Welcome to misalpav.com
लेखक: निनाद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मी सहसा इंग्रजी चित्रपट पाहात नाही , संवाद कळत नाही आणि आवडत ही नाहीत. पण तुमची लेखन शैली आवड्ली. चित्रपट कधीच पाहणार नाही. कदाचित चांगला ही असेल. पण एखादी कलाकृती अंगावार धाडकन कोसळते म्हणजे काय हे निश्चित माहेत आहे त्यामुळे तुमचे लेखन भावले.छान समिक्षण केल आहे तुम्ही ! चित्रपट संपला आणि माझ्यासमोर ते फ्लेक्स येत राहिले. राजाचे राज पण आज पण उद्यापण आणि हातात पिस्तुल घेतलेला माणूस! अराजक आणि बंदुकांची क्षणिक सत्ता! आपली पण वाटचाल याच दिशेने होते आहे का? हा प्रश्न अस्वस्थ करायला लागला. भारतात असे कधीही होणार नाही याची खात्री बाळगा ! आपण समजतो त्यापेक्षा आपला समाज फार फार म्याचुअर्ड आहे.धर्माची ( नीतीशास्त्र या अर्थाने ) आपल्या समाजात फार खोलवर रुजली आहेत. देवभोळा आणि पापभिरु समाज आहे आपला !

आपला समाज फार फार म्याचुअर्ड आहे
शीख दंगली ? हिंदू मुस्लिम दंगली ? खैरलांजी ? आपल्या समूहामधल्या अशा प्रवृत्तींचे वेळोवेळी दर्शन झाले आहे ..

शीख दंगली ? हिंदू मुस्लिम दंगली ? खैरलांजी ? ही समूहाची मानसिकता आहे आणि तरीही क्रौर्याला मर्यादा आहे( तुलनेने), ज्या पद्धतीने समिकक्षणात सांगितले आहे ,त्यातील व्यक्तिगत क्रौर्य अंगावर शहारे आणणारे आहे ! विशेषतः लहान मुलांची मानसिकता ! ही विकृती आपल्याकडे घड्णार नाही असे वाटते.

भारतात असे कधीही होणार नाही याची खात्री बाळगा ! धाडसी आहे विधान.

:( !! कोनी बद्दलपण असच काही वाचल आहे. तुम्ही किती अस्वस्थ आहात हे लिखाणात पुरेपूर जाणवतय.

कोनीची ख्रिश्चन आर्मी तर अजूनच भयानक आहे... त्यांना देवाचे खरे राज्य येथे आणायचे आहे. :(

निनाद धन्यवाद. अप्रतीम व ओघवती शैली अतिशय सुन्दर समीक्षण, एवढे वाचल्यावर चित्रपट पहावाच लागेल. असेच लिहत रहा.
विनोद१८

जबरदस्त परिक्षण रे निनाद. चित्रपट देखील फार सशक्त असावा. पडदा खरच अर्धा अंधारात आहे. आणि हे केवळ वर्तमानाच्या कारण मिमांसेचं लक्षण नाहि. अफ्रीकेचा भूतकाळ रसातळाला नेला युरोपने. त्या जखमा अजुन भरल्या नाहित. आधुनीक जगाशी सांगड घालणे तर लांब राहिलं... त्यांना एक राज्यव्यवस्था म्हणुन देखील उभं राहता आलं नाहि अजुन :(

अफ्रीकेचा भूतकाळ रसातळाला नेला युरोपने. त्या जखमा अजुन भरल्या नाहित. आधुनीक जगाशी सांगड घालणे तर लांब राहिलं... त्यांना एक राज्यव्यवस्था म्हणुन देखील उभं राहता आलं नाहि अजुन पण त्यातही त्यांचा टोळीवाद अजून भयंकर. युरोपीय येण्याआधी तेथे काही तरी व्यवस्था होती ती युरोपीयनांना उध्वस्त केली हे मात्र खरे.

म बापरे.......लादेखील चित्रपट बघायचा धीर होईल असे वाटत नाही. आणि बघितल्यावर मी पुन्हा नॉर्मल होइन असेही वाटत नाही. पण ही हिंसा कशासाठी? इतके क्रौर्य....... नकळत्या वयात?

चित्रपट बघायचा धीर होईल असं वाटत नाही. असं म्हंटलय. पण चित्रपटात हिंसा असली तरी रक्तरंजित हिंसा नाही. म्हणजे एका बॉलिवुडपटात जसे ओंगळवाणे रक्ताळलेले चेहरे दाखवतात असे काही नाही. जे आहे जसे आहे तसे. गोळी लागल्यावर जसे बोटभर रक्त बाहेर येईल तसेच चित्रपटात दिसते. मरतांना शेवटचे संवाद, फायनल श्वास, क्लोजअप, ढ्यांग करून आलेले 'मुजिक', मग मरणे वगैरे वगैरे काही नाही...

म्हणूनच धीर होईलसं वाटत नाही. गुंडा बघायला मजा येते, वासेपूर कथानकामुळे आवडतो - तरी रियलिस्टिक हिंसा एक तिटकार्‍याची भावना आणतेच...

उत्तम मांडणी, लेखनाची पद्धत आवडली. मनात विचार आले, की, भरकट्लेले तारुण्य, अन्धारातलं भविश्य... अद्ज्ञाना मुळे वाढती पाशवी विचार सरणी, एका बाजूला जेव्हा माणूस मंगळावर जातोय, तेव्हा दुसर्या बाजूंला जगात अशीही परिस्थिती असते ह्याची कल्पना करवत नाही. गाळात रुतत चाललेलं आयुष्य आहे, ते शेवटी त्याच गाळात बुडूनच संपणार आहे, फक्त केव्हा ह्याची वाट पाहत दिवस काढतायत. असं होण्यामागची कारण भरपूर असतील, पण खरच भयंकर आहे.