पोझीशनल अॅडवांटेज घेऊ देणार नाही त्यामुळे होम प्रिपरेशनचा फारसा उपयोग नाही. काय खेळायचे ते आत्ता इथे पटावर.
मॅग्नुस खेळलाय ए ५! नेहेमीप्रमाणेच अनपेक्षित खेळी. तो राजाच्या बाजूला प्याद्यांची मोर्चे बांधणी करतच नहिये. सध्या जागा बळकावणे आणि वेटिंग मूव, आनंदला आव्हान आहे तुझा प्लॅन दाखव!
आनंदने फक्त एक गोष्ट साध्य केली आहे की त्याची प्याद्यांची रचना उअत्तम आहे. आणि मॅग्नुसचे दी प्यादे डबल आहे. एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्याला विजय मिळवायचा आहे!!
त्या डबल झालेल्या प्याद्यांनीच उत्तर कोट करून ठेवला आहे त्याच्या राजासाठी. याउलट आनंदचा राजा शेवटच्या पट्टीत असल्याने आणि पुढची तीनही प्यादी जागीच असल्याने लास्ट-फाईल चेक चा धोका कायम ध्यानात ठेवून चाल करावी लागते आहे. हे बंधन काहीसे परवाच्या एच पट्टीतला बंधनासारखे ठरू नये म्हणजे मिळवली.
आनंदने ई प्यादे घेण्याची घाई का केली कोण जाणे. कोपर्यात गेलेला वजीर पुन्हा सक्रीय झाला मॅग्नसचा. शेवटच्या फळीतला मेट-थ्रेट वाचवायला इतर पर्याय होते. खरंतर घोडा पुरेसा आहे. आणि घोड्यासाठी वजीर अडकवून ठेवणे परवडले नसते मॅग्नसला. :(
(हे रिकामे प्रतिसाद कसे पडतायत)
कदाचित असं असेल की आनंद आज रूक-पॉन एन्डिंगचा भरपूर अभ्यास करून आला असावा. पण दोन्ही हत्ती झटपट पटाबाहेर काढून मॅग्नसने त्याचा प्लान उधळून लावला असे दिसते.
कारण बर्याचदा या खेळी पटावरच्या स्थितीप्रमाणेच खेळाव्या लागतात फारसा अभ्यास करण्यासारखे नसावे. त्याने एनर्जी वाचवली. काळ्या मोहोर्यांकडून खेळण्याचे त्याने नक्की केले आहे. कारण आनंदकडे फार पर्याय आहेत असे वाटत नाही. कार्लसनला खेळी करु द्यायची आणि त्यावर उत्तम पर्याय शोधायचा हीच स्ट्रॅटेजी त्याला काही देऊ शकेल असा माझा अंदाज!
पण ते खुप म्हणजे फारच म्हणजे लैच म्हणजे अतिचशय अवघड आहे !!
आणि ह्यात नशिबाचा काही भाग नाही ...
बाकी हीच गोष्ट आपल्याला चेस बाबत आवडते .... इट्स अ गेम विदाऊट चान्स !! पाऊस पडला म्हणुन डकवर्थ लुईस नाही की दव पडल म्हणुन स्पिनरला अॅडव्हान्टेज नाही .... नो लक फॅक्टर ...
प्रत्येक पॉईट हा झगडुनच मिळवावा लागेल !!
आनंदची जराशी चूक आणि कार्लसन संधी घेईल कारण प्याद्यांच्या एंडगेमवर राजाच्या मदतीनं खेळण्यात त्याचं कमालीचं कसब आहे (सहावा गेम!). ड्रॉ झाला तर आनंदचं नशिब (म्हणजे वजीरावजीरी करुन). नाही तर कार्लसन सहजासहजी ड्रॉ सुद्धा होऊ देत नाही असा मागच्या सर्व गेम्सचा अनुभव आहे.
प्रतिक्रिया
येस!
वॉव!
मॅग्नुस
आनंद घोडा c3 ???
नाही कारण
१९ खेळ्यात
कार्लसन ने एक चुक केल्यास डाव आनंदकडे झुकेल अन्यथा ड्रो
आज त्याला चुक करावीच लागेल!
असं का वाटतंय?
एक नक्की झाले आहे की
बर्यच वेळानंतर आनंदची
एफ४ खेळला!
हत्ती एच-८
आता कंपल्सरी मारामारी आणि
आजच्या डावात
पण
हो ते सध्याच्या
ऊप्स
फारसा अॅक्टिव
आजचा गेम
आनंद डी ४ का खेळ्ला नाहि?
कारण
समजले नाही..
धन्यवाद! आले लक्षात !
आज फार दु:खी वाटत आहे...
का हो?
एकूण वातावरण उदास वाटत आहे...
डी ४ ने घोदा आणि वजीर एकत्र
आता वजीर जी २
घ्या तिच्या मारी ड्रो काय ?!
ड्रॉ !!!!!!
आनंदने आज फार काही केले नाही
किंवा
च्यायला
नाही तसं वाटत नाही
हे बघा
ड्रॉ इज लाईक लॉस्स फॉर आनंद
अगदी तसेच नाही कारण
पण ते खुप म्हणजे फारच म्हणजे
उद्याच्या डावात आनंदकडे
चला आता करमणूक ( पप) सुरू..
हा हा हा!!
एक प्रश्न
हा हा हा!
कोणीतरी बूस्ट पाजारे आमच्या
सचिनला बोलवा!
त्यामानाने
गेम एकदम ओपन आणि समबल आहे
प्रतिसाद अपलोड होईपर्यंत
सायकॉलॉगी ओफ चेस्स ....
Pagination